काबुली चणा सॅलेड

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
22 Apr 2014 - 5:45 pm

Salad

साहित्यः
१. वाफवलेले काबुली चणे - १.५ कप
२. बारीक चीरलेला पालक (कच्चाच) - १/२ कप
३. मध्यम चीरलेला कांदा - १
४. मध्यम चीरलेली काकडि - १/२ कप
५. मध्यम चीरलेली लाल सीमला मिरची - १/२ कप
६. ब्लॅक ऑलीव्ह्ज - ३ चमचे
७. बारीक चीरलेली कोथींबीर (पार्स्ले मिळाली तर उत्तम)
८. कुस्करलेलं फेटा चीज - २ मोठे चमचे
९. चवीनुसार मीठ (फेटाचीज मधेहि असतं ईनफॅक्ट जास्तच असतं)

ड्रेसींगसाठि:

१०. चीली फ्लेक्स किंवा बारीक चीरलेली लाल/हिरवी मिरची - १ चमचा (तिखट ज्या प्रमाणात हवं असेल त्या प्रमाणात कमी/जास्त करणे)
११. ऑलीव्ह ऑईल - ४ मोठे चमचे, व्हिनेगर किंवा लींबाचा रस - १/२ चमचा, मध १/२ चमचा

कृती:
१. एका मोठ्या बाउल मधे अनुक्रमे काबुली चणे, पालक, कांदा, काकडि, लाल सीमला मिरची, ब्लॅक ऑलीव्ह्ज, बारीक चीरलेली कोथींबीर किंवा पार्स्ले, कुस्करलेलं फेटा चीज आणि चवीनुसार मीठ घालुन हलक्या हाताने एकत्र करा
२. ड्रेसींगसाठि दिलेलं सर्व साहित्य एका दुसर्‍या बाउल मधे मिक्स करा
३. तयार ड्रेसींग आणि सॅलेड फ्रिजमधे १/२ तास ठेवुन द्या
४. सॅलेड गार झालं कि ड्रेसींग सॅलेडवर घालुन परत हलक्या हाताने मिक्स करुन सर्व करा. हे सॅलेड गाsssssरच छान लागतं

टिपा: १. कच्चा पालक आवडत नसल्यास नाहि घातलात तरी चवीत विशेष फरक पडत नाहि
२. ड्रेसींग अगदि सर्व करण्याअगोदर घाला. ड्रेसींगसकट सॅलेड फ्रिज मधे ठेवलं तर पाणी सुटुन कदाचीत पाणचट लागण्याची शक्यता आहे
३. सॅलेड मधे थोडाशी नटि/क्रंची चव हवी असल्यास खारे शेंगदाणे किंवा भरडसर वाटलेले अक्रोड घालु शकता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

22 Apr 2014 - 5:49 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hand-clapping-smiley-emoticon.gif

मि.पा.वरील गेल्या ३ दिवसात झालेले पाक-कृती- हल्ले पहाता ...
आज'ची संध्याकाळ येकंदर अत्यंत अवघड जाणार आहे!

आणि हो हे एक र्‍हायचच!
मी पैला.... =))

पिलीयन रायडर's picture

22 Apr 2014 - 5:54 pm | पिलीयन रायडर

अहहाहाहाहाहाहा....

अतिसुंदर...!

प्रचेतस's picture

22 Apr 2014 - 5:56 pm | प्रचेतस

जबरीच.

पैसा's picture

22 Apr 2014 - 6:00 pm | पैसा

मस्त दिसतंय. पण मला एक शंका आहे. तुम्ही लोक वजन कमी करण्यासाठी जेवणाबदली सॅलड खात असाल तर त्यात पनीर/चीझ/ऑलिव्ह ऑईल कसं काय एवढं चालेल?

साती's picture

22 Apr 2014 - 6:41 pm | साती

वजन कमी करण्यासाठी नाही, तेवढ्याच किंवा रिलेटिवली कमी कॅलरीत हेल्दी ऑप्शन म्हणून.
या सॅलडमधून जेवढी विटॅमिन्स आणि अँटीऑ़कैडंटस मिळतील तेवढी एवढ्याच कॅलरीचा वरणभातातून मिळणार नाहीत.
वजन करताना किंवा एरवीही कॅलरी कमी करण्यासोबतच विटॅमिन्स, अँटी ऑक्सिडंट आणी प्रोटीन्स मिळणे गरजेचे असते.

