(केजरीवाल जगातील प्रभावी व्यक्तीमत्व ठरल्याने...)

विकास's picture
विकास in काथ्याकूट
24 Apr 2014 - 5:26 am
गाभा: 

टाईम साप्ताहीक या जगातील अतिप्रतिष्ठीत साप्ताहीकात झालेल्या १०० लोकप्रिय प्रभावी नेत्यांच्या जनमतचाचणीत लाडके नेते श्री. अरविंद केजरीवाल हे पहीले आले आहेत तर देशाचे नेते नरेन्द्र मोदी हे दुसरे आले आहेत! अर्थात जरी केजरीवालांनी "हो" मतांमधे मोदींना मागे टाकले असले तरी "नो" मतांमधे मोदींनी बाजी मारली आहे. राहूल गांधींचा क्रमांक त्यांच्या वया इतकाच म्हणजे ४३वा आला आहे! तेंव्हा सर्वप्रथम केजरीवालांचे अभिनंदन! आता जरी ते देशाचे पंतप्रधान चुकून झाले नाहीत तरी सारे विश्वासाठीचे ते एक प्रभावी व्यक्तीमत्व ठरले आहेत. तेंव्हा आवडोत अथवा नावडोत केजरीवालांचे देशबांधव (आणि भगिनी) म्हणून, आता केजरीवाल यांनी आता आपल्या या तडफदार प्रभावी व्यक्तीमत्वाचा वापर करत या जगाच्या रहाटगाडग्याला परत योग्य पदावर आणण्यासाठी त्यांनी काही गोष्टिंना प्राधान्यक्रम द्यावा असे तुम्हाला वाटत असेल.

मी काही गोष्टींची यादी पुढे देतोयः (कोणत्याही खास (चढत्या/उतरत्या) भाजणीत ही यादी नाही)

  1. जागतीक स्तरावर "common men of the world unite" अर्थात "जगातल्या आम आदमींनो एक व्हा" असा नारा देतील
  2. टाईम साप्ताहीक अमेरीकन असल्याने सुरवात अमेरीकन व्हाईट हाउस समोर आंदोलन आणि पेनसिल्व्हेनिया अ‍ॅव्हेन्यू अथवा कॉन्स्टीट्यूशन अ‍ॅव्हेन्यूवर झोपून.
  3. युनायटेड नेशन्समधे जाऊन, "मै तो आम आदमी हूं" चे भाषण देऊन.
  4. चीन मधे तिआनमेन चौकात (चिनी सत्ता लाल डगल्यांच्या हातात असल्याने) लालपाल विधेयकाची मागणी करत आणि तशी करत असताना एखाद्या चिन्याकडून काँग्रेसची निशाणी स्वतच्या गालावर उठवून.
  5. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरॉन भांडवलशहांच्या हातात कसे गेले आहेत हे माध्यमांमधे आक्रस्ताळ्या आवाजात सांगून
  6. जर्मनीच्या अँजेला मर्कलयांच्या विरोधात (असली तर) निवडणुकीस उभे राहून
  7. रशिया क्रायमिआला मदत करत असल्याने विरोध करणार्‍या भांडवलशाही राष्ट्रांच्या विरोधात जागतिक आंदोलन उभारून.
  8. नक्षलवादी विचारवंतांना फोर्ड आणि तत्सम फाउंडेशनकडून अनुदान मिळवण्यासाठी स्वत:चे प्रभावी वजन खर्च करून
  9. अजून काही... (स्पष्ट करा)

यातील कोणती तीन कार्ये केजरीवालांनी हाती घ्यावीत असे वाटते? का? त्यांच्यात देखील प्राधान्यक्रम असेल तर तो कसा असेल? केजरीवाल हे जगातले सर्वोच्च प्रभावी नेते टाईम साप्ताहीकात ठरले आहेत. हे लक्षात ठेवा आणि त्याला अनुषंगून आपले विचार सांगा. उगाच टाईम साप्ताहीकात १९३८ साली हिटलर आणि १९४२ साली स्टॅलीन हे या साप्ताहीकात (किंचित वेगळी वर्गवारी पण) Person of the year झाले होते, त्यामुळे असल्या गोष्टींना अर्थ नसतो वगैरे म्हणत विषयांतर नको!

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

24 Apr 2014 - 5:55 am | आत्मशून्य

उगाच टाईम साप्ताहीकात १९३८
साली हिटलर आणि १९४२ साली स्टॅलीन हे
या साप्ताहीकात (किंचित वेगळी वर्गवारी पण)
Person of the year झाले होते, त्यामुळे
असल्या गोष्टींना अर्थ नसतो वगैरे म्हणत विषयांतर
नको!

एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे.

विकास's picture

24 Apr 2014 - 6:39 am | विकास

एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे.

केजरीराज्यात पाणी फुकट असल्यामुळे असेल. ;)

एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे.

थोडी दुरुस्ती करुन असे म्हणतो
एक अनिवाशी भारतीय दुसऱ्या निवाशी भारतीयाला कसे पाण्यात बघतो त्याचे हे विडंबन उत्त्तम उदाहरण ठरावे.

ए भाग्गो.....

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Apr 2014 - 8:16 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Apr 2014 - 8:16 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

चौकटराजा's picture

24 Apr 2014 - 8:28 am | चौकटराजा

आनीबाणीवाल्या इंदिरा गांधी चे भारतरत्न अजून कायम आहे ना ?

ऋषिकेश's picture

24 Apr 2014 - 9:31 am | ऋषिकेश

:)

अनुप ढेरे's picture

24 Apr 2014 - 9:42 am | अनुप ढेरे

=))

पैसा's picture

24 Apr 2014 - 9:43 am | पैसा

तियानमेन चौकात जावे हे लै आवडले. याच धर्तीवर आणखी काही अपेक्षा आहेत.

१. पाकिस्तानात जाऊन दाऊद इब्राहिमजी यांची भेट घ्यावी आणि पाकिस्तान-अफगाणिस्तानातल्या तालिबान्याना शांतीचा संदेश द्यावा. (म्हणजे त्याना शांतता पाळायला लावावी.)

२. नायजेरियावर दबाव आणून नायजेरियन्संनी अवैधरीत्या गोव्यात राहून ड्रज्ग व्यापार करणे थांबवावे

३. इस्लामी देशांत महिलांची गळचेपी थांबवण्याचे प्रयत्न करावेत. भारतातल्या मुस्लिम महिलांना निदान उन्हाळ्यात बुरखे वापरायची सक्ती करू नये अशी मागणी उलैमांकडे करावी.

आणखीन खूप अपेक्षा आहेत. पण सध्या त्यातल्या त्यात सोपी कामे पुढे ठेवली आहेत. ती झाली की मग पुढची यादी देण्यात येईल.

आयुर्हित's picture

24 Apr 2014 - 10:48 am | आयुर्हित

आधी दिल्लीतल्या रिक्षावाल्यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ द्या की.

संजय क्षीरसागर's picture

24 Apr 2014 - 10:52 am | संजय क्षीरसागर

तुमचं राममंदिर होईल, तुम्ही काळजी करु नका.

आयुर्हित's picture

24 Apr 2014 - 9:47 pm | आयुर्हित

राममंदिर झाल्यावर आपल्याहातूनच उद्घाटन होईल त्याचे, निश्चिंत रहा!

संजय क्षीरसागर's picture

24 Apr 2014 - 11:58 pm | संजय क्षीरसागर

तसं झालं तर सगळ्या मूर्ती हालवून, तिथे मी शाळेचे वर्ग बांधायला लावीन.

आयुर्हित's picture

25 Apr 2014 - 12:13 am | आयुर्हित

बमियानला केले तसे?

गब्रिएल's picture

25 Apr 2014 - 10:09 am | गब्रिएल

वा वा. १४०० वर्सापूर्वीपन कोनीतरी आसच क्येलं व्हतं; त्येचाच आवतार म्हनावा का काय हा ? "मी" सोडून जगात कोनीबी अक्कलवान न्हाय आसा आग्रेपाहायेच म्ह्ना आपला. येकदम जंक्शन. होउन जावंद्या. नायतर लय बकाल झालिया जग. होउन जाउद्या इस्कोट. अवतार बाबाकी जय !

आनन्दा's picture

24 Apr 2014 - 9:44 am | आनन्दा

बाकी ही यादी कशी बनवतात, त्यात कोणाकोणाचे योगदान असते, यावर पण जरा प्रकाश टाका ना भौ..
आणि "दरवर्षी ही यादी याच वेळेस प्रकाशित होते की यावेळेस अंमळ लवकरच प्रकाशित झालेय" असा नसता प्रश्न उगीच डोक्यात येउन गेला.

आनन्दा's picture

24 Apr 2014 - 9:47 am | आनन्दा

जाता जाता, ही बातमी तर "April 10, 2014" ची आहे? आज अचानक बाहेर कशी आली?

आनन्दा's picture

24 Apr 2014 - 9:50 am | आनन्दा

आणि, पहिले दोनही नेते भारतातले? भारत सोडून जगात नेते उरलेच नाहीत की काय? काय हे? आता जगाचे कसे होणार?

थोडक्यात, ही यादी म्हणजे मला केजरी आणि मोदी समर्थकांचे युद्ध वाटते, ज्यात केजरीसमर्थक जिंकलेत.

