"मोटो -जी" ची क्रेझ

उडन खटोला's picture
उडन खटोला in काथ्याकूट
8 Feb 2014 - 3:37 pm
गाभा: 

मोटोरोला या कंपनीचे नुकतेच गुगल कडून लीनोव्हो कडे हस्तांतरण झाले . गेली काही वर्षे samsung आणि apple च्या स्पर्धेत इतर कंपन्यांचा प्राण कंठाशी आला होता . त्यात भारतीय बाजारपेठेत micromax आणि kaarbon / lava सारख्या कंपन्यांनी आपले स्थान निर्माण केलेलं होतं .
अशा परीस्थितीत मोटोरोला चा नवा "मोटो -जी" या मॉडेल कडे game -changer म्हणून पाहिले जात आहे। ५. इंची स्क्रीन ,१ जीबी RAM , १. २ GHz प्रोसेसर आणि android kitkat update सह १६ जीबी इंटर्नल मेमरी , ५ MP कॅमेरा इत्यादी वेधक वैशिष्ट्यांनी सजलेला हा फोन flipkart वरून फक्त १४,०००/- ला घरपोच उपलब्ध असल्याने ग्राहकांच्या उड्या पडल्या नसत्या तरच नवल!
लॉंच केल्यापासून हा फोन overbooked असून out -of -stock आहे, इतका लोकप्रिय ठरला आहे. "मोटो -जी" च्या या क्रेझ बद्दल आणि फोन बद्दल आपली मते जाणून घेणे जरूर आवडेल …

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Feb 2014 - 3:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीबद्दल धन्स. फ्लीपकार्ट वर मोटो जी पाहिला. उपलब्ध आहे. १२४९९ रुपयांना आहे, पण कंन्फेग्रेशन समाधान करु शकणार नाही असे वाटले. भारतीय बाजारपेठेत मायक्रोमॅक्स,कार्बन,आणि लावा यांची चलती आहे, याच्याशी सहमत. कमी पैशात यांनी चांगले मोबाईल दिले आहेत. मी लावा स्मार्ट फोन्सचा फॅन आहे. LAVA N-400, LAVA iris 506 आणि मला सध्या खुणावतोय तो Lava Iris Pro 30 नक्कीच घ्यावा असा वाटतोय. आपल्या मोटो जीच्या तुलनेत आमचा लावा इरिस प्रो थर्टी भारी वाटतोय. काय म्हणता ?

अर्थात पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना. :)

-दिलीप बिरुटे

उडन खटोला's picture

8 Feb 2014 - 4:28 pm | उडन खटोला

"मोटो -जी" १६ जीबी इंटर्नल मेमरी १४,०००/- ला आहे,पण तो overbooked असून out -of -stock आहे... तर ८ जीबी इंटर्नल मेमरी १२,५००/- ला आहे .

Lava Iris Pro 30 किंवा सोनी एक्स्पीरिया चाही विचार करतच आहे, पण माझ्यासाठी फोन ची साउंड क्वालिटी (संगीता साठी) महत्त्वाची आहे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Feb 2014 - 4:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओव्हर ऑल परफॉर्मन्स पाहिजे ना राव. आता तुम्ही म्हणाल म्युझीक महत्वाचं. मला क्यामेरा महत्वाचा वाटेल. कोणाला गेम्स आणि अ‍ॅप्लीकेशन्स व्यवस्थित रन व्हायला हवे असे वाटेल. कोणाला फोनचा लूक महत्वाचा वाटेल. कोणाला रॅम तर कोणाला मेमरी महत्वाची वाटेल. कोणाला एचडी. डिस्प्ले आणि रेकॉर्डींगही एचडी.आवडेल. हो की नाय ? तेव्हा ऑल परफॉर्मन्स महत्वाचा, नै का....! आणि कमी किमतीत चांगले फोन्स हे येत्या काळाचं वैशिष्ट्ये असेल तेव्हा आपण वेगवेगळ्या फोन मॉडेल्सवर बोलत राहू अट एकच ठेवू की १० ते १५ हजारापर्यंत कोणते चांगले मोबाईल येताहेत त्याची जमेल तशी चर्चा करुच. बाकी मिपाकर कोणत्या फोन्सला महत्व देतात तेही वाचत राहू.

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

8 Feb 2014 - 5:45 pm | तुषार काळभोर

१. मायक्रोमॅक्स अजिबात नाही. दोन फोन १३-१४ महिन्यात डेड झाले राव. सेम प्रॉब्लेम. needs to cool down before you can use it. आणि फुस्स्स्स!! मदरबोर्ड चेंज करावा लागेल. (ए९० आणि ए१११)
२. सध्या एचटीसी डीजायर सी वापरतोय. शारिरीक दॄष्ट्या मजबूत आहे.
३. नोकिया लुमिया ६२० खुणावतोय. पण प्रश्न पडलायः विंडोज का अँड्रॉईड...
४. सॅमसंग क्वाट्रो...