आपल्या टिपीकल जेवणात आणि फराळाच्या पदार्थांतही कार्ब्ज जास्त आणि प्रोटिन्स कमी असतात.
म्हणून हे चणे फुटाणे खायचे. ;)

पैसा's picture

22 Apr 2014 - 7:10 pm | पैसा

ते माहित आहे. आणि फॅट्स सुद्धा एकदम बंद करून चालणार नाही हे पण माहित आहे. मात्र ४ चमचे तेल/चीझ/पनीर या पदार्थांचं प्रमाण जरा जास्त वाटलं. म्हणजे ४ चमचे तेल आणि एवढे चीझ तर आपल्या रोजच्या जेवणात पण नसतं.

साती's picture

22 Apr 2014 - 7:40 pm | साती

म्हणून तर हे खायचं.
आणि त्यादिवशी रोजचे जेवण घ्यायचे नाही.
आणि हे तर ऑलिव ऑईल आहे. ऑलिव ऑईल आपण जोपर्यंत तळणाला/ फोडणीला वापरत नाही तोपर्यंत ग्रेटच असतं.

पैसा's picture

22 Apr 2014 - 7:53 pm | पैसा

एकूण आपण अन्नावर जेवढे जास्त प्रोसेसिंग करत जाऊ तेवढी पोषणमूल्य कमी व्हायची.

आता दुसरा प्रश्न. ड्रेसिंग म्हणून ऑलिव्ह तेलाऐवजी थोडंसं घरगुती लोणी वापरलं तर एक प्रयोग म्हणून?

दिपक.कुवेत's picture

24 Apr 2014 - 12:24 pm | दिपक.कुवेत

घालायचचं असेल चीजएवजी घाल. तेलामुळे सॅलेड मिक्स व्हायला मदत होईल अन्यथा घट्ट मिक्स होईल.

पैसा's picture

24 Apr 2014 - 4:10 pm | पैसा

चीजपेक्षा लोणी बरे. गुड आयड्या!

प्रभाकर पेठकर's picture

23 Apr 2014 - 8:04 pm | प्रभाकर पेठकर

ऑलीव्ह ऑईल मध्येही इतर तेला इतकेच उष्मांक (कॅलरीज), (१ ग्रॅम = ९), असतात. ऑलीव्ह ऑईल मध्ये वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्याचा गुणधर्म आहे म्हणून ते इतर तेलापेक्षा चांगले असे म्हणतात. पण ते चांगले म्हणून जास्त खाल्यास अतिरिक्त उष्मांकाचे चरबीत रुपांतर होते. दिवसाला १५ ग्रॅम (१ टेबलस्पून) पेक्षा जास्त खाऊ नये असे म्हणतात.

दिपक.कुवेत's picture

22 Apr 2014 - 7:44 pm | दिपक.कुवेत

पैसातै, अगं कुठे रोज हे सॅलेड खायचयं? तेव्हा बिनधास्त सगळे जिन्नस घालुन खा, ईतरांना खीलव. ईतर ऑईल पेक्षा ऑलीव्ह ऑईल त्यातल्या त्यात हेल्दि म्हणतात. ईकडे (स्पेशली मिडल ईस्ट मधे) तर सर्रास भाज्या, सॅलेड, हमुस (हेच काबुली चणे वाटुन) वर कच्चच घालुन देतात. पुढे जाउन असंहि एकलय कि नवजात बाळांना ह्या तेलानी मालीश केलं कि हाडं मजबुत / बळकट होतात. पण बहुतेक उष्ण असल्याने सर्वच बाळांना चालत असं नाहि.

पैसा's picture

22 Apr 2014 - 7:48 pm | पैसा

धन्यवाद, साती आणि दीपक.

या तेलांबद्दल साती किंवा कोणाही डॉक्टर कडून जास्त माहिती कधीतरी वाचायला आवडेल. म्हणजे काही लोक म्हणतात, तांदुळाच्या कोंड्याचं तेल चांगलं, काही म्हणतात ऑलिव्ह तेल, कोणी म्हणतात सनफ्लॉवर इ.इ.

साती's picture

22 Apr 2014 - 9:13 pm | साती

प्रमाणात खाल्ल्यास सगळंच चांगलं.
;)

पैसा's picture

22 Apr 2014 - 9:24 pm | पैसा

नाहीतर आवडलं म्हणून तेच खात सुटायचं! :D

कुसुमावती's picture

23 Apr 2014 - 4:18 pm | कुसुमावती

ऑलिव्ह ऑइलमधे इतर तेलांपेक्षा जास्त अ‍ॅन्टीऑक्सीडन्ट्स असतात अस कुठेतरी वाचलयं, खरचं अस असत का?

