नमस्कार मंडळी,
मिपा ला जसे नीलकांत प्रशान्त सारखे तंत्रज्ञ , तात्या, ई. एक्का, गवि, रामदास यांच्या सारखे लेखक,( आयला इतरांची नावे घेतली नाही म्हणून आमच्या नावाने श़ंख नको . बरेच आहेत हे "बेशर्त" कबूल !!! ) तसे सौ उ. स्पा व ( आणि डॉ, काशीनाथ घाणेकर या चालीवर ) अभ्या सोलापूर वाले सारखे ग्राफिक आर्टिस्ट लाभलेयत ! आपले नशीब दुसरं काय ! ( चांगल्या अर्थाने !)
तर सांगायचं काय ! आपल्याला वेळोवेळी लागणारी ब्यानर वेळेत इथे लावणारे श्री अभ्या यांचे कवतिक उर्फ रसग्रहण ईई करण्यासाठी ह्या धाग्याचा उपदव्याप !
चौ रा रसग्रहण मोड ऑन --
मिपाच्या सातव्या वर्षातील पदार्पणाच्या निमित्ताने नुकतेच एक ब्यानर मिपावर आले आहे. त्याचे पहिले वैशिष्ट असे की मिसळीतील शेवेचा पिवळा रंग तसेच तर्रीचा लाल रंग यांच्या विविध छटा वापरून मिपाशी अभ्या यांची प्रतिभा कशी एकरूप झाली आहे हे दिसून येते. मिसळीवर हिरवीगार कोथिंबीर घातल्या शिवाय गार्निशींग होत नाही. सबब त्याचीही काळजी अभ्या यानी किती कल्पकतेने घेतली आहे ते पहा !! आ हा हा ! चित्राच्या वरच्या कडेला पसरलेली कोथिंबीर व त्याच बरोबरचे टमाटो चे चिप्स दिसत आहेत. वर मिपा असे लिहिलेला भाजलेला पापड ही दिसत आहे.वा वा ! बाजूला मिपा अशी अक्षरे असलेले गणपती बाप्पा दिसत आहेत. हाटेल मालक बहुदा परम गणपती भक्त आहेत. त्यानी लावलेला हा गजानन मिपावर कृपा दृष्टी ठेवून आहे. पण त्या नजरेतून जरब ही दिसत आहे. आपले संपादक मंडळ कृपा व जरब यांचा सुरेख संगम साधून आहे याचा अभ्या याना किती 'अभ्या' स आहे हे दिसून येते. ( अभ्या खाजगीत म्हणतात " संम काहींवर ठरवून कृपा करते तर काहींवर जरब ( ठरवून) ठेवते . असो .) शेवे तही गाठी, भावनगरी ,बारीक शेव असे प्रकार असतात त्याची दखलही अभ्या यानी घेतली आहे. आता 'आपल्या मिपाचे; ही ओळ पहा ना त्याला लेअर स्टाईल चा वापर करून चिझलींग केले आहे म्हणजे गाठी तयार झाली. मधली तांबडट लाईन तिखट शेवेची आहे. खालची " गणेशेत्सवाच्या" ही ओळ पहा त्यात तुम्हाला बारीक पिवळ्या रंगाची शेव दिसेल व मधून मधून नारळाच्या खवाचे गार्निशिंग ही ! वा अभ्या जी क्या बात है !
हे सारे ब्यानर म्हणजे नव वधू प्रिया मी बावरते सारखी गूढगुंजनात्मक कविता वाटते आहे.
चौ रा रसग्रहण मोड ऑफ
अभ्या बॅनर मस्त झालेय !
च उ रा ( चहाटळ उचकवू राजा )
अभ्या निर्मित " मिपा" चे ब्यानर !
गाभा:
प्रतिक्रिया
12 Sep 2013 - 9:25 am | प्रचेतस
हाहाहा. एक नंबर.
बाकी ब्यानर नीट बघितलात तर अजून काही खुबी दिसतील.
