मँगो पार्फे

मनिष's picture
मनिष in पाककृती
9 Apr 2014 - 4:26 pm

करायला सोपी आणि अतिशय स्वादिष्ट अशी ही आंब्याची डेलीकसी - मँगो पार्फे (Parfait).

एकदा साहित्य जमवले, आणि फळे कापून तयार असली की काही मिनिटातच तयार होते, आणि तितकीच लवकर फस्त होते! :-)

खास करून लहान मुलांची अतिशय आवडती डीश. आंब्याच्या मौसमाचे आणि उन्हाळ्याचे स्वागत करण्यासाठी अतिशय चविष्ट, थंडगार पाककृती. ह्या प्रमाणात ३ ग्लास मँगो पार्फे तयार होईल.

साहित्य:

  • ३ मध्यम आकारचे हापूस आंबे, बारिक चिरलेले.
  • ३ ते ४ इतर फळे, बारीक चिरलेली. मी १ सफरचंद, २ किवी आणि वाटीभर द्राक्षे घेतली होती.
  • स्ट्रॉबेरी किंवा इतर आवडत्या स्वादाचे योगर्ट.
  • स्ट्रॉबेरी क्रश ६ मोठे चमचे. इतर कुठलाही आवडता क्रश घेऊ शकता.
  • ३ मोठे चमचे बारीक तुकडे केलेला सुका मेवा - मी आक्रोड, काजू आणि पिस्ते घेतले होते.
  • थोडेसे मध किंवा बटरस्कॉच सिरप, सजावटीसाठी.

mango fruits yogurt

कृती:

  1. ग्लासात सगळ्यात खाली आंब्याच्या बारीक फोडि टाकून घ्याव्यात. साधारण १ आंबा एका ग्लासासाठी ह्या प्रमाणात.
  2. आंब्याच्या फोडींवर २-३ चमचे स्ट्रॉबेरी योगर्ट टाकावे.
  3. ह्या योगर्टवर २-३ चमचे स्ट्रॉबेरी क्रश टाकून घ्यावे.
  4. आता ह्यावर बारीक कापलेल्या फळांच्या फोडी टाकाव्यात.
  5. आता वरून १ चमचा बारीक तुकडे केलेला सुका मेवा आणि ३-४ थेंब मधाचे किंवा बटरस्कॉच सिरपचे टाकावे.
  6. हे भरलेले ग्लास आता फ्रीजरमधे १५-२० मिनिटे ठेवावेत, ही डीश थंडगार किंवा थोडी बर्फाळच छान लागते - त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे फ्रीजरमधे जास्त वेळ ठेवता येईल.
  7. parfait

  8. बस्स!! फ्रीज मधून बाहेर काढा आणि उन्हाळ्यातल्या एखाद्या दुपारी ह्या थंडगार, स्वादिष्ट 'मँगो पार्फे' वर ताव मारा. लहान मुले असतील तर फ्रीजमधून बाहेर काढल्यावर लगेचच फस्त होईल ह्याची गॅरंटी!

Mango Parfait - Ready To Eat

लुत्फ घ्या थंडगार मँगो पार्फेचा! :D

प्रतिक्रिया

वाह !! मस्त कलरफुल्ल दिसतय की.

दिपक.कुवेत's picture

9 Apr 2014 - 5:05 pm | दिपक.कुवेत

कसलं कलरफुल आणि टेंप्टिंग दिसतय. असं वाटतय शेवटचा ग्लास लगेच उचलुन घ्यावा. असं केलं तर...स्ट्रॉबेरी क्रश, मध किंवा बटरस्कॉच सिरप नुसतच न टाकता ग्लास गोलाकार फिरवत घातलं तर नक्किच एक आकर्षक डिझाईन तयार होईल (ते नाहि का चॉकलेट सीरपचं असतं तस)

ही खरच मस्त आयडीया आहे, करून बघयला हवी. :-)

ह्याला पार्फे म्हणतात होय. पुण्यात एम जी रोडवरच्या पाश्चर्स मध्ये मिळतं की हे !!

मी तिथे नाही खाल्ले कधी. मला वाटते एक मॉलमधे माझ्या मुलानी खाल्ले आणि मग आम्ही घरीच करतो....अगदी हापुस घेतला तरी मॉलपेक्षा स्वस्त पडते! :P

पैसा's picture

9 Apr 2014 - 5:25 pm | पैसा

मस्त दिसतंय! आणि हेल्दी पण. मात्र तीन हापूस आंबे? कसे परवडणार?