विकास's picture

24 Apr 2014 - 9:53 am | विकास

बातमी एप्रिल १० ची नसावी. त्या दिवशी ऑनलाईन पोल चालू झाले असावे. २३ एप्रिल (काल) पोल बंद झाले आणि निकाल जाहीर झाले. आज टाईममधे त्यासंदर्भात व्यवस्थित वृत्त येईल. राहूल गांधींचे नाव नसल्यास ते निवृत्त समजावेत. ;)

मला वाटते जगभरच्या बातम्यांच्या ट्रेंडवरून ही यादी तयार केली जात असावी असे वाटते. नक्की माहीत नाही.

पैसा's picture

24 Apr 2014 - 9:58 am | पैसा

तिथल्या प्रतिक्रिया वाचल्या. लोकांनी व्होटिंग केलंय आणि काहीतरी वेटेज फॅक्टर लावला आहे. नेमकी पद्धत काय बघावं लागेल. त्यातल्या सुरुवातीच्या काही प्रतिक्रियांवरून बॉट्सनी मतदान केल्याचे निष्कर्ष लोकांनी काढले आहेत. ३० आणि ४० लाख भारतीय लोक 'टाईम'वर जाऊन मतदान करायला रिकामटेकडे आहेत वाट्टं!

माहितगार's picture

24 Apr 2014 - 10:41 am | माहितगार

३० आणि ४० लाख भारतीय लोक 'टाईम'वर जाऊन मतदान करायला रिकामटेकडे आहेत वाट्टं!

सहमत

आनन्दा's picture

24 Apr 2014 - 1:15 pm | आनन्दा

अजून एक गोष्ट लक्षात आली,

१८ अप्रिल ला "Laverne Cox" (मला तो का ती हे माहीत नाही :) ) या यादीत प्रथम क्रमांकावर होता. त्याआधी वेगवेगळे युरोपियन. अमेरिकन लोक या यादीत स्पर्धा करत होते. अचानक १९/२० अप्रिल ला एके सर्वांना मागे टाकून या यादीत प्रथम क्रमांकवर विराजमान झाले.
ही पहा १७ अप्रिल ची बातमी -
Despite a rocky year for Justin Bieber, the Canadian pop star surged to the top of the TIME 100 reader poll, edging out Egyptian Presidential candidate Abdul Fattah al-Sisi. Though the final TIME 100 list of the most influential people of the year worldwide is always ultimately chosen by the editors, TIME seeks the input of readers in an online poll.

Music stars Rihanna and Lady Gaga take third and fourth place in the current poll, though Gaga has a clear lead.

असो. सत्य स्पष्ट, आणि या बहुमानावर आरूढ झाल्याबद्दल केजरींचे अभिनंदन, ही म्याच एव्हढ्या फरकाने आजपर्यंत क्वचितच कोणि मारली असेल. बाकी माहीतगार/ ऋषिकेश आणि क्लिंटन यांना या धाग्यावर खेचायचा मोह आवरत नाही, पैकी माहीतगार आहेतच.

माझा प्रश्न आहे की - मोदी आणि केजरी दोघांनी पण ही यादी मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला हे तर स्पष्ट आहे, पण तो फसलाय हे तर त्यपेक्षाही स्पष्ट आहे, तर एव्हढी मोठी चूक या दोघांकडून नेमकी कशी/ का झाली असावी?

माहितगार's picture

24 Apr 2014 - 2:29 pm | माहितगार

....आणि या बहुमानावर आरूढ झाल्याबद्दल केजरींचे अभिनंदन, ही म्याच एव्हढ्या फरकाने आजपर्यंत क्वचितच कोणि मारली असेल. ........माझा प्रश्न आहे की - मोदी आणि केजरी दोघांनी पण ही यादी मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला हे तर स्पष्ट आहे, पण तो फसलाय हे तर त्यपेक्षाही स्पष्ट आहे, तर एव्हढी मोठी चूक या दोघांकडून नेमकी कशी/ का झाली असावी?

(:) हा स्मायली केजरींच्यावरीने, ह.घ्या) माझा हा स्मायलीवाला विनोदाचा भाग सोडला तर आकडेवारीत प्रथमदर्शनी काहीतरी गफलत आहे असे वाटते, (माझ जिथपर्यंत निरीक्षण आहे) भारतीय लोकांचा आंतरजालावर एकुण (टक्केवारी) सहभाग सहसा (अती उत्साही वातावरणातसुद्धा) एवढा नसतो आणि परदेशी लोकांना भारतीय राजकारणात (अती उत्साही वातावरणातसुद्धा) एवढा रस नसतो. तरी सुद्धा हि कॉमेंट कुणी टाईमवर जाऊन टाकावी असे वाटत नाही कारण त्यांनी चुका सुधारल्या तर त्यातील गफलती शोधणे आपल्याला कठीण जाईल.

काही मॅन्यूपुलेशन झालच असेलतर (मी संशयवाद जेवण्यातलया चिमूटभर मीठा एवढाच ठेवण्याबद्दल दक्ष असतो तरीही मला शंका वाटते आहेच) केजरीवाल आणि मोदींनाच सरळ जबाबदार धरल पाहीजे अस नाही त्यांच्या समर्थाकांपैकी एखादा उत्साही प्राणी असू शकतो किंवा अशा सॉफ्टवेअरना कस गंडवल हे करून पाहणारे हौसेही या जगात कमी नाहीत. अर्थात या शक्यतांच्या पलिकडे जाऊन परकीय व्यक्ती देश आणि संस्था यांचे इतर हितसंबंधही व्यस्त असू शकतात या संदर्भाने मी वेगळा धागा काढला आहेच त्याचा येथे विस्तार करत नाही.

भारत थोडेसे स्रोत असलेला देश आहे त्या पेक्षा तो एक व्यावसायिक संधींकरीता विकसीत होत असलेला देश आहे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अण्वस्त्र सज्ज देश या नात्याने सामरीक दृष्ट्या खूप सशक्त नसला तरी महत्वाचा देश आहे. जर भारतीय पाकिस्तानी चिनी रशीयन लोकांना आमेरीकेतील तेथील ओपीनीयन इन्फ्ल्यूअन्स करण्याची इच्छा असू शकते (सध्या भारतीय वंशाच्या हॉटेल व्यावसायीकावर क्लिंटनबाईंच कँपेन प्रमाणाबाहेर फायनान्स केल्याबद्दल आमेरीकेत केस चालू आहे) तर आमेरीकेतील अथवा इतर देशातील लोक भारतीय राजकारणात प्रत्यक्ष हस्तक्षेप शक्य नसला तरी अप्रत्यक्षपणे ओपीनीयन्स इन्फ्लूएन्स करण्याचा प्रयत्न न करता राहतील का ?

आमेरीकेला भारत आणि पाकीस्तान (कडे अणवस्त्रे आहेत म्हणून ती खूपतात असे नव्हे तर इतरही देशांकडे अण्वस्त्रे असण्याच लॉजीकल समर्थन होऊ शकत त्यांच्या स्वतःच्या सामरीक सामर्थ्याला महत्व कमी होऊ शकत वगैरे किंवा खरोखरही भारतीय उपमहाद्वीपातील संघर्ष टोकाला गेलेतर काय या भिती मुळे जे किंवा जे काही कारण असेल ते) मध्ये काश्मिर प्रश्नावर चर्चा होऊन हवी असणे स्वाभाविक आहे आणि भारत इतर तीसर्‍या देशास या चर्चेत घेणार नाही हेही निश्चित आहे. भारत आणि पाकीस्तानच्या उजव्या नसलेल्या गटांकडून कितीही चर्चा झाल्या तरी जनतेची मान्यता मिळणार नाही; शॉक होऊ नका, मी आमेरीकन राजकारण्याच्या बुटात पाय ठेवले तर मी दोन्ही देशातील उजव्यांना पुढे येण्यास प्रोत्साहन देईन आणि चर्चेस बसवेन त्या करता दोन्ही कडे उजवे निवडून येतील या करता बरेच काही पडद्या मागून करण्यास जमलेतर करेन पण निश्चितपणे पडद्या मागून कारण माझा आमेरीकन राजकारणी म्हणून असा प्रत्यक्ष हस्तक्षेप भारतीय आणि पाकिस्तानी दोन्ही नागरीकांना खपणार नाही. हा भाग एक झाला.

आपण इकॉनॉमीक टाईम्सचे आणि भारत आमेरीका व्यापारी संबधांच्या वृत्तांचे अभ्यासक असाल तर दुसर्‍या बाजूला आमेरीकन व्यावसायिकांना हव्या असलेल्या आणि भारत सरकार देत नसलेल्या सवलतींमुळे आम्रेरीकन व्यापार्‍यांची नाराजीमुळे आमेरीक प्रशासनावरील त्यांचे दबाव मननीय आहेत. मी लंडन ऑलीपीक्सच्यावेळेस एक युरोमेरीकन स्त्रीचे नाव भोपाळ गॅसवाल्यांची बाजू घेऊन आमेरीकन कंपनीला विरोध वगैरेकरताना वाचल्याचे आठवते त्यानंतर तीच स्त्री भारतातील एका चळवळीची (आर्थीक) बाजू घेताना दिसली . भोपाल गॅसवर कधी काळी लिहू म्हणून जे दुवे जपले होते ते उघडून पाहताना आंतरजालावरून तीचे नाव हळू हळू गायब होते आहे असे हलकेसे जाणवत होते अशात दोन एक महिन्यापुर्वी ती त्या सर्व संदर्भ दुव्यातून हरवली होती. कदाचीत दुवे नैसर्गिक पणे बंद पडले असतील कदाचित माझा संशयवाद पुर्ण चुकीचाही असू शकतो. अशातील काही लोकांच्या भूमिका इराणशी संबंध सुधारण्यास साहाय्यभूत असणार्‍या असू शकतात असे वाटले सर्व संशय चुकीचे असू शकतात. उद्देश कोणत्याही भारतीय व्यक्ती अथवा पक्षाकडे बोट दाखवण्याचाही नाही.

