साहित्य-
२५० ग्राम साखर,५ अंडी,२५० ग्राम बटर/मार्गारिन,
२ चमचे ऑरेंज इसेन्स, २०० मिली ऑरेंज लिक्युअर ,१ चहाचा चमचाभर ऑरेंज कलर (ऑप्शनल)
१५० ग्राम मैदा,१०० ग्राम पोटॅटो स्टार्च/कॉर्न स्टार्च/आरारुट,
३ चहाचे चमचे बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ
कृती-
साखर,अंडी, ऑरेंज इसेन्स एकत्र करणे व भरपूर फेटणे. त्या मिश्रणात २०० मिली ऑरेंज लिक्युअर घालणे व फेटणे.
२५० ग्राम बटर/मार्गारिन पातळ करुन घालणे व फेटणे.
मैदा+ बेकिंग पावडर+ पोटॅटो स्टार्च एकत्र करणे, त्यात चिमूटभर मीठ घालणे व हे एकत्र करुन वरील मिश्रणात घालणे.
१७५ अंश से. वर ३० मिनिटे बेक करणे व नंतर १५० अंश से वर २५ ते ३० मिनिटे बेक करणे.मंद बेक करणे ह्या केकला आवश्यक आहे.
विणायची सुई किवा सुरी केकच्या पोटात खूपसून पाहणे, जर मिश्रण चिकटले नाही तर केक झाला आहे असे समजावे.
केक झाला असला तरीही ५ मिनिटे तो अवनमध्येच राहू देणे. नंतर जाळीवर काढून घेणे व पूर्ण गार झाल्यावर तुकडे करणे.
ऑरेंजलिक्युअर मुळे एक वेगळा स्वाद येतो.
ज्यांना लिक्युअर केक नको असेल त्यांना संत्र्यांचा गर (साधारण वाटीभर)व अर्धा कप संत्रा ज्यूस घालता येईल.
प्रतिक्रिया
15 Feb 2014 - 7:10 pm | प्यारे१
कसला भारी दिसतोय!
तोंडात टाकल्याटाकल्या विरघळणार असा!
16 Feb 2014 - 11:28 am | दिपक.कुवेत
मस्तच
15 Feb 2014 - 7:58 pm | रेवती
एकदम मस्त, लुसलुशीत दिसतोय.
15 Feb 2014 - 8:13 pm | यशोधरा
आले, आले स्वातीतैचे केक आले! :)
15 Feb 2014 - 8:23 pm | अत्रन्गि पाउस
काहीतरी अजून घ्यावे का ? चहा .. जाम ..व्हिप्ड क्रीम किंवा आईस्क्रीम ?
15 Feb 2014 - 8:57 pm | मदनबाण
मस्त ! :)
{प्लम केक प्रेमी} :)
15 Feb 2014 - 9:17 pm | सानिकास्वप्निल
मस्तचं केकाकृती ताई
केक सुंदरचं दिसतोय.
15 Feb 2014 - 10:05 pm | आरोही
फार सुन्दर ....
16 Feb 2014 - 4:08 am | नंदन
'काफे ऊंड कुकन'साठी परफेक्ट केक दिसतोय!
16 Feb 2014 - 9:26 am | वेल्लाभट
ओह्होहोहो! जबर!
16 Feb 2014 - 9:37 am | स्पंदना
जब्बरदस्त!!
आजच पहाते सामान मिळतय का, म्हणजे बनवुन येथे फोटो टाकुन मिरवता येइल.
16 Feb 2014 - 4:10 pm | सुहास झेले
मस्तच.... :)
16 Feb 2014 - 10:24 pm | मधुरा देशपांडे
भारी. रविवार दुपार आणि काफे उंड कुखेन. फोटू बघून लगेच खावासा वाटतोय.