साहित्यः १ कप मैदा
१/४ कप तेल
चवीपुरते मिठ
३/४ ते १ कप हिरवे मटार
फोडणीसाठी १ टेस्पून तेल + १/४ टीस्पून हळद
ओवा, १ इंच आले ७-८ लसुन पाकळ्या आणि ४ हिरव्या मिरच्या ठेचून.
कृती: मैद्या मध्ये थंड तेलाचे मोहन घालून मीठ ,ओवा आणि पाणी घालून घट्टसर माळून घ्या आणि काही वेळ झाकून ठेवा .
मिक्सर मध्ये मटार थोडे जाडसर भरडून घ्या.
आता एका भांड्यात थोडे ते घालून त्यात आल लसुन मिरची तेच टाका ,मग हळद आणि शेवटी भरडलेले मटार टाका. मीठ टाकून परतून घ्या .अगदी पाच मिनिटेच.
आता तयार मिश्रण थोडे गार होऊ द्या .
तोपर्यंत मैद्याच्या पीठाचे छोटे गोळे करून घ्या .
आता मैद्याचा एक गोळा घेऊन तो थोडा पोळपाटावर लाटून तो हातावर घ्या,
त्यात तयार सारण भरून गोळा बंद करा.
आणि हलक्या हाताने दाबा व त्याला कचोरी चा आकार द्या .किवा लाटून हि घेऊ शकता .पण हलक्या हाताने नाहीतर सारण बाहेर येईल.
अशा प्रकारे सर्व कचोऱ्या तयार करून घ्या .
एका कधाइत टाळण्यासाठी तेल टाका आणि ते थोडे तापल्यावर च त्यात एक किवा दोन कचोऱ्या टाका व मध्यम आचेवर टाळून घ्या.
अशाप्रकारे सर्व कचोऱ्या तळून घ्या .
जर कचोरी क्रिस्पी हवी असेल तर तेलाचे तापमान जास्त नसताना कचोरी टाकावी म्हणजे ती क्रिस्पी होईल.
जर तेलाचे तापमान जास्त असेल तर कचोरी लगेच नरम पडेल.
आता हि recipe देण्याचे कारण कि मस्त थंडी पडलीये आणि आज तर पाऊस हि झाला .तेव्हा काहीतरी चटपटीत खावेसे वाटत असणार ....
आणि मटार तर फारच स्वस्त आहेत सध्या ..घरात किवा बाजारात लगेच मिळतील तेवा नक्की करून बघा ...
प्रतिक्रिया
15 Feb 2014 - 10:39 pm | खेडूत
छान!
फटू ८०० बाय ४५० ऐवजी ६०० बाय ४०० केला तर मावेल!
घाईत टंकल्यामुळे गम्मत झालीय - ''सर्व कचोऱ्या टाळून घ्या '' :)
15 Feb 2014 - 11:04 pm | आरोही
अरे हो खरेच गम्मत झालि कि....पण भावना कळल्या ना ???ते महत्वाचे...आनि फोटो चे म्हनाल तर आता तो कसा लहान करावा ते मला माहित नाहि हो...
आनि हो नरान च्या ऐवजि नरम आहे ह.....
15 Feb 2014 - 11:30 pm | अविकुमार
आन बडिशेपबी दिसून र्हायलीय नव्हं का फटूत..... ती कवा टाकायची? कशामंदी टाकायची? का चूकून पडलीया फटूवर?
काय बी आसंना का गड्या...फटू लई म्हंजी लईच झ्याक....! :)
15 Feb 2014 - 11:42 pm | अत्रुप्त आत्मा
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआआ!!!
ये खाने के बाद, एक गरमागरम पेस्सल चाय.आउर बाद मे ज्यादा चूना लगा के तंबाकू! यूं कि..मजा आ जाए गा. :)
16 Feb 2014 - 1:38 am | रेवती
पाकृ, फोटो दोन्ही आवडले.
16 Feb 2014 - 8:50 am | मुक्त विहारि
झक्कास
16 Feb 2014 - 9:07 am | वेल्लाभट
कस्स्ल्या चविष्ट, टेम्प्टिंग दिसतायत त्या कचो-या........
अर्र्र...... जामच भारी...
पाकृ पण मस्त
16 Feb 2014 - 9:27 am | निवेदिता-ताई
मस्तच
16 Feb 2014 - 11:12 am | दिपक.कुवेत
मस्तच दिसत आहेत. पाहुनच भुक चाळवली.
16 Feb 2014 - 11:14 am | जेपी
मस्तच .
16 Feb 2014 - 12:34 pm | प्यारे१
चाय के साथ बेष्ट लगेंगा!
-मराठी प्यारे
16 Feb 2014 - 4:19 pm | स्वाती दिनेश
छान दिसत आहेत कचोर्या..
स्वाती
16 Feb 2014 - 5:04 pm | आरोही
सर्व प्रतीक्रीयाकर्त्यांचे आभार ..पण कुणी करून बघितल्या का नाही या कचोऱ्या????????????
16 Feb 2014 - 5:13 pm | दिपक.कुवेत
मटार, मैदा आणण्यापासुन तयारी आहे. तसहि आता पुढिल आठवड्यात भारतात जात असल्याने आम्हि (पक्षी मी आणि बायको) आहे तेच संपवायच्या मागे आहोत.
16 Feb 2014 - 5:58 pm | सानिकास्वप्निल
खुसखुशीत कचोर्या!!
मस्तच
16 Feb 2014 - 10:19 pm | मधुरा देशपांडे
मस्त. लगेच करून पहिल्या आणि फोटो काढायच्या आत फस्त केल्या. :)
17 Feb 2014 - 8:45 am | स्मिता चौगुले
मस्तच...
या कचोर्या किती दिवस टिकतील? म्ह्णजे प्रवसात २-३ दिवस टिकू शकतील क?
17 Feb 2014 - 3:07 pm | आरोही
मला नाही वाटत या कचोऱ्या जास्त टिकतील कारण ४-५ तासात त्या नरम पडतात .... आणि गरम गरम खाण्यातच खरी मजा आहे......तेव्हा त्या लगेच फस्त होतात .....+)
17 Feb 2014 - 11:58 am | मदनबाण
भूक लागली !