डॉ.काशिनाथ घाणेकर

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जनातलं, मनातलं
16 Jul 2008 - 12:00 pm

कला

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

16 Jul 2008 - 12:37 pm | आनंदयात्री

तुमची सही खुप सुंदर आलीये, आवडली.

डोमकावळा's picture

16 Jul 2008 - 12:44 pm | डोमकावळा

आवडली

मैत्र's picture

17 Jul 2008 - 5:55 pm | मैत्र

तुमची सही फार छान आहे... अक्षर अतिशय वळणदार आहे... आज काल कोणी मराठीतून सही करताना दिसत नाही...
मग इतक्या सुंदर सहीवर तारीख इंग्लिश का आहे?

उदय सप्रे's picture

17 Jul 2008 - 8:46 pm | उदय सप्रे

तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे , पण काय आहे हल्ली शाळेत पण मराठी माध्यमातून शिकताना पण आकडे आवर्जून इंग्रजीमधे लिहायला लावतात, मी इंजिनिअर आहे ते शिक्षण पण इ<ग्रजीमधे झाले ना?मग वृथा एखाद्या भाषेबध्दल तिटकारा का बाळगावा?माझ्या मातृभाषेचा मला अभिमान आहेच पण त्याच्बरोबर इतर भाषांचा आदर पण आहे.
असो,
मी सिटीबँक वाल्यांना ठणकावून सांगितले "मराठी माणूस चालतो ना क्रेडिट कार्डाचा ग्राहक म्हणून मग मी सही बदलणार नाही ! हवे तर या नाहीतर....."
आपल्या कौतुकाबध्दल आभा र्ही सही मी परिर्श्रमपूर्वक विकसित केली आहे ज्यात माझ्या वडिलांचे नांव पण दिसते.
चित्र आवडलेले दिसत नाही तात्यांसारखेच तुम्हाला पण !मी अजून सुधारणा करण्याचा प्रयत्न करीन.
उदय सप्रे

विसोबा खेचर's picture

18 Jul 2008 - 12:56 am | विसोबा खेचर

चित्र आवडलेले दिसत नाही तात्यांसारखेच तुम्हाला पण !मी अजून सुधारणा करण्याचा प्रयत्न करीन.

मनापासून शुभेच्छा! माझी टीका आपण सकारात्मक घेतलीत याचा आनंद वाटला. फार कमी लोकात हा गूण असतो!

उदय सप्रे's picture

18 Jul 2008 - 9:12 am | उदय सप्रे

तात्या,
कालच मी प्राजूंना व्यक्तिगत संदेश पाठवला होता त्यात म्हटले होते तुमच्याबध्दल आणि तुमच्या टिकेमुळे वाईट नक्कीच वाटले होते , पण ती टीका मी तेव्हढीच सकारात्मक पण घेतली आहे.शिवाय मिपा मुळे इतकी चांगले मित्र-मैत्रिणी मिळाल्या आहेत हे ऋण मिपा आणि पर्यायाने तुमचेच नाही का?मग जो माणूस कौतुक करतो त्याला टीका करण्याचा हक्कही आहेच की !
फक्त वाईट याचे वाटले की तुम्हाला मी काढलेले एकही चित्र अजून्पर्यंत आवडलेले नाही ! प्रत्येक चित्रात तुम्हाला काही ना काही कमतरता - उणीव दिसतेच.याचे २ अर्थ होतात : १.तुमची अभिरुची एकदम उच्च प्रतीची आहे आणि मी तिथवर पोचण्याएव्हढे स्किल अजून माझयात यायचे आहे.
२, एखाद्या व्यक्तीबध्दल आपल्याला आपुलकी वाटत असेल आणि त्या व्यक्तीची कीर्ति जगभर व्हावी असे वाटत असेल तर आपण त्या व्यक्तीच्या तोंडावर तिचे कौतुक न करता "अजून सुधारणा हवी" असे सांगत रहातो की जेणेकरून ते व्यक्ती रिफाईन्ड होत जाते आणि पूर्ण्त्वाच्या जवळ जाते.उदा. सुधीर फडके यांच्या भावगीतांबाबत पंडित कुमार गंधर्व त्यांना तोंडावर नेहेमी म्हणत "अरे, तु म्हणतोस त्याला भावगीत कोण म्हणेल्?गीतात अजून भाव यायला हवेत !' आणि बाबूजी गेले की इतर लोकांना सांगत असत , "तुम्हाला भावगीत म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर एकदा सुधीर चे गाणे लक्ष देऊन ऐका !"
आणि तुमचा उद्देश वरील २ पैकी एक नक्कीच आहे याची खात्री आहे , काहीही असला तरी तो माझ्या हिताचाच नाही का? मग तुमच्यासारख्या सिनिअर माणसावर कोण रागावेल?
हां आता तुम्ही अगदी सदासिव पेठी पुणेरी कोकणस्थी छाप शेरे मारता याचे वाईट नकीच वाटते , पण वाईट वाटणे आणि राग येणे यात फरक आहे ! ज्याला चाड असते तोच माणुस प्रगती करु शकतो असा माझा ठाम विश्वास आहे,त्यामुळे तात्या, तुमचा आमच्यावरील हक्क कायम आहे आणि राहील याची खात्री असुन द्या !काही कमी जास्त लिहिले असल्यास "बालक" समजून माफ करून टाका !
उदय सप्रे

विसोबा खेचर's picture

16 Jul 2008 - 1:33 pm | विसोबा खेचर

आपल्या प्रयत्नांना दाद देतो, आपल्यातील कलेच्या उर्मीला सलाम करतो परंतु डॉ काशिनाथ घाणेकर दिसायला इतके भयानक नव्हते असं मला वाटतं! :)

भाग्यश्री's picture

18 Jul 2008 - 2:16 am | भाग्यश्री

चित्रं मला आवडलं, परफेक्ट नसेल आलेलं.. पण मला इतकं सुद्धा जमणार नाही.. डोळ्यांचा घारा रंग फक्त पेन्सीलीने दाखवणॅ अवघड असावे..

स्वप्निल..'s picture

18 Jul 2008 - 3:47 am | स्वप्निल..

आवडलं....उदयजी!

आता ते डॉ.काशिनाथ घाणेकर दिसतात कि नाही..ते मला माहीत नाही..कारण मी त्यांचा फोटो पाहीलेला नाही..पण मला अशा चित्रांसाठी लागनारी मेहनत माहीत आहे..

अजुन येउ द्या...

स्वप्निल..