माझी सुंदर आई

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
26 Jul 2008 - 7:28 am

(अनुवादीत. संगीतकार---सी. रामचंद्र)

नसे देखिले त्या देवा जरी
त्या देखण्या काय जरूरी
अगे,आई
कमलमुखी तू सुंदर असता
रूप तयाचे कसे वेगळे

कुठले मानव कुठले देव
फुलती सर्व तुझ्याच पदरी
दुनेयेत ह्या स्वर्ग असे
पायतळी तो तुझ्याच वसे

भरती ममतेने नयन जिचे
मुर्ती देखण्या काय जरूरी
अगे,आई
कमलमुखी तू सुंदर असता
रूप तयाचे कसे वेगळे

कधी दुःखाचे ऊन असे
कधी नैराशाचा मेघ बरसे
हे कमलहस्त तुझ्या दुवांचे
सर्सावती मम माथ्या वरती
अगे,आई
कमलमुखी तू सुंदर असता
रूप तयाचे कसे वेगळे

तूं असता असो अंधार जरी
सूर्यनारायणाची काय जरूरी
अगे,आई
कमलमुखी तू सुंदर असता
रूप तयाचे कसे वेगळे

तुझ्या स्तुतीसुमनांच्या शब्दापुढे
कुठलाही शब्द थोर नसे
देवा जवळी असो सर्व माया
तुझ्या ममतेला मोल नसे
अगे,आई
कमलमुखी तू सुंदर असता
रूप तयाचे कसे वेगळे

जवळी दुनियेतली दौलत जरी
तू असता आम्हा काय जरूरी
अगे,आई
कमलमुखी तू सुंदर असता
रूप तयाचे कसे वेगळे

श्रीकृष्ण सामंत

कविता

प्रतिक्रिया

श्रीकृष्ण सामंत's picture

26 Jul 2008 - 7:55 am | श्रीकृष्ण सामंत

सॉरी,
वरिल गाण्याचे संगीतकार रोशन आहेत.सी.रामचंद्र नव्हेत
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

किर्ति's picture

28 Jul 2008 - 10:52 am | किर्ति

कविता खुप भावुक आहे खुप आवडली ;;)