निष्पक्षपाती, धर्मनिरपेक्ष, पुरोगामी वगैरे

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
19 Dec 2013 - 12:41 pm
गाभा: 

आज बाजारात असलेली बहुतांश वृत्तपत्रे स्वतःला धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी म्हणवून घेतात. अर्थात त्यांना कोणत्या पक्षाचा कैवार आहे हे काही लपून राहत नाही. परंतु सामना प्रमाणे आपण मुखपत्र आहोत असे जाहीरपणे मान्य करण्याची कोणाची इच्छा असत नाही.
सध्या भारतात चालू असणार्‍या नाट्यपूर्ण (?) घडामोडींमुळे या सर्व वृत्तपत्रांची विचित्र कोंडी झालेली दिसून येते. आपल्या पक्षाचा कैवार घ्यावा तर मग आपण बहुतांश असणार्‍या वाचकवर्गापासून दूर जातो, म्हणजे ते लोक आपले वृत्तपत्र वाचणे बंग करणार, म्हण्जे प्रत्यक्ष फटका आपल्या विचारसरणीच्या पक्षाला बसणार. लोकमताचा कैवार घेणारे लेख लिहावे तर मग आणखीनच कठीण.
अर्थात या सर्वांतून त्यांचे प्रखर बुद्धिमान संपादक मार्ग काढत असतातच. सकाळ, मटामधील लेख त्या दॄष्टीने अत्यंत वाचनीय असतात. मला स्वतःला हे लोक एव्हढे "समतोल" लेख कसे लिहु शकतात असा नेहमीच प्रश्न पडतो.
उदाहरणार्थ - दिल्ली च्या निवडणूकीनंतर या सर्वांना सर्वात मोठा धोका आहे तो आप पासून. त्यामुळे सध्या मोदींवरून लक्ष आप वर वळवण्यात हे लोक मग्न आहेत. याचे २ फायदे आहेत.
१. मोदींना मिळणारी प्रसिद्धी आपोआप कमी होते.
२. आप हे तुलनेने सोपे टारगेट आहे. त्यांची पाटी कोरी असल्यामुळे त्यांचे समर्थन करण्यासाठी आकडे मदतीला येत नाहीत.

आज मटा मधे आप बद्दल आलेले लेख वाचले
१. आप चा एन जी ओ पासून चा प्रवास, (ज्यामध्ये कोंग्रेस वर एकही वार नाही.) आप पुढील आव्हाने (आप पाच वर्षांनंतर शिल्लकही राहणार नाही याचे भाकीत)
२. राहुल गांधींचा "आम आदमी" चेहरा
३. अग्रलेख - भाजप - कोंग्रेस आणि अण्णांचे कौतुक (आप चे खच्चीकरण)

व्यक्तिशः मी आप चा समर्थक नाही, पण आजचे लेख पाहून पुढचे ६ महिने वारे कोणत्या दिशेने वाहणार आहेत याचा छान अंदाज आला.

आता काही प्रश्न -
१. हे लेखक आपल्या विचारांशी प्रामाणिक असतात की पगाराशी?
२. एव्हधे शब्दांचे खेळ करून त्यांना नेमके काय साध्य करायचे असते, आणि ते किती प्रमाणात साध्य होत असेल?
३. मिपा वर आताच वाचलेल्या एका लेखाप्रमाणे तेही झापडबंद विचार करत असतात?

ही यादी वाढत जाणारी आहे. हे सर्व कसे चालत असेल, याबबतीत कोणाचे काही प्रश्न/ अनुभव/ ठोकताळे आणि उदाहरणे यांचे स्वागत आहे

प्रतिक्रिया

मारकुटे's picture

19 Dec 2013 - 2:33 pm | मारकुटे

१. हे लेखक आपल्या विचारांशी प्रामाणिक असतात की पगाराशी?
पगाराशी. संपादक मंडळाकडून फोन येतो अमुक विषयावर अमुक बाजूने अमुक शब्दांचा लेख द्या अमुक तारखेपर्यंत म्हणजे तमुक तारखेला प्रसिद्ध होईल. पाटी टाकली जाते. लेख पाडला जातो.