सुबोध खरे's picture

24 Apr 2014 - 12:39 pm | सुबोध खरे

ओलिव्ह तेल हे युरोपीय देशांनी स्वतःच्या फायद्यासाठी उदोउदो करून चढवून ठेवलेले आहे. तांदुळाच्या कोंड्याचे तेल त्यापेक्षा सर्व दृष्टीने नक्कीच जास्त चांगले आहे.
पहा http://www.heartfoundation.org.nz/healthy-living/healthy-eating/food-for...
http://foodwatch.com.au/blog/fats-and-oils/item/q-how-does-rice-bran-oil...
http://whatscookingamerica.net/Information/RiceBranOil.htm
ओलिव्ह तेल सलाड ड्रेसिंग साठी वापरता येते परंतु भारतीय पद्धतीच्या स्वयंपाकासाठी नाही कारण कोणतीही गोष्ट परतण्या साठी अथवा तळण्यासाठी घेतली तर ओलिव्ह तेलाचा धूर येतो आणि त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात आणि चवहि बिघडते. शिवाय टेफ्लोन/ नॉन स्टिक भांडी सुद्धा खराब होतात.
शिवाय ५०० रुपये लिटर ला देऊन आपण काय मिळवता?केवळ युरोपीय देशांच्या तुंबड्या भरता.
आपले साधे गोडे तेल किंवा सूर्यफुलाचे तेल १०० किंवा ८० रुपये लिटर ला देऊन तुम्हाला तितकेच फायदे मिळतात. तांदुळाच्या कोंड्याचे तेल १२० रुपये लिटर ला सर्वात चांगले आहे.

पैसा's picture

24 Apr 2014 - 4:17 pm | पैसा

मी हल्ली घरात गोडेतेल, सूर्यफुलाचे तेल आणि तांदुळाच्या कोंड्याचे तेल ही तिन्ही तेले आणून ठेवते. त्याशिवाय घरगुती तूप आणि खोबरेल सुद्धा घरात असतंच. गोडेतेल (शेंगातेल) पोळ्यांची कणीक मळताना वापरते. चुकून कधी काही तळलेच तर त्यासाठी सूर्यफूलाचं तेल आणि भाजी आमटीच्या फोडणीसाठी तांदुळाच्या कोंड्याचे तेल. याशिवाय घरचे तूप काही पदार्थांना वापरते. आणि खोबरेल तेल काही माशांचे पदार्थ आणि शाकाहारी कारवारी पदार्थ यासाठी.

आयुर्हित's picture

24 Apr 2014 - 7:37 pm | आयुर्हित

आपण खोबरेल तेलाचा कोणता ब्रांड व प्याकिंग वापरताय? म्हणजे कोणता चांगला?
वापरतांना काय काळजी घ्यावी? कारण आम्ही आजपर्यंत कधीच वापरले नाही.

पैसा's picture

24 Apr 2014 - 9:37 pm | पैसा

गोव्यात गावठी ताजं खोबरेल मिळतं. एकतर खोबरे देऊन त्याचं तेल काढून मिळतं किंवा बाजारातही स्थानिक तेल मिळतं. ते अनब्रँडेड असतं, पण त्यावर प्रोसेस काही केलेली नसते.

किंवा मग निर्मल वगैरे बरेच ब्रँड मिळतात. अर्ध्या किंवा एका लिटरच्या पिशव्या. खाण्यासाठी ते कोकोराज, पॅराशूट वगैरे मात्र वापरू नका. त्यावर काय प्रोसेस केलेली असेल आणि काय केमिकल्स वापरली असतील सांगता येत नाही.

प्रभाकर पेठकर's picture

25 Apr 2014 - 1:36 am | प्रभाकर पेठकर

खायच्या खोबरेल तेलाच्या बाटलीवर 'Edible Oil' असे लिहीलेले असते तेच स्वयंपाकात वापरावे.

शुचि's picture

25 Apr 2014 - 1:38 am | शुचि

=))

प्रभाकर पेठकर's picture

24 Apr 2014 - 9:10 pm | प्रभाकर पेठकर

>>>>कोणतीही गोष्ट परतण्या साठी अथवा तळण्यासाठी घेतली तर ओलिव्ह तेलाचा धूर येतो आणि त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात आणि चवहि बिघडते. शिवाय टेफ्लोन/ नॉन स्टिक भांडी सुद्धा खराब होता

सुबोध खरे साहेब,

माझा अनुभव वेगळा आहे. मी गेली ६-७ वर्षे ऑलिव्ह ऑईल वापरतो आहे. कच्चे आणि भारतिय स्वयंपाकासाठी सुद्धा. तापविल्याने जीवनसत्वे नष्ट होतात की नाही ह्याची मला कल्पना नाही पण धूर आल्याचे कधीच दिसले नाही आणि माझी सर्व नॉनस्टीकची भांडी अगदी व्यवस्थित आहेत.

