फाडा नो खिचडो............. ( गव्हाच्या तुकड्यांची खिचडी)- गुजराथी पदार्थ

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in पाककृती
21 Jan 2014 - 2:59 am

डाळ तांदळाची खिचडी हा एक सोपा प्रकार सर्वानाच माहीत असतो
इथे त्याचेच जरा वेगळे रूप तांदळा ऐवजी तुकडा गहु वापरतात. अर्थात त्यामुळे चवीत बराच फरक पडतो.
डाळ , गहू भाज्या असा एक परीपूर्ण आहार मिळतो
साहित्य :
फाडा ( तुकडा गहु) ( एक वाटी), मुग डाळ ( अर्धी वाटी) , कांदे ( तीन मध्यम आकाराचे) , वटाटे ( एक मध्यम आकाराचा) , मोड आलेली कडधान्ये ( अर्धी वाटी) , आले ( अर्धा इंच) फोडणी साठी. मिरच्या , राई , जिरे , मेथी दाणे , हिंग , हळद मीठ तेल( फोडणी पुरते) गरम मसाला. पाणी पाच कप
फाडा हा किमान सहा सात तास भिजवून ठेवावा लागतो. तरच तो नीट शिजतो. मुगाची डाळ धुवून घ्यावी
1
कांदे बारीक चिरुन घ्यावेत. आले खिसुन घ्यावे. बटाटे मिरच्या तुकडे करून घ्याव्यात.
2
इतर मसाले वेगळे काढून घ्यावेत
3
फोडणी साठी फ्रायपॅन तापवत ठेवावी त्यात तेल टाकावे. तेल गरम झाले प्रथम राई टाकावी त्या नंतर मेथी दाणे, जिरे, हिंग आणि सर्वात शेवटी मिरची आणि आले टाकावे
यानंतर कांदे व बटाटे फ्रायपॅन मधे टाकावे. मोड आलेली कडधान्ये टाकावीत. कांदा किंचीत गुलाबी रंगावर येईपर्यन्त फ्रायपॅन मधे झार्‍याने हलवुन घ्यावे.
फाडा भिजवलेले पाणी वेगळे काढून घ्यावे. यानंतर फाडा आणि मुगाची डाळ फ्रायपॅन मधे मिश्रणात टाकावी. फाडा आणि मुगाची डाळ किंचीत कोरडी/सुट्टी होई पर्यन्त भाजावी. फाडा सुका होत आहे असे जाणवल्या नंतर फ्रायपॅनमध्ये पाणी घाला
थोडीशी उकळी आल्यानंतर हळद आणि मीठ टाकावे.आणि ढवळावे. आणखी एक उकळे आल्यानंतर गरम मसाला घालावा. फ्रायपॅन ला झाकण लावून दहा मिनीटे उकळू द्यावे. पाणी आटू द्यावे. साधारण खिचडी इतका घट्टपणा आल्यानंतर फ्रायपॅन शिजवणे थांबवावे.
4
5 "फाडा नो खिचडो" रेडी तू ईट.
यात हवे असेल तर वांगी, किंवा तोंडली , गाजर फ्लॉवर या सारख्या इतर भाज्या वापरु शकतो.
आवडत असल्यास सुक्या खोबर्‍याचे काप घातली तरी चालतील मात्र ते खिचडो ला फोडणी देत असतानाच फ्रायपॅन मधे टाकावे.
वाढते वेळेस गरमागरम "खिचडो" वर तुपाची धार आसल्यास लज्जत आणखी वाढते.
टीपः फोडणीत आवडत असल्यास लसूण वापरु शकता.

प्रतिक्रिया

विजुभौ फाडा म्हणजेच दलिया का?
खिचडो बाकी फक्कड बरं का.
सोबतीला पापड, लोणचं, दही असे इतर संस्कार असले तर मग बघायलाच नको.
फोटो एकदम तोंपासु आहेत.

अनन्त अवधुत's picture

23 Jan 2014 - 4:25 am | अनन्त अवधुत

खिचडी तेरे चार यार,
दही , पापड घी, अचार .

जुइ's picture

21 Jan 2014 - 6:13 am | जुइ

जरा वेगळा प्रकार महित झाला. करुन बघन्यात येईल. फाडा दलियासारखा वाटत आहे.

इन्दुसुता's picture

21 Jan 2014 - 6:35 am | इन्दुसुता

अरे वा! नक्की करून बघणार.

आनन्दिता's picture

21 Jan 2014 - 8:40 am | आनन्दिता

चोक्कस!!