२. एव्हधे शब्दांचे खेळ करून त्यांना नेमके काय साध्य करायचे असते, आणि ते किती प्रमाणात साध्य होत असेल?

पैसे कमावणे

३. मिपा वर आताच वाचलेल्या एका लेखाप्रमाणे तेही झापडबंद विचार करत असतात?

विचार? म्हण्जे काय असतं हे?

पैसा's picture

19 Dec 2013 - 5:19 pm | पैसा

पण प्रिंट मिडिया हे एवढे गंभीरपणे घ्यायचे माध्यम आहे असं आता वाटत नाही. शेवटचे वाचनीय अग्रलेख किंवा इतर काही वैचारिक लिखाण हे गोविंद तळवलांकरांच्या निवृतीबरोबर संपले असं वाटतं.

शेवटचे वाचनीय अग्रलेख किंवा इतर काही वैचारिक लिखाण हे गोविंद तळवलांकरांच्या निवृतीबरोबर संपले असं वाटतं.

बळंच? अतिशय अज्ञानमूलक विधान.

पैसा's picture

19 Dec 2013 - 6:09 pm | पैसा

करा बापडे. पण नंतर एक तरी चांगला मराठी संपादक आहे का सांगा कोणी. इंग्रजी पेपरवाले हे माणसांत जमा होत नाहीत. हुच्चभ्रू ते.

एक तरी चांगला मराठी संपादक आहे का सांगा कोणी. >>>

या वाक्याशी सहमत ;) ( काय ते एक एक , शिंदे काय कामत काय ;) )

( लॉन्ग सुट्टीवर चाललो आहे ;) )

प्यारे१'s picture

19 Dec 2013 - 6:20 pm | प्यारे१

बिरुटे र्‍हायलं का? का औरंगाबादलाच सुट्टीसाठी जाणारेस? ;)

बॅटमॅन's picture

19 Dec 2013 - 6:17 pm | बॅटमॅन

मी वादासाठी वाद घालतोय हा जावईशोध लावल्याबद्दल हार्दिक हबिणंदण!!!

बाकी, गिरीश कुबेर वैग्रेंचे लेख मस्त असतात. वैचारिक लिखाण म्हणताना कुठल्या क्षेत्रातले लिखाण अभिप्रेत आहे हे स्पष्ट केलेलं नाही. राजकीय सोडून अन्य क्षेत्रांतही उत्तम लिखाण झालेलं दिसून येतं. ते जमेस धरायचं नसेल अन जेनेरिक सुस्काराच सोडायचा असेल तर मग आमची बेशर्त शरणागती.

पैसा's picture

19 Dec 2013 - 6:39 pm | पैसा

सध्या सासूबै, जावई यांचे लैच्च संदर्भ येऊन र्‍हायलेत! बाकी गिरीश कुबेर यांची मिपावरची लोकप्रियता हल्लीच बगितली आहे. http://www.misalpav.com/node/25630 त्यामुळे णो कमेण्ट.

व्हॉटेव्हर...फक्त "पूर्वीचं पुणं राहिलं नाही" छाप सुराला आक्षेप होता. बाकी असोच.

पिंपातला उंदीर's picture

19 Dec 2013 - 8:03 pm | पिंपातला उंदीर

+१११

विकास's picture

19 Dec 2013 - 7:55 pm | विकास

शेवटचे वाचनीय अग्रलेख किंवा इतर काही वैचारिक लिखाण हे गोविंद तळवलांकरांच्या निवृतीबरोबर संपले असं वाटतं.