भारतातील निवडणूका परकीय लोकांना पुर्णपणे प्रभावीत करता येणे निश्चीतपणे अशक्य आहे. सध्याचेच भारत सरकार खूप आमेरीकाभिमूख होते तरीही दुरावा येण्याचे थांबले नाही. पाहिजे ते प्रशासन आणून हवे ते सगळे साध्य करता येईल एवढाही कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी भारत कच्चा नक्कीच नाही त्यामुळे अशा शक्यतांची खूप चिंता करावी असे वाटत नाही. माझ्या सागंण्याचा मतितार्थ परकीयवृत्तसंस्थाच्या वृत्तांना प्रमाणा बाहेर महत्व देणे आपण टाळले पाहिजे. किमान पक्षी त्यांच्या वृत्तांनी भारतीय हुरळून जातात त्यांच्या वृत्तात अभिप्रेत असे अर्थ काढून प्रभावित होतात असे त्यांना कळता कामा नये.

माझी व्यक्तीगत मते आहेत कोणताही विदा आकडेवारी संदर्भ देणे कदाचित शक्य असणार नाही. कोणत्याही वादात पडण्याचे टाळावे म्हणून मी मिपावर हे लिहिणे टाळले होतो. हा प्रतिसाद न पटल्यास ह.घ्या नाहीतर माझा आणि आनन्दा यांच्यातील व्यक्तीगत मतांचा संवाद म्हणून सोडून द्यावे.

यादी मॅनिप्युलेट करण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला आहे पण तो Time कडूनच.
नाहीतर ५ दिवसात, १७ एप्रिलच्या बातम्यांत मोदी आणि AK४९ चे पहिल्या पाचात नाव असले पाहिजे होते.

Time चा हेतू चुकीची माहिती देवून भारतीय(अति हुशार /अति भावनिक)लोकांना गुमराह करायचा दिसतोय, हे नक्की.

विकास's picture

24 Apr 2014 - 5:55 pm | विकास

३० आणि ४० लाख भारतीय लोक 'टाईम'वर जाऊन मतदान करायला रिकामटेकडे आहेत वाट्टं!

व्हॉट्सअ‍ॅप वर टेक्स्टींग करायचे सोडून टाईम साप्ताहीकाकडे जायला कुणाला वेळ तरी आहे का? उगाच आपले काहीतरी... ;)

मोदी पंतप्रधान झाले तर तीन गोष्टी प्राधान्यक्रमानं करतील :

१) स्वतःचं लग्न! कारण ते स्वतःला मोस्ट इलिजिबल बॅचलर समजतात. आपकी अदालतमधे पूर्वी झालेल्या इंटर्व्यूमधे ते (लाजत लाजत) म्हणाले होते : "हमको सरकारने जमीन (प्लॉट) तो दे दी है, अब मकान कब बनेगा देखना है".

(जसोदाबेन बघा वाट)

२) अंबानी, अडानी आणि डिएलफनं प्रचारात केलेल्या उपकाराची भरघोस परतफेड बिजेपीच्या खास `कॉर्पोरेट किक बॅक स्टाईलनं' करणार.

(काँग्रेसी अवाक, त्यांचे एकामागून एक घोटाळे उघड होतात आणि हे डोळ्यादेखत लुटतायंत पण काही करता येत नाही)

३) ज्या एकमेव मुद्यावर संघानं (आणि वरुन दाखवायला बिजेपीनं) त्यांना पंतप्रधानपदाचा दावेदार बनवलं त्याची परिपूर्ती करणार, राममंदिर बांधून!

(असंख्य भारतीय खूष! आणि देशासाठी कायमची डोकेदुखी!)

सुहासदवन's picture

24 Apr 2014 - 10:26 am | सुहासदवन

माणसानं किती किती म्हणून आशावादी असावं ह्यासाठी आजच्या पिढीने तुमच्याकडे एक उत्तम उदाहरण म्हणून पाहिलं पाहिजे :))

संजय क्षीरसागर's picture

24 Apr 2014 - 10:39 am | संजय क्षीरसागर

आता टाईम्सच्या ओपिनियन पोलनं व्यापक स्तरावर लोक काय विचार करतात हे दाखवून दिलंय त्यामुळे बिजेपीप्रेमींची जळजळ होतेयं इतकंच.

विकास's picture

24 Apr 2014 - 5:57 pm | विकास

लेखात प्रश्न केजरीवालांच्या संदर्भात विचारले होते पण आपण त्या ठिकाणी चुकून मोदी वाचलेले दिसतेयं! असो.

आयुर्हित's picture

24 Apr 2014 - 10:41 am | आयुर्हित

खरोखरच Time चे मनापासून कौतुक करावेसे वाटते.
Time सारख्यांनी आपला धंधा(हो धंधाच!) कसा वाढवावा, याचा हा पाठ इतर माध्यमांनी घेण्यासारखा आहे.

जो माणूस दिल्लीमध्ये ५०० रुपये दान दिलेल्या एका रिक्षावाल्या वर प्रभाव पाडू शकला नाही,तो जगातील एक नंबरचा प्रभावी नेता कसा असू शकेल?

भारताच्या गृहमंत्र्यावर/पोलीस आयुक्तांवर/LGवर काय प्रभाव पाडला होता तेही सर्वांना माहिती आहेच.
ज्याने "येडा मुख्यमंत्री" हे शिंदेंनी दिलेलं बिरूद, राजीनामा देऊन सार्थ ठरविले.

माझ्या मते जगातला तर सोडाच, भारतातला एक नंबरचा विनोदी माणूस/जोकर म्हणून Time ने नाव घ्यावे.

Time ने जी लिस्ट दिली आहे त्यात १०० लोकप्रिय प्रभावी नेत्यांच्या जनमतचाचणीत २०१४ मध्ये "अण्णा हजारे" का नाहीत?

माझ्यामते भारतातील रिकामटेकडी जनता जी facebook वर like करते, त्याच्या संख्येवरून ही लिस्ट बनविली आहे, जी पूर्ण पणे बरोबर आहे फक्त "Most liked/disliked people" या नावाने छापली गेली पाहिजे होती.
Time ने भारतीय जनतेला वेडे बनविणे सोडावे व आपली ही अक्षम्य चूक कशी सुधारता येईल हे पाहावे.

संजय क्षीरसागर's picture

24 Apr 2014 - 10:48 am | संजय क्षीरसागर

बिजेपी सरकार आलं तर देशाची काय परिस्थिती होते पाहा मग कळेल कुणी कुणाला वेडं बनवलं ते.

विवेकपटाईत's picture

24 Apr 2014 - 9:32 pm | विवेकपटाईत

संजयजी पूर्वग्रसित होऊन मते बनवू नका. किमान योजना आयोगचे अहवाल तरी वाचत जा. ११व्या योजनेत भा ज प शासित राज्यांची कामगिरी अन्य राज्यांपेक्षा जास्त चांगली होती. हे सत्य आहे. बाकी मोदी आल्याने देशात मूलभूत -अर्थात रस्ते, रेल्वे, सिंचन, वीज इत्यादींना महत्व दिले जाईल ज्याने भारतीय उद्योगांचा विकास होईल. अमेरिकेला हे नको आहे म्हणून अमेरिका मोदी विरोधात आहे.

ज्या पक्षाच्या १५० अधिक केजरीवाल समेत असे उम्मेद्वार आहेत ज्यांच्या NGO ला कुठून मदत मिळते सांगायची गरज नाही. खाल्लेला मिठाला जगावे लागेतेच.

दिल्लीत वीज दर कमी करण्या एवजी सबसिडी वाढवली. सबसिडीचा पैसा कंपनीला बिन विल वसूल करताच मिळतो दिल्लीत वीज बिल वसूल करणे काही सौपे काम नाही. जेवढी जास्त सबसिडी तेवढा जास्त अंबानीचा फायदा (कुणाच्या खिशात आहे, कोण आहे लवकरच कळेल, घोर निराशा होईल) म्हण आहे न चोर मचाये शोर.

.

संजय क्षीरसागर's picture

25 Apr 2014 - 12:16 am | संजय क्षीरसागर

मोदी हे संघ आणि अंबानी-अडानी ग्रुपचं प्यादं आहे ही गोष्ट उघड दिसत असतांना, उगीच एखाद्या बथ्थड राजकीय नेत्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत `परकीय हस्तक्षेप आहे' असा कल्पनाविलास करणं हा भलताच ग्रह आहे.

सुहासदवन's picture

25 Apr 2014 - 1:08 pm | सुहासदवन

मोदी हे संघ आणि अंबानी-अडानी ग्रुपचं प्यादं

ह्या अश्या प्याद्यांचा उपयोग करूनच जवळ जवळ प्रत्येक मोठा उद्योजक आपली पो़ळी भाजून घेत असतो, त्यात गैर काय आहे?