आयुर्हित's picture

21 Jan 2014 - 8:55 am | आयुर्हित

पा कृ आवडली. आरोग्यदायी आहे.
धन्यवाद.

आपला मिपास्नेही :आयुर्हीत

मुक्त विहारि's picture

21 Jan 2014 - 8:59 am | मुक्त विहारि

मस्तच...

(बिरुटे सरांच्या प्रतिसादाची वाट न बघता, प्रतिसाद टंकत आहे. म्हनजे रेसिपी किती भावली असेल, हे वेसांनल)

पैसा's picture

21 Jan 2014 - 9:36 am | पैसा

एकदम हेल्दी आणि सौम्य प्रकार! आवडली पाकृ!

ब़जरबट्टू's picture

21 Jan 2014 - 9:49 am | ब़जरबट्टू

सौम्य कसला ?.. मोजून दहा मसाल्यातले पदार्थ आहे त्यात...

पैसा's picture

21 Jan 2014 - 8:40 pm | पैसा

त्यातले बहुतेकसे फोडणीत घातलेत. तेलावर भाजून वगैरे तेलकट करून ठेवले नाहीत!

फोडणीत घातल्यावर जळजळत नाही असं म्हणायचं आहे का?

अरे पण मी म्हणतो त्यांची सौम्यची व्याख्या वेगळी असेल.
तुम्हाला मोहरीवाणी येवढं तडतडायला काय झालं? ;)

काही झालं तरी तो प्यारे आहे गणपाभौ. अंगाशी आलं की मस्करी करत होतो असं म्हणून निघून जाईल. ;)

प्यारे१'s picture

22 Jan 2014 - 8:41 pm | प्यारे१

@ सूड : तिरकसपणा हा 'स्वभाव' नको होऊ देऊ राजा.

@ गणपा, मला त्या सगळ्या मसाल्यानं जळजळ होते. इनो तरी किती घेणार ना?
म्हणून प्रश्न विचारलेला.

पैसा's picture

22 Jan 2014 - 8:47 pm | पैसा

आले ( अर्धा इंच) फोडणी साठी. मिरच्या , राई , जिरे , मेथी दाणे , हिंग , हळद मीठ

यापैकी कोणत्याही पदार्थाने जळजळ व्हायची शक्यता नाही. आले, जिरे, मेथी, हिंग, हळद ही तर पाचक औषधे आहेत. एक चमचाभर गरम मसाला वासापुरता टाकला तर त्यानेही जळजळ व्हायची शक्यता नाही. तरीही होत असेल तर काहीतरी लोचा आहे असे खुशाल समजा. इतरही बरेचसे मसाले ही औषधेच आहेत, मात्र मिरे, लवंगा, सुक्या मिरच्या मोठ्या प्रमाणात तेलात तळून/भाजून घातल्या तर जळजळ होऊ शकेल. इतर पाकृ करताना कांदा खोबरंसुद्धा तेलावर भाजलं की जास्तीच्या तेलामुळे जळजळ होईल.

आणखी काही शंका आहेत?

प्यारे१'s picture

22 Jan 2014 - 9:37 pm | प्यारे१

अय्यो राम पाप की वो ते!
माझा प्रश्न गंडला. माय मिस्टेक.

>>>मात्र मिरे, लवंगा, सुक्या मिरच्या मोठ्या प्रमाणात तेलात तळून/भाजून घातल्या तर जळजळ होऊ शकेल.
हेच हेच.

ह्या जागी हेच पदार्थ फोडणीमध्ये घातल्यास जलजळ होत नाही का असं विचारायचं होतं.
(वर सुद्धा हेच अपेक्षित होते. मसाला म्हटलं की हे नि धणे, तमालपत्र, लवंग, वेलच्या, ती कसली ती फुलं, लाल मिरच्या वगैरे 'ठसका' दिसतं)

विजुभौंच्या फाडो ना खिचडी ला प्रतिसादांचा तडका
घ्या की अजून पळीभर खिचडी वाढूदे का?
-खिचडी बघून तृप्त आत्मा प्यारे ;)

पैसा's picture

22 Jan 2014 - 11:06 pm | पैसा

धणे तमालपत्र आणि वेलची यांनी कधीच जळजळ होत नाही. लवंगा, मिरे आणि मिरच्या हेही प्रमाणात असतील तर काही त्रास होऊ नये. मात्र खूप जास्त असतील आणि त्याबरोबर तेलही जास्त असेल (तवंग येण्याएवढं) तर जळजळ होणारच!

