मॉरिशस सफरनामा (२)

सोत्रि's picture
सोत्रि in भटकंती
18 Nov 2013 - 8:35 pm

>> मॉरिशस सफरीची सुरुवात तर एकदम ‘फर्स्ट क्लास’ झाली होती...

बिझनेस क्लासमधल्या आरामदायी सीट्सवर विराजमान झाल्यावर सहज बायकोला म्हणालो की एअर मॉरिशसचा एक मेल आला होता ऑफिशियल अपग्रेडसाठी. त्यासाठी 19,650 रुपयांपासून पुढे बोली लावायची होती आपल्या किमतीची. लिलाव संपला की त्याची बोली जास्त त्याला अपग्रेड मिळणार होता. त्यावर बायको एकदम खूश होऊन म्हणाली, “अरे व्वा! म्हणजे तेवढे पैसे वाचले आपले? मस्तच, आता तेवढ्या पैशाची शॉपिंग करता येईल!” ते ऐकून मला घाम फुटला आणि मी पाय लांब करून, पांघरूण डोक्यावर ओढून, पुढचे सगळे बोलणे ऐकायचे टाळण्यासाठी झोपेचे सोंग घेतले. त्या सोंगेच्या झोपेतच मला इथवरचा प्लॅनिंगचा सर्व प्रवास आठवत होता...

मार्चमध्ये, दिवाळीच्या सुट्टीत मॉरिशसला जायचे नक्की केल्यावर सर्व ऑनलाईन टूर एजंट्सकडच्या टूर्सची माहिती करून घेणे चालू केले. साधारण ‘फ्री फॉरमॅट’ असलेली गाईडेड टूर घ्यायची असा प्लान होता. केसरी ट्रॅव्हल्सवर पहिल्यांदा चेक केले. यांच्या सगळ्या टूर्स भयानक महाग आहेत. त्यांना असे का विचारले तर म्हणाले मुंबईपासून ‘टूर लीडर’ तुमच्या बरोबर असणार. म्हणजे च्यामारी, त्या ‘टूर लीडर’चा जायचा यायचा खर्च, राहायचा खर्च आमच्या बोडक्यावर. आणि हा टूर लीडर करणार काय? तर, प्रवासात तुमचे हवे नको पाहणार. च्यायला मग एअर होस्टेस काय करणार? त्यामुळे केसरी टूर्स ड्रॉप केले. परत येताना एक केसरीचा ग्रुप आमच्या बरोबर होता. त्यांचा टूर लीडर चक्क बिझनेस क्लासने प्रवास करत होता. च्यामारी, प्रवासी मंडळ इकॉनॉमी मध्ये आणि ‘प्रवासात तुमचे हवे नको पाहणारा’ टूर लीडर बिझनेस क्लास मध्ये! लैच भारी प्रकार.

आणखीनं एक दोन टूर्सवाले 4 आणि 5 स्टार रिसॉर्टची नावे सांगून पॅकेजीस सांगत होते. मग मीच कुठे राहायचे आणि कुठल्या रिसॉर्ट मध्ये ते ठरवायचे ठरविले. त्यानुसार नेटवर ‘ट्रीप अ‍ॅडवायझर’ आणि तत्सम साईट्स वर शोध घ्यायला सुरुवात केली. वेगवेगळ्या रिसॉर्टबद्दलचे रिव्ह्यू आणि फोटोज बघत शोध चालू ठेवला. जनरली खाण्यापिण्याबद्दल भारतीयांचे रिव्ह्यू वाचून रिसॉर्टचे रेटिंग ठरवायचो. ज्या रिसॉर्टला जास्त शिव्या ते जास्त चांगले, असे रेटिंग. कारण जनरली हे रिव्ह्यू देणारे शाकाहारी असायचे आणि भारतीय जेवण नसल्याची तक्रार करणारे हे रिव्ह्यू असायचे. मला भारताबाहेर, स्थानिक डेलीकसीज, स्पेशियालीटीज आणि कॉंटीनेंटल, असे, जे खाणे आपण जनरली करत नाही ते ट्राय करायला आवडते. सर्व्हिसबद्दल युरोपियन लोकांचे रिव्ह्यू वाचून रिसॉर्टचे रेटिंग ठरवायचो, खास करून ब्रिटिश. यांच्याकडून चांगले रिव्ह्यू आलेले असले म्हणजे सर्व्हिस चांगली असणार याची खात्री.