कमी आंबे टाका आणि प्रभो म्हणतो तसे जस्त योगर्ट टाकायचे. हाकानाका! :-)
मला फळे जास्त आवडतात म्हणून फळे जास्त टाकली. ह्यात जेली टाकुनही मस्त लागते.

प्रभाकर पेठकर's picture

9 Apr 2014 - 8:31 pm | प्रभाकर पेठकर

जास्त योघर्ट वापरण्यापेक्षा आंब्याची मात्रा कमी करून सोबत स्वस्तातली मस्त पिकलेली पपई वापरून पाहा. मुलांना-नवर्‍याला कळणारही नाही. शिवाय फ्रुट परी फ्रुट झालेच.

पिकलेल्या पपईला तर दुसरी उपमाच नाही. निव्वळ साखर!!!

नाही हो! माझ्या ४ वर्षाच्या मुलाला हापूस आणि इतर आंब्यांचा फरकही पहिल्या घासाला समजतो! :-)

अगदी माझ्या मुलाला हि हा फरक लगेच कळतो .तो सध्या पाउणेचार वर्षाचा आहे ..तरिहि ...+)

कवितानागेश's picture

9 Apr 2014 - 5:27 pm | कवितानागेश

यम्मी. :)

पिलीयन रायडर's picture

9 Apr 2014 - 5:29 pm | पिलीयन रायडर

मल आजकाल कोणतेच फोटो दिसत नाहीत.. का बरं?

भारी!! आपल्याला यात योगर्ट जास्त आणी फळं कमी असलेलं पार्फे जास्त आवडतं!!

आहाहाहा.... कसला जोवघेणा प्रकार दिसतोय.

शेवटच्या फोटोतील ग्लास पटकन उचलावासा वाटतोय.

शिद's picture

9 Apr 2014 - 7:02 pm | शिद

*जिवघेणा

भारीच प्रकरण आहे. कधी खाल्ले नाही. आता प्रयत्न करुन बघितला पाहिजे..

बरेच पार्फे खाल्लेत पण इतका सुंदर कधी पाहीला नाही. मात्र सुकामेवा/ओट्स वगैरे आवडत नाही. कडक असतात अन हिरड्यांना टोचतात. जास्त योगर्ट अन मऊ मऊ फळे घातलेले पार्फे आवडतात.

ओट्स नाही चांगले लागणार, पण मधात बुजलेले काजू, आक्रोड नक्कीच छान क्रंची लागतात. बदाम कदाचित जास्त कडक लागतील.

शुचि's picture

9 Apr 2014 - 7:10 pm | शुचि

अरेच्या ओटस नाही सॉरी ग्रॅनोला म्हणायचे होते :) ग्रॅनोला पर्फे ब्रेकफास्ट्ला इथे खातात. ग्रॅनोलातही - ब्लूबेरी/स्ट्रॉबेरी/व्हॅनिला वगैरे प्रकार आहेत. अर्थात ते त्या त्या एस्सेन्स मध्ये मुरवलेले/सुक्या बेरीज घातलेले वगैरे असतात. पण जाम टोचतात.

आजानुकर्ण's picture

9 Apr 2014 - 7:00 pm | आजानुकर्ण

मस्तानी आता डाऊनमार्केट झाली आहे काय?

कावर्‍यांची मँगो मस्तानी अन पिस्ता मस्तानी ..... खाऊन १० वर्षं झाली. असो. अप्रतिम असते एवढेच नोंदवते.

मनिष's picture

9 Apr 2014 - 7:05 pm | मनिष

स्वतः आपण?
मस्तानी जाऊ दे अप्/डाऊन, पण तुझ्या सहीत ही कॉग्रेसची जाहिरात? हेच पहायचे राहिले होते?

आजानुकर्ण's picture

9 Apr 2014 - 8:15 pm | आजानुकर्ण

मी पहिल्यापासूनच पुरोगामी पक्षांचा व विचारांचा समर्थक आहे.

प्यारे१'s picture

9 Apr 2014 - 8:19 pm | प्यारे१

=)) =)) =))

आता पुढचा विनोद सांगा प्लिज.

आजानुकर्ण's picture

9 Apr 2014 - 8:30 pm | आजानुकर्ण

विनोद सांगितले तरी तुम्हाला समजतील असे वाटत नाही *ok*

(ह. घ्या. बरंका)

विनोद सांगा तरी, नै समजले तर सोनियाजी राहुलबाबाला भरवतात तसं भरवा आम्हाला.

