स्ट्फ्ड ब्रेड - शाकाहारी...गणपाभाऊला समर्पित

वाटाड्या...'s picture
वाटाड्या... in पाककृती
10 Apr 2014 - 12:58 am

मित्रहो..

सदर धागा.. पाकृ. गणपाभाऊला समर्पित आहे. गणपाभाऊनी सांगितलेली स्ट्फ्ड ब्रेडची पाकृ. शाकाहारी पध्द्तीने देत आहे.

चला तर...

पाकृ. साठी खालील पदार्थ घेतले...

१. २ वाट्या ऑल पर्पज पीठ (All Purpose Flour),
२. १ चमचा अंदाजाने साखर आणि मीठ,
३. ७ ग्रॅम यीस्ट,
४. १ वाटी कोमट पाणी,
५. टोमॅटो चकत्या, कांदा मध्यम चिरलेला,
६. ऑरगॅनीक चीज,
७. पास्ता सॉस १ वाटी,
८. ढोबळ्या मिरचीचे काप साधारण १० प्रत्येकी ...
९. अमीठेरी :crazy: बटर (unsalted butter),
१०. १ चमचा ईटालियन हर्ब्स,

१ ते ४ आणि १० - हे सगळं एकत्र करुन आचार्‍या प्रमाणे पीठ मळुन कणीक मळली..

kanik

१ तास साधारण ओव्हन मधे मळलेलं पीठ ठेवलं. असलं टरारुन आलं की एका की सौ. वाटीने डोळे मोठे करुन बग्गितलं. डोळ्यातुन म्हणत होती..काय पण ध्यान आहे किती ती मळायची कणीक. पण तीला म्हणलं काही काळजी करु नको, सगळ ठीक होईल.

मग गोळा काढला..थोडा परत मळला...

ऑल पर्पज पीठ ओट्यावर पसरलं आणि लाटला...आणि भरुन आलं ..काय ते दिवस महाराजा..सातारला इंजिनीअरींला कॉलेजला असताना मेसला विट्लो आला की रुमवरच स्वयंपाक करायचो...त्याची आठवण झाली...जाने दो...

गोळा लाट्ला गेला आहे...आणि पास्ता सॉस पसरायला घेतला आहे...

Suru

तर आता काम सोप्प होतं...भाज्या पसरायला घेतल्या...आणि तेव्हडयात आमचं एक सात वर्षाचं बॉबकटवालं डोकं आलं ...मदत करायला...सत्यानाश...फार युध्द न होता कांदा आणि टोमॅटोचे काप ठेवले गेले...

onion and tomato

मग नंबर ढोबळी मिरचीचा लागला...

Dhobali mirachi

त्यावर ऑरगॅनीक चीज पसरलं गेलं...आणि आमच्या पोटाच्या घेराकडं आमचं लक्ष गेलं...सध्या पोट बरच खपाटीला गेलं असल्यानं जरा बरं वाटलं...नाहीतर परत डोळे मोठे झाले असते.. *shok*
with cheese

ओव्हन ३५० डीग्री फॅरन हाईट किंवा साधारण १८०डीग्री सेल्सिअस ला तापवायला ठेवला...
तर जिन्नस एकदा तयार झाल्यावर दांडी गुल झाली, गणपा भाउनी मारे सांगीतलं ..करंजी सारखं लॉक कुठं करता येतय? मग करा मागे सारण सारखं करुन एकदाचं जमलं.

with cheese ready

त्यावर बटरचा हात पसरला....चीज टाकलं वरुन..खमंगपणा येण्यासाठी..झकास...४५-५० मिनीट ओव्हनमधे नीट बेक होऊ दिलं. काय सांगु राजे काय घमघमाट सुटला होता....सात वर्षाचं डोकं नुसतं इकडुन तिकडे उड्या मारत होतं. कधी खातोय असं झालं होतं.