तुषार काळभोर's picture

8 Feb 2014 - 5:46 pm | तुषार काळभोर

पण अँड्रॉईड मध्ये किंमतीच्या मानाने, मोटो-जी लईभारी वाटतोय!

उडन खटोला's picture

8 Feb 2014 - 6:45 pm | उडन खटोला

सहमत ... फक्त परफॉर्मन्स कसा आहे ते एखाद्याने स्वतः वापरुन सांगितले तर बरे होइल

Ganesh Sonwane's picture

10 Feb 2014 - 2:16 pm | Ganesh Sonwane

विंडोज नको घेउस वैतागवाडी आहे.

Ganesh Sonwane's picture

10 Feb 2014 - 2:17 pm | Ganesh Sonwane

विंडोज नको घेउस वैतागवाडी आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Mar 2014 - 2:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लुमिया ७२० चांगला आहे. अर्थात अँड्रोईड एवढी अ‍ॅप्स अजुन विंडोज स्टोअर वर नाहीत. पण वापरायला सोपा, बॅटरी दणदणीत आहे. डिस्प्ले क्वालीटी झक्कास आहे. टच सेन्सिटीव्हीटी अफलातुन आहे.
र्रॅम मात्र फक्त ५१२ एम.बी. आहे हा तोट्याचा भाग आहे. बाकी सगळं उत्तम आहे.

जेपी's picture

8 Feb 2014 - 5:56 pm | जेपी

वाचनखुण साठवतो .

मोबाइलमधले फोटो प्रिट करायला देतो त्यावेळी स्टुडिओवाले सांगतात आमचे ब्लुटुथ स्लो आहे मेमरी कार्ड काढून द्या .

मुद्दा असा आहे की
१)कार्ड नसेल तर
(मोटो जी सारखे) अथवा
२)कार्ड बैटरीच्या खाली असेल तर फोन बंद करून
कार्ड काढावे लागते .

कोणाला असा अनुभव आला का ?

सुबोध खरे's picture

8 Feb 2014 - 9:12 pm | सुबोध खरे

माझ्या मुलाचा आणि मुलीचा दोघांचा कार्बन चा मोबाईल होता म्हणून माझ्या बायको साठी कार्बनचा टायटानियम एस 5 हा मोबाईल घेतला. तो घेतल्या दिवसापासून काहीतरी रुटूखुटु चालूच होते शेवटी तीन महिन्यानी तो बंद पडला यानंतर मी तो चार वेळेला कार्बनच्या सेवा केंद्रात घेऊन गेलो आणि तो अजूनही दुरुस्त झालेला नाही. शेवटी मी कार्बनला ग्राहक न्यायालयात जाण्याची धमकी दिल्यावर आता चक्रे हलू लागली आहेत.
कार्बन च्या सेवा केंद्रात गेल्यावर एक वस्तुस्थिती जाणवली की तेथे मूळ कंपनी कडून कोणताही उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत नाही की सेवा केंद्राना सुट्या भागांचा व्यवस्थित पुरवठा होत नाही. यामुळे कंटाळून सेवा केंद्रे बंद होतात. मग ते (कार्बन कंपनी) नवीन माणसाला कंत्राट देतात आणि नवीन केंद्र उघडतात.आता यापुढे मोबाईल विकत घेताना मी प्रथम त्यांच्या विक्री पश्चात सेवा केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यावरच तो विकत घ्यायचा की नाही ते ठरविणार आहे.
कार्बन च्या केंद्रआवर गेल्यावर इतक्या ग्राहकांच्या तक्रारी पाहील्या आणि ऐकल्या की आता कार्बन या नावावर पुर्ण काट.
या अगोदरचे आमचे सर्व मोबाईल सॅम संग चे होते त्यांच्या मोबाईल ला कधीच तक्रार आली नाही( कार्बन च्या अगोदरच्या दोन्ही मोबाईल ना तक्रार न आल्याने तो घेतला होता).असाच अनुभव मायक्रोमॅक्सच्या फोन बद्दल आहे असे ऐकतो. त्यांच्या सेवा केंद्रावरील भरपूर गर्दी पाहून मला तसे वाटले.
कदाचित भारतीय कंपन्या स्वस्तात फोन देण्यासाठी स्वस्तात उपलब्ध केलेले सुटे भाग वापरीत असाव्यात. त्यामुळे शंभरात पाच लोकाना वाईट अनुभव आला तरी त्याना काही घेणे देणे नसावे.प्रचंड मोठ्या खप असलेल्या उत्पादकांची ग्राहकाबद्दल असणारी बेफिकीरी इथेही जाणवते.
पण एक कळकळीची विनंती- जे उत्पादन घेणार आहात त्याच्या सेवा विभागाशी संपर्क साधून पहा त्यांचा प्रतिसाद किती चांगला येतो ते त्यावरून ठरवा.