हाय्काय नि नाय्काय! ;)

असे काय करताय? आपण जुने 'डावे' (की समाजवादी? गोंधळ होतो आजकाल) नाही का? :lol:

प्यारे१'s picture

9 Apr 2014 - 7:05 pm | प्यारे१

असावी.
बाजीराव गेल्या पासून तिला तसं कुणी वाली नाहीच म्हणा ;)

पार्फे बर्फघून गार्फार वार्फाटले आर्फाहे. ;)

छान दिसते आहे. आता इथे हापूस शोधणे आले. सध्या तरी केंट म्यांगोज मिळालेत आणि त्यातला एकच पिकलाय.

प्रभाकर पेठकर's picture

9 Apr 2014 - 8:38 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर पाककृतीची लाजवाब सजावट. वेळ मिळताच करून पाहण्यात येईल.

असेच फळांचे तुकडे वापरून, जेली घालून फ्रिजमध्ये थंड आणि घट्ट करून त्याचे काप काढतात. तेही छान दिसते आणि लागते.

स्वतः पेठकर काकांच प्रतिसाद पाहून दिल खुष झाला! :-)

मुक्त विहारि's picture

9 Apr 2014 - 9:28 pm | मुक्त विहारि

झक्कास...

आरोही's picture

9 Apr 2014 - 10:17 pm | आरोही

मस्त नक्की करून बघणार

निवेदिता-ताई's picture

9 Apr 2014 - 10:33 pm | निवेदिता-ताई

मस्त

सोत्रि's picture

10 Apr 2014 - 12:09 am | सोत्रि

करून आस्वाद घेण्यात येइल लवकरच!

- (आंबाप्रेमी) सोकाजी

स्पंदना's picture

10 Apr 2014 - 7:08 am | स्पंदना

कलरफुल!! मला किवी जरा चरचरते तोंडात.
पण पहाता येइल करुन.

सानिकास्वप्निल's picture

10 Apr 2014 - 11:25 am | सानिकास्वप्निल

काय रंगसंगती आहे मस्तचं
पार्फेची कृती आवडली आंबे मिळताच करुन बघीतली जाईल :)

मुवि, अद्वेय, निवेदिता-ताई, सोत्रि, aparna, सानिकास्वप्निल आणि सर्वच प्रतिसाद देणार्‍यांचे आभार!

(खुद के साथ बातां: असाच जरा तिथेही प्रतिसाद मिळाला तर? आम्हालही जरा हुरूप येईल ना! ;-))

इशा१२३'s picture

10 Apr 2014 - 12:42 pm | इशा१२३

मोहक रंगसंगती आणि सोपी पाककॄती ...छानच..

भाते's picture

10 Apr 2014 - 2:24 pm | भाते

शेवटचा फोटो बघुनच गारगार वाटलं. नक्की करून बघण्यात येईल.

सुहास झेले's picture

10 Apr 2014 - 6:13 pm | सुहास झेले

भारीच.... शेवटचा फोटो तर क्या केहने :)

तुमचा अभिषेक's picture

11 Apr 2014 - 12:17 pm | तुमचा अभिषेक

क्लास !
मला फळे मोजकीच आवडत असली तरी बघायचा आनंद मिळाला.

अनन्या वर्तक's picture

12 Apr 2014 - 12:34 am | अनन्या वर्तक

मनीष अतिशय सुंदर सादरीकरण. आठवड्यातून एक दोनदा ग्रॅनोला पर्फे ब्रेकफास्ट्ला असतेच त्या मुळे हा पदार्थ जास्त जवळचा. फळे आणि योगर्ट मुळे मस्त रंगसंगती साधली आहे. फोटो आवडले........

Anvita's picture

12 Apr 2014 - 8:16 am | Anvita

मस्त कलरफुल फोटो !
अगदी बघून आत्ताच खावे सारखे वाटते आहे.

किसन शिंदे's picture

12 Apr 2014 - 8:40 am | किसन शिंदे

(स्पा मोड ऑन) हुच्च्भ्रू पाककृती (स्पा मोड ऑफ) :D

पियुशा's picture

16 Apr 2014 - 3:13 pm | पियुशा

कसला क्लास दिसतय !

मदनबाण's picture

23 Apr 2014 - 6:40 pm | मदनबाण

जबराट !

ब़जरबट्टू's picture

24 Apr 2014 - 11:04 am | ब़जरबट्टू

आहा.. उन्हाळ्यात असले काही म्हणजे मज्जाच.. :)