लोकेशन (चित्र आंतरजालावरून साभार)

शोधता शोधता, ‘जलसा बीच रिसॉर्ट’ हाताशी लागले. मॉरिशसच्या ईशान्येला (नॉर्थ-ईस्ट) असलेले एक सुंदर रिसॉर्ट. ह्या रिसॉर्टला लागून सफेद वाळूचा सुंदर प्रायव्हेट बीच आहे ज्यावर फक्त रिसॉर्टमध्ये राहणारेच जाऊ शकतात. ह्या रिसॉर्टच्या प्रायव्हेट बीचचे वैशिष्ट्य म्हणजे ह्यावरून सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्हींचा आनंद घेता येतो. रिसॉर्टच्या स्विमिंग पुलमधून निळ्याशार समुद्राचा देखावा अगदी सुंदर दिसतो. समुद्राच्या खार्‍या पाण्यात डंबून झाल्यावर, शॉवर घेऊन नैसर्गिकपणे गरम झालेल्या स्विमिंग पुलामध्ये बसून, स्विमींगपूलाला लागून असलेल्या बारमधून एक मस्त मादक आणि चवदार कॉकटेल चाखत बायकोबरोबर गप्पा मारायचे माझे स्वप्न ह्या ‘जलसा बीच’मध्ये पूर्ण होताना दिसत होते, ह्या रिसॉर्टचे फोटो बघून.

आता रिसॉर्ट फायनल झाले. त्यानुसार आता, मला हव्या असलेल्या तारखांना आणि माझ्या खिशाला परवडणारे पॅकेज देणार्‍या टूर एजंट्सचा शोध चालू केला. बर्‍याच जणांचे जलसा बीच बरोबर टाय-अप नसल्याने त्यांनी त्यांच्या टाय-अप असलेल्या रिसॉर्टची पॅकेजिस विकायचा प्रयत्न केला. पण माझे रिसॉर्ट आता फायनल झाले होते. गोआयबिबो.कॉम, यात्रा.कॉम आणि मेकमायट्रीप.कॉम ह्या तीन टूर एजंट्स पर्यंत आता शोध सीमित होऊन ह्या तिघांपैकी एक ठरवायचा होता. चार्जेस सर्वांचे थोड्या फार प्रमाणात सारखेच होते. टूर डिटेल्स मागविल्यावर कळले की यात्रा.कॉम टूर्सबरोबर गेल्यास प्रत्येक ठिकाणी एंट्री चार्जेस आपल्याला भरायचे होते. मत ते कटाप झाले. गोआयबिबो.कॉमच्या पॅकेजमध्ये फक्त ब्रेकफास्ट समाविष्ट होता आणि टूर मध्ये आयलंडची टूर नव्हती. मेकमायट्रीप.कॉमचे पॅकेज त्यांच्यात सर्वसमावेशक वाटले.

पहिल्या दिवशी रिसॉर्टमध्ये मोकळा वेळ.
दुसर्‍या दिवशी उत्तर मॉरिशसची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गायडेड सहल.
तिसर्‍या दिवशी दक्षिण मॉरिशसची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गायडेड सहल.
चौथ्या दिवशी Ile Aux Cerf ह्या आयलंडची सफर, ह्या आयलंडवर वॉटर स्पोर्ट्सची रेलेचेल आहे. जे आपल्या खिशाला परवडेल ते आपापल्या पैशाने करायचे.
पाचव्या दिवशी रिसॉर्टमध्ये मोकळा वेळ, चेक आऊट आणि एअर पोर्टासाठी प्रस्थान

