साहित्य:
१. गव्हाचे पीठ
२. १ कप गाजराची पेस्ट
३. १ कप पालकाची पेस्ट
४. १ कप बिटाची पेस्ट
५. आलं-मिरची पेस्ट १ चमचा प्रत्येकि
६. ओवा/जिरेपुड - पाव चमचा प्रत्येकि
७. चवीनुसार मीठ
८. तेल कणिक भीजवण्यासाठि
९. बटर किंवा साजुक तुप पराठे भाजण्यासाठि
कृती:
१. गाजर, बीट वेगवेगळे वाफवून त्याची पेस्ट तयार करा. पालक ब्लांच करुन (उकळत्या पाण्यात एक १० मि. घालुन) त्याचीहि पेस्ट करुन घ्या
२. गाजर, पालक आणि बीटाच्या पेस्टमध्ये मावेल इतके गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ, आलं-मिरची पेस्ट, ओवा/जिरेपुड आणि तेल घालुन वेगवेगळि कणीक भिजवा
३. आता तिन्ही कणकेमधुन छोटा गोळा घेउन त्याचा एक मोठा गोळा करा व पराठा लाटा किंवा तिन्ही कणकेमधुन छोटा गोळा घेउन लंबगोलाकर वळा व एका गोळ्याच्या शेवटि एक ठेवुन चक्राकार वळा (भुईचक्र असतं त्या प्रमाणे). शेवटचं टोक गोळ्यावर घेउन हलकेच दाब द्या म्हणजे पराठा लाटता येईल
४. हलक्या हाताने पराठा लाटून घ्या. पराठा थोडा जाडसरच ठेवा. बटर/साजुक तुपावर खमंग भाजून आवडत्या लोणचं, चटणी, सॉस, रायत्याबरोबर, भाजी बरोबर खायला द्या. अगदि काहिच नसेल तर वाफाळणार्या चहाबरोबर नुसता खा!
अवांतरः पराठा अंमळ जास्त भाजला गेलाय तेव्हा जरा तिकडे जरा कानाडोळा करा :)
टिपः हा पराठा स्टफ्ड नसल्यामुळे खाताना कदाचीत बेचव लागण्याची शक्यता आहे म्हणुन जोडिला एखादि भाजी, लोणचं, रायतं असेल तर चव वाढेल. मुख्य म्हणजे कलरफुल असल्यामुळे मुलं आकर्षित होतील(च) शीवाय पालक, बीट आणि गाजर विनासायस त्यांच्या पोटात जाईल :)
प्रतिक्रिया
9 Jan 2014 - 6:47 pm | प्रचेतस
जबरी.
10 Jan 2014 - 12:28 pm | सस्नेह
वरती एक लोण्याचा गोळा ठेवा ना दीपकभाऊ, मग मजा येईल !
10 Jan 2014 - 1:04 pm | आनंदराव
मस्त !!!Smile
10 Jan 2014 - 1:17 pm | मुक्त विहारि
मस्तच..
10 Jan 2014 - 4:04 pm | अनन्न्या
नक्की आवडतील मुलांना!
11 Jan 2014 - 6:33 pm | त्रिवेणी
पराठा अंमळ जास्त भाजला गेलाय तेव्हा जरा तिकडे जरा कानाडोळा करा >>> त्या काळ्या रंगामुळे पराठ्यांना कोणाची नजर नाही लागणार.
15 Jan 2014 - 2:44 pm | अक्षया
वाह कलर फुल आणि पौष्टीक पराठा.. :)
21 Jan 2014 - 3:18 pm | पैसा
लै भारी प्रकार!
22 Jan 2014 - 8:42 am | सुहास झेले
लै भारी :)
22 Jan 2014 - 9:15 am | जॅक डनियल्स
बायकोने तीन-चार वेळा खाऊ घातला आहे. पराठा लाटताना अंतिम टप्प्यात असताना ती बारीक चिरलेला लसूण आणि थोडी कोथिंबीर टाकून लाटते. बटर वर कुरकुरीत भाजून मस्त चव येते. लोणचे संपले असल्यास ताटात टाकल्यावर थोडा चाट मसाला भुरभुरते. झकास चव येते.
22 Jan 2014 - 1:27 pm | दिपक.कुवेत
हि नविन अॅडिशन कळली. नेक्स्ट टायमाला अॅडवुन बघतो.
22 Jan 2014 - 5:28 pm | तुमचा अभिषेक
पोरांना लुभवायला आणि थ्री इन वन चवीसाठी चांगला प्रयोग आहे, पण याला घरापर्यंत पोहोचवत नाही. कारण आमची सौ एक पराठा हाच खाद्यप्रकार छान करते त्यात उगाच प्रयोगांची रिस्क नकोय.. :)
23 Jan 2014 - 10:15 pm | अर्धवटराव
आमची सौ पंजाबन. तिला विविध प्रकारचे पराठे बनवायचा अति शौक. अत्यंत चविष्ट पराठे खाऊ घालते बायडी. आता मी तिला हा इस्टमनकलर पराठा खाउ घालतो :)
धन्यवाद हो दिपकशेठ.