आंबा

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in पाककृती
16 Feb 2014 - 5:20 pm

उन्हाळा म्हंटला की आपल्याला सर्वात अगोदर आठवतो तो आंबा. उन्हाळ्याचा
बर्‍याच प्रकारचे आंबे खात असतो.
हापूस पायरी मलगोवा केसर तोतापुरी दशेरी रत्ना कावजीपाटील, गोटी अंबा , खोबरी आम्बा यांचा आपल्याला परीचय असतो.
इकडे दक्षीण अफ्रीकेत सध्या उन्हाळा आहे, आपल्या इतकी नाही पण इकडे सुद्धा आंब्यांची रेलचेल असते.
आपल्यकडे दिसतात तशा आंब्यांच्या गाड्या दिसत नाहीत पण आंबे भरपूर असतात.
आपल्या इथल्या सारखी नाही पण तोतापुरीच्या जवळपास जाणारे चव असणारा आंबा पहायला चाखायला मिळाला.
1
अक्षरशः डाळिंबाच्या रंगाच आंबा प्रथमच पाहिला.
याची चव मात्र एकदम फक्कड आहे
2

प्रतिक्रिया

तिमा's picture

16 Feb 2014 - 5:39 pm | तिमा

आंब्याचा रंग वेगळाच आहे. फोटो छान आले आहेत. पण पाककृती दिली नाही म्हणून णिषेध!(म्हणजे धुणं,कापणं, बशीत मांडणं इत्यादि>)

आयुर्हित's picture

16 Feb 2014 - 5:42 pm | आयुर्हित

सालीचा रंग जबरीच आहे! डाळींबी आंबा !!
दात न लावलेली कोय सांभाळून ठेवा! भारतात येतांना घेऊन या हो २-४ कोयी आमच्यासाठी!

धन्यवाद, नवीन माहिती दिल्याबद्दल.

मुक्त विहारि's picture

16 Feb 2014 - 11:01 pm | मुक्त विहारि

झक्कास....

हा आंबा घेवून कधी येत आहात?

नाही म्हणजे तसा कट्टा ठरवायला बरे.....

(कट्टेकरी) मुवि.

इथे आम्हाला युरोप मधे सुद्धा हाच आंबा मिळतो. मला पण आवडते ह्याची चव. अगदी आपल्या हापुस एवढी खास चव नाही, पण दुधाची तहान ताकावर भागवायची.

ईजुभौ इथे अगदी असलाच पण हिरवागार आंबा, बारोमास मिळतो.
फळ चांगलं मोठ्या नारळा येवढं मोठं पण आतला बाठा फार फार तर १ सेंमी जाड.