असे पाच दिवस आणि चार रात्रींचे जंगी पॅकेज होते. एअर मॉरिशसने प्रवास, एअर पोर्टापासून रिसॉर्ट टू अ‍ॅन्ड फ्रो पिक अप आणि ड्रॉप, मॉरिशसमधले सर्व टूरबरोबर फिरणे हा प्रवासखर्च पॅकेजमध्ये समाविष्ट. सकाळचा ब्रेकफास्ट आणि रात्रीचे जेवण, रिसॉर्टच्या रेस्तरॉंमध्ये, पॅकेजमध्ये समाविष्ट. हे सर्वसमावेशक पॅकेज होते. म्हणजे आता अतिरिक्त खर्च फक्त दुपारच्या जेवणाचा आणि Ile Aux Cerf ह्या आयलंडवर असलेल्या वॉटर स्पोर्ट्सचा होणार होता. दुपारच्या जेवणासाठी बरोबर भरपूर खाद्यपदार्थ घ्यायचे ठरवले आणि तो खर्चपण आटोक्यात आणला. 30,000 भरून टूर बुक करायची आणि जायच्या 20 दिवस आधी बाकीचे पैसे भरायचे होते. हेच ते 30,000, नॉन रिफंडेबल असलेले. :)

हे सर्व आठवत असताना... अनाउंसमेंट झाली की आता 10 - 15 मिनिटात मॉरिशसच्या ‘सर शिवसागर रामगुलाम (Sir Seewoosagur Ramgoolam)’ विमानतळावर लॅन्डिंग होईल, त्यासाठी सर्व प्रवाशांनी तयार व्हावे. मी ही लगेच कॅमेरा सरसावून तयार झालो.

विमानतळा नजीकचा विहंगम नजारा

विमानतळा नजीकच्या गावातला विहंगम नजारा

विमानतळावर इमिग्रेशन ऑफिसरकडे पासपोर्ट दिला. त्याने परतीचे तिकीट मागितले मी त्याला दिले. त्याने पासपोर्टवर काही नोंदी केल्या आणि पासपोर्ट परत दिला. मी त्याला 'ऑन अरायव्हल विसा'साठीचा काउंटर कोठे आहे ते विचारले तर मस्त हसून म्हणाला, “30 दिवसांच्या विसाचा स्टॅम्प मारला आहे पासपोर्टवर”. मी एकदम फ्लॅटच झालो. मी त्याला म्हटले की विसासाठी फोटो लागतील असे सांगितले होते. फोटो देऊ का? असे विचारले तर ती जुनी पद्धत होती असे कळले. मोफत ऑन अरायव्हल विसाचे हे सर्व सोपस्कार फक्त 5-7 मिनिटात पार पडून बाहेर पडायच्या लॉबीत आलो कसे तेही कळले नाही. मग एक्सचेंज काउंटरवर जाऊन 5000 भारतीय रुपयांचे मॉरिशियन रुपये करून घेतले. (1 मॉरिशियन रुपया = 2 भारतीय रुपये)

बाहेर आलो तर आमच्या रिसॉर्टच्या कंपनीचा माणूस बोर्ड घेऊन उभा होता. तो म्हणाला अजून 4-5 फॅमिली येणार आहेत पलीकडच्या असेंब्ली पॉइंटजवळ जाऊन बसा. सर्वजण आले की तो अनाउंसमेंट करणार होता. थोड्या वेळात एका ‘मोठा’ घोळका, तेवढाच मोठा आवाज करत असेंब्ली पॉइंटजवळ आला आणि कळले की ते सर्व गुज्जूभाई आणी बेन आमच्या बरोबर रिसॉर्टला येणार आहेत. एक नवविवाहित दांपत्यदेखील होते पण ते मुंबैस्थाइक सौदिंडीयन (शेट्टी) जोडपे होते. बस रिसॉर्टकडे निघाली आणि सर्व गुज्जूभाई आणि बेन यांनी पिकनिकाची गाणी म्हणायला सुरुवात केली. विमानात झोप झाली असल्याने ती गाणी ऐकून एकंदरीतच सुट्टीचा आणि सहलीचा माहोल तयार झाला आणि मग गुज्जूभाई आणी बेन यांची ओळख करून घ्यायला सुरुवात केली. त्या पाच गुज्जू फॅमिली दरवर्षी कुठल्यातरी परदेशाचा दौरा एकत्र करतात असे कळले. मुंबईला त्यांच्या फॅक्टर्‍या आहेत, त्यांतील 2-3 जण पार्टनर आहेत हे देखिल कळले. त्यातल्या एका शहाभाईंनी मला विचारले तुम्ही काय करता? सर्व्हिस का? शपथ सांगतो, ‘असा मी असामी’तल्या 'चोक्कस!' असे म्हणणार्‍या गोवर्धनभाईंची आठवण झाली. पण मी लगेच घाटी असल्याचा फील न आणता माझ्या जॉबला ग्लोरिफाय करून सांगितले. पण त्याच्या चेहेर्‍यावर ‘सर्व्हिस करणारा’ असा भाव जो झाला होता तो तसाच राहिला. तर ते असो, मंडळी चांगली होती आणि निगर्वी होती.