जर का अ‍ॅसिडिटीचा त्रास व्हायची सवय असेल तर तू दिपकचे सालन (म्हणजे त्याने केलेले) खायचा विचारही करू नकोस!

इरसाल's picture

21 Jan 2014 - 9:48 am | इरसाल

खिचडी साठी लैच मेहनत घेतलेली दिसतेय, अख्खे दोन दिवस, पहिला फटु १९ ला अणी दुसरा २० ला.
एटले खिचडो बहु सारु लागे छे !

उडन खटोला's picture

21 Jan 2014 - 10:04 am | उडन खटोला

माझा मिपा आणि समस्त संस्थळावरच्या पाक्रु वर एक आक्षेप आहे.

जिन्नसाचे प्रमाण देताना एक वाटी वगैरे काय देताअ? भले शहरात छोटी विभक्त कुटुम्बे असतील ,पण गावाकडे आम्हाला किमान १०-१५ जणान्चे जेवण बनवावे लागते. तरी माप देताना माणशी प्रमाण द्यावे.

मिपा असो कि आणखी काही , ते कथित शहरी सन्स्क्रुती पुरते मर्यादित करन्यास आमचा सख्त विरोध राहिल !

जै महाराश्ट्र!

जिन्नसाचे प्रमाण देताना एक वाटी वगैरे काय देताअ? भले शहरात छोटी विभक्त कुटुम्बे असतील ,पण गावाकडे आम्हाला किमान १०-१५ जणान्चे जेवण बनवावे लागते. तरी माप देताना माणशी प्रमाण द्यावे.
कारण पाकृ देणार्‍याचा असा समज असतो की वाचणार्‍याला अक्कल आहे आणि वाट्यांमध्ये दिलेलं प्रमाण आपल्या बुद्धीने आपल्या गरजेनुसार तो रुपांतरित करु शकतो.

कपिलमुनी's picture

21 Jan 2014 - 4:27 pm | कपिलमुनी

ते माणशी माणशी बदलते ना !

जसे की एखदा १ डिश भात खातो .. तर एखादा ४ डिश खातो .. नंतर तुम्हीच म्हणाल , शहरातल्या माणसंचे काय प्रमाण देता ..गावाकडच्या माणसांचे द्या ;)

पद्मश्री चित्रे's picture

21 Jan 2014 - 10:06 am | पद्मश्री चित्रे

आवडली पाकक्रृती

प्रभाकर पेठकर's picture

21 Jan 2014 - 10:09 am | प्रभाकर पेठकर

गणपा भाऊ,

'फाडा' म्हणजे 'दलिया'च आहे.

विजुभाऊ,

पाककृती आणि छायाचित्रं एकदम झकास आहे. नाकीच करून पाहण्यात येईल.

विजुभाऊ's picture

21 Jan 2014 - 10:29 am | विजुभाऊ

जिन्नसाचे प्रमाण देताना एक वाटी वगैरे काय देताअ?
हे प्रमाण साधारणतः एका व्यक्ती साठी आहे. यात एका व्यक्तीए पूर्ण जेवण होते.
अर्थात मोठे प्रमाण द्यायला हरकत नाही. पण मी जसे केले तसेच लिहीले. या इथे एक दोन माणसांसाठी इतकेच साहित्य असणार ना!

दिपक.कुवेत's picture

21 Jan 2014 - 10:53 am | दिपक.कुवेत

पाककॄती विभागात????? (ह प्रश्न डेली सोप सीरीयल प्रमाणे खालुन, वरुन, बाजुकडुन येत आहे असं समजावं). असो पण पाकृ आणि फोटो झकास शीवाय पौष्टिकहि दिसतेय.

सहीच !! फाडो म्हणजे लापशी का हो?

दिपक.कुवेत's picture

21 Jan 2014 - 11:30 am | दिपक.कुवेत

सॉरी टु से पण तु आधीचे प्रतीसाद न वाचताच प्रश्न विचारतोस का? 'फाड' म्हणजेच "दलिया" असं पेठकर काकांनी आधीच गणपाला सांगीतलय.

>>सॉरी टु से पण तु आधीचे प्रतीसाद न वाचताच प्रश्न विचारतोस का?

ओह्ह ओक्के !! आय माय स्वारी. नुसती पाकृ वाचून प्रतिसाद दिला मी. ;)

दिपक.कुवेत's picture

21 Jan 2014 - 11:31 am | दिपक.कुवेत

चुकुन 'फाड' टाईप झालं

प्रचेतस's picture

21 Jan 2014 - 12:51 pm | प्रचेतस

एकदम फक्कड पाककृती

अनिरुद्ध प's picture

21 Jan 2014 - 1:25 pm | अनिरुद्ध प

फोटु दिसत नाही आहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jan 2014 - 5:14 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआ आसमंत...आसमंत...आसमंत!