प्रत्येक राज्यात तिथला मोठा उद्योगपती किंवा तेथील उद्योजक हे त्या राज्याच्या शासनावर थोडाफार प्रभाव ठेवून असतातच. शेवटी पैशाची आणि उद्योगांची मोठी उलाढाल तेच करतात. शासकीय तिजोरीत महत्वाची भर तेच घालत असतात.

महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे सुद्धा साखर आणि सहकाराच्या पैशाच्या माध्यमातून (पण फक्त) महाराष्ट्राच्या शासनावर प्रभाव ठेवून असतातच की.

आता समजा मोदीनी अंबानी-अडानी किंवा गुजरात मधील उद्योजकांना भारतीय बाजारपेठेत किंवा भारतातील इतर उद्योगांना गुजरातमध्ये एक महत्वाचे स्थान मिळ्वून दिले आहे,
तर मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना किंवा शासनाला कोणी रोखले होते, असे काही करण्यापासून?

अंबानी-अडानी च्या लेवलला जाऊ द्या पण महाराष्ट्राच्या मातीतील किती उद्योगांना किंवा उद्योजकांना भारतीय बाजारपेठेत स्वत:चे असे स्थान आहे?
टाटा नॅनो सारखे किती उद्योग दुसर्‍या राज्यातून खेचून आणून महाराष्ट्रात उभारले गेले?

उद्योगांचं जाऊ द्या, महाराष्ट्राच्या नेत्यांचे तरी काय स्थान आणि प्रभाव आहे भारतीय बाजारपेठेत (दिल्लीत)?

चांगल किंवा वाईट जाऊ द्या. पण निदान राष्ट्रीय लेवलला अंबानी-अडानी ह्यांच्या सारख्या उद्योजकांचे मोदींशी नाव तरी जो़डले जाते, गुजरातला ते निदान रिप्रेजेंट तरी करतात, पॄथ्वीराज चव्हांणाचे नाव, निदान आडनाव घेतल्यावर तरी कोणता (आदर्श) उद्योग किंवा उद्योजक आठवतो?

महाराष्ट्राच्या शासनाने खरंच काही चांगलं केलं असेल तर मग करा ना मार्केटिंग ह्या सार्‍याची.
वाट कसली बघताय...मोदी सरकारची!

संजय क्षीरसागर's picture

25 Apr 2014 - 2:27 pm | संजय क्षीरसागर

त्यानं मोनॉपॉली वाढते आणि त्यात जनतेला पर्याय न राहिल्यानं ती लुटली जाते. मोदी काय किंवा काँग्रेस काय मला सत्ताधार्‍यांना इंडस्टिअ‍ॅलिस्टनी नाचवणं गैर वाटतं. इंडस्ट्री जनहितासाठी चालली पाहिजे आणि इंडस्टियालिस्टलाही फायदा व्ह्यायला हवा पण संपत्तीच बेतहाशा केंद्रिकरण गैर आहे.

माहितगार's picture

25 Apr 2014 - 2:56 pm | माहितगार

सं.क्षी. लेखापरिक्षण आणि अर्थशास्त्र या बाबत आम्हाला आपल्या एवढ प्रगाढ ज्ञान नाही. आमच्या मते दोन गोष्टी आहेत व्यक्ती/संस्था आपल्या भोवतालच्या समाज, संस्कृती आणि व्यवस्थेचीच निर्मिती असतात. घडल्या चुकांना व्यक्तीं/संस्थांची जबाबदारी निश्चित केलीच पाहीजे हे खरे पण हे करताना या चुका व्यवस्थेतील त्रुटींमुळे होत असतील अथवा सांस्कृतीक प्रश्न असतील तर तिकडेही लक्ष दिले पाहीजे.

मला आपल्या व्यवसायाला लक्ष्य करायच नाही. पण भारतात लेखापालांची लेखापरिक्षकांची एकुण संख्या किती ? त्यां सर्वांचा सर्व कारभार शुद्ध आदर्श नितीमुल्यांनी चालू आहे असे सर्टीफीकेट आपण द्याल काय ? एखाद्या अयोग्य व्यवसाय करणार्‍या उद्योजकाने एखाद्या लेखापालाला लेखापरिक्षकाला मानधन दिलेही असेल म्हणून आपण डोळेझाकून लेखापालाला लेखापरिक्षकावर डोळे झाकून आरोप करतो का की अमूक लेखापरिक्षकाने तमूक उद्योजकाची गाडी वापरली ?

संशयाच प्रमाण जेवणातल्या मीठाच्या प्रमाणापलिकडे असून कसे चालेल ? का केवळ आपला तो बाब्या आणि दुसर्‍याच ते कार्ट एवढी एक आणि एकच भूमीका ठेवायची. आता महाराष्ट्रातली मतदान संपली आहेत आपापले राजकीय अंगरखे उतरवून समतोल विचारकरणे आत्मपरिक्षणही करणे या बद्दल सर्वांनीच सवडीने विचार करावा, (आणि मी हा निघालो बोलल्याप्रमाणे करण्यासाठी)

आयुर्हित's picture

25 Apr 2014 - 2:57 pm | आयुर्हित

संजय क्षीरसागरजी, आधी माणसं ओळखायला शिका! बाकी आपोआप चांगले होईल हो.त्यासाठी आआपजी गरज नाही.

आणि हो एक अजून, आम्हाला बोलवा हो थेठरात,सत्ताधार्‍यांना इंडस्टिअ‍ॅलिस्टनी नाचवतांना बघायला आवडेल!
कोण पवार की सोनिया की पप्पू नाचणार आहे तेही कळवा आधी!

संजय क्षीरसागर's picture

25 Apr 2014 - 9:33 pm | संजय क्षीरसागर

घडल्या चुकांना व्यक्तीं/संस्थांची जबाबदारी निश्चित केलीच पाहीजे हे खरे पण हे करताना या चुका व्यवस्थेतील त्रुटींमुळे होत असतील अथवा सांस्कृतीक प्रश्न असतील तर तिकडेही लक्ष दिले पाहीजे.

चुक नाही फ्रॉड हा शब्द लक्षात घ्या. फ्रॉड म्हणजे संगनमतानं केलेला अपहार. तो व्यवस्थापनातल्या पद्धती डावलून होतो आणि पैशाचा हव्यास हे त्याचं एकमेव कारण असतं.

एखाद्या अयोग्य व्यवसाय करणार्‍या उद्योजकाने एखाद्या लेखापालाला लेखापरिक्षकाला मानधन दिलेही असेल म्हणून आपण डोळेझाकून लेखापालाला लेखापरिक्षकावर डोळे झाकून आरोप करतो का की अमूक लेखापरिक्षकाने तमूक उद्योजकाची गाडी वापरली ?

दादाश्री, कोणतीही इमानदार व्यक्ती बेईमान माणसाचं काम करत नाही असा माझा व्यावसायिक अनुभव आहे. You can't bend honesty with money. त्यामुळे बेईमान उद्योजकाची मेहेरबानी प्रामाणिक माणूस स्विकारतच नाही!

मोदी; अडानी, अंबानी आणि डिएलएफच्या विमानातनं फिरतायंत आणि या कंपन्यांची कार्यप्रणाली उद्योग जगतात मशहूर आहे. त्यामुळे तुम्ही कितीही झाकले तरी मोदी उघडे पडणा. पण डोळेझाकच करायचीये म्हटल्यावर विवेकाचा प्रश्नच मिटला.

संशयाच प्रमाण जेवणातल्या मीठाच्या प्रमाणापलिकडे असून कसे चालेल ? का केवळ आपला तो बाब्या आणि दुसर्‍याच ते कार्ट एवढी एक आणि एकच भूमीका ठेवायची

संशय कसला? उघड दिसतंय. आता ज्यांना मोदीच प्रिय आहेत त्यांना पुढची पाच वर्ष कायकाय पाहायला लागणाराये याची कल्पनाच करावी. असो, आता संधी गेलीये त्यामुळे बोलून उपयोग नाही.

विकास's picture

25 Apr 2014 - 10:11 pm | विकास

आता ज्यांना मोदीच प्रिय आहेत त्यांना पुढची पाच वर्ष कायकाय पाहायला लागणाराये याची कल्पनाच करावी.

मोदी निवडणूक आणि बहुमतवाल्या पक्षाचे नेते म्हणून निर्वाचीत प्रतिनिधीअंतर्गत निवडणूक जिंकले की मोदीविरोधकांनी मोदी लाट नाही पण मोदीविरोधाची ओहटी मान्य केली ? :)

मात्र एक प्रश्न नक्कीच पडतो. जर चुकून मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांनी कुठलेही वादग्रस्त निर्णय न घेता जनतेच्या भल्यासाठी राज्य केले तर तुम्ही ते तसे वागले हे मान्य कराल का तरी देखील मोदी वाईटच असतील?

माझ्या पुरते बोलायचे तर केजरीवालांनी चांगले मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतले असते तर आणि अगदी उद्या तेच काय पण पप्पू गांधी जरी पंप्र झाला आणि चांगले निर्णय घेतले तर मी स्वागतच करेन. पण मला मोदी विरोधकांची याबाबतीत खात्री नाही म्हणून विचारत आहे.

इतकंच वाटतं. देशातला भ्रष्टाचार रोखला गेला आणि महागाई आवाक्यात आली की लोक सुखी होतील. मग ते मोदी की आणखी कुणी केलं यानं फरक पडत नाही. अर्थात मोदी जे बोललेत तसे वागले तर त्यांचं मनापासून कौतुक करीन यात वाद नाही.

