राजकपूरचा '' अनाडी '' आज आठवला
आठवण्याचे कारण खालील बातमी [THE TIMES OF INDIA 25/11/2013]
The state's crisis hit relief & rehabilitation department led by senior congress leader Patangrao Kadam has paid a compensation of Rs. 3,000 to chief minister Prithviraj Chavan's wife ,Satwasheela,for loss of crop in the wake of the worst ever drought in western Maharashtra in 2011-12.
पानशेत धरण फुटल्यामुळे ज्यांची घरे गेली त्यांना सरकारने जागा दिली
धरण फुटण्याने ज्या भागात पाणी गेले होते आणि जागेचे नुकसान झाले होते त्या भागात आमचा वाडा होता . सरकारी कागदोपत्री हे सारे स्पष्ट होते
पण वडिलांनी जागा मिळावी म्हणून अर्ज केला नाही . कारण झालेले नुकसान त्यांना '' परवडणारे '' होते
अरे हो ! अनाडीचा याच्याशी संबंध म्हणजे अनाडीतील मोतीलालच्या तोंडी असलेले एक वाक्य
'' ये वो लोग है जिन्हे रास्तोपर बटवे मिले मगर उन्होने लौटाये नही ''
राजकपूरचा '' अनाडी '' आज आठवला
गाभा:
प्रतिक्रिया
25 Nov 2013 - 7:54 pm | उद्दाम
काही कळलं नाही.
25 Nov 2013 - 8:02 pm | पैसा
तुमच्या आमच्यासारखे लोक गप रहातात आणि ज्यांच्याकडे बक्कळ असतंय त्यांना मिळेल तेवढं कमीच असतंय. त्या ३००० रुपयांत बाईंची एक साडी तरी आली असेल का कोणजाणे!
26 Nov 2013 - 5:21 am | स्पंदना
श्रीमंती ही वस्तूत अथवा पैशात असते असा तुमचा गैरसमज झालाय देशपाडॅ साहेब.
श्रीमंती मनात असते. तुमचे वडिल श्रीमंत असतील. ह्या बाई नसतील. आता आणि कुठे चिंधी चोरी करता येइल या विचाराने त्यांना रात्रीची झोप लागत नसेल राव! राहू दे ना!
तरी नवर्याच नाव पृथ्वीराज आहे म्हणुन बर.