किसन शिंदे's picture

9 Feb 2014 - 8:14 am | किसन शिंदे

..मायक्रोमॅक्सचंही तेच रडगाणं आहे. त्यांचे अगदी आदल्या दिवशी नवीन घेतलेले फोन दुसर्‍या दिवशी दुरूस्तीला येतात. त्याबाबतीत मग सॅमसंग आणि नोकियाला खुप मानता येईल.

मंदार कात्रे's picture

9 Feb 2014 - 9:53 am | मंदार कात्रे

मी सुमारे २ वर्षापासून सॅमसंग अ‍ॅण्ड्रॉईड वापरतोय , एकदाही रिपेअर साठी केन्द्रात न्यावा लागला नाही. जास्तच प्रॉब्लेम वाटल्यास "फॅक्टरी- रीसेट" मारला की काम झाले!

तुषार काळभोर's picture

10 Feb 2014 - 1:13 pm | तुषार काळभोर

माझे दोन स्मार्टफोन गेले राव...
एकतर आख्ख्या पुण्यात एकच सेवा केंद्र.
तिथे नंबर लावल्यावर दीड-दोन तासाने नंबर येतो. फोन ठेवून घेतात आणि प्रत्येकाला (अ‍ॅटलीस्ट) १५ दिवसांनी बोलवतात.
प्रत्येक जण वैतागलेला असतो. म्हणून तिथल्या माणसाला हळूच कारण विचारले तर म्हणाला, कंपनीकडे पार्ट्ची मागणी नोंदवल्यावर ५-६ वेळा फोलोअप घ्यावा लागतो. त्यात २-३ आठवडे जातात.
जवळजवळ प्रत्येक स्मार्ट्फोनला मदरबोर्डचा इश्यु!
सॅमसंग S Duos चा अनुभव पण चांगला नाहिये.

नोकिया: एकतर एकाही नोकियाला प्रोब्लेम आलेला नाही. ११००, एन् ७०, एन् ९०० हे मॉडेल वापरलेत. एन् ९०० ची स्क्रीन एकदा फुटली, तर आउट ऑफ प्रॉडक्शन मॉडेल असूनही २ दिवसात बदलून दिली होती. (पेड सर्विस).

मोटोरोलाची अधिकृत केंद्रे मागच्या वर्षीच गुगलने बंद केली आहेत .

ज्यावेळी फोन लटकतो/हैंग होतो (कोणतेही बटन काम करत नाही) त्यावेळी फोनची बैटरी काढून पुन्हा बसवली की चालू होतो .
पण बैटरी काढता न
येणाऱ्या फोनला मात्र असे
झाल्यास तसे करता येत नाही .

अर्र! मी घ्यावा म्हणत होते हा फोन. नको घ्यायला का?

लॉरी टांगटूंगकर's picture

9 Feb 2014 - 12:17 pm | लॉरी टांगटूंगकर

त्या केस मध्ये बॅटरी संपूर्ण ड्रेन व्हायची वाट पहावी लागते. फार प्रॉब्लेम येत नाही. माझ्या सध्याच्या फोनची पण काढता येत नाही, कधी प्रॉब्लेम नाही आला.

यातला कैमरा खास नाही :टेकरडार

माझीही शॅम्पेन's picture

9 Feb 2014 - 11:27 am | माझीही शॅम्पेन

सॅमसंग एस-3 लॉंच झाल्या झाल्या लगेच 35 हजारात घेतल्यावर बरेच मित्रांनी वेड्यात काढले होते , मॅक्रॉमॅक्स - कबून तेव्हा त्यानी 15-20 हजरापर्यंत सेट घेतले होते ते खराब होऊन परत दुसरे फोन घेतले तरी अजुन एस-3 सॉलिड चालू आहे :)
सस्ते का माल रोता है ... अस काहीतरी म्हणतात ..:)

किसन शिंदे's picture

9 Feb 2014 - 12:24 pm | किसन शिंदे

सस्ते का माल रोता है ... अस काहीतरी म्हणतात .

तसं नाही ते. 'सस्ता रोये बारबार, मेहंगा रोये एकबार' :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Feb 2014 - 1:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> सस्ते का माल रोता है ... अस काहीतरी म्हणतात ..:)

असं नाय हं...अशा वेळी पारखी नजर असली पाहिजे. मी मोबाईलच्या बाबतीत खूप पैसे घातले आहेत आता महाग असलेल्या मोबाईलवर पैसे खर्च करायचं जिवावर येतं. तरी नवलाईची खोड मोड़त नाही. पण माझे लावाचे फोन स्वस्त आणि मस्त निघाले आहेत.