दोन गोष्टींचा संबंध आहे किंवा नाही कल्पना नाही पण कोलेस्टेरॉल पातळी अजून तरी व्यवस्थित आहे.

तादूळाच्या कोंड्याच्या तेलाचा एखादा प्रचलित ब्रँड आहे का? कारण इथे घाणीचे तेल मिळणार नाही पण ब्रँडेड मिळू शकेल.

सुबोध खरे's picture

27 Apr 2014 - 1:40 pm | सुबोध खरे

पेठकर साहेब,
ओलिव्ह तेलाच्या बद्दल मी जे दुवे दिलेले आहेत त्यात हि सर्व माहिती आहेच. आपण जर एक्स्ट्रा व्हर्जिन तेल वापरत नसाल ( ओलिव्ह पोमेस तेल) तर तेवढा धूर येत नाही. परंतु ओलिव्ह तेल तळणासाठी वापरले तर त्याची चव बिघडते असा वैयक्तिक अनुभव आहे. (शिवाय पाचशे रुपये लिटरचे तेल तळणासाठी वापरण्यात काय हशील)
तांदुळाच्या कोंड्याचे तेल ricela , riso tandul किंवा सफोला fortune हे ब्रांड उपलब्ध आहेत.

प्रभाकर पेठकर's picture

28 Apr 2014 - 1:54 pm | प्रभाकर पेठकर

>>>>(शिवाय पाचशे रुपये लिटरचे तेल तळणासाठी वापरण्यात काय हशील)>>>>>तांदुळाच्या कोंड्याचे तेल ricela , riso tandul किंवा सफोला fortune हे ब्रांड उपलब्ध आहेत.

धन्यवाद. आता शोधतो मार्केटात.

पुढे जाउन असंहि एकलय कि नवजात बाळांना ह्या तेलानी मालीश केलं कि हाडं मजबुत / बळकट होतात. पण बहुतेक उष्ण असल्याने सर्वच बाळांना चालत असं नाहि.
ऑलिव्ह ऑइल नी बाळाची त्वचा मउ बनते.आमच्या मातोश्रींनी आमच्या बाल्य अवस्थेत याचा वापर केला होता.

सुबोध खरे's picture

24 Apr 2014 - 8:35 pm | सुबोध खरे

ओलीव ओइल हे सूर्यप्रकाशामुळे आणि जास्त तापमानाला विघटन पावते त्यामुळे ते फक्त थंडीत त्वचा कोरडी पडू नये म्हणून किंवा फाटू नये म्हणून लावता येते. http://recipes.howstuffworks.com/how-olive-oil-works3.htm
लहान मुलांना तेलाचे मालिश करण्याचा मूळ हेतू हा आहे कि ते तेल त्वचेत शोषून घेतले जाते आणि त्याचे सूर्यप्रकाशात ड जीवन् सत्त्वात रुपांतर होते. यासाठी मुलाला मालिश झाल्यावर थोडा वेळ सकाळच्या कोवळ्या उन्हात धरावे आणि अर्ध्या ते एक तासाने अंघोळ घालावी.(दुर्दैवाने मालिश करणाऱ्या बाईला तेवढा वेळ नसतो). हे ड जीवनसत्त्व हाडांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. पण याच कारणासाठी ओलिव्ह तेल या कामाला उपयुक्त नाही कारण सूर्यप्रकाशात त्याचे विघटन होते. लहान मुलाच्या मालिश साठी तिळाचे तेल सर्वात उत्तम असते. यात इतरही काही आयुर्वेदिक औषधे मिसळून मालिश केले जाते( उदा डाबर चे लाल तेल) पण मला त्याबद्दल नक्की काही सांगता येणार नाही

लहान मुलाच्या मालिश साठी तिळाचे तेल सर्वात उत्तम असते.
१००% सहमत.
आखाड्यात जाणाऱ्या पैलवाना ते जिम ला जाणाऱ्या बॉडी बिल्डर पासून म्हातारपणात गुडघे दुखीला देखील तिळाचे तेल सर्वात उत्तम असते. आपण सर्वांनीच जर आपल्या देशातील तेलाचे फायदे समजून घेतले तर कितीतरी लोकांना याचा फायदा होईल.

व्वाह्ह्ह्ह्ह... मस्त चखना ;)

ब़जरबट्टू's picture

23 Apr 2014 - 2:36 pm | ब़जरबट्टू

नक्की घेता ना ?? :))

हा असा चकना.. चढवायची आहे का उतरवायची... :))

हा हा हा... पसंद अपनी अपनी. :)

ब़जरबट्टू's picture

24 Apr 2014 - 5:22 pm | ब़जरबट्टू

कायबी म्हणा राव.. चखणा शब्दासंग असे प्रकार जात नाय.. मंग तुम्ही "स्नक्स" म्हणा.. आपली काही संस्क्रुती काय का नाय ? :))

मस्त कलंदर's picture

22 Apr 2014 - 6:13 pm | मस्त कलंदर

मस्त आहे हे ही सॅलड.