तर तेही असो, जलसा बीच रिसॉर्टला पोहोचल्यावर असा नजारा होता.

(क्रमशः)

प्रतिक्रिया

जेपी's picture

18 Nov 2013 - 8:43 pm | जेपी

फ्लॅशबॅक मुळे बरीच माहिती कळाली ,
मस्त आहे हा भाग ही .

रुस्तम's picture

18 Nov 2013 - 8:57 pm | रुस्तम

मस्त ....

सूड's picture

18 Nov 2013 - 9:09 pm | सूड

एकच नंबर राव!!

मधुरा देशपांडे's picture

18 Nov 2013 - 9:16 pm | मधुरा देशपांडे

मस्त वर्णन. आमच्या मॉरीशस सफरीची आठवण करून दिलीत. आम्ही सुद्धा मेकमायट्रीप सोबतच बुकिंग केले होते. परंतु तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शाकाहारी असल्यामुळे जिथे भारतीय जेवण मिळेल ते रिसोर्ट निवडले.

पुढचे भाग वाचायला आवडतील.

प्यारे१'s picture

18 Nov 2013 - 9:24 pm | प्यारे१

छानच.

मस्त आहे 'पिलानिंग'

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2013 - 10:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहलीचा मूड जमलाय मस्त. होऊन जाउदे लवकर लवकर पुधचे भाग !

सानिकास्वप्निल's picture

18 Nov 2013 - 10:19 pm | सानिकास्वप्निल

सगळे फोटो पण सुंदर :)
पुभाप्र

संजय क्षीरसागर's picture

18 Nov 2013 - 10:40 pm | संजय क्षीरसागर

पुढचा भाग लवकर टाक. मधे गोव्याच्या हॉलिडे इन ला गेलो होतो. ते रिसॉर्ट असंच केलंय त्याची आठवण आली.

कवितानागेश's picture

18 Nov 2013 - 10:43 pm | कवितानागेश

मजा येतेय वाचायला. फोटो छान आहेत. फार दिवसांनी असे स्वच्छ पाणी पाहिले समुद्राचं. :)

मृत्युन्जय's picture

19 Nov 2013 - 12:06 am | मृत्युन्जय

मस्त हो सोत्रि. वाचतोय.

रेवती's picture

19 Nov 2013 - 12:16 am | रेवती

छान वर्णन आणि फोटू.

अर्धवटराव's picture

19 Nov 2013 - 12:52 am | अर्धवटराव

नाम ह काफी है.
सोत्री + बीच + कॉकटेल + अजुन काहि इंट्रेस्टींग... जबराट.

निनाद's picture

19 Nov 2013 - 1:27 am | निनाद

मस्त... वाचतो आहे.

प्रभाकर पेठकर's picture

19 Nov 2013 - 2:02 am | प्रभाकर पेठकर

सुंदर.
मेक माय ट्रिप, जलसा रिसॉर्ट, १ मॉरिशियन रुपया = २ भारतिय रुपये वगैरे वगैर मुद्द्यांची नोंद घेतली आहे.
पुढील भाग लवकर येऊ द्या.

विजुभाऊ's picture

19 Nov 2013 - 2:21 am | विजुभाऊ

झक्कास सोत्रीभाय.
हवे मॉरीशस मा शु शु स्पेश्यल पिधु एनी वात करो.......

शिद's picture

19 Nov 2013 - 3:41 am | शिद

मला भारताबाहेर, स्थानिक डेलीकसीज, स्पेशियालीटीज आणि कॉंटीनेंटल, असे, जे खाणे आपण जनरली करत नाही ते ट्राय करायला आवडते.