-दिलीप बिरुटे
(स्वस्तात मस्त शोधणारा)

-दिलीप बिरुटे

आनंदी गोपाळ's picture

9 Feb 2014 - 7:36 pm | आनंदी गोपाळ

मी तुमच्यासोबत.
मला मायक्रोमॅक्सचा उत्तम अनुभव आहे.
एक्स्डीए डेव्ह्लपर फोरमवर मायक्रोमॅक्स फोन साठी वेगळी खोली आहे म्हटल्यावर क्वालीटी छानच आहे असे माझे मत.

पैसा's picture

9 Feb 2014 - 9:07 pm | पैसा

आमच्याकडेही कार्बन मायक्रोमॅक्स आणि व्हिडिओकॉनचे फोन रीझनेबली चांगले निघाले आहेत. सॅमसुंग चांगले असतात पण माझ्या भावाला २०-२५ हजाराचा सॅमसुंग ३ महिन्यात खराब होण्याचाही अनुभव एकदा आला आहे. तेव्हा प्रत्येक कंपनीचा प्रत्येक हॅण्डसेट चांगला निघेल असं काही सांगता येत नाही.

शिवाय आपण लेटेस्ट म्हणून घेतलेला फोन २ महिन्यात आऊटडेटेड वाटायला लागतो. ओएस, कॉन्फिगरेशन सगळंच बदलतं, अपडेट होतं. नवी येणारी अ‍ॅप्स मोठमोठी असतात आणि त्यांना जास्त जास्त मेमरी लागत रहाते. अशा वेळी ३/४ वर्षे टिकणारा हॅण्डसेट म्हणजे वैताग वाटायची शक्यता! एखाद्या वर्षानंतर हॅण्डसेट बदलावा असं आपोआप वाटायला लागतं. तेव्हा ५/७ हजाराचा हॅण्डसेट बदलायला फार वाईट वाटत नाही.

वेताळ's picture

9 Feb 2014 - 11:53 am | वेताळ

ह्यात आवाज व इतर बाबतीत दर्जा खुपच चांगला आहे.एचटीसी डीजाएर यु,५००,६०० ही मॉडेल बघा.

कुसुमावती's picture

10 Feb 2014 - 6:30 pm | कुसुमावती

माझा एचटीसी डिझायर ५०० यु आहे, आवाज आणि कॅमेर्‍याचा दर्जा अप्रतिम आहे.

भाते's picture

9 Feb 2014 - 12:18 pm | भाते

गुगलबाबा कडुन मिळालेल्या माहिती नुसार ५ फेब्रुवारी २०१४ तारीख असलेली अधिकृत केंद्रांची ही यादी मिळाली.

सुहास झेले's picture

9 Feb 2014 - 3:51 pm | सुहास झेले

कळेनाच की इतकी काय क्रेझ ह्या फोनची... उगाच हवा उडवून द्यायची सोशल नेटवर्कवर हे मार्केटिंग तंत्र कळलेलं दिसतंय परदेशी कंपनींना :p

मी गेले दोन वर्ष Samsung Galaxy 2.0 वापरतोय... अगदी मसका चालतोय :)

१.२ GZ Processor.
1 GB RAM
5 MP Camera
4 GB Memory (upgradable up to 32 GB)
Android JB 4.1 upgradable.
Multitouch वगैरे वगैरे वगैरे!

तुफान आवडला आहे. सगळ्यांनाच. कोणताही प्रॉब्लेम नाही. डिजाइन एकदम I-Phone सारखे आहे. ७०% लोकांनी हातात घेतल्यावर आयफोनच काय अशी विचारणा केली. आता यातली लेटेस्ट सेरिज s5 आहे पण मला सौंदर्यद्रुश्टीने बघता स२ ते स५ यातिल कोणतेच पसंत पडले नाहीत. अगदी कॉनफिग थोडे बरे असुनही.

बाकी सर्वीस सेंटर हाच क्रायटेरिया असेल तर भारतिय कंपन्यांच्या कमी नादी लागलेले बरे परंतु थोड्याफार फरकाने अनुभव समानच असतो. पण तुमच्याकडे पहिल्याच दणक्यात उसापर करायला (केस दाखल न करताच ग्राहक न्यायालयात केस दाखल करायचा फॉर्म स्वहस्ते भरुन त्याची झेरॉक्स सर्वीस सेंटरला कुरिअर व स्कॅन कॉपी कंपनीला इमेल करण्या एव्हडा)पुरेसा वेळ असेल तर विक्रीपश्चात सेवेचा कोणताही विचार न करता डोळे झाकुन भारतिय कंपन्यांचा मोबाइल घ्या. ९०% तिथे जायची(सर्वीस सेंटर) वेळच येत नाही.

