पौष्टिक मिक्स वेज पराठे

आरोही's picture
आरोही in पाककृती
22 Apr 2014 - 3:24 pm

साहित्य :कणिक ४ वाट्या ,कोबी १ वाटी ,गाजर १ वाटी ,शिमला मिरची अर्धी वाटी,पनीर १ वाटी ,चीज अर्धी वाटी ,उकडलेले बटाटे २ ,लाल तिखट १ चमचा ,हळद १ चमचा ,गरम मसाला १ चमचा ,जीरा पावडर १ चमचा ,आमचूर पावडर १ चमचा ,मीठ चवीप्रमाणे ,तेल २ चमचे ..,पाणी आवशकते नुसार .
(कोबी ,गाजर ,पनीर किसून घ्यावे ,उकडलेला बटाटा कुस्करून घ्यावा ,शिमला मिरची बारीक कापून घ्यावी . )

1

कृती : सर्व प्रथम कणकेमध्ये मीठ टाकून पाणी घालून मळून बाजूला ठेवून द्यावे . आता एका कढाई मध्ये दोन चमचे तेल घालून तेल तापल्यावर त्यात सर्व प्रथम शिमला मिरची टाकावी .त्यानंतर कोबी ,गाजर टाकावे ,दोन ते तीन मी.परतल्यावर त्यात कुस्करलेला बटाटा टाकावा .
आता सर्व नीट एकजीव करून त्यात लाल तिखट ,हळद ,जीरा पावडर ,गरम मसाला ,मीठ आमचूर पावडर टाकून नीट परतावे.

पाच मिनिटे परतून आच बंद करावी .
मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे आणि मग त्यात पनीर आणि किसलेले चीज टाकून नीट मिक्स करावे .
आता मिश्रण गार होऊ द्यावे .

2

मिश्रण गार झाल्यावर एका बाजूला कणकेचा एक गोळा घेऊन तो थोडासा लाटून घ्यावा
त्याला थोडे तेल लावून त्याची त्रिकोणी घडी करावी
त्यात तयार मिश्रण भरावे आणि अशा रीतीने बंद करावे.
आता हलक्या हाताने त्रिकोणी आकारात लाटावेत
आणि लाटून झाल्यावर तव्यावर दोन्ही बाजूला तेल लावून शेकावेत .
अशा रीतीने उरलेले सर्व पराठे बनवावेत

3

आणि पुदिन्याच्या चटणी किवा दही बरोबर खायला द्यावेत .

4

प्रतिक्रिया

त्रिवेणी's picture

22 Apr 2014 - 3:39 pm | त्रिवेणी

आलेच ग. बरीच लिस्ट वाढते आहे तुझ्याकडे आल्यावर काय काय खायचे त्याची.

कवितानागेश's picture

22 Apr 2014 - 3:41 pm | कवितानागेश

मीपण येते. :)

व्वाह!! एकदम मस्त पाकृ आणि फोटोपण!! :)
पहिला फोटो एकदम सह्ही. आणि पुदिन्याची चटणी भारी दिसतेय गं...पराठे नक्की करून बघणार!!

michmadhura's picture

22 Apr 2014 - 3:59 pm | michmadhura

एकदम मस्त. नक्की करून बघणार!!

तोंपासू!

भावना कल्लोळ's picture

22 Apr 2014 - 4:51 pm | भावना कल्लोळ

"लाळ गळतीमुळे मिपाकर अस्वस्थ" अशी ब्रेकिंग न्युज येणेच बाकी राहिले आहे आता … बाकी पाकु बद्दल काय बोलावे?

लकीली जेवायला आलू मटर पराठे आहेत आज! :)

अजया's picture

22 Apr 2014 - 4:55 pm | अजया

आजच केले होते, कटलेट करुन उरलेल्या मिक्स वेज मिश्रणाचे! त्यामुळे फार त्रास नाही झाला ,पाकृ पाहुन ;)

सानिकास्वप्निल's picture

22 Apr 2014 - 5:23 pm | सानिकास्वप्निल

पाकृ आवडली.

दिपक.कुवेत's picture

22 Apr 2014 - 5:35 pm | दिपक.कुवेत

खुपच आवडले. अवांतर प्रश्नः ह्या सगळ्या भाज्या एवढ्या बारीक कशावर किसल्या?

माझ्याकडे एक चीज किसायाची किसणी आहे त्याने या भाज्या किसल्या आहेत ..+)

अत्रुप्त आत्मा's picture

22 Apr 2014 - 5:41 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating.gif

फोटू छान आलाय. कृतीही आवडली.

पिंगू's picture

22 Apr 2014 - 6:20 pm | पिंगू

सही आहे.

खतरनाक टेस्टी दिसताहेतच.

पैसा's picture

22 Apr 2014 - 7:19 pm | पैसा

आवडली!

मधुरा देशपांडे's picture

22 Apr 2014 - 9:36 pm | मधुरा देशपांडे

मस्त आहे पाकृ. फोटो पण छान.

Anvita's picture

23 Apr 2014 - 9:28 am | Anvita

मस्त !

पराठा लाटायची पद्धत फार आवडली.
टेस्टी अन पौष्टिक!!

मदनबाण's picture

23 Apr 2014 - 6:29 pm | मदनबाण

वाह... :)
{लच्छा पराठा प्रेमी} :)

पाककृती आवडल्याबद्दल सर्वांचे आभार ...+)

सुहास झेले's picture

23 Apr 2014 - 7:19 pm | सुहास झेले

जबरदस्त पाककृती... आणि फोटो ही मस्त :)

अनन्या वर्तक's picture

28 Apr 2014 - 10:30 pm | अनन्या वर्तक

पाककृती आवडली. त्रिकोणी पराठे वेगळी पद्दत आहे मस्त. फोटो सुद्धा छान आहेत.

हम्म आत्ता आठवले, आम्ही (सासरी) या त्रिकोणी जाडसर पोळ्यांना "रोटले" म्हणतो.