दिवा

आंबोळी's picture
आंबोळी in जे न देखे रवी...
18 Jul 2008 - 11:50 am

आमची प्रेरणा
स्वाती फडणीस यांची "गोडवा" आणि
बेसनलाडू यांची "सोडवा"

मांडी घालून तसाच ठेउ, खांदा खांदा देत राहू !
खांदेपालटाला तिरडी जरा, खाली उतरवून ठेवू !!

काळ्या करड्या लाकडात, जलद आग लाऊ !
धूर ज्वाला निरखत , जीवनाचा अंत पाहू!!

चल पुन्हा घराकडे , पाणी अंगावर घेऊ!
गेलेल्याच्या आठवणी, दिवा माजघरी लावू !!

=======================
आंबोळी.............. १८-०७-२००८

विडंबन

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

18 Jul 2008 - 11:56 am | बेसनलाडू

ही डेंजर कविता वाचून तुमच्या 'त्या' लय डेंजर कंदीलाची आठवण झाली.
('दिवा'भीत)बेसनलाडू
मांडी घालून तसाच ठेउ हे कळले नाही बुवा!
(अजाण)बेसनलाडू
तुमच्या या कवितेतील एका धूसर तत्त्वज्ञानाने डोळे चुरचुरले;त्यावर विचार करतोय अजून.
(तत्त्वज्ञानी)बेसनलाडू

सर्किट's picture

19 Jul 2008 - 3:51 am | सर्किट (not verified)

मांडी घालून तसाच ठेउ हे कळले नाही बुवा!

बेला, एखादी व्यक्ती मांडी घालूनच "गेली", तर तिरडीवर सरळ करून घालणे कठीण जाते.

आंबोळी,

गहिरे तत्वज्ञान ! तुमच्या आजच्या तिन्ही विडंबनात हे सर्वाधिक सुंदर विडंबन.

- सर्किट

बेसनलाडू's picture

19 Jul 2008 - 3:56 am | बेसनलाडू

तेव्हा कळले नव्हते/लक्षात आले नव्हते.स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.
(आभारी)बेसनलाडू
चार्ली चॅप्लिन "गेला" तेव्हा अशाच काहीशा स्थितीत(म्हणजे मांडी घालून असे नाही,तर पाय सोडून बसलेल्या अवस्थेत);ज्यामुळे त्याला कॉफिनमध्ये घालणे कठीण होऊन बसले, व "गेला" तरी लोकांना हसवून/त्यांचे मनोरंजन करून अशी आख्यायिका ऐकल्याचे आठवते. यात कितपत तथ्य आहे,याबाबत कोणास काही माहिती आहे काय?
(जिज्ञासू)बेसनलाडू

कोलबेर's picture

19 Jul 2008 - 4:00 am | कोलबेर

तर तिरडीवर सरळ करून घालणे कठीण जाते.

(मयताला)तिरडीवर मांडी घालुनच ठेवले जाते असे वाटते..

अमोल केळकर's picture

18 Jul 2008 - 11:59 am | अमोल केळकर

मजेशीर
विडंबन आवडले :D
--------------------------------------------------
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !!
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी

केशवसुमार's picture

18 Jul 2008 - 12:06 pm | केशवसुमार

अंबोळीशेठ,
:O तुम्ही सुध्दा
ज ह ब ह रा हा... हा हा हा..
संपुर्ण काव्य आवडल...अभिनंदन!
(कंदिलाला घाबरणारा)केशवसुमार
स्वगतः काल अंबोळीशेठनी कंदिल लावला असणार :B ? त्या शिवाय का आज कवितेची तिरडी बांधली.. :W

विजुभाऊ's picture

18 Jul 2008 - 1:33 pm | विजुभाऊ

गेलेल्याच्या आठवणी, दिवा माजघरी लावू
घालवण्याची यादी पाहुन , कन्दील माजघरी लावु
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

आनंदयात्री's picture

18 Jul 2008 - 4:20 pm | आनंदयात्री

भारीच !!

आयला कंदिल्या .. काय रे यमाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहेस कारे तु मिपावरचा ??
तुझे हे विडंबन पाहुन विडंबन बाई बाटलीतच होते ते काय वाईट होते की तु आता त्याची त्या जोखडातुन मुक्तता करुन मयतापर्यंत आणुन ठेवलेस असे वाटायला लागलेय.

मनस्वी's picture

18 Jul 2008 - 3:41 pm | मनस्वी

सुंदर विडंबन कंदिल्या! मजा आली वाचून!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

अभिज्ञ's picture

18 Jul 2008 - 7:53 pm | अभिज्ञ

विडंबन फर्मास झाले आहे.
मजा आली.

अभिज्ञ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jul 2008 - 8:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विडंबन लै भारी !!!

अरे अंबोळ्या*,
तुला हे मरणाचं कसं सुचतं, माणूस , निसर्ग, चंद्र, सुर्य, तारे, सोडून ते खांदेकरी, मयत, गेलेल्याच्या आठवणी
यात कसा रमतोस कोणास ठाऊक !!!

अंबोळी बद्दल आदर आहे. हे सांगने न लगे.

मदनबाण's picture

18 Jul 2008 - 8:12 pm | मदनबाण

आंबोळीराव चालुध्या !!!!

(जय यम देवा)
मदनबाण.....

कोलबेर's picture

19 Jul 2008 - 3:57 am | कोलबेर

चल पुन्हा घराकडे , पाणी अंगावर घेऊ!
गेलेल्याच्या आठवणी, दिवा माजघरी लावू !!

हेच

चल पुन्हा घराकडे , पाणी अंगावर घेऊ!
गेलेल्याच्या आठवणी, कंदिल माजघरी लावू !!

असे वाचावे आणि पुन्हा पहिल्या कडव्या पासून रिपीट लूप सुरु करावा. :)

रामदास's picture

19 Jul 2008 - 7:39 am | रामदास

मृताला मांडी घातलेल्या स्थितीत , पद्मासन घालून ,पुरण्याची प्रथा लिंगायतांमध्ये आहे.
हिंदू मध्ये दफन करण्याची प्रथा नाही. पण लिंगायतांमध्ये आहे.आता जागेच्या अभावी हा विधी नसावा असे वाटते. नगरला अशाच एका दफनभूमीवर हॉटेल उभे राहीले आहे.

सुचेल तसं's picture

19 Jul 2008 - 8:25 am | सुचेल तसं

रामदास,

बरोबर आहे तुमचं. नगरला त्या जागेवर "रिद्धी" म्हणुन एक हॉटेल बर्‍याच वर्षांपुर्वी सुरु झालं होतं. ती जागा खर तर अत्यंत मोक्याची आहे. (कारण समोरच एक बाग आहे आणि हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती आहे.)

परंतु त्या हॉटेलमधे गेल्यावर अतिशय भकास वाटायचं... कदाचित ह्याच जागी दफनभुमी आहे हे माहिती असल्यामुळे असेल. ते हॉटेल अजिबात चालले नाही आणि थोड्याच दिवसात बंद पडले. त्याच्यानंतर अजुन कुठले हॉटेल तिथे सुरु झालय का?

http://sucheltas.blogspot.com

विसोबा खेचर's picture

19 Jul 2008 - 8:37 am | विसोबा खेचर

चल पुन्हा घराकडे , पाणी अंगावर घेऊ!
गेलेल्याच्या आठवणी, दिवा माजघरी लावू !!

अतिशय सुरेख...!

आपला,
(अंतर्मूख) तात्या.