पाऊस म्हणाला

मालविका's picture
मालविका in जे न देखे रवी...
22 Apr 2014 - 5:06 pm

पाऊस म्हणाला,
मी येतो नि धरतीला आनंद
मी येतो नि शेतकरी सुखावतो
मी येतो नि झाडं फुलं तरारतात
मी येतो नि प्राणी पक्षी आनंदतात

पाऊस म्हणाला,
मी आलो कि मोर नाचू लागतात
मी आलो कि नद्या वाहू लागतात
मी आलो कि सागराला उधान येत
मी आलो कि मन दाटून येत

पाऊस म्हणाला,
मी आलो कि मुंबईकर धास्तावतात
नि लोकल बंद होईल म्हणून घाबरतात
मी आलो कि हे काळजी करत बसतात
आणि २६ जुलै होईल क काय विचारात बसतात

पाऊस म्हणाला,
मी आलो कि पुढारी खडबडून जागे होतात
कुठे आणि किती खड्डे आहेत ते मोजत बसतात
मी आलो कि विरोधी पक्ष सोकावतो
सत्तेवार्लेल्याला धारेवर धर्याची संधी तो मिळवतो

पाऊस म्हणाला,
खर सांगू आता,मी राजकारण करत नाही
इकडे बरसायचं तिकडे नाही असं माझ्या मनात नाही
ओला दुष्काळ सुका दुष्काळ माझ्यामुळे घडत नाही
प्रदूषण करता तुम्ही,दोष मात्र घेत नाही

पाऊस म्हणाला,
मी आहे म्हणून तुम्ही आहात हे विसरू नका
दोष तुमचा असून नाव मला ठेवू नका
झाडे लावाच्या नुसत्या घोषणा देऊ नका
कृती करा पण प्रदूषण मात्र करू नका
-मालविका

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

23 Apr 2014 - 11:06 am | मिसळलेला काव्यप्रेमी

आकाशवाणीवरच्या त्या श्रुतिका आठवल्या..

मदनबाण's picture

23 Apr 2014 - 6:20 pm | मदनबाण

छान...