केजरीवालांच्या दिल्लीतल्या राजकीय कारकिर्दी विषयी मतभेद आहेत. मला त्यांच्या सचोटी विषयी तिळमात्र शंका नाही.

आनन्दा's picture

26 Apr 2014 - 11:07 am | आनन्दा

मला, संधीचं सर्वांना समान वाटप व्हावं आणि देशाचा विकास व्हावा

मला वाटते संधी सर्वांना समानच मिळते. काही लोक त्यचा अधिक फायदा घेतात इतकेच. बाकी मी कोणत्याच माणसाला त्याच्या तात्कालिक कृत्यांवरून मापत नाही, अनेक गोष्टींचे दीर्घकालीन परिणाम समजण्यास आपण कमी पडतो, ते बर्‍याच वेळेस राजकारणी लोक दूरदॄष्टीने पाहत असतात, तेव्हा मोदींनी गेली २ वर्ष अदानींवर कृपा केली, डीएलएफचे विमान वापरले म्हणजे नंतर देखील असेच करतील असे नाही. त्या व्यक्तीचे दीर्घकालीन उद्दिष्ट, त्यांचे चरित्र्य वगैरे गोष्टी देखील बघणे आवश्यक आहे. आणि मोदी त्य कसोटीवर उतरतात म्हणूनच माझ त्यांना पाठिम्बा आहे. बाकी चारित्र्य वगैरे गोष्टींवर मोदींची तुलना मनमोहनसिंगांशी करयला माझी ना नाही.

आणि मुख्य म्हणजे, माझा क्रांती पेक्षा उत्क्रांतीवर जास्त विश्वास आहे, आणि हेच मला मोदींपेक्षा केजरीवाल जास्त आवडतात.

माहितगार's picture

25 Apr 2014 - 11:56 pm | माहितगार

सं.क्षी. राजकारण बाजूला ठेवल तरी तुम्ही प्रश्नांचा फारच एकांगी विचार करता असं वाटत. मी व्यक्तीपुजा आणि व्यक्तीद्वेष दोन्हीही टाळतो. मी मोदी समर्थक नसताना (मी कोणत्याही एका पक्षाचा कधीच समर्थक नव्हतो) सुद्धा तुमच्या लेखी मोदी समर्थक होऊन जातो हे अनुभवताना गंमत दुसरीकडे काळजी वाटते काँग्रेसची जागा घेण्याची चांगली संधी असलेला एक पक्ष मतदारांनाच दोषी ठरवत मोठा होऊ पहातो आहे. लोकांना कन्व्हीन्स करण्याच्या मोठे होण्याच्या अशा पद्धती यशस्वी होत असतील तर माहीत नाही सामान्य माणूस म्हणून बघताना प्रांजळपणे सांगायचे झाले तर जुनेच औषध (पद्धतीचे) नव्या बाटली (नव्या नावाने) माझा देश एक चांगल्या बदलाची संधी दवडत नाही ना अशी साशंकता येते हे एक. अशा साशंकता व्यक्त करणार्‍यांना विश्वासात घेण्या एवजी नकारात्मक मार्केटींगचा आधार हे दोन. आणि असे दाखवून देणार्‍यांची लगेच विरोधक म्हणून बोळवण हे तीन, असे सांगणार्‍यांचे ऐकण्याची एक पैसाही तयारी नसणे हे चार, म्हणजे जो तुमचा विरोधक नाही तो पण विरोधक कसा होईल हे स्वतःहून पहाणे. आम्ही मिपावर कुणाचे पैसे घेऊन आलोय का बावळट आहोत का आम्हाला विवेक नाही ?

उत्साह उपयोगाला येतो पण मर्यादा असतात, महाराष्ट्रात निवडणूका संपल्यात जमा आहेत अंगरखे आणि चष्मे बाजूस ठेऊन आत्मपरीक्षणही केल्यास पुढच्या वेळी आपल्यालाच प्रचारात सुधारणा करण्यास आपल्या चाहत्याची बाजू अधीक समर्पक पणे मांडण्यास उपयोग होईल. माझ्या खालील धाग्याचे सावकाशीने वाचन करावे घाई नाही.

नकारात्मक प्रचाराचे प्रकार आणि मर्यादा, विरोधाभास, व्यक्तिगत हल्ले, व्यक्तिगत आरोप, व्यक्तिलक्ष्य तर्कदोष

हो ना, कारण तुम्ही फक्त माहिती जमवतायं,जस्ट अ कॉपी-पेस्ट जॉब ! माहितगाराला स्वतःचं मत नसतं. आणि मजा अशीये की तरी सुद्धा तुमची मतं लपत नाहीत! ही दोलायमान स्थिती आहे आणि त्यामुळे निरुपयोगी ठरते. न घरका न घाटका.

तुम्ही म्हटलंय `आम्ही मिपावर कुणाचे पैसे घेऊन आलोय का बावळट आहोत का आम्हाला विवेक नाही? '

हे तुम्ही स्वतःचं मत स्वतःवरच लादतायं कारण मी असं कुठेही म्हटलं नाही. उलट तुमच्या प्रतिसादाला व्यवस्थित उत्तर दिलं होतं. नुसती माहिती जमवणारा, मोदी हा कॉर्पोरेट फ्रॉड आहे याचा प्रतिवाद करु शकत नाही.

तुम्ही तुमच्या धाग्यांची लिस्ट दिली आहे. मी तुमचे धागे वाचत नाही कारण मला ते निरर्थक वाटतात.

माहितगार's picture

26 Apr 2014 - 11:13 am | माहितगार

मनमोकळ्या प्रतिसादासाठी धन्यवाद

आयुर्हित's picture

24 Apr 2014 - 12:38 pm | आयुर्हित

विकासजी, आपणास धन्यवाद!
आपला लेख वाचून मिपावर लिहिलेला प्रतिसाद तासाच्या तसा Time वर Copy & Paste केला आहे.
हा प्रतिसाद वाचून Time ने चक्क Heading बदलले!
नवे heading असे आहे :
Indian Politician Arvind Kejriwal Wins TIME 100 Readers’ Poll

आधीचे heading असे होते: The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll

संपादक मंडळ, हा मिपाचा एक प्रकारे विजयच आहे.

प्यारे१'s picture

24 Apr 2014 - 1:09 pm | प्यारे१

>>>आपला लेख वाचून मिपावर लिहिलेला प्रतिसाद तासाच्या तसा Time वर Copy & Paste केला आहे.
>>>संपादक मंडळ, हा मिपाचा एक प्रकारे विजयच आहे.

मिपावर श्रेणी देण्याचा प्रकार सुरु होणार आहे का? 'अतिविनोदी' अशी श्रेणी द्यावी-शी वाटत आहे.
माणसानं स्वतःबद्दल किती अवास्तव कल्पना कराव्यात ह्याला काही मर्यादा????????????

अवास्तव कल्पना करण्यासाठी ठेवलाय ना एक माणूस मिपावर? कोटा वाढवलाय काय?? ;)

Indian Politician Arvind Kejriwal Wins TIME 100 Readers’ Poll

हे शीर्षक आधीच्या या शीर्षकापेक्षा

The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll

निश्चित जास्त प्रभावी आणि स्पष्ट आहे.
(संपादित)

आयुर्हित's picture

24 Apr 2014 - 1:17 pm | आयुर्हित

हा विनोद ही नाही, सत्य घटना आहे.
पाहिजे तर माझ्याकडे Time चा मूळ लेख, नवा लेख व लेखावरील सर्व कॉमेंट्स copy करून ठेवल्यात.
Mail id द्या, mail करतो आपणास!

प्यारे१'s picture

24 Apr 2014 - 1:44 pm | प्यारे१

इथेच टाका की. तुम्च्या प्रतिसादानं टाईमचं हेडींग बदललं असेल तर कौतुकच आहे.

टाका इथं. लिंक दिलीत तरी चालेल. तुम्हाला जमत नसेल तर संपादकांना सांगा.

मिपाचा एक प्रकारचा विजय असल्यानं संपादक अथवा मालक सुद्धा मदत करतीलच ही खात्री आहे.

आयुर्हित's picture

24 Apr 2014 - 2:20 pm | आयुर्हित

प्रशांतजी व admin आपल्याला mail पाठवला आहे. व लिंक्स जोडल्या आहेत.
यात पहिल्या file मध्ये ४८८ comments होत्या, ज्या नवीन धाग्यात फक्त ९५ दिसत आहेत, ज्यात माझी comment मला सापडली नाही (बहुतेक उडवलेली दिसते!)

आधीचे Heading असलेली file

The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll

आत्ताचे Heading असलेली file

Indian Politician Arvind Kejriwal Wins TIME 100 Readers’ Poll

थॉर माणूस's picture

25 Apr 2014 - 3:38 pm | थॉर माणूस

म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की टाईम्सच्या साईटवर तुम्ही मराठीतून प्रतिक्रीया पाठवलीत. ती त्यांना समजली म्हणून त्यांनी लेखाचं शिर्षक बदललं. आणि ते तुमच्या प्रतिक्रीयेमुळे बदललं हे कुणाला कळू नये म्हणून तुमची मराठीतली प्रतिक्रीया पण उडवली? *ROFL*

आयुर्हित's picture

26 Apr 2014 - 4:51 am | आयुर्हित

होय, मला हेच म्हणायचे आहे.
आणि पुरावा आपल्या समोरच आहे.

