चाहूल एका सृजनाची

BONGALE SANTOSH SHAHU's picture
BONGALE SANTOSH... in जे न देखे रवी...
14 Nov 2013 - 6:48 pm

चाहूल एका सृजनाची

पाऊस एक आशा - भविष्याची
पाऊस एक दिशा -ध्येयाची
पाऊस म्हणजे हिरवळ -आनंदाची
पाऊस म्हणजे दर्वळ -सुगंधाची

पाऊस एक आधार -जीवनाचा
पाऊस एक निर्धार -स्वप्नांचा
पाऊस म्हणजे रिमझिम-संगीताची
पाऊस म्हणजे किलबिल -बालपणाची

पाऊस एक देवता -गाभाऱ्याला
पाऊस एक पाहुणा -घराला
पाऊस म्हणजे नवता -वसुंधरेला
पाऊस म्हणजे उधान -सागराला

चाहूल एका सृजनाची
कथा साऱ्या जीवनाची
केवढी रूपे त्या पावसाची
हजारो हातांच्या विधात्याची

-संतोष बोंगाळे

कविता