बैटरी ड्रेन झाल्यावर ताप उतरतो डॉक्टरकडे जावे लागत नाही ? छान .

वरील सर्व प्रतिसाद वाचून उत्साह वाढला आहे .
कार्बन एस १ टिटानियम चा विचार करतो .

रिव्युवाले म्हटतात की या कंपन्यांचे फोन सात आठ हजारपर्यंतचे घ्या पण जास्ती बजेट असेल तर नावाजलेल्यांचे घेणे .

कार्बन आणि मा'मैक्सने एक
गोष्ट चांगली केली ती म्हणजे मोठ्या सायबांना टाय सूट बूट काढायला लावले ,किंमती उतवल्या ++

आत्मशून्य's picture

9 Feb 2014 - 6:36 pm | आत्मशून्य

पुर्वी सर्व काँप्युटर ओएस या काँप्युटर हार्डवेअर सोबत टाइटली इंटीग्रेटेड असत. जसे आपल्या डिजीटल टिवी, फ्रिज, वॉशिंग मशिन, वगैरे वगैरेलाही आहेच ज्यावर आपण संबधित आज्ञावली वापरतो, पण आपण ती इंस्टॉल करत नाही डायरेक्ट वापरतो बिघाड झाला तर दुरुस्तिवाला बोलावतो. हेच अ‍ॅपलच्या सध्याच्या प्रोडक्ट्स विशयी लागु पडते.

आयबिएम ही जेंव्हा एकमेव महारा़क्षस व सर्वोत्तम संगणक कंपनी अस्तित्वात होती तेंव्हा स्पर्धे अभावी ते म्हणतील ति पुर्व दिशा असत असे. परिणामी त्यातील हुशार तज्ञ अतिशय अहंकारी व प्रचंड कंपुबाज बनले. व कंपनीसाठी सामान्यांना वापरता येइल अशी ओएस तयार करण्यापेक्षा एकमेकांचे पाय ओढण्यात चुका काढण्यात त्यांची क्षमता खर्च होउ लागली. परिणामी कंपनीला नाइलाजाने अशी ओएस बनवायचे काम मायक्रोसॉफ्ट नामक पिल्लाला द्यावे लागले(आउटसोर्स).

हे पिल्लु हुशार होते त्यांनी ऑर्डर स्विकारताना एकच अट घातली ति म्हणजे ओएसच्या स्वामित्वाची (म्हणजेच आयबीएम सोडुन इतरांना सुधा ति ओएस विकायची परवानगी असणे). त्याकाळात हार्डवेअर अन सॉफ्टवेअर एकाच ठिकाणी बनुन डिस्पॅच होत असे. व आयबीएम हीच सर्वोत्कृश्ट (एकमेव क्षमताधारक ज्याला बाजारपेठेत मुल्य नाव व अस्तित्व आहे) कंपनी असल्याने तिला मायक्रोसॉफ्टचा हा निर्णय प्रचंड बालिश व हास्यास्पद वाटला.

झाले. ओएस तयार झाली. इतकी प्रभावी की घरात जरी त्याचे रिक्वायर्ड हार्डवेअर तयार केले तरी त्यावर ती तगडी पळेल. अर्थातच मायक्रोसॉफ्टच्या या कामगीरीमुळे १) आयबीएम कायमचे झोपले. २) इतर हार्डवेअर कंपन्यांचा उदय झाला ३) इंस्टॉलेबल गोश्टीची चलती झाली. ४) कंप्युटर सामान्यांना परवडु लागले. आणि.... हो बिल गेट्स अमेरिकेतिल सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला.

जे काम विंडोज ने पिसी बाबत केले तेच काम अँड्रॉइडने स्मार्टफोन बाबत केले. कोणीही हार्डवेअर बनवा आणी ओएस रन करा. म्हणुनच गुजरातची मायक्रोमॅक्स आज सॅमसंगला टक्कर देते अन ह्युज जॅकमन सारख्या हॉलिवुडच्या ए लिस्ट अभिनेत्याकडुन जाहिरात करवते.

बहुतेक कार्बन एस १ टिटानियम मॉडेल आता कंपनीने बंद केले आहे, मिळणे अशक्य. आणी त्याच्या सुधारीत आवृत्या उपलब्ध आहेत पण त्याचा द्रुश्यानुभव (लूक अन फिल) मला कंटाळवाणा आहे.