चित्रगुप्त's picture

24 Apr 2014 - 1:42 pm | चित्रगुप्त

माझ्या माहिती प्रमाणे पॅरिस मधे आयफेल टॉवर जवळ केजरीवाल प्रेमींनी एक मोठी सभा भरवली होती, त्यानंतर पत्रके वगैरेही वितरित केली गेली होती. याप्रकारच्या सभा परदेशात मोठ्या प्रमाणावर झाल्या असल्यास 'टाईम' ने त्या आधारावर मूल्यमापन केले असू शकते.
या सभेविषयी जास्त माहिती हवी असल्यास मिळू शकते.

मृत्युन्जय's picture

24 Apr 2014 - 2:03 pm | मृत्युन्जय

एक मिनिट. का फुकाची चर्चा करतो आहोत आपण? जर समजा केजरी वाराणसीमधुन निवडुन आले तर काय ते स्पष्ट होइलच की. मला वाटते केजरीवाल जर जिंकले तर ते जास्त लोकप्रिय आणि प्रभावी आहेत हे लोकांनी मान्य केलेच पाहिजे. टाइम वर आपला विश्वास नसेल कदाचित. जनमतावर ठेउयात ना. तिथे तर कळेलच की.

बादवे: अब की बार मोदी सरकार ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Apr 2014 - 2:29 pm | llपुण्याचे पेशवेll

वरच्या भागाशी सहमत नसलो तरी 'बादवे' शी सहमत आहे.
अबकी बार मोदी सरकार.

पैसा's picture

24 Apr 2014 - 2:33 pm | पैसा

विकास यांनी विडंबन म्हणून लिहिलेल्या धाग्यावर गंभीर वाद सुरू झाले ही धाग्याची शोकांतिका!
आणि ज्या दोघांनी आंतर्राष्ट्रीय पातळीवर अजून काहीच केलं नाही त्यांना "The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll" मधे टाईम मॅगझिन स्थान देतं हे आंतर्राष्ट्रीय राजकारणाचं विडंबन झालं.
या यादीत ओबामाकाका कुठे आहेत मग?

माहितगार's picture

24 Apr 2014 - 2:47 pm | माहितगार

मतदान फेर्‍या संपत आल्यात वादाच्या आपापल्या तोफा वेगवेगळ्या समर्थक मंडळींनी थंड करावयास ठेवल्यास हरकत नाही. धागा आणि मिपावर शांतता नांदण्याच्या दृष्टीने माझे प्रतिसाद कुठे उडवण्याची गरज भासल्यास मोकळेपणाने उडवावा ही नम्र विनंती.

पैसा's picture

24 Apr 2014 - 2:50 pm | पैसा

माझा प्रतिसाद केवळ एक सामान्य सदस्य म्हणून आहे. तुमच्या एकट्याच्या गंभीर प्रतिसादांचा तिथे काही संबंध नाही. बाकी खूपजण हा धागा गंभीरपणे घेताना बघून मला जाम गंमत वाटत आहे!

माहितगार's picture

24 Apr 2014 - 3:01 pm | माहितगार

होय ना या धाग्याचा वेगळा उद्देशपाहून मी माझा वेगळा धागा काढला होता. (तरीही आनन्दांना लांबलचक प्रतिसाद देत बसलो :) )

एनीवे समर्थकांना त्यांचे त्यांचे लोक निवडून येण्याचा सारा प्रभाव मिपा धाग्यांमूळे पडतो एवढा मिपावर विश्वास आहे हे अशा निमीत्ताने सिद्ध होते हे काय कमी आहे ? :)

मत आतातशी मतपेटीत गेली पुढची पाचवर्षे हसायचंच काम आहे ;)

अजून मुंबईत संध्याकाळपर्यंत मतदान होईल आणि टाइम पोलसारख्या गोष्टींचा सूज्ञ लोक (हॅ हॅ हॅ वाले सोडा, त्यांना कशाचंच काही पडलेलं नाही), निश्चित विचार करतील अशी अपेक्षा आहे.

माहितगार's picture

24 Apr 2014 - 3:38 pm | माहितगार

तर अर्ध्या दिवसाच घोडा मैदान बाकी आहे म्हणताय ? टाइम टाइम ची बात आहे तर !! जो जे वांछील तो ते लाहो आमच्या शुभेच्छा जशा इतरांना तश्याच तुम्हालाही मतदानाचा अर्धा दिवस तुमच्या इच्छेनुसार जावो ही सदिच्छा. विरोधकहो नाराज होऊ नका अशाच सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत. (कुणीही निवडून आले तरी माहितगारच्याच सदिच्छेने ;) ह. घ्या.)

सं.क्षी. राजकारण हा विषय कधीच हसण्यावारी नेत नाहीत असे दिसते. ज्याची त्याची मर्जी पण इतर कोणत्यातरी आवडीच्या विषयात कधी तरी अधून मधून मोकळेपणाने हसून घेत रहा म्हणजे झाले. आपल्या आनंदा करता आमच्या केजरींनाही शुभेच्छा.

पैसा's picture

24 Apr 2014 - 3:49 pm | पैसा

तुम्हाला केजरीवाल गंमतीशीर वाटतात का?

मला ब्वा विनोदी धाग्याला गंभीरपणे घेणारे लोक गंमतीशीर वाटतात! आणि टाईम मॅगेझीनसुद्धा!

आणि ज्या दोघांनी आंतर्राष्ट्रीय पातळीवर अजून काहीच केलं नाही त्यांना "The 100 Most Influential People in the World: Readers’ Poll" मधे टाईम मॅगझिन स्थान देतं हे आंतर्राष्ट्रीय राजकारणाचं विडंबन झालं.

तुमचा अभिषेक's picture

24 Apr 2014 - 2:38 pm | तुमचा अभिषेक

रजनीकांत नंतर श्री केजरीवाल, श्री मोदी, कु. राहुलगांधी ही आजच्या तारखेला भारतीय सोशलसाईटसवर चांगल्यावाईट कारणांनी धुमाकूळ घालणारी लोकप्रिय व्यक्तीमत्वे आहेत. यात अगदी सौ. सनी लिऑनचेही नाव जोडू शकता. दर दुसरा फॉर्वर्डेड मेसेज यांच्यापैकी एकावरच असतो. त्यामुळे यालाच जनमाणसांवर टाकलेला प्रभाव म्हणून गणले तर हे शक्यय.

पैसा's picture

24 Apr 2014 - 2:48 pm | पैसा

मग या यादीत आलोकनाथ का नाही बरे?

तुमचा अभिषेक's picture

24 Apr 2014 - 3:11 pm | तुमचा अभिषेक

कारण यादी प्रभावी "नेत्यांची" आहे, अन्यथा रजनीकांत पहिला नसता. ;)

प्यारे१'s picture

24 Apr 2014 - 4:02 pm | प्यारे१

सनी लिऑन फारच प्रभावीपणं 'नेते' असं म्हणायचंय का? ;)

(ए *ड, कुठं आहेस तू?)

मनीषा's picture

24 Apr 2014 - 4:09 pm | मनीषा

कुठलही एक कार्य हाती घेण्यास हरकत नाही पण ते पूर्ण करावे .
नुस्ती "बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात " .... असं नको.

आयुर्हित's picture

24 Apr 2014 - 4:40 pm | आयुर्हित

१००% सहमत.
धन्यवाद.

मूकवाचक's picture

24 Apr 2014 - 4:44 pm | मूकवाचक

=))

विकास's picture

24 Apr 2014 - 5:03 pm | विकास

वर पैसाताईंनी म्हणल्याप्रमाणे हा धागा विरंगुळा आणि ऋषिकेश यांच्या "मोदी पंप्र झाले तर" धाग्याचे काहीसे विडंबन होते. थोडक्यात निव्वळ टाईमपास. अर्थात टाईम साप्ताहीकाने टाईमपास केलेला नाही! एका अर्थाने त्यांचा हा business survey आहे. सध्या टाईम जास्त कुठे वाचले जाऊ शकते, कोण वाचते आणि काय वाचते याचा एक ढोबळ अंदाज यात लागू शकतो असे वाटते. यात टाईम ने कुठेही काही ठरवलेले नाही. निव्वळ जे काही हो - नाही मत पडले त्यावरून क्रमवारी ठरवली आहे.

यात केजरीवालांना "हो" अशी जास्त मते मिळाली म्हणून ते "या टाईमाचे" प्रभावी नेते झाले तर मोदींना "नो" म्हणून सगळ्यात जास्त मते मिळाल्याने ते "टाईमलेस" प्रभावी नेते झाले! ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Apr 2014 - 5:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. अरविंद केजरीवाल
२. नरेंद्र मोदी
३. Katy Perry : गायिका
४. Justin Bieber : पॉप गायक
५. Laverne Cox : अभिनेत्री
६. Rihanna : अभिनेत्री आणि गायिका
७. Benedict Cumberbatch : नट
८. Beyonce Knowles : अभिनेत्री आणि गायिका
९. Jared Leto : नट, दिग्दर्शक, निर्माता, इ.
१०. Lupita Nyong'o : अभिनेत्री, दिग्दर्शक, इ.................................... इतके पुरे नाही का ?!

लोक्स, लोक्स, लोक्स...

या यादीतली क्रमांक ३ पासून पुढची नावे बघितल्यास त्यांचा वीसएक वर्षाखालील अमेरिकन (आणि इतर देशातीलअमेरिकनाईझ्ड) लोकसंख्या सोडून इतरांवर काय कपाळाचा प्रभाव पडणार आहे ? आणि जागतिक राजकारणावर त्यांचा प्रभाव पडेल असे म्हणणे म्हणजे काय हे सांगायलाच हवे काय?