मधे मधे लक्ष ठेवलं...आणि....स्ट्फ्ड ब्रेड तैयार हय खाने के लिये....तुटुन पडो...सात वर्षाच्या डोक्याचा आनंद नुसता मावत नव्हता डोळ्यात...*yahoo*

Ready to eat

१० मिणीटात सगळं संपवुन तृप्त मनाने गणपाभाऊला थँक्यु म्हणलं मनात...

अशा तर्‍हेने आमचा स्वयंपाकी प्रयत्न करुन सफळ संर्पुण झाला. आता भलताच प्रॉब्लेम झालाय ना पण ..आमच्याकडे येणार्‍या फर्माइशी नको इतक्या वाढल्या आहेत....

प्रतिक्रिया

वाटाड्या...'s picture

10 Apr 2014 - 1:03 am | वाटाड्या...

फोटु दिसत नाय...आणि हा लेख पण एडीट करता येत नाय...काय करावे...

आत्मशून्य's picture

10 Apr 2014 - 2:41 am | आत्मशून्य

पण ..आमच्याकडे
येणार्या फर्माइशी नको इतक्या वाढल्या आहेत....

हे मात्र खरे आहे. आपण अड्वेञ्च्र म्हणून काही करायला जातो आणी लोकांना मात्र उगाचच त्यातले प्रो वाटू लागतो.

पैसा's picture

10 Apr 2014 - 9:45 am | पैसा

एक तर तुम्ही फोटो तिथून हलवले असावेत किंवा पब्लिक अ‍ॅक्सेस दिला नाहीये. नेमकं काय बघा. पण मला 'अ‍ॅक्सेस डिनाईड' असा मेसेज मिळाला नाही. गुगलवर लॉग इन केल्यावर त्या फोटोच्या लिंकवर काहीच दिसत नाहीये.

फोटो जिथे आहेत ती लिंक इथे द्या, मग बघू.

त्रिवेणी's picture

10 Apr 2014 - 2:14 pm | त्रिवेणी

मलापण फोटो दिसत नाहीत.

तुमचा अभिषेक's picture

10 Apr 2014 - 2:27 pm | तुमचा अभिषेक

मलापण नाही..
आणि पाकृच्या धाग्यात तेच बघून तर सारे काही ठरवायचे असते. म्हणजे वाचायचे की न वाचायचे, करायचे की न करायचे. (अर्थात बायकोच्या हस्ते)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Apr 2014 - 2:35 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/fist-smash-smiley-emoticon.gif फो...............टूsssssss :-/ http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/fist-smash-smiley-emoticon.gif

स न वि वि's picture

11 Apr 2014 - 5:57 pm | स न वि वि

ह्या हातच्या स्मायली कश्या आणल्या?

दिपक.कुवेत's picture

10 Apr 2014 - 2:48 pm | दिपक.कुवेत

हि पाकॄ हमखास यशस्वी झाल्याची पावती आहे! लगे रहो....

दिपक.कुवेत's picture

10 Apr 2014 - 2:52 pm | दिपक.कुवेत

"ऑल पर्पज पीठ" वाचुन मराठि भाषा सुद्धा कशी पावलागणीक बदलते याचा प्रत्यय आला!

ब़जरबट्टू's picture

11 Apr 2014 - 10:47 am | ब़जरबट्टू

+)) =))

अजुन एका बाप्याला (स्वयंपाक घरात) कामाला लावल्याबद्दल त्या गृहलक्ष्मीचे भरभरुन आशिर्वाद मिळणार असं दिसतय. :)

लगे रहो वाटाड्या भौ.
फोटच जरा जमवा परत.

वाटाड्या...'s picture

10 Apr 2014 - 8:16 pm | वाटाड्या...

जयजयकार..थँक्यु दादा...फोटु दिसायला लागले...

वा मस्त दिसतेय पाकृ. लिखाणही आवडले.

भाते's picture

10 Apr 2014 - 8:21 pm | भाते

शेवटचा फोटो दिसत नाही आहे. (मी संपवल्यावर कसा दिसणार इतरांना?) :)
सगळे साहित्य जमा केल्यावर करून बघण्यात येईल.

