गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व मिपाकरांना :)
साहित्यः
एक लिटर फुल फॅट दुध
३-४ टेस्पून पिठीसाखर (आवडीप्रमाणे कमी - जास्तं)
२ टेस्पून लिंबाचा रस
१/४ टीस्पून केशर
१/४ टीस्पून वेलचीपूड
१/२ टीस्पून पिस्त्याचे काप
बर्फाचे तुकडे
पाकृ:
मध्यम आचेवर कढईत दूध तापवायला ठेवावे.
दूधाला उकळी आली की त्यात लिंबाचा रस थोडा-थोडा करून घालावा व सतत ढवळावे.
दूध फाटायला / नासायला लागून त्याचे पाणी (व्हे) वेगळे होऊ लागेल.
त्यात बर्फाचे तुकडे घालून गॅस बंद करावा व बर्फ पूर्ण वितळेपर्यंत ढवळत रहावे.
चाळणीत स्वच्छ कापड ठेवून त्यात तयार केले पनीर गाळून घ्यावे.
कापडाची पोटली तयार करून शक्य तेवढे पाणी पिळून काढून टाकावे.
थंड पाण्याच्या नळाखाली पोटली धुवावी म्हणजे लिंबाचा वास जाईल.
१ तास पोटली टांगून ठेवावी.
एका तासानंतर पनीरला एका ताटात काढून, केशर घालून चांगले ४-५ मिनिटे मळावे. पनीर अगदी मऊसूत झाले पाहीजे.
त्यात पिठीसाखर घालून एकत्र करावे.
मंद आचेवर नॉन-स्टीक पॅनमध्ये पनीरचे मिश्रण ४-५ मिनिटे परतून घ्यावे. (ह्याला नोरोम पाक म्हणतात)
मिश्रण पॅन सोडू लागले कि ताटात काढून , गरम असतानाच मळावे. (हाताची काळजी घेणे)
मिश्रणात वेलचीपूड घालावी, थोडे पिस्ते ही घालावे व पुन्हा थोडे मळावे.
मी मोदक बनवण्यासाठी पेढे मोदकांचा साचा वापरलाय तसेच बंगाली लोकं साँदेश मिठीई बनवण्यासाठी टेराकोटा किंवा दगडी साचा वापरतात, तो ही वापरलाय.
साच्याला तुपाचा हात फिरवून, मिश्रण कोमट असताना साच्यात घालून मोदक तयार करुन घेणे.
पिस्त्याचे काप लावून सजवावे व बाप्पाला नैवेद्य दाखवून खावे :)
टीपः
पनीर + साखरेचे मिश्रण फार वेळ परतायचे नाही , परतले गेले तर तर साँदेश चिवट व कडक होतात. अशा प्रकाराला कोरा पाक साँदेश असे म्हणतात.
पनीर + साखरेचे मिश्रण न परतता सर्व्ह केले तर कांचागोला साँदेश असे म्हणतात.
साखरेऐवजी खेजुर गुर (खजुराचा गुळ / साधा गुळ) वापरुन साँदेश बनवता येतं.
साचा नसेल तर गोळे बनवून ही साँदेश सर्व्ह करता येतील.
प्रतिक्रिया
9 Sep 2013 - 11:19 pm | अत्रुप्त आत्मा
लै भारी...! त्या माश्याच्या अकाराच्या साच्यामुळे आमच्या संदेस खायच्या बंगाली हाटेलांची अठवण झाली! :)
9 Sep 2013 - 11:24 pm | टक्कू
व्वा व्वा ! काय सुरेख आहे पदार्थ!
मस्तच. नुसता बघूनच चव जिभेवर आली सानिका!
10 Sep 2013 - 10:12 am | पैसा
बंगाल्यांना दिसलं दूध की फाड असंच काहीसं सुचतं वाटतं! साँदेशचे एवढे प्रकार असतात हे नव्हतं माहित. गूळ घातलेला खाल्ला आहे एकदा. मात्र गणपतीच्या नैवेद्याला माशाच्या आकारातला साँदेश बघून अंमळ हसू आलं! \M/
10 Sep 2013 - 10:19 am | यशोधरा
का गो? मत्स्यावतार हाच ना पैला अॅवटॅर? :P
10 Sep 2013 - 3:36 pm | अत्रुप्त आत्मा
@अॅवटॅर? =)) =)) =))
10 Sep 2013 - 10:14 pm | यशोधरा
ह्सता काय स्मायल्यापंत?