नांदेडीअन's picture

9 Feb 2014 - 10:42 pm | नांदेडीअन

भारतीय ब्रँड्समध्ये Micromax आणि Xolo मस्त आहेत.
ज्या ब्रँड्सचे फोन खूप जास्त विकल्या जातात, त्यांच्या सर्विस सेंटरवर गर्दी दिसली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

आणि हो, काही सभासदांकडून चुकीची माहिती देण्यात आली आहे. (कदाचित अनावधानाने.)
Non-removable Battery असणारा फोन हँग झाला तरी त्याला पॉवर बटनाने रिस्टार्ट करता येते.
तेव्हा या कारणाने असा मोबाइल न घेण्याचा निर्णय घेऊ नये.

नांदेडीअन ,होय मी रिव्युतलीच माहिती टाकली .तसेच बैटरी बदलणे खर्चिक असते असेही म्हटले आहे .

रिव्युवाले फार घाबरवतात का सावध करतात ?चर्चा असल्यामुळे विरुध्द मत कळले हे छान .

योगी९००'s picture

10 Feb 2014 - 12:49 pm | योगी९००

मी काही दिवस LG G2 वापरला. आत्तापर्यंत वापरलेल्या सर्व अ‍ॅन्ड्रोईड मोबाईलपेक्षा हा सरस होता/आहे. उत्तम UI, fastest processor, features like knonk on was making LG G2 different than any other mobiles. LG कडून इतक्या भारी मोबाईलची अपेक्षा नव्हती.

पण दुर्दैवाने तो चोरीला गेला.. आता LG शिवाय दुसरा कोठलाच मोबाईलचा विचार पण करवत नाही. कंपनी तर्फे iphone 5S, Samsung S4 मिळत आहेत पण LG G2 ला पर्याय नाही.

आता LG G3 च्या प्रतिक्षेत आहे.

संचित's picture

10 Feb 2014 - 1:36 pm | संचित

आमच्या कडे नोकिया लुमिया ६२० आहे. मस्त चालू आहे. फक्त गाण्याची प्ले लिस्ट तयार करणे जरा अवघड जाते.
सपोर्ट देखील चांगला आये. अजिबात गर्दी नसते नोकिया care च्या दुकानात आणि फोनही लगेच ठीक होतो.

योगी९००'s picture

10 Feb 2014 - 2:56 pm | योगी९००

मोबाईलचा इन्शुरन्स काढता येतो काय? LG G2 चोरीला गेल्यावर बर्‍याच मित्रांनी नवा महागडा फोन घेऊ नको असे सांगितले. (स्वतः मात्र iphone वापरतात). आयुष्यात पहिल्यांदा एवढा भारी मोबाईल घेतला आणि तो चोरीला गेला.

म्हणून विचारतो मोबाईल चोरीला गेल्यावर किंवा damage झाल्यावर सर्व रक्कम मिळेल असा इशुरन्स आहे काय?

भाते's picture

10 Feb 2014 - 4:34 pm | भाते

भ्रमणध्वनीच्या विम्यासंबधी माहिती इथे मिळेल.

तुषार काळभोर's picture

10 Feb 2014 - 6:06 pm | तुषार काळभोर
मंदार कात्रे's picture

10 Feb 2014 - 3:23 pm | मंदार कात्रे

सॅमसंग ग्रॅण्ड २ ची वाट पाहतो आहे.

नेक्सस ५ पेक्षा हा चांगला ठरेल का?

माझीही शॅम्पेन's picture

9 Mar 2014 - 11:01 am | माझीही शॅम्पेन

"नेक्सस ५ पेक्षा हा चांगला ठरेल का"

नेक्सस सर्वीस नेटवर्क भारतात कस आहे ???

पिलीयन रायडर's picture

11 Mar 2014 - 2:45 pm | पिलीयन रायडर

कित्ती चर्चा झालीये ही.. एक काय तरी ठाम सांगा बर कुणी तरी..

१०-१२ हजार बजेट आहे..
स्मार्ट्फोन हवा आहे..
स्क्रिन मोठी, आवाज चांगला, कॅमेरा बर्‍यापैकी चालेल..
सर्व्हिस चांगली हवी..

कोणता घेऊ?

स्पंदना's picture

12 Mar 2014 - 4:46 am | स्पंदना

सेम हिअर!
फक्त अ‍ॅडीशन म्हणजे इंटरनॅशनल सर्वीस अन वॉरंटी हवीय.
बोला लवकर.

श्री गावसेना प्रमुख's picture

12 Mar 2014 - 8:41 am | श्री गावसेना प्रमुख

सॅमसंग कोअर घ्या,१ जी बी रॅम ४ जी बी इंटरनल मेमोरी बस सब कुछ अच्छा है

sandeep_2310's picture

12 Mar 2014 - 12:29 am | sandeep_2310

स्मार्ट्फोन हवा आहे..