कमी खाणं म्हणजे पौष्टिक खाणं नव्हे. त्यामुळं आवश्यक ती कर्बोदकं, प्रथिनं, स्निग्धांश सगळं शरीरास मिळायला हवं. त्यामुळे थोडं तेल, साखर्/गोडवा, कधीमधी चीज्/पनीर हे आवश्यक आहे.

रेवती's picture

22 Apr 2014 - 6:14 pm | रेवती

छानच दिसतय!

पिंगू's picture

22 Apr 2014 - 6:19 pm | पिंगू

सॅलड छान आणि पोटभरु आहे.

सूड's picture

22 Apr 2014 - 6:45 pm | सूड

काकडी छान चिरली आहे.

शुचि's picture

22 Apr 2014 - 6:45 pm | शुचि

आरोग्यवर्धक पाककृती. छान दिसते आहे.

मस्तच लागणार .फोटोही छान .
तिकडे हे पदार्थही मुबलक मिळत असणार .उन्हाळ्यात सैलड आणि पावसाळ्यात गरम सूप जेवणाची लज्जत वाढवते .
थंडीत खुराक सकाळी खावा .
येनकेनप्रकारे जिभेचे चोचले पुरवावेत .

१)परदेशातले "स्पिनिच",बिटाची पाने ,आणि भारतातला पालक जरी एकाच वर्गातल्या वनस्पती असल्या तरी चवीत किती फरक पडतो ?

२)काकडीचेही बरेच प्रकार आहेत खिरा ,शेतकाकडी ,गोपाळकाल्याला बाजारात येते ती बांबूछाप ,थोडीशी पडवळासारखी दिसणारी फिकट हिरवी ,सैनविजला वापरतात ती पांढरी छोटी ,जपान्यांची झुकिनी आणि कृष्णेच्या तीरावरची वाळूक .

३)सलाड म्हणजे जिवनसत्त्वांचा खजिना .थोडेफार तेल चवीला घेतल्याने वजनाचा काटा तबकडीफोडून बाहेर जाणार नाही .

४)तमिळनाडूत नवरात्रीत रोज एक कडधान्य भिजवून मोड आल्यावर उकडून त्यात ओले खोबरे टाकून मुलांसाठी प्रसाद असतो .

५)सध्या पौष्टिक पाककृतीँचा ट्रेँड आला आहे .साठ पासठ सालांत फोर्टात एक पौष्टिक खारीक विकत मिळायची त्याची आठवण झाली .

प्यारे१'s picture

22 Apr 2014 - 7:05 pm | प्यारे१

या! तुमचीच कमी होती. :-/
त्या बायकांना आणि सूडला (हे बळंच ;) ) काही बोलता येत नाही, म्हटलं तुम्हाला तरी सांगावं... :)
हुश्श्श!

मस्तय पाकॄ!

यशोधरा's picture

22 Apr 2014 - 7:15 pm | यशोधरा

मस्त सॅलड!

अजया's picture

22 Apr 2014 - 9:22 pm | अजया

मस्त मस्त.! नक्की करुन पाहाणार !

मधुरा देशपांडे's picture

22 Apr 2014 - 9:33 pm | मधुरा देशपांडे

आवडलं. मस्तच.

आयुर्हित's picture

22 Apr 2014 - 10:13 pm | आयुर्हित

फोटो पाहूनच तोंपासु. सोपी साधी छान पाकृ!

काबुली चणे(छोले) मला नेहमीच आवडतात. आजपर्यंत फक्त छोले-भटुरे हाच एक पर्याय होता. आपला हा पर्याय त्यापेक्षा खरोखरच चांगला आहे.
फक्त मी ऑलिव्ह ऑईल ४चमच्यांपेक्षा १चमचा वापरेन ज्यामुळे ही पाकृ अधिक आरोग्यदायी होईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Apr 2014 - 10:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

चवदार पाकृ आणि सुरेख फोटो !

जेनी...'s picture

22 Apr 2014 - 10:38 pm | जेनी...

दिपु काका ...

मुक्त विहारि's picture

22 Apr 2014 - 10:39 pm | मुक्त विहारि

झक्कास....

(ह्या पुढचा आपला कट्टा एखाद्या टुमदार घरी करू या.आम्ही साग्रसंगीत सगळी तयारी करतो.काय मसाले वगैरे लागले तर (अगदी पाट्या वरवंट्यावर) वाटून देतो.पण शेफ मात्र तुम्हीच.)