गणपतीच्या बाप्पाची सोंड नीट पहा. तिथे ७ हा आकडा दिसेल. ते मिपाचे सातव्या वर्षातले पदार्पण आहे.
शिवाय उंदिरमामा पण नीट निरखून बघा आणि मग काय दिसतेय ते सांगा. =))
बाकी अतिशय देखणा आणि साजेसा बॅनर बनवल्याबद्दल अभ्याचे खास कौतुक.
12 Sep 2013 - 10:28 am | चौकटराजा
अभ्या मामा आले अन खाटेखाली लपले याची दखल घ्यायचीच राहिली.
12 Sep 2013 - 7:44 pm | अग्निकोल्हा
तोरणातिल झंडुच्या फुलांची मांडणी विषेश आवडली.
12 Sep 2013 - 10:25 am | कोमल
:)) :)) :))
मस्तच चौराकाका. रसग्रहण जबराच...
ब्यानरचा उंदीर खासच..
12 Sep 2013 - 10:31 am | मालोजीराव
अभ्या अप्रतिम क्यालीग्राफी आणि क्रियेटीविटी … जबरी केलंयस बे
12 Sep 2013 - 10:35 am | संजय क्षीरसागर
बॅनर मस्त झालायं. टेक्स्टची कॅलिग्राफी जमव. या पानावर वरती दिसतोय तसा फाँट जास्त इंप्रेसिव होईल.
12 Sep 2013 - 10:46 am | विटेकर
आम्ही तर म्हणतोय मिपा अक्षरे असलेला वक्रतुंड मिपाचा अधिकृत लोगो व्हावा !
पण लक्षात कोण घेतो ? चौ रा नी म्ह्ट्लच आहे ..
संम काहींवर ठरवून कृपा करते तर काहींवर जरब ( ठरवून) ठेवते .
12 Sep 2013 - 10:46 am | सस्नेह
गणेशप्रतिमा अतिशय कल्पक आहे.
अभ्याचे कौतुक करावे तितके थोडेच !
12 Sep 2013 - 10:53 am | भ ट क्या खे ड वा ला
ब्यानर म्हणजे सुरेख ,सुबक आकाराचा भर गच्च पुरणाचा साजूक तुपाची धार पडलेला उकडीचा मोदक
आणि रस ग्रहण म्हणजे उरलेल्या मोदकांना दुसर्यादिवशी पाणी सुटते ना तसे चवदार पाणी
ज्याला गुळ नारळाचा खमंग पणा, वेलची आंबेमोहराचा स्वाद मोद्कापेक्षा जास्त जाणवतो ते
12 Sep 2013 - 10:56 am | विटेकर
जबराट !
मधुराधिपते मधुरम !
खेड्वाले .. झकास !
12 Sep 2013 - 1:27 pm | केदार-मिसळपाव
निरीक्षणशक्ती आणि कल्पनाविश्कार...
12 Sep 2013 - 1:47 pm | पैसा
आमचा अभ्या आहेच तसा गुणी. कधीतरी रुसला म्हणून काय झालं! :P
12 Sep 2013 - 3:41 pm | मुक्त विहारि
मस्त
झक्कास
सुंदर
आणि तसेच, चौ.रा. काकाचे परिक्षण
12 Sep 2013 - 3:43 pm | बॅटमॅन
अभ्या आहेच गुणी!!!! त्याचे प्रत्यंतर असे वेळोवेळी दिसत राहते. बाकी चौराकाकांचे परीक्षणही उत्तमच.
12 Sep 2013 - 4:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त रसग्रहण... विशेषतः पडद्यामागे राहून इतके सुंदर काम करणार्या वट्ट कलाकाराचे नावही कळले ! (तसे ते बाप्पाच्या ऊंदीरमामाने आम्हाला हळूच सांगितले होतेच. पण आताचा उघड सत्कार जास्त आवडला !)
अभ्या साठी खास...