वरचा डेटा आणि शेवटच्या एकदोन दिवसांतील झालेले मतदान पाहता, एकतर ही संगणक वापरून टाईमची केलेली चेष्टा आहे किंवा केजरीवाल आणि मोदींच्या अतीउत्साही पाठीराख्यांनी केलेली फुकाची चढाओढ केली आहे... दोन्हीना ना शेंडा ना बुडखा !

इथे तर त्याचा "सबळ पुरावा" म्हणून वापरत लोक "बाजारात तूरी... " चा संगित प्रयोग करत आहेत?! =)) . =)) . =))

विकास's picture

24 Apr 2014 - 5:35 pm | विकास

एकतर ही संगणक वापरून टाईमची केलेली चेष्टा आहे किंवा केजरीवाल आणि मोदींच्या अतीउत्साही पाठीराख्यांनी केलेली फुकाची चढाओढ केली आहे... दोन्हीना ना शेंडा ना बुडखा !

सहमत.

बाजारात बाकी धान्याचा तुटवडा असला तरी तुरीचे अमाप पिक आले आहे, त्यामुळे काळजी नसावी. ;)

क्लिंटन's picture

24 Apr 2014 - 5:41 pm | क्लिंटन

या यादीतली क्रमांक ३ पासून पुढची नावे बघितल्यास त्यांचा वीसएक वर्षाखालील अमेरिकन (आणि इतर देशातीलअमेरिकनाईझ्ड) लोकसंख्या सोडून इतरांवर काय कपाळाचा प्रभाव पडणार आहे ? आणि जागतिक राजकारणावर त्यांचा प्रभाव पडेल असे म्हणणे म्हणजे काय हे सांगायलाच हवे काय?

छे हो इस्पिक एक्का असे कसे म्हणता? मोदींना मागे टाकून केजरीवाल पहिल्या क्रमांकावर आले आहेत यामुळे मोदी समर्थकांचा कसा जळफळाट होत आहे हे बघितले नाहीत का? :)

टाईमसारख्या जागतिक प्रसिध्दीच्या मासिकाने केवळ वाचकांकडून असे पोल मागविणे हा प्रकार केला ते बघून आश्चर्य वाटले. केजरीवालांना ३२ लाख मते मिळाली आहेत म्हणे. एकट्या तामिळनाडूमधून त्याच्या दसपट मते रजनीकांतला सहज मिळू शकतील म्हणजे रजनीकांत पूर्ण जगातले आघाडीचे व्यक्तिमत्व झाले असा अर्थ घ्यायचा का?

प्यारे१'s picture

24 Apr 2014 - 6:24 pm | प्यारे१

>>>>>>>रजनीकांतला सहज मिळू शकतील म्हणजे रजनीकांत पूर्ण जगातले आघाडीचे व्यक्तिमत्व झाले असा अर्थ घ्यायचा का?

छे छे!
रजनीकांतनं घेतलेल्या सर्व्हेमध्ये टाईमला पहिल्या १० अब्ज मध्ये स्थान नाही!

एकट्या तामिळनाडूमधून त्याच्या दसपट मते रजनीकांतला सहज मिळू शकतील म्हणजे रजनीकांत पूर्ण जगातले आघाडीचे व्यक्तिमत्व झाले असा अर्थ घ्यायचा का?
हॅ.हॅ.हॅ... रजनी अण्णाचे नाव जर टाकले असते तर टाईमचा सर्वर लगेच क्रॅश नसता का झाला ? ;)

माहितगार's picture

25 Apr 2014 - 3:34 pm | माहितगार

हॅ.हॅ.हॅ... रजनी अण्णाचे नाव जर टाकले असते तर टाईमचा सर्वर लगेच क्रॅश नसता का झाला ?

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Apr 2014 - 6:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

नक्कीच.

पण आजकाल "केवळ सोईच्याच नव्हे तर आस्तित्वात नसलेल्या / व्हर्च्युअल राईचा देखिल पर्वत करणे" आणि "समोर असलेला गैरसोईचा पर्वत स्वतःचे डोळे घट्ट झाकून आस्तित्वातच नाही" असे म्हणणार्‍या स्वयंघोषीत विचारवंतांची लाट आली आहे...

हा आजार सर्वकाळ (एंडेमिक) असतो आणि निवडणूकीच्या मोसमात त्याची जोरदार साथ (एपिडेमिक) येते. काहीजणांत याची लागण उपायापलिकडे गेलेली असल्याने डेटा, अकाऊंटींग, सारासार बुद्धी, समतोल विचार, इ औषधांचा फायदा तर होत नाहीच पण उलट जोरदार अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन येते ! ;) :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Apr 2014 - 6:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

टाईमसारख्या जागतिक प्रसिध्दीच्या मासिकाने केवळ वाचकांकडून असे पोल मागविणे हा प्रकार केला ते बघून आश्चर्य वाटले.
एकदा सर्व लोकांना खुला व्हर्चुअल सर्व्हे संस्थळावर प्रसिद्ध केला की मग कोणाला त्याच्या अश्या दुरुपयोगापासून थांबवणे केवळ अशक्य आहे. मात्र त्यात सापडलेल्या डेटाचा खरेपणा आणि उपयुक्तता ठरवायला शास्त्रिय अक्कल जरूर लागते ;)

कुठल्या एका सर्वेक्षणात कोण आघाडीवर दिसतो ह्याला कितपत महत्व द्यायचे?
ही पत्रिका वेळोवेळी अशी सर्वेक्षणे करत असते?
पण त्याने नेमके काय सिद्ध होते तेच कळत नाही.
पहिल्या नंबर वर केजरीवाल असोत किंवा मोदी किंवा अगदी यादीत त्यांना स्थान ही नसले तरी काय बिघडणार आहे?
आपण आपले मत त्या वरुन ठरवणार आहोत का?

टाईम साप्ताहीकाने, दोन याद्या तयार केल्या आहेत. एक आहे ती त्यांच्या विश्लेषणानुसार सिलेक्टीव्ह प्रभावी व्यक्तीमत्वाची यादी ज्यात पहीले नाव बियॉन्सीचे आहे. Time 100 असे गुगगले तर ती यादी दिसते. आणि दुसरी यादी आहे : readers’ poll for the 2014 TIME 100 ज्यात एके पहीले आहेत. :(

ठीक आहे बर्‍याच वेळाने एकेंना गालावर हात न उठता अथवा तोंडावर शाई न उडता प्रसिद्धी मिळाली. हे ही नसे थोडके. ;)

ठीक आहे बर्‍याच वेळाने एकेंना गालावर हात न उठता अथवा तोंडावर शाई न उडता प्रसिद्धी मिळाली.
परत एकदा... हॅ.हॅ.हॅ... ;) टाईमवाल्यांना एकेंची "नौटंकी" पराकोटीची आवडली असण्याची शक्यता नाकारता येत नाही ! ;)

जाता जाता :- कोणाला तरी केजरी मलेरिया किंवा केजरी काविळ झाल्याचे निदान झाले आहे म्हणे ! ;)

तुमचा अभिषेक's picture

24 Apr 2014 - 10:19 pm | तुमचा अभिषेक

केजरीवाल यांच्याच आरोपानुसार काँग्रेस आणि भाजपा यांनी देशभरच्या मिडीयाला विकत घेतलेय.
पण केजरीवाल यांनी तर चक्क अमेरीकेच्या मिडीयाला विकत घेतलेले दिसतेय :D

केजरीवाल यांनी तर चक्क अमेरीकेच्या मिडीयाला विकत घेतलेले दिसतेय
असे नसून

अमेरीकेच्या मिडीयाने केजरीवाल यांना दत्तक घेतले आहे, भारताची अतर्गत सुरक्षा व पाक व्याप्त पाकिस्तानविषयी लुडबुड करायला..
असे आहे!

कारण अमेरीकेच्या मिडीयाला माहिती आहे भारतात काही अतिहुशार/अतिभावनिक लोक आहेत AK४९ ला निवडून देणारे!

अमेरीकेच्या मिडीयाने केजरीवाल यांना दत्तक घेतले आहे,

बादरायणी पीजे... ;)

घड्याळाचे काम टाईम दाखवणे आहे आणि घड्याळ हाताला बांधले जाते. याचा अर्थ घड्याळाची हाताशी बांधिलकी आहे. थोडक्यात टाईममधे केजरीवालांना प्राधान्य मिळते याचा अर्थ त्यांचे घड्याळाशी आणि हाताशी संबंध आहेत. :#

नांदेडीअन's picture

24 Apr 2014 - 11:00 pm | नांदेडीअन

"More than 3.2 million votes were cast in the poll.
There were attempts to inflate the voting numbers, but only legitimate votes were tabulated for the final results.
On Thursday, TIME will announce this year’s TIME 100 honorees, who are selected by the editors."

http://time.com/73538/indian-politician-arvind-kejriwal-wins-time-100-re...

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2014 - 2:35 pm | श्रीगुरुजी

आकडेवारीचा काहीतरी घोळ दिसतोय.

"टाईम"च्या सर्वेक्षणात अवतारी महापुरूष केजरीवाल यांना २२,६५,३४० "येस" मते मिळाली आहेत व खलनायक मोदींना २५,२२,५६७ "येस" मते मिळाली आहेत. पण निकाल वेगळाच दाखवित आहेत.

