गुळांबा

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
29 Mar 2014 - 6:03 pm

साहित्यः कैरीचा कीस दोन वाट्या, गूळ चार वाट्या, वेलची पावडर, लवंगा दोन तीन.
कृती: कैय्रा धुऊन साले काढून घ्यावीत. साले काढलेल्या कैय्रा किसाव्यात. किसाच्या दुप्पट गूळ घेऊन तो किसलेल्या कैरीत मिसळावा. दोन तास मिश्रण झाकून ठेवावे. दोन तासानंतर गूळ विरघळला की लवंगा घालून मिश्रण गॅसवर कढवायला ठेवावे. मिश्रणाचा थेंब डीशमध्ये टाकून पहावा. थेंब पसरत नसेल तर गुळांबा तयार झाला असे समजावे. तयार गुळांब्यात वेलची पावडर मिसळावी.
या गुळांब्याला वेळ कमी लागतो. गूळाचे प्रमाण कैरीच्या आंबटपणानुसार कमी जास्त करावे. त्यासाठी गूळ एकत्र करून ठेवलेल्या मिश्रणाची गॅसवर ठेवण्यापूर्वी चव पहावी. गुळांब्याची चव छान खमंग लागते. एकदा करून ठेवला की वर्षभरात कधीही मुलांना जॅमऐवजी देता येतो.
gulamba

प्रतिक्रिया

इन्दुसुता's picture

29 Mar 2014 - 6:16 pm | इन्दुसुता

कृती आणि फोटो आवडले.

रेवती's picture

29 Mar 2014 - 7:09 pm | रेवती

वाह! छान.

विवेकपटाईत's picture

29 Mar 2014 - 7:31 pm | विवेकपटाईत

कृती आवडली. ब्रेड वर लावण्यासाठी मस्त जाॅम...

ह भ प's picture

29 Mar 2014 - 7:52 pm | ह भ प

उन्हाळ्यातली सगळ्यात आवडती डिश.. यम्मी.. लवकरात लवकर घरी कैर्‍या आणून देतो आता.. :)

यशोधरा's picture

29 Mar 2014 - 7:52 pm | यशोधरा

यम्मी!

पियुशा's picture

30 Mar 2014 - 4:52 pm | पियुशा

यम्म यम्म !!

त्रिवेणी's picture

29 Mar 2014 - 8:18 pm | त्रिवेणी

तायडे आता दोन्ही बरण्या ईकडे पार्सल कर बघु.

अजया's picture

29 Mar 2014 - 9:38 pm | अजया

रत्नांग्रीस जावेच लागणार !!

सानिकास्वप्निल's picture

30 Mar 2014 - 12:49 am | सानिकास्वप्निल

मस्तं !

विशाखा राऊत's picture

30 Mar 2014 - 3:59 am | विशाखा राऊत

अरे वाह..

श्रीरंग_जोशी's picture

30 Mar 2014 - 4:44 am | श्रीरंग_जोशी

लहानपणी दुपारचे (तीन चार वाजताच्या दरम्यानचे) जेवण म्हणून बरेचदा पोळीबरोबर खायला आवडायचा.

पाकृ आवडली.

मस्त ! मला यातली रसात मुरलेली लवंग फार आवडते... गोड पाक आणि लवंगेचा स्वता:चा स्वाद यांची वेगळीच चव जिभेला मिळते.

तुमचा अभिषेक's picture

30 Mar 2014 - 11:54 pm | तुमचा अभिषेक

मला यातली रसात मुरलेली लवंग फार आवडते... गोड पाक आणि लवंगेचा स्वता:चा स्वाद यांची वेगळीच चव जिभेला मिळते.

माझा जाम फेवरेट आहे ग हा ! :) आहाहाहा! काय लागतो...
पाकृ मस्त!

पैसा's picture

30 Mar 2014 - 5:11 pm | पैसा

आवडता प्रकार. माझी आई फोडींचा पण गुळांबा करायची. तोही मस्त वाटतो. दुसरा राजेशाही प्रकार म्हणजे पिक्या हापूस आंब्याच्या फोडींचा साखरांबा. अहाहा! स्वर्गच!!

>> दुसरा राजेशाही प्रकार म्हणजे पिक्या हापूस आंब्याच्या फोडींचा साखरांबा.

वा वा !! काय आठवण काढलीत!!

मैत्र's picture

1 Apr 2014 - 2:14 pm | मैत्र

प्रचंड सहमत..
त्याची चव म्हणजे केवळ स्वर्ग.. आणि तो झक्कास केशरी रंग..
बेष्ट..

या वर्षीचे हापूसचे भाव पाहून दचकायला होतंय सध्या तरी.

किसन शिंदे's picture

30 Mar 2014 - 5:24 pm | किसन शिंदे

गावी मे महिन्याच्या सुट्टीतल्या कालखंडात एकदा तरी गुळांबा बनवून खाणे हा कार्यक्रम ठरलेला असायचा. आम्ही सगळी चुलत भावंडे दिवसभर त्याचा थाट घालून बसत असू, सोबतीला आज्जी असायचीच. :) स्वकष्टाने झाडावरून निवडून मोठ्या कैर्‍या उतरवून आणल्यानंतर भगिनी मंडळाकडे त्यांची रवानगी व्हायची. त्यांनी एकदम बारीक किसून घेतल्यावर चुलीवर गुळांबा करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात व्हायची, त्यासाठी आज्जी मधून मधून सुचना द्यायची. मग तयार झालेला गुळांबा सगळ्यांना समान वाटणी केल्यानंतर जो तो निवांतपणे एखादी मस्त जागा बघून त्यावर ताव मारायचा.

आता काही मिळत नाही गावी गेल्यावर. :(

अनन्न्या's picture

30 Mar 2014 - 6:58 pm | अनन्न्या

मुलांसाठी आपण स्वतः केलेला पदार्थ आपल्यालाही वेगळाच आनंद देऊन जातो.

प्यारे१'s picture

31 Mar 2014 - 3:51 pm | प्यारे१

मत्तच!

पाककृती छान आहे यात वाद नाहीच.

लहान असताना या पदार्थाचा इतका मारा सहन केलाय की आता नावही नको वाटतं.
डब्याला काही नसलं की आयत्यावेळी चपातीच्या घड्यांमध्ये गुळांबा, मुरांबा आदी पदार्थ असायचे. त्यातल्या पाकामुळे चपात्या पार लिब-लिबीत होऊन जायच्या वर उरलेला रस डब्याच्या झाकणाचं कवच, वरचं प्लॅस्टिकचं आवरण भेदुन वह्या,पुस्तकांनाही चिक्कट करुन सोडायचा. माझ्यापेक्षा मुंग्यांनी पुस्तकांची पाननपानं वाचली असतील याची खात्री आहे.

पैसा's picture

31 Mar 2014 - 11:09 pm | पैसा

=)) तरीच तू गोड पदार्थांच्या वाटेला न जाता चिकनचा मॅसॅकर करतोस!

प्यारे१'s picture

1 Apr 2014 - 1:41 pm | प्यारे१

>>>मॅसॅकर

मुर्दोंको मारने में काहे का मॅसॅकर? डिसेक्शन या पोस्ट मार्टेम कहो! ;)

आरोही's picture

2 Apr 2014 - 2:34 pm | आरोही

मस्त प्रकार ....मला वाटते यालाच मुरंबा पण म्हणतात

इशा१२३'s picture

3 Apr 2014 - 11:20 am | इशा१२३

मस्त दिसतोय गुळांबा..साखरेपेक्षा गुळ चटकदार लागतो....करतेच आता..