काय मसाले वगैरे लागले तर (अगदी पाट्या वरवंट्यावर) वाटून देतो.पण शेफ मात्र तुम्हीच.)

हाहाहा =)) हे खरच भारीये!!!

Prajakta२१'s picture

22 Apr 2014 - 10:53 pm | Prajakta२१

चण्याऐवजी मुग/ मटकी आणि ब्लॅक ऑलीव्ह्ज ऐवजी काळी द्राक्षे वापरली तर चालेल का?

आयुर्हित's picture

23 Apr 2014 - 9:05 am | आयुर्हित

चण्याऐवजी मुग/ मटकी किंवा इतरही कडधान्य जसे चवली,राजमा देखील वापरू शकता.
मुग/मटकी जर मोड आणून वापरलेत तर अजून जास्त पौष्टिक होतात.

ब्लॅक ऑलीव्ह्ज ऐवजी काळी द्राक्षे वापरली तर नक्कीच चालु शकेल की.
फक्त प्रत्येकातील पोषक तत्वे(वितामिंस व मिनरल्स),GI(ग्लायसेमिक इंडेक्स)व मुख्य म्हणजे चव वेगवेगळी आहे.

अजून आपल्या कल्पकतेला भरपूर वाव आहे हवे तसे बदल करायला आणि आलटून पालटून सर्व पदार्थ वापरून पाहायला!

दिपक.कुवेत's picture

24 Apr 2014 - 12:29 pm | दिपक.कुवेत

हेच बोल्तो. आपापल्या आवडिप्रमाणे थोडेफार बदल करुन वेगवेगळे व्हेरीअशन्स करु शकतो. मोड आलेल्या कडधान्याचं सॅलेड पण अप्रतिम लागेल (काळी द्राक्षे घालुन). पौष्टिक आणि शीवाय पोटभरहि!

सुहास झेले's picture

22 Apr 2014 - 11:39 pm | सुहास झेले

जबरीच :)

भाते's picture

23 Apr 2014 - 7:55 am | भाते

करून पाहिले पाहिजे. करायला सोपे आणि पौष्टिकही. :)

इरसाल's picture

23 Apr 2014 - 9:34 am | इरसाल

यात एक उकडलेले अंडे अर्ध कापुन मस्त सजावट करता येईल आणी चवही वाढेल.

प्यारे१'s picture

23 Apr 2014 - 2:05 pm | प्यारे१

तुम्हाला यात 'चखणा' दिसतोय काय? ;)

इरसाल's picture

23 Apr 2014 - 2:22 pm | इरसाल

फेटा चीज़ मुळे नजर जरा "चकणी" झालीय.

बादरायण संबंधः "चुपकेसे देखेगी साजन को सजनी" प्रमाणे चखणा-चकणी चालुन जावे.

मृत्युन्जय's picture

23 Apr 2014 - 2:31 pm | मृत्युन्जय

बेष्ट आहे एकदम. लैच भारी.

सानिकास्वप्निल's picture

23 Apr 2014 - 2:45 pm | सानिकास्वप्निल

छान आहे पाकृ
मी ह्यात कांदा, टोमॅटोबरोबर थोडी चिरलेली कैरी, चिंच-खजुर चटणी, पुदिना चटणी व शेव-बुंदी घालून काबुली चणा चाट बनवते.

सेम सेम अस्सच मी मटकि घालुन मटकीचाट बनवते , त्याला माझा नवरा उसळ म्हणतो :-/

प्यारे१'s picture

23 Apr 2014 - 10:42 pm | प्यारे१

तुम उसे (म्हणजे ये सब मिश्रण को) उबालकर देती हो क्या?

पैसा's picture

23 Apr 2014 - 10:55 pm | पैसा

मटकी कशी दिसते?

जेनी...'s picture

23 Apr 2014 - 11:34 pm | जेनी...

अर्रे एकदम मस्तच दिसते !!
ब्रावुन कलर्चा शॉर्ट टॉप आणि
ब्रावुनच कलरचा शॉर्‍ट स्कर्ट घालुन
गोर्या गोर्या हाताने हाय करत असते =))

पैसा's picture

24 Apr 2014 - 4:19 pm | पैसा

फटु द्या! त्याशिवाय आम्ही कसा विश्वास ठेवणार? ;)

सासुबै आत्तापर्यंत कित्तीवेळा मी ' ह्यांचा ' फोटु मागितला असेल ... तुम्ही दिला क्का???

