एक काहीतरी……

चिनार's picture
चिनार in जे न देखे रवी...
3 Apr 2014 - 1:37 pm

मामाचं पत्र हरवलंय की पत्र लिहिणारा मामाचं हरवलाय ?
एक काहीतरी नक्कीच हरवलंय !

कोंबड्याचं आरवण थांबलंय की ती सकाळ व्हायचीच थांबलीय ?
एक काहीतरी नक्कीच थांबलय !

पाटीवर अभ्यास लिहायचा राहिलाय की आमची पाटी कोरीच राहिलीय ?
एक काहीतरी नक्कीच राहिलंय !

मऊ वरण-भात करपलाय की आमची जीभच करपलीय ?
एक काहीतरी नक्कीच करपलय !

संवाद कमी झालाय की विसंवाद वाढलाय ?
एक काहीतरी नक्कीच झालंय

आमचं वय वाढलंय की आमच्यातलं अंतर वाढलंय ?
एक काहीतरी नक्कीच वाढलंय

शुभं करोति म्हणायचं विसरलोय की शुभ म्हणजे काय तेच विसरलोय ?
एक काहीतरी नक्कीच विसरलोय !

रामाची गोष्ट संपली आहे की प्रत्येक गोष्टीतला रामच संपलाय ?
एक काहीतरी नक्कीच संपलय !!

मुक्तक

प्रतिक्रिया

चिनार's picture

23 Apr 2014 - 3:20 pm | चिनार

ही कविता "उत्तमकथा " मासिकाच्या एप्रिल अंकात प्रकाशित झाली आहे

प्यारे१'s picture

23 Apr 2014 - 3:23 pm | प्यारे१

हार्दिक अभिनंदन!

इथे घासकडवींची आठवण येते. निराशाजनक चित्र कोणी रेखाटले की ते आवर्जून नवीन अन सकारात्मक डेव्हलपमेन्ट कडे लक्ष वेधतात. अन्य काही लेखातही हटके पण प्रगल्भ दृष्टीकोन मांडलेले खरे तर त्यांचे प्रतिसाद आजकाल मिस करते आहे. :(
हा प्रतिसाद मनापासून व प्रंजळपणे लिहीलेला आहे.

पैसा's picture

23 Apr 2014 - 11:00 pm | पैसा

इथे अशाच आणखी नव्या कविता पण लिहीत चला!

कविता आवडली. पण तुम्ही म्हणताय ते सगळंच हरवलं नाही अजून. बर्‍याच ठिकाणी शिल्लक आहे. फक्त तुम्हाला कॉम्प्युटरसमोरून उठून निसर्गाकडे जावं लागेल!