10 Sep 2013 - 10:47 pm | अत्रुप्त आत्मा
ते अॅवटॅर... उच्चारी वाचताना , मला आमच्याशी होणारा काही N.R.I. लोकांचा संवाद अठवला...
ते:-खुर्जी
आंम्ही:- काय?
ते:-टुम्चं शुब्नाव खाय?.. आमाला हेक म्हाइती द्या.. सत् णारायण विश्न्नुचा खितवा अॅवटॅर ? =))
तिथे स्टेजवर दाबलेलं हसू इथे आलं...! =)) अॅवटॅर...! =))
11 Sep 2013 - 5:12 am | यशोधरा
एनाराय लोकांशीसांवाद होतो सांगायचा क्षीण प्रयत्न हो! :D :P
11 Sep 2013 - 1:28 pm | अत्रुप्त आत्मा
@क्षीण प्रयत्न हो! >>> =)) असा संवाद (भारतात) दुसर्या कुणाशी होतो हो??????????
मग क्षीण प्रयत्न कस्सा हो..............!?
अता माझी अवांतरातून रजा हो.....................!
11 Sep 2013 - 2:16 pm | अनिरुद्ध प
अगदि अगदि,हसुन हसुन सहमत.
10 Sep 2013 - 10:23 am | डॉ सुहास म्हात्रे
ते मासे नाहीत... नदीची फळं आहेत. फळ चालतात बाप्पाला ;) :)
10 Sep 2013 - 11:01 am | पैसा
यशोधरा आणि एक्का राव, :ROFL:
10 Sep 2013 - 12:06 pm | बॅटमॅन
साँदेश भीषण भालो!
अन ते नदीच्या फळांबाबत एकदम सहमत. लग्न असो की मुंज, ही नदीफळे आणि काही प्राणीफळेही त्यांना लागतातच.
10 Sep 2013 - 11:26 am | दिपक.कुवेत
अतिशय सुरेख. मोदकाच्या साँदेशवर पिस्त्याचे काप ठेवण्याची आयडिया आवडली. ते पनीर-साखरेचे मिश्रण नुसतच परतायचं ना? आय मीन तुप न घालता?
10 Sep 2013 - 1:16 pm | सानिकास्वप्निल
तुप घालायचे नाही आणी मंद आचेवर नुसतेच परतायचे :)
10 Sep 2013 - 11:58 am | मदनबाण
टोकवाले नॉरम नॉरम मोदक आवडले. :)
10 Sep 2013 - 12:53 pm | मुक्त विहारि
झक्कास..
10 Sep 2013 - 12:58 pm | Mrunalini
खुप मस्त... एकदा करुन बघायला पाहिजे आणि हो... मासा पण आवडला :P ;)
10 Sep 2013 - 6:27 pm | अनन्न्या
बाप्पाला नैवेद्य दाखवेपर्यंत धीर कोण धरणार? आधीच गट्टम करावेसे वाटतायत!
10 Sep 2013 - 9:07 pm | प्यारे१
अॅज युज्वल... ढासू!
सणवारांचं खरं प्रयोजन शेतकर्यांना कर्जबाजारी करुन त्रास देण्यासाठी नसून (शोधा लेख) सानिका , पनीरवाले दीपक, चिकनवाले गणपा, शाकाहारी मॄणालिनी, मटणावाले शाही पेठकर काका, स्वातीताई के-का-कू अशा व इतर सर्व लोकांना स्वतःला मस्त करुन खायला नि पेश करायला आणखी एक निमित्त असं'च' आहे असं विशेष सूत्रांकडून समजतं...!
10 Sep 2013 - 9:20 pm | मीनल
करायला सोपे, खायला मस्त!!!
10 Sep 2013 - 9:49 pm | मीनल
लिंबाच्या रसाऐवजी व्हिनीगार वापरला तर?
15 Sep 2013 - 7:41 pm | सानिकास्वप्निल
व्हिनेगर चालेल / सायट्रीक अॅसिड ही चालेल :)
15 Sep 2013 - 1:47 pm | पियुशा
सह्हिच !! कसल भारी दिसतय लगेच गट्ट्म करावस वाटतय :)