मग जशास तस्सेच :-/

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Apr 2014 - 9:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

जेनी कुनाचा डूआयडी हाय ते कळ्ळं बर्का जेनीबेन उर्फ पुजाक्का :) =))

क्या इस्पू काका ... कितना लेट पैचाना :-/

दिपक.कुवेत's picture

24 Apr 2014 - 12:31 pm | दिपक.कुवेत

आज्जी तु "काहितरी" बनवतेस यातचं सगळं आलं! मला वाटलं तुझा नेहमीचा प्रतीसाद येईल... हे माझी आई छान करते, हे माझी दिदि छान करते वगैरे!

काय करणार दिपु काका नवरा नावाच्या प्राण्याला भुकच खुप लागते :-/

गिरकी's picture

23 Apr 2014 - 2:52 pm | गिरकी

एक सलाड विकांत करता येईल यावेळी :)

अनन्त अवधुत's picture

23 Apr 2014 - 3:13 pm | अनन्त अवधुत

धन्यवाद दिपक.कुवेत.
मी आजच हे सॅलेड केले. संध्याकाळी काही मित्र येणार होते म्हणून त्यांच्या साठी हे सॅलेड केले.
मी केलेले ३ बदल:
मित्रांचे येणे अचानक ठरल्यामुळे चणे भिजवून वाफवायला वेळ नव्हता म्हणून ब्रोकोली घातली.
(चण्या ऐवजी ब्रोकोली चव कशी लागेल हि धाकधूक होती, पण छान लागते. )
घरात मोझेरेला चीज होते, त्यामुळे तेच वापरले.
काकडी ऐवजी झुकीनी वापरली.
ड्रेसिंग एक नंबर आहे.
सॅलेड आवडले. धन्यवाद.

आयुर्हित's picture

23 Apr 2014 - 3:53 pm | आयुर्हित

एवढी छान पाकृ केलीत, जरा फोटो येवू द्या की राव!

दिपक.कुवेत's picture

24 Apr 2014 - 12:32 pm | दिपक.कुवेत

लय भारी. लगे रहो. असं काहि केलंत कि फोटो पण टाका कि राव!

एकदम मस्त पाकृ... :) फोटो वरून एकदम यम्मी दिसतेय!!

मदनबाण's picture

23 Apr 2014 - 4:18 pm | मदनबाण

झकास्स्स... :)

@ कंजूस
महोदय वाळक्यांच नाव काढुन तुम्ही आम्हासनी लयं त्रास दिला बघा. ;)

कुसुमावती's picture

23 Apr 2014 - 4:22 pm | कुसुमावती

छान आहे पाकृ. आवडली.

प्रभाकर पेठकर's picture

23 Apr 2014 - 8:16 pm | प्रभाकर पेठकर

मस्तं सॅलड.

प्रथिनांचा (प्रोटीन्सचा) फायदा शरीरास होण्यासाठी कर्बोदकांची (कार्बोहाड्रेट्सची) गरज असतेच. त्यामुळे भाज्या आणि चीझ सोबत काबूली चण्याचे प्रयोजन अगदी योग्य आहे. कांही पोषकद्रव्यांना शरीरात पचनासाठी तेलाची गरज असते. फक्त तेलातच त्यांचे विघटन होते. त्यामुळे माफक प्रमाणात घातलेल्या ऑलीव्ह ऑईलने हे सॅलड म्हणजे एक परिपूर्ण आहार झाला आहे.

गरजेनुसार तेलाचे प्रमाण कमी करणे, चीझ टाळणे इ.इ. सुरक्षित पाऊले उचलण्यास हरकत नाही. ज्यांना मांसाहार वर्ज्य किंवा निषिद्ध नाही त्यांनी उकडलेल्या कोंबडीच्या मांसाचे बारीक तुकडे किंचित मीठ आणि काळीमिरी भुरभुरून वरील सॅलडात मिसळायला हरकत नाही.

(हे सर्व जेवणाऐवजी खाल्ल्यास शरीरास सर्व पोषकद्रव्ये मिळूनही वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होईल.)

आयुर्हित's picture

24 Apr 2014 - 3:59 pm | आयुर्हित

पेठकर काका,
आपला प्रतिसाद आवडला, पण "प्रथिनांचा (प्रोटीन्सचा) फायदा शरीरास होण्यासाठी कर्बोदकांची (कार्बोहाड्रेट्सची) गरज असतेच." हे मात्र डोक्यावरून (tangently)गेलंय!