अनन्न्या's picture

21 Jan 2014 - 6:05 pm | अनन्न्या

फोटो मस्त!

jaypal's picture

21 Jan 2014 - 6:29 pm | jaypal

फाडु खिचडी

सानिकास्वप्निल's picture

21 Jan 2014 - 6:55 pm | सानिकास्वप्निल

वाह !! पौष्टिक खिचडी !!
चविष्ट प्रकार :)
अवांतरः दलिया थोडा तुपावर किंवा तेलावर परतून कुकरला ही शिजवता येतो.

स्वाती दिनेश's picture

21 Jan 2014 - 7:01 pm | स्वाती दिनेश

खिचडी मस्तच!सोबत भाजलेला पापड आणि लोणच्याची फोड हवी मात्र..

स्वाती

अनिरुद्ध प's picture

21 Jan 2014 - 7:05 pm | अनिरुद्ध प

फटु आणि पा क्रु 'च्चोक्कस' घणु सारु.

झक्कास विजुभाऊ....फोटो तर मस्तच!!!

सस्नेह's picture

21 Jan 2014 - 10:44 pm | सस्नेह

कलर मस्त आलाय खिचडीला.
गहू दहा मिनिटात मऊ शिजतात म्हणता, विजुभौ ?
खीर करताना चार पाच शिट्ट्या केल्याशिवाय शिजत नाहीत असा अनुभव आहे.

विजुभाऊ's picture

22 Jan 2014 - 12:26 am | विजुभाऊ

गहू दहा मिनिटात मऊ शिजतात म्हणता,
बरोबर आहे. त्यासाठीच फाडा अगोदर पाच सहा तास भिजवुन ठेवतात. काहीजण भिजवताना गरम पाणी वापरतात.
मी गरम पाणी टाकायला विसरलो त्यामुळे भिजवलेले पाणी काढून टाकण्या अगोदर फाडा एक मिनिटे मायक्रोवेव्ह ठेवला होता. त्यामुळे किती फरक पडला कोण जाणे. मायक्रो वेव्ह मधे पाणी किंचीत कोमट झाले होते इतकेच.
त्याशिवाय भिजवलेला फाडा फ्रायपॅन मधे किंचीत भाजलाय ( फोडणी नंतर) त्यामुळे तो लवकर शिजतो.

पहाटवारा's picture

23 Jan 2014 - 7:01 am | पहाटवारा

विजुभाऊ, बाजरिचा पण फाडा असतो काय ? कारण हि अशीच गुजराती (किंवा कदाचीत राजस्तानी असेल) स्टाईलची पण बाजरीची खिचडी खाल्लेली आठवली. हि पण मस्त दिसते आहे.
-पहाटवारा

अनन्या वर्तक's picture

22 Jan 2014 - 5:10 am | अनन्या वर्तक

एकदम हेल्दी पाककृती.

सुहास झेले's picture

22 Jan 2014 - 8:34 am | सुहास झेले

जबरी... पौष्टिक आहे एकदम. करून बघण्यात येईल :) :)

पियुशा's picture

22 Jan 2014 - 1:03 pm | पियुशा

लय भारी !

तुमचा अभिषेक's picture

22 Jan 2014 - 8:48 pm | तुमचा अभिषेक

फाडू फोटोजेनिक आहे.. यातील जिन्नस आवडीचे नसले तरी खावेसे वाटतेय बघून..

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Jan 2014 - 9:31 am | llपुण्याचे पेशवेll

छान खिचडी विजुभाऊ.

विवेकपटाईत's picture

23 Jan 2014 - 8:15 pm | विवेकपटाईत

मस्त आवडली. करून बघेन (अर्थात सौ करणार मी खाणार)

_मनश्री_'s picture

1 Feb 2014 - 11:38 am | _मनश्री_

खुप मस्त
कालच केली होती ,घरी सगळ्यांना खुप आवडली ,

_मनश्री_'s picture

1 Feb 2014 - 11:43 am | _मनश्री_

मी आधी गहु तव्यावर भाजून घेतले , आणि मग थोड़ पाणी घालून मिक्सर मध्ये फिरवून थोड़े बारीक़
केले ,आणि अर्धा तास भिजवले ,छान शिजले होते ,