'आम'च्या विजयाचे पडसाद पुण्यात उमटत आहेत असे वाटते. पुण्याचे सुप्रसिद्ध गुंड व खुनाचे आरोपी श्री मानकर ह्यांनी सर्वश्रेष्ठ खिलाडी श्री. कलमाडी ह्यांच्याशी पंगा घेण्याचे मनावर घेतले आहे. आता कलमाडी म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचे गुन्हेगार! त्यामुळे तेही सहजासहजी हार मानत नाहीयेत.
कागदोपत्री कलमाडी काँग्रेसमधून हद्दपार झाले असले तरी पुणेरी काँग्रेसजन कलमाडीजींना आदरस्थानी मानतात. खाल्ल्या मिठाला आणि मेवामिठाईला जागतायत!
पण ह्या नमकहलाल काँग्रेसी अनुयायांची पंचाईत होत आहे. कलमाडीभाई आपले म्हणावेत का नाही ह्या विषयी वरून काहीच आदेश येत नाही आहे. 'आम'चा विजय पाहून उच्चपदस्थ काँग्रेसी काळजीपूर्वक पावले उचलत आहेत. ज्येष्ठ गुन्हेगार मानकर साहेब अधिकृतरित्या गुन्ह्यात बरबटलेले नसल्यामुळे खिलाडीपेक्षा खुनी बरा असे काँग्रेसी वरिष्ठ्जन म्हणत आहेत. दुसरीकडे कलमाडीसाहेबांना खासदारपदाचा मोह सुटत नाही. त्यामुळे ते झोपडपट्टीवासियांच्या मागण्यांकरता मोर्चा वगैरे समाजसेवेत व्यग्र आहेत.
एकंदर पुण्याच्या काँग्रेसची मोठी गंमत चालू आहे. समजा कलमाडीसाहेब आम आदमी पार्टीत भरती होऊन खासदारपदाची निवडणूक लढवते झाले तर मोठीच मौज होईल ह्यात शंका नाही.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/-/articleshow/27...?
प्रतिक्रिया
15 Dec 2013 - 9:57 am | पिंपातला उंदीर
शिर्षक वाचून वाटलं की मोदी विरुद्ध केजरीवाल असा नवा धागा निघाला की काय !
15 Dec 2013 - 10:00 am | मारकुटे
सहमत आहे.
फक्त आम्हाला संघ विरुद्ध विचारवंत किंवा धार्मिक विरुद्ध अंनिस किंवा संस्कृतीरक्षक विरुद्ध स्त्रीवादी किंवा स्ट्रेट विरुद्ध सेम असं काही असेल असं वाटलं असा प्रतिसाद तुम्ही लिहाल असं वाटलं होतं ;)
15 Dec 2013 - 3:20 pm | बाळकराम
आपले खुनाचे कौशल्य कलमाडीवर आजमावे आणि ह्या पवित्र कृत्यासाठी कायमचे तुरुंगात जाऊन देशसेवा करावी ही माझी त्यांना विनंती.
16 Dec 2013 - 2:42 am | हुप्प्या
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4621390702326334884&Se...
बाजीगर खिलाडीला अचानक झोपडपट्टीवासियांचा पुळका आला आहे. त्यांच्या प्रश्नावर मोठा मोर्चा काढायचे कलमाडीभाईंनी मनावर घेतले आहे. मग जे काँग्रेसवाले साथ देतील ते देतील.
जसे जसे खिलाडीभाईंना नवे नवे उमाळे फुटतायत तसे तसे पुणेरी काँग्रेसजन संभ्रमात पडत आहेत. थोर थोर नेते मिठाची गुळणी धरून गप्प.
यह सारी हरकत आप ने करवाई है. ना वह भ्रष्टाचार को इतना जरुरत से जादा अहम इश्यु बनाता ना कलमाडीभाई को ये नाटक करना पडता.
असो. तमाशा बघा आणि टाळ्या पिटा. दिमाग को टेन्शन नै देनेका!
खिलाडी पंजाला खूनी पंजा काय उत्तर देतो पाहू या लवकरच!