Xolo Opus Q1000

मी घेतला मोटो जी इतक्यात १६ जीबीवाला. पर्फॉर्मन्स आवडतो आहे - तरी स्द्ध्याच घेतलाय, अजून २० -२५ दिवसांनी सांगते कसा आहे ते

सत्याचे प्रयोग's picture

14 Mar 2014 - 8:44 pm | सत्याचे प्रयोग

१ च नबरी 100 - 125 अप्लीकेशन टाकलेत अडखळला नाही कधीच मल्टिटास्कीग लई भारी , विजेरी 24 तास चालतीय

मंदार कात्रे's picture

3 Apr 2014 - 6:47 pm | मंदार कात्रे

15 दिवसापूर्वी मोटो जी घेतला , आजच kitkat अपडेट मारली ...

एकदम मस्त ......जबरदस्त परफॉर्मन्स !

पैसा वसूल फोन

धन्यवाद लेखक उडन खटोला जी !

श्रीगुरुजी's picture

1 Jan 2015 - 8:55 pm | श्रीगुरुजी

जुलै २०१४ मध्ये, बरोबर ५ महिन्यांपूर्वी, १६ जीबी वाला मोटो-जी घेतला. ५ महिने व्यवस्थित चालला. २ दिवसांपूर्वी अचानक मान टाकली. फोन स्विच ऑन होईना. ३-४ वेळा ऑन करण्याचे बटन दाबून धरले तरी ऑन झाला नाही. बॅटरी संपली असावी असा अंदाज करून ५-६ तास बॅटरी चार्ज करून पाहिली. तरीसुद्धा ऑन होईना. उघडून सिमकार्ड काढून जरा साफसुफ करून परत घातले. थोडा हलवून पाहिला. तरीसुद्धा मान टाकलेलीच. शेवटी सेवा केंद्रात घेऊन गेलो. दुरूस्तीला किमान ८-१० दिवस लागतील असा अंदाज दिलाय.

सेवा केंद्रात अजून एक ग्राहक आला होता. त्यालाही हाच प्रॉब्लेम आलाय.

काही काळापूर्वी माझ्याकडे मोटोरेझर होता. ४ वर्षे ११ महिने वापरल्यानंतर एका रात्रीत असाच अचानक बंद पडला. वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करूनसुद्धा सुरू झाला नाही. फोन ज्ञवळपास ५ वर्षे वापरल्याने दुरूस्तीच्या भानगडीत न पडता एक वेगळा नवीन फोन घेतला. मोटोरेझरने जवळपास ५ वर्षाच्या वापरानंतर मान टाकली. परंतु मोटो-जी जेमतेम ५ महिने वापरल्यानंतर बंद पडलाय.

एकंदरीत अचानक बंद पडणे हा मोटोरोला फोन्सचा चा कॉमन प्रॉब्लेम दिसतोय. या २ अनुभवांवरून भविष्यात परत मोटो चा फोन घ्यायचा नाही असे ठरविले आहे.

यसवायजी's picture

1 Jan 2015 - 10:48 pm | यसवायजी

जेंव्हा बॅटरी पूर्ण संपली होती, तेंव्हा बराच वेळ चार्ज केल्यावरही हाच प्रॉब्लेम मला आला होता. नेटवर सर्च केल्यावर खाली दिलेली माहिती मिळाली आणी फोन चालू झाला.
(सध्या श्यामसिंग ग्र्यान्ड आणी मोटो जी-२ दोन्ही वापरतोय. मोटो बेष्ट वाटला. उत्तम फोन आहे, काळजी नसावी.)

Plug it into the charger
Hold the VOL DOWN key
While still holding the VOL DOWN key, press and hold the POWER key
Hold both keys down for over 120 seconds. This is more than two minutes and will seem like a long time. You might want to time yourself to make sure you hold it longer than two minutes.
After holding the keys down for more than two minutes, release them.
The Flash Boot screen will display, and the Normal Reboot option will be highlighted
Press the VOL UP key and the device will start a normal reboot.

सतिश गावडे's picture

1 Jan 2015 - 10:55 pm | सतिश गावडे

या प्रकारात फोन बुट सिक्वेन्स दाखवतो का?

जस्स स्विचॉफ्फ करून परत ट्राय केलं. पण यावेळी फोन 'डेड' नव्हता. त्यामुळे कदाचीत, दोन मिनिटानंतर 'नॉर्मल बूट' झाला. पहावं लागेल.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jan 2015 - 11:10 pm | अत्रुप्त आत्मा

Plug it into the charger
Hold the VOL DOWN key
While still holding the VOL DOWN key, press and hold the POWER key
Hold both keys down for over 120 seconds. This is more than two minutes and will seem like a long time. You might want to time yourself to make sure you hold it longer than two minutes.
After holding the keys down for more than two minutes, release them.
The Flash Boot screen will display, and the Normal Reboot option will be highlighted
Press the VOL UP key and the device will start a normal reboot.

