White chocolate fudge brownie balls with rum

अनन्या वर्तक's picture
अनन्या वर्तक in पाककृती
11 Apr 2014 - 1:12 am

साहित्य:
१) 1/4 pound chocolate fudge brownies
२) 2 tablespoons dark rum
३) 1-1/2 ounces white chocolate
४) Dry Shredded Coconut
५) 1-1/2 teaspoons cocoa powder, for dusting

पाककृती:
१) Brownies आणि Rum एका काचेच्या भांड्य मध्ये घेवून त्याचे मिश्रण करून घ्या.
२) 1-inch sorbet scoop च्या साह्याने Brownies-Rum च्या मिश्रणाचे गोळे plastic wrap वर ठेवून फ्रीझर मध्ये वीस मिनिटांसाठी ठेवून द्यावे.
३) Double boiler च्या साह्याने White Chocolate गरम करून घ्यावे आणि त्यात Brownies-Rum Balls बुडवून घ्यावे आणि त्यांनतर त्यावर Shredded Coconut पसरवावे.
४) Brownies-rum balls थंड झाल्यावर त्यावर Cocoa powder dusting साठी वापरू शकता आणि हवी असल्यास Rum सुद्धा Spray करू शकता.

पाककृतीचे श्रेय शेजारील जर्मन मैत्रिणीला.

ही पाककृती सादर करताना पदार्थांचे योग्य मराठी शब्द माहीत न्हवते त्यामुळे आणि शुद्धलेखनाच्या चुका बद्दल माफी मागते.

Image1

Image1

Image1

Image1

Image1

Image1

Image1

Image1

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

11 Apr 2014 - 1:34 am | अत्रुप्त आत्मा

मी पैला! :D
.
.
.
.
ह्ह्हाssssssss खाल्लं सुद्दा! ;)
लै लै मस्त...बर कां! :)

स्वप्नांची राणी's picture

11 Apr 2014 - 3:58 am | स्वप्नांची राणी

आता येवढे ढिगभर बनवलेत तर खायला पण पाठवुन दे ना थोडेसे...तोंपासु आहेत अगदि!!!

दिनेश सायगल's picture

11 Apr 2014 - 9:00 am | दिनेश सायगल

निम्मी पाककृती ल्याटीन लिपित लिहून आणि तेच ते फोटो टाकून नेमके काय साधलेत ते कळले नाहि.

निवेदिता-ताई's picture

11 Apr 2014 - 9:41 pm | निवेदिता-ताई

सुंदर

मुक्त विहारि's picture

11 Apr 2014 - 9:46 pm | मुक्त विहारि

झक्कास

थोडं सत्यनारायणाच्या शिर्‍यासारखं दिसतंय.

अनन्या वर्तक's picture

11 Apr 2014 - 10:55 pm | अनन्या वर्तक

बरोबर आहे तुमचे Brownies-Rum Balls चे पेपर सर्विंग कप सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद देण्यासाठी सुद्धा वापरतात.

मस्तच दिसताहेत ब्राउनी रम बॉल्स. :)

अनन्या वर्तक's picture

11 Apr 2014 - 11:26 pm | अनन्या वर्तक

तुमच्या सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल आभार.

थोडी अधिक माहिती:
माझ्या मित्राच्या Ph.D. Final Defense ची पार्टी होती. नेहमी प्रमाणेच काहीतरी भेटवस्तू खरेदी करून द्यावे असे ठरले होते. पण तेव्हा मी सहज विचार केला जर मी स्वतः एखादा सोप्पा पदार्थ बनवून नेला तर सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि माझ्या मित्राला सुद्धा आनंद वाटेल. पदार्थ नक्कीच साधा आणि सोप्पा आहे आणि म्हणूनच सगळ्यांनाच आवडला.

ह्या वेळेस क्रमवार फोटो काढायला नाही जमले कारण Chocolate मुळे हात खूपच messy झाले होते. ह्या पाककृती मध्ये Brownies-Rum Balls ची Consistency कायम ठेवून त्यांना गरम Chocolate मधून बाहेर काढल्यावर सुधा त्यांचा आकार योग्य तो ठेवणे ह्या गोष्टी करताना फोटो काढणे शक्य झाले नाही. मला सुद्धा आवडले असते क्रमवार फोटो काढावयास.