,
आणि 
12 Sep 2013 - 5:08 pm | अनिरुद्ध प
+११११११११११११११
12 Sep 2013 - 5:10 pm | चिगो
जबरा कल्पनाशक्ती आणि कलाकारी, अभ्या.. मस्त रसग्रहण, चौरा..
12 Sep 2013 - 6:35 pm | अग्निकोल्हा
अभिमान आहे.
12 Sep 2013 - 7:17 pm | प्यारे१
अभ्याला आम्ही १००१ चं बक्षिस कधीच जाहीर केलंय! त्याआधी पण लई वेळा बक्षिसं दिलेत. पोरगं गुणी हाय. आपण नाय कौतुक करायचं तर कुणी करायचं?
(ऑ? काय म्हनला? पाकीट रिकामं हुतं? आरं मर्दा.... रोख रक्कम मिळेल रे थोड्याच दिवसात.)
सीरियसली, मस्त काम आहे अभ्याचं. परतेक्ष भेटून जाहीर सांगिटलो आहे. काय रे?
चौरा काकांचे पण आभार!
12 Sep 2013 - 7:26 pm | बॅटमॅन
हा अस्सल दक्षिण महाराष्ट्रीय उच्चार लिहिलेला पाहून बरं वाटलं. :)
12 Sep 2013 - 11:25 pm | कोमल
:)) होय रे?? खरं काय रे?? :))
12 Sep 2013 - 7:32 pm | पिंगू
जबरदस्त गुण उधळले आहेत अभ्या... __/\__
दंडवत घे रे..
12 Sep 2013 - 7:53 pm | स्पा
लई गुणाचे पोर हाय पघा
मस्त रे भ्या :)
12 Sep 2013 - 8:01 pm | दादा कोंडके
गावाचं नाव काडलस बे. :)
12 Sep 2013 - 8:04 pm | रेवती
अभ्याची नेहमीच आम्हाला मदत होते. त्याला धन्यवाद.
12 Sep 2013 - 8:43 pm | आदूबाळ
मिपाच्या अक्षरांत गणपतीबाप्पा हे सातव्या वर्षासाठी अधिकृत ब्यानर व्हावे याला +१
अभ्याची क्रिएटिविटी भारी आहे यात शंकाच नाही!
12 Sep 2013 - 9:48 pm | अत्रुप्त आत्मा
माणणीय अब्याडब्या ब्यानर कर! ;) यांचे हार्दिक अभिनंदन!
12 Sep 2013 - 10:07 pm | किसन शिंदे
या अभ्याचे आभार मानवे तितके थोडेच आहेत. फोन करून सांगायचं फक्त, कधी कधी तर ते पण नाही करायला लागत...याचं काम तयार असतं. धन्यवाद रे अभि.:)
चौराकाकांचे निरिक्षणही उत्तम.
12 Sep 2013 - 10:11 pm | मोदक
मस्त रे.. :-)
12 Sep 2013 - 11:32 pm | श्रीरंग_जोशी
ये लडका देवताओंके चहिते कलाकारोंमेसे एक है!!
13 Sep 2013 - 12:29 am | अत्रुप्त आत्मा
इस बात पे सलाम!
13 Sep 2013 - 5:45 am | स्पंदना
हे बर झाल की अभ्या....साठी एक धागाच काढला. नाहीतर खफ वर जाउन नुसत कौतुक करुन येते मी.
अभ्या....लेका कला आहे तुझ्या हातात. अशीच राहुदे...उदंड यश आणु दे.
आम्ही १००० शब्दात जे सांगीतल नसत ते त्या बॅनरवर आलं बाळा.
स्पेश्शल धागा काढल्याबद्दल चौकट राजा यांचे आभार.
15 Sep 2013 - 4:45 pm | सुधीर
मागे जन्माष्टमीच्या बॅनरवरून कळलं होतचं. सुंदर कला आहे.
15 Sep 2013 - 5:14 pm | मदनबाण
बॅनर आणि त्याची कल्पना अप्रतिम आहे. :)