सदर सूचना आणि कर्तव्य.. मराठीत-काढून देता येइल काय? __/\__ फार बरे होइल.

यसवायजी's picture

1 Jan 2015 - 11:29 pm | यसवायजी

मोब्या चार्जीन्गला लावा. "आव्वाज कमी!" बटण दाबून ठेवा. ते तसेच दाबले असताना, आता "पावरबाज" बटनसुद्धा दाबा. दोन्ही 'कळा' दाबलेल्या अवस्थेत असताना तब्बल दोन मिंटे स्वतः कळ सोसून स्वस्त बसा..
(नंतर बोटं मोडालंच माझ्या नावाने दुखताहेत म्हणून)
आता मोकळे व्हा. म्हणजे बोटं मोकळी करा.
'फ्लॅश बूट स्क्रीन' चमकेल, आणि 'नॉर्मल रिबूट' पर्याय दिसेल.
आता आवाज वर चढवणारी कळ दाबा आणि फोन चालू होईल. आता एक बार लावा. योउ हवे दोने इत.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2015 - 12:11 am | अत्रुप्त आत्मा

आता एक बार लावा. योउ हवे दोने इत. >>> अत्यंत धण्यवाद्स!

श्रीगुरुजी's picture

2 Jan 2015 - 1:58 pm | श्रीगुरुजी

सविस्तर मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक आभार! या धाग्यावर आधीच समस्या लिहायला हवी होती, म्हणजे सेवाकेंद्राचे दोन हेलपाटे टळले असते. असो. काही वेळापूर्वीच सेवा केंद्रातून फोन दुरूस्त झाल्याचा फोन आलाय. ३ दिवसांपूर्वी दुरूस्तीला देताना कमीतकमी ८ दिवसांचा अंदाज दिला होता. पण ३ दिवसात दुरूस्त झालाय, म्हणजे तुम्ही वर लिहिलेली किंवा तशीच प्रक्रिया केली असावी. ओएस परत लोड केली नसली तर बरं होईल. नाहीतर सगळा डाटा परत टाकावा लागेल.

ग्रेटथिंकर's picture

1 Jan 2015 - 10:49 pm | ग्रेटथिंकर

नोकिया घेतलाय ना गुर्जी तुमी?

श्रीगुरुजी's picture

2 Jan 2015 - 2:01 pm | श्रीगुरुजी

नानासाहेब,

मोकिया ल्युमिया ५३५ दोन आठवड्यांपूर्वी मुलीसाठी घेतला. मोटो-जी आमच्या सौ. वापरतात. म्हणून तर बंद पडल्यापडल्या धावपळ करून सेवाकेंद्रात जावे लागले. जरा चालढकल केली असती तर आमची काही खैर नव्हती. आम्ही स्वतः कार्बन ए-२१ वापरतो.

रुस्तम's picture

1 Jan 2015 - 9:44 pm | रुस्तम

मार्च २०१४ मधे कंपनीत आम्ही ५ जणांनी मोटो जी एकदम घेतला होता. अजुन तरी कोणाला काही प्रॉब्लम नाही.

मी मोटो जी सेकंड जनरेशन घेतला. मामॅ मेल्यामुळे. २ मेले. सद्ध्या मोटोची काही तक्रार नाही.

कृपया या ८फेब्रु २०१४ च्या धाग्यात अपडेटस टाकू नका.
१ जाने २०१५ चा नवा धागा काढावा उडनखटोलाजी मोटोजी साठी.
मोबाईलच्या बाबतीत एक वर्ष म्हणजे कोणे एके काळी आटपाट नगरात मोटोजी राज्य करत होता असं लिहावं लागतंय.

दर एक दीड वर्षानी दहा पंधरा हजारांचे फोन बदलू शकणांऱ्यांची मतं वेगळी असतात (=एक कंजूस विचार.)

पिंपातला उंदीर's picture

2 Jan 2015 - 9:10 am | पिंपातला उंदीर

फेब्रुवारी २०१४ ला १६ जी बी वाला मोटो -जी घेतला . भारी handset आहे . तक्रारीला जागा नाही . निर्णय बरोबर ठरला

मंदार कात्रे's picture

2 Jan 2015 - 10:06 am | मंदार कात्रे

मीदेखील मार्च २०१४ ला घेतला मोटो-जी .अपडेट मारून व्यवस्थित चालू आहे. काहीही तक्रार नाही. आणि मुख्य म्हणजे सॅमसंग सारखा ६-७ महिन्यानी सतत हँग होत नाही ,हा प्लस पॉईंट!

asus झेनफोन सुद्धा एक चेंज म्हणून छान पर्याय आहे. मागील 6 महिन्या पासून वापरत आहे, अजुन तरी काही ही प्रॉब्लेम आलेला नाही.