गोविंद तळवळकरांच्या लेखनाचा मी देखील फॅन आहे. किंबहूना त्यावेळेस जी काय म.टा. वाचण्याची सवय लागली ती अजूनही जात नाही. आजही लोकसत्तेचे अग्रलेख आवडत असले तरी ब्राउजरमधे प्रथम म.टा.च लिहीले जाते आणि त्याचे कारण गोविंद तळवळकर! :)

तरी देखील मोठेपणी परत त्यांचेच लेखन पुस्तकरूपात वाचत असताना त्यांचे "रॉयिस्ट" असणे अधिक जाणवू लागले. मानवेंद्रनाथ रॉय ना जरी आपल्याकडे त्यांच्या नावात असल्याप्रमाणे मानवतावादी धरले गेले असले, तरी ते स्वतः कम्युनिस्टच होते. अर्थात गोविंदराव कम्युनिस्ट होते/आहेत असे म्हणायचे नाही पण, डावीकडे झुकलेले असल्याने लेखनशैलीतून तत्कालीन डाव्या विचारवंतांप्रमाणे सहजतेने (subtly) अनेकदा सामाजीक / राजकीय विचार स्वातंत्र्योत्तर काळातील नेहरूंच्या डावीकडे झुकलेल्या काँग्रेसला पुढे करणारे वाटू लागले. तरी देखील असे म्हणत असताना, त्यांनी आत्ताच्या अनेक तथाकथीत विचारवंतांप्रमाणे लबाडी केली / दिशाभूल केली असे अजिबात म्हणायचे नाही. पण त्याच बरोबर ते पूर्णपणे समतोल होते असे देखील आता वाटत नाही...

कुठल्याही पत्रकाराचे/विचारवंताचे सगळेच विचार पटले पाहीजेत, सहमती झाली पाहीजे असे नसते. पण ते किती प्रामाणिकपणे आणि तळमळीने एखादा विषय मांडतात यावर अनेकदा अनेक गोष्टी अवलंबून असतात. गोविंद तळवळकर, ग.वा.बेहरे, माधव गडकरी (त्याच ऑर्डरमधे) यांचे लेखन हे असे वाटते. गिरीष कुबेर यांचे लेखन देखील असेच प्रामाणिक आण स्वतंत्र वाटते. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक विचाराशी/मुद्याशी सहमत होऊ शकलो नाही तरी अग्रलेख वाचल्याशिवाय राहवत नाही.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Dec 2013 - 5:46 pm | राजेंद्र मेहेंदळे

आजकाल चेपु आणि ईतर सोशल नेटवर्कींग साईटवर पोस्ट तयार करुन फिरवत राहण्याचापण उद्योग करणार्‍या कंपनी आहेत.(उदा. मोदीप्रचार, राहुल/काँग्रेसविरोध किंवा खिल्ली उडवणे)...तर अग्रलेख आणि बातम्या वाचुन कुठे मत बनवताय? शेवटी खप जास्त होणे महत्वाचे..आणि देणगीदारांचे हितसंबंध जपावे लागतातच म्हणा...त्यामुळे वाचुन दोन घटका करमणुक म्हणुन सोडुन द्या

विकास's picture

19 Dec 2013 - 6:22 pm | विकास

कांची कामकोटीचे शंकराचार्य श्री. जयेन्द्र सरस्वतींना गेले काही वर्षे खुनाच्या आरोपाखाली अटक केले होते आणि नंतर जामीनावर सोडून खटला चालू होता... आता ते त्यांची कोर्टाने निर्दोष जाहीर करून मुक्तता केली. आधीची बातमी कशी कव्हर केली गेली आणि आत्ताची कशी केली गेली हे खालील माहितीत स्पष्ट होते...

Shankaracharya

आणि हेच परत खटला दाखल केला की घसा ओरडून सांगणार हिंदू संत/आचार्य कसे नालायक आहेत ते !

आणी विचारवंत सुद्धा त्यांचीच री ओढणार

बॅटमॅन's picture

19 Dec 2013 - 6:32 pm | बॅटमॅन

फ्याशन आहे सध्याची, दुसरे काही नाही. ते नै केलं तर त्यांचं दुकान बंद पडेल अशी त्यांना भीती वाटतेय.