दिव्यश्री's picture

10 Apr 2014 - 9:25 pm | दिव्यश्री

मस्त पाककृती . भारी फोटूज आणि सादरीकरण . :)

वाटाड्या...'s picture

15 Apr 2014 - 7:24 pm | वाटाड्या...

दि..ताई..

सखी's picture

11 Apr 2014 - 5:08 pm | सखी

छानच जमलाय की स्टफ्ड ब्रेड. लिहण्याची स्टाईलपण आवडली खास करुन 'सात वर्षाचं डोकं' हे भारीच :)

त्रिवेणी's picture

11 Apr 2014 - 5:25 pm | त्रिवेणी

यीस्ट कोणत्या कंपनीच वापरल.

वाटाड्या...'s picture

15 Apr 2014 - 7:26 pm | वाटाड्या...

ड्राय यीस्ट वापरलं. ते मायरचं आहे.

केदार-मिसळपाव's picture

11 Apr 2014 - 5:31 pm | केदार-मिसळपाव

अभिनंदन

स न वि वि's picture

11 Apr 2014 - 5:55 pm | स न वि वि

हा हा काय ती लेखन शैलि म्हनावि..हसुन हसुन उदर दुखु लगले. :lol: बाकि सगले सुरेखच... आणि हो अश्या हि काही settings आहेत का? कि ज्यात पब्लिक आणि प्राएवेत अ‍ॅक्सेस द्यावे लागतात? कुठे आहेत ते विभाग? मी नविन् आहे हो इथे...क्रुपया मदत करवि... *YES*

स न वि वि's picture

11 Apr 2014 - 6:00 pm | स न वि वि

तर आता काम सोप्प होतं...भाज्या पसरायला घेतल्या...आणि तेव्हडयात आमचं एक सात वर्षाचं बॉबकटवालं डोकं आलं ...मदत करायला...सत्यानाश...फार युध्द न होता कांदा आणि टोमॅटोचे काप ठेवले गेले

:lol:

यशोधरा's picture

11 Apr 2014 - 6:03 pm | यशोधरा

झकास फोटो!

रेवती's picture

11 Apr 2014 - 6:14 pm | रेवती

वा! झकास काम केलत! सात वर्षाचं डोकं म्हटल्यावर एक लहानगी मुलगी नाचत डोळ्यासमोर येत होती.
सगळे फोटू आता व्यवस्थित दिसल्याने हा पदार्थ तुम्हीच केलायत याचा पुरावा मिळाला. ;)

शाकाहारी...गणपाभाऊला समर्पित ???? कधीपासुन :-) समस्त कुक्कूटवर्ग एका पायाने लंगडी घालुन नाचतील कि ओ.. ;-)
बाकि व्हेरीएशन दणकुन आवडली..धन्यवाद
मायक्रोवेव मधे करता येईल का ही पा.कृ. व काय सेटीग्ज ठेवावी? जानकारांनी प्रकाश टाकावा हि णम्र विनंती

मुक्त विहारि's picture

11 Apr 2014 - 8:03 pm | मुक्त विहारि

झक्कास

अनन्या वर्तक's picture

11 Apr 2014 - 11:41 pm | अनन्या वर्तक

छान वाटले तुम्ही गणपांची स्टफ्ड चीज ब्रेड पाककृती पाहून तुम्ही स्वतः प्रयत्न करून पदार्थ बनविला. फोटो आणि शेवटची पंच लाईन अतिशय सुंदर.

वाटाड्या...'s picture

15 Apr 2014 - 7:28 pm | वाटाड्या...

अनन्या वर्तक, मुविशेठ, रेवती ताई, यशोधरा ताई, स न वि वि (ताई/बुवा?), सखी ताई, केदार-मिसळपाव दादा, शुचि ताई, दिपक.कुवेत शेठ आणि सर्वात शेवटी परत एकदा गणपाभाऊ..सगळ्यांचे आभार...

- वाटी