संजय क्षीरसागर's picture

25 Apr 2014 - 2:39 pm | संजय क्षीरसागर

`नो' मतं वजा केली आहेत.

मदनबाण's picture

25 Apr 2014 - 4:10 pm | मदनबाण

Keju
Keju
{चित्रे जालावरुन घेण्यात आली आहेत.}

वेताळ's picture

25 Apr 2014 - 5:26 pm | वेताळ

मुंबई- ब्रिटनमधील केंब्रिज, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित संस्थातील प्राध्यापक आणि शैक्षणिक क्षेत्रातील इतर तज्ज्ञ अशा सुमारे ७५ भारतीय वंशाच्या मान्यवरांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर जाहीर टीका केली आहे.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील प्राध्यापक चेतन भट आणि गौतम अप्पा यांनी 'इंडिपेन्डंट' या डाव्या विचारसरणीच्या वृत्तपत्रात लिहिलेल्या एका खुल्या पत्रात नरेंद्र मोदींवर तीव्र टीका केली आहे. 'मोदी सत्तेवर येण्याच्या कल्पनेने आम्ही भयभीत होतो,' असे त्यांनी म्हटले आहे.

'भारतीय लोक आपले पुढील सरकार निवडून देण्यासाठी मतदान करीत असताना नरेंद्र मोदी प्रणित भाजप सरकारबाबत आम्हाला लोकशाही, मानवाधिकार आणि सामाजिक, धार्मिक विविधतेबद्दल चिंता वाटते,' असे या पत्रात म्हटलं आहे.

जगातील निर्वासित भारतिय बुध्दीजीवी लोकाना भारतातील लोकांची काळजी वाटत आहे.
भारतातील बरेच बुध्दीजीवी व हुशार लोक मोदी पंतप्रधान झाल्यावर जसे हरदन्हळ्ळी देवेगौडा किंवा अनंतमुर्ती भारत सोडुन परदेशात स्थाईक होणार आहेत. मला तर भाऊ परदेशी लोकांची काळजी वाटु लागली आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Apr 2014 - 5:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

मला तर असला सरळ सरळ हायजॅक केलेला सर्वे तसाच पुढे ढकलून प्रसिद्ध करणार्‍या टाइम च्या तब्येतिची काळजी वाटू लागली आहे !

विकास's picture

25 Apr 2014 - 5:57 pm | विकास

मला तर भाऊ परदेशी लोकांची काळजी वाटु लागली आहे.

खरे आहे. पण वास्तवीक त्यांच्या लक्षात येत नाही की मोदी सत्तेवर आले तर त्यांची संशोधनाकरता अनुदाने वाढणार आहेत. या भट्ट साहेबांनी Hindutva in the West: mapping the antinomies of diaspora nationalism असे २००० साली पुस्तक लिहीले होते. किती पैसे त्यांना मिळाले असतील ते बघा. पण नंतर शिंचे युपिए आले आणि या विषयावर दक्षिणाच मिळेनाशा झाल्या. आता मोदी आले की परत मिळू लागतील.

माझे तर म्हणणे असे आहे की तुम्हा कुणाआ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डॉक्टरेट हवी असली तर या भट्ट साहेबांना आत्ताच कॉन्टॅक्ट करा आणि मोदींवर टिका केलेले स्वतःचे लेख, प्रतिसाद त्यांना पाठवा. तुम्हाला पण अनुदान मिळेल आणि मोदी कसे नरराक्षस आहेत असा (त्यांचाच पुस्तकातले संदर्भ घेऊन)नसंशोधनात्मक प्रबंध लिहील्यावर पिएचडी पण मिळेल.

चौकटराजा's picture

25 Apr 2014 - 5:48 pm | चौकटराजा

केजरीवाल की कचरावाल व मोदी की नुसतीच भाजप या झाडाची एक फांदी हे १६ मे ला ठरेल ना ! टाईम वाले , लाईफ वाले, इंडिया टु डे वाले काही का म्हणेनात ! राज ठाकरे की फक्त भाषणबाज ठाकरे हे ही १६ ला कळेल ना !

अर्धवटराव's picture

25 Apr 2014 - 11:11 pm | अर्धवटराव

आणि हा जागतीक दर्जाचा प्रभाव सत्कारणी लावण्यासाठी शुभेच्छा.

विकास's picture

26 Apr 2014 - 7:02 am | विकास

टाईमच्या संपादकीयांच्या निवडीत टाईम १०० लीडरमधे मात्र मोदी आहेत. फरीद झकेरीयांनी करून दिलेली त्यांची ओळख पाश्चात्य माध्यमांच्या दृष्टीकोनातून पाहीले तर संतुलीत वाटली.

श्रीगुरुजी's picture

24 May 2014 - 2:32 pm | श्रीगुरुजी

केजरीवाल ही व्यक्ती एकंदरीत सुधारण्याच्या पलिकडे गेलेली दिसतेय. गेल्या काही महिन्यात प्रसिद्धीसाठी वाटेल त्या थराला जाऊन नौटंकी करणार्‍या या ढोंग्याला व त्याच्या पक्षाला निवडणुकीत जबरदस्त चपराक देऊन जमिनीवर आणले. पण अजूनही यांचे डोळे उघडत नाहीत. आपल्या नौटंकीला, खोट्या आरोपांना व ढोंगबाजीला जनता अजिबात फसत नाही हे यांच्या डोक्यात अजून घुसतच नाही.

त्यांची आता नवीन नौटंकी सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यात केजरीवालांनी भारतातील त्यांच्या मते सर्वाधिक भ्रष्टाचारी असलेल्या ३० जणांची नावे जाहीर केली होती. त्यात गडकरींचे नाव टाकले होते. गांधी परिवाराची नावे अर्थातच त्यांच्या यादीत नव्हती. आपल्या आरोपांना पुरावे देण्याचे फालतू सोपस्कार त्यांना मान्य नसतात. कोणी पुरावे मागितले तर ते भ्रष्टाचार्‍यांच्या बाजूने आहेत असा निष्कर्ष काढून ते मोकळे होतात. गडकरींनी प्रगल्भता दाखवून केजरीवालांविरूद्ध न्यायालयात बदनामीचा दावा दाखल केल्यावर निवडणुकांचे निमित्त सांगून इतके दिवस या खटल्याला तोंड देण्याचे त्यांनी टाळले. आता निवडणुक संपल्यावर खटल्यापासून दूर पळायचे कारणच देता येईना. त्यामुळे सुनावणीला उपस्थित रहावे लागले. न्यायालयाने जामीनासाठी १०००० रूं.चा व्यक्तिगत बाँड मागितल्यावर सुरूवातीला देण्याची तयारी दाखवून नंतर घुमजाव केले व तुरूंगात जाणे पसंत केले. आपल्याला बाँड मागणे हे बेकायदेशीर आहे असेही त्यांनी न्यायाधीशांना सुनावले. त्यामुळे त्यांच्या कायद्याच्या अज्ञानाची न्यायाधीशांनी चांगलीच कानउघाडणी केली.

ठराविक लोकांवर वाटेल ते बेलगाम आरोप करायचे, आरोपांचे पुरावे मागितल्यावर ते द्यायचे नाहीत कारण मुळातच बिनबुडाचे आरोप केलेले असतात, न्यायालयीन प्रक्रियेवर अविश्वास दाखवायचा आणि स्वतः हुतात्मा झाल्याचे नाटक करायचे ही केजरीवालांची मोड्यूस ऑपरंडी. हे धोरण पूर्ण अयशस्वी ठरले असताना पुन्हा एकदा त्याच नौटंकीच्या मार्गाने हे निघाले आहेत.

मी पूर्वी एका धाग्यावर लिहिले होते की वि. प्र. सिंगांचा ज्या वेगाने उदय झाला, त्यापेक्षा जास्त वेगाने त्यांचा अस्त झाला. केजरीवालांचे तसेच होण्याची शक्यता दिसत होती. आता ही शक्यता प्रत्यक्षात येताना दिसत आहे. केजरीवालांसारख्या माथेफिरू व हेकट व्यक्तींना जनतेने दिलेली शिक्षा पुरेशी नाही. त्यांचे डोके ताळ्यावर आणण्यासाठी तुरूंगवासासारख्या शॉक ट्रीटमेंटचीच गरज आहे.

असंका's picture

25 May 2014 - 7:56 am | असंका

काय हो दादा, I Told You So असं म्हणायला धागे कमी पडायला लागले का? किती जुने जुने धागे वर काढताय? हा तर विनोदी म्हणून काढलेला धागा होता....

आणि इतकेच जर केजरीवाल अयशस्वी आहेत, तर एव्ह्ढे मोठमोठे प्रतिसाद देऊन त्यांचं महत्त्व का वाढवताय?

सुधीर जी's picture

24 May 2014 - 3:05 pm | सुधीर जी

*clapping*

आष्ट्रेलियाचे सत्ताधारी अतिआदरणीय आणि जनतेचे लाडके माननीय टोनी अबॉट दादा मुठभर भांडवलशहांच्या हातातली बाहुले कसे बनलेत आणि इकडचा आम आदमी त्यामुळे कसा खवळला आहे हे दाखवण्यासाठी सिडनी हार्बर ब्रिजवर रास्ता रोको करून इकडल्या तिहारसदृश्य जेलात जाऊन बसावे...... :))