बाकी लेख मस्तचं झाला आहे. पुभाप्र.

गवि's picture

19 Nov 2013 - 10:49 am | गवि

लोकल फूड स्पेशालिटी खाण्याच्या आवडीविषयी प्रचंड सहमत. तिथे (उदा. स्वित्झर्लंडमधे) बर्फातही आपल्याला तेजामायला मरायला तो मस्त गर्रम गर्रम पिठलंभात किंवा ती पावभाजी अन मालपोवा अन दाल मखनी अन वडापाव कसा मिळाला याची आनंदाने वर्णनं करणारे लोक पाहून, भले त्यांचा आनंद खरा असला तरी, खास काहीच वाटत नाही.

अस्सल त्या मातीतलं (यक..!! :-) )खायला देणारा टूर ऑपरेटर दुर्दैवाने सहसा मिळत नाही कारण बहुधा बाजारात हे चालत नाही. अन्य लॉजिस्टिकचे मुद्देही असतील (म्हणजे काही लोकांना लोकल आणि अन्य बर्‍याच जणांना डाळभात असं मॅनेज करणं अवघड जात असेल.). भारतातला बराच मोठा पर्यटक भाग शाकाहारी असतो.. मटणबिटण खाणारे इथले अस्सल नॉनव्हेजिटेरियन लोकही परदेशात नेमकं कशाचं मांस वापरलेलं असेल त्याबाबतची "रिस्क" घ्यायला तयार नसतात.

आपल्यासारख्या सर्वाहारी प्राण्यांना सुदैवाने ती काळजी नसल्याने सुसरीच्या शेपटीचे सूप किंवा ऑक्टोपसचं कालवण उदरी गेलं आणि नंतर कळलं तरी मनाला शॉक नाही.. म्हणून निर्धास्त काहीही खाता येतं हे खरंय.

तुझ्या सफरीमधे आपण स्वतःच तिथे पोहोचल्याचा भास आता होतो आहे. मधे खंड न पाडता वेळात वेळ काढून पुढचे भाग टाक.

आत्तापर्यंतच्या फोटोंवरुन झालेलं मत काहीसं निरुत्साही किंवा अपेक्षाभंगाचं आहे. पाणी पारदर्शक असलं तरी जसं वाटलं होतं तसं एव्हरग्रीन वातावरण किंवा स्वच्छतेची पातळी दिसत नाही. साधारण गोव्यातल्या रिसोर्टचे खाजगी बीचेस जितपत असतील तितपतच दिसतोय बीच.

एकदोन फोटोत तर चक्क राडारोडा दिसतोय बीचकाठी. समुद्राचा फील नाहीच. स्वच्छ पाण्याचं सरोवर असावं तसं वाटतंय. ओहोटीमुळे असेल. पण आह.. मॉरिशस.. असं जे चित्र सिनेमे आणि डॉक्युमेंटरीजमधून, शिवाय गुळगुळीत ब्रोशर्सवरुन झालं होतं ते अजून समोर आलं नसावं. पुढच्या भागात येईल अशी आशा....

झकासराव's picture

19 Nov 2013 - 11:03 am | झकासराव

चांगलं लिहिताय. :)

मस्त सोत्रि, धमाल आली वाचताना आणि फोटो बघताना.
सध्या जोरदार प्रवासवर्णनं चालु आहेत. मॉरिशस, जॉर्डन, विएतनाम, कारवार्-दांडेली.. मज्जा येतेय वाचायला.
तुमी लिवा दणादणा.

आरोह's picture

19 Nov 2013 - 2:25 pm | आरोह

मॉरिशस,मेक माय ट्रिप, जलसा रिसॉर्ट, सर्व् कही आठवते....आम्ही जुन २०१२ मधे गेलो होतो....तेव्हा तेथिल वातावरण चागले असते..एकन्दरित छान अनुभव.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Nov 2013 - 2:42 pm | राजेंद्र मेहेंदळे

वर्णन आणि फोटो मस्त..पण काही फोटो दिसत नाहियेत हपिसात
घरी जाउन बघतो

दिपक.कुवेत's picture

19 Nov 2013 - 5:16 pm | दिपक.कुवेत

पुढिल भागांच्या/फोटोंच्या प्रतीक्षेत. एक शंका......आपल्या पसंतीच हॉटेल ठरवुन मेक माय ट्रिप बाकि सगळं बुकिंग करुन देते का? आय मीन त्यांच्या खर्चात समाविष्ट असलेलं / दिलेले हॉटेल ऑप्शन्स आपण वगळू शकतो का?