कृपया, जरा अधिक स्पष्ट करून हवे आहे.
धन्यवाद,

प्रभाकर पेठकर's picture

25 Apr 2014 - 1:48 am | प्रभाकर पेठकर

माझा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी आपल्या पारंपारीक पाककृतींकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो.
जसे आमटी-भात, भाजी-पोळी, डाळीची खिचडी, कोंबडीचे, बोकडाचे कालवण - भात, आंबोळ्या, भाकरी इ.इ.इ.
गोर्‍यांकडे मांसाहारा बरोबर पाव, अरबस्थानात मांसाहाराबरोबर खुप्स (पिटा ब्रेड) इ.इ. खाल्ले जातात. ह्या सर्व आहार पद्धतीत प्रथिनांबरोबर कर्बोदकाची साथ असते.
कर्बोदकांमुळे 'पोट भरल्याची' भावनाही लवकर निर्माण होऊन माणूस समाधान पावतो.
बाकी माहिती गुगलावर मिळेलच.

अमेरिकन त्रिशंकू's picture

23 Apr 2014 - 11:23 pm | अमेरिकन त्रिशंकू

यात कुरकुरित पिटा चिप्स घातल्याकी फतूश सॅलडसारखेच लागेल.
अर्थात फतूशमध्ये छोले/चणे आणि ऑलिव्ह्ज नसतात पण चालेल एक वेगळे फतूश म्हणून.

दिपक.कुवेत's picture

24 Apr 2014 - 12:34 pm | दिपक.कुवेत

व्हेरी गुड आयडिया. हे फतुश सॅलेड पण मला फार आवडतं ते त्यात असण्यार्‍या कुरकुरीत चिप्स मुळेच.

अक्षया's picture

24 Apr 2014 - 5:10 pm | अक्षया

नक्की करुन बघेन. :)

तेल कोणतेही खावे .त्यात चव आणि परवडणे हे जास्त महत्त्वाचे .कोलेस्टरॉलची वाढ फक्त तेलानेच होते असं नाही .अतिआहार आणि जिवाला नाही कहार तर रक्तातला वाहाता मेद वाढतो . राहिला मुद्दा प्रतिष्ठेचा .आम्ही यँव करतो वगैरे त्याच्याशी उपयुक्ततेचा काहीच संबंध नाही .
तेलाच्या केमिस्ट्रीविषयी नंतर कधीतरी .

राघवेंद्र's picture

27 Apr 2014 - 7:02 am | राघवेंद्र

दिपक भाऊ, आजच करुन बघितले, मस्त झाले होते.
चीझ, व्हिनेगर ऐवजी घट्ट दही वापरले.

दिपक.कुवेत's picture

27 Apr 2014 - 11:19 am | दिपक.कुवेत

फोटो टाका कि राव त्यामुळे ईतरांना पण हुरुप येईल. ड्रेसींग साठि वरील साहित्य टाळुन (चीज/ऑईल असल्यामुळे) अजुन एक करता येईल.... आलं, मिरची, पुदिना, कोथींबीर आणि ब्लांच केलेला पालक हे सर्व मिक्सर मधे मुलायम वाटुन दह्याच्या चक्क्यात घालावं. जरुरी पुरतं पाणी घालुन हे ड्रेसींग सॅलडवर घालुन मिक्स करणे.

राघवेंद्र's picture

27 Apr 2014 - 8:27 pm | राघवेंद्र

हे बघा फोटो.

photo1

photo2

दिपक.कुवेत's picture

28 Apr 2014 - 1:19 pm | दिपक.कुवेत

फोटो काल मोबाईलवर पाहिले. छान आलेत. पण ईथे दिसत नाहियेत. नुसती दोन टिंब दिसत आहेत.

राघवेंद्र's picture

28 Apr 2014 - 7:08 pm | राघवेंद्र

मित्रा, मला ऑफिस मधुन सुध्दा व्यवस्थित दिसत आहेत. ( गुगलच वापरले आहे )
हा विकांताला तुमची सॅलड व मिर्च का सालन व सप्रे साहेबांची दावणगिरी दोसा पाककृती करुन बघितली.
मस्त झाली होती. मिर्च का सालन फोटो टाकण्यासाठी अजुन एकदा करावी लागेल.

अनन्या वर्तक's picture

28 Apr 2014 - 10:23 pm | अनन्या वर्तक

हेल्दी पाककृती. माझी अगदी मनापासून आवडती पाककृती. फोटो सुद्धा छान आहेत.

सस्नेह's picture

1 May 2014 - 3:32 pm | सस्नेह

कच्चा पालक आवडत नसल्यामुळे पुदिना घालून करून पाह्ते.
बाकी हा 'चखणा' आहे हे नवीन समजलं. माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे चखणे हे तळलेले पदार्थ असतात.

कवितानागेश's picture

1 May 2014 - 3:40 pm | कवितानागेश

अगं, कॅलरी कॉन्शस लोक्स चटपटित सॅलेड्स खातात चखणा म्हणून. :)