मी-सौरभ's picture

20 Nov 2013 - 7:05 pm | मी-सौरभ

पु. भा. प्र.

पैसा's picture

20 Nov 2013 - 7:13 pm | पैसा

वर्णन एकच नंबर! फोटो छान आहेत, पण गवि म्हणाले तसे गोव्यात असल्यासारखं वाटलं!!
शॉपिंग कितीची केली याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे! ;)

मंदार कात्रे's picture

28 Nov 2013 - 11:23 pm | मंदार कात्रे

लै भारी !

स्पंदना's picture

29 Nov 2013 - 6:12 am | स्पंदना

अहाहा! गरम समुद्र!
मी जाणारेय आता ! आमचा येथला बीच मला कुदकऊअद्वुन टाकतो. पाण्याजवळ तर अजिबात नाय जायच. मरायच का काय थंडीने?
मस्त हो. जोडीन काय मजा केली ते नाही सांगितल. एकदम गुज्जुभाय बरोअबरच एंजोय केले का काय?

सुधीर कांदळकर's picture

30 Nov 2013 - 7:27 am | सुधीर कांदळकर

फ्लॅशबॅकचा वापर आवडला. चित्रे जरा मोठी हवी होती. वेगळ्या निसर्गाचे, समुद्राचे दर्शन सुखावह. तिथल्या किनार्‍यावरची घाण भारतीयांनीच केली असावी की काय याचा विचार करतो आहे.

मॉरिशसला जाणार्‍यात सिनेमावाले, नवश्रीमंत लोक जास्त असल्यामुळे केसरीवाले, वगैरे भरपूर पैसे लावतात. पण त्यामुळेच इतर ठिकाणच्या टूर्स ते वाजवी किंमतीत देऊं शकतात.

पुभाप्र

अत्रुप्त आत्मा's picture

30 Nov 2013 - 11:11 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/yes/small-ok-sign-smiley-emoticon.gif

वेल्लाभट's picture

30 Nov 2013 - 1:16 pm | वेल्लाभट

आ हा हा ! काय बात!

मयुरा गुप्ते's picture

1 Dec 2013 - 4:19 am | मयुरा गुप्ते

"मला भारताबाहेर, स्थानिक डेलीकसीज, स्पेशियालीटीज आणि कॉंटीनेंटल, असे, जे खाणे आपण जनरली करत नाही ते ट्राय करायला आवडते"--- १००% सहमत.
आम्हिही आतच मेक्सिकोला रिवीयेरा माया ला जाऊन आलो. एकंदरीत फोटोज आणि वर्णन वाचुन सेम टु सेम पॅकेज डील्स असावेत असं वाटतयं.
पहिल्या दिवशी रिसॉर्टमध्ये मोकळा वेळ.
दुसर्‍या दिवशी स्नॉर्क्लिंग च्या गायडेड सहल.
तिसर्‍या दिवशी चिचेन ईट्झा नावाचं ठीकण जे माया सिवीलाय्झेशन(पुरातन अवषेश-कालावधी साधारण २०००-३००० ख्रिस्तपूर्व काळ.) चे पिरॅमीड पाहण्यासाठी गायडेड सहल.
चौथ्या दिवशी रिसॉर्टमध्ये मोकळा वेळ, चेक आऊट आणि एअर पोर्टासाठी प्रस्थान
स्थानिक पदार्थां मध्ये आम्ही ऑक्टोपस, स्क्विड्,सालमन, विवीध प्रकारचे सालसा, मार्गरीटाझ, आणि सुकवलेले क्रिकेट्स खाल्ले.
तुमच्या लेखमाले साठी शुभेछा!
-मयुरा.