शाही रवा बेसन बर्फी

टक्कू's picture
टक्कू in पाककृती
8 Sep 2013 - 12:06 pm

गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया असे घोष आता कानावर ऐकू येत आहेत. बाप्पाच्या आगमनाची आपण सारेच जण इतक्या आतुरतेने वाट पाहत असतो कि १५ दिवस आधीपासूनच आपली जय्यत तयारी सुरु होते. पूजेची तयारी, सजावटीची तयारी आणि मुख्य म्हणजे वेगवेगळ्या नैवेद्याची तयारी. उकडीचे मोदक मुख्य असले तरी रोज अनेक गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. असाच एक गोड पदार्थ आई ने गणपती बाप्पा साठी केला आणि तोच मी इथे शेअर करतेय.

साहित्य:
१ वाटी रवा
१ वाटी बेसन
१/२ वाटी नारळ
१/२ वाटी खवा
१ १/२ वाटी साखर
१/२ वाटी तूप
वेलची पूड
सजावटी साठी काजू बदामाचे काप

कृती:
१. एका मोठ्या पातेल्यात साखर आणि ती भिजेल इतके पाणी घ्यावे व बाजूला ठेवून द्यावे. वड्या थापायच्या ट्रे अथवा ताटाला तूप लावावे.
२. प्रथम तूपावर बेसन भाजून घ्यावं. फोटो मध्ये दाखविल्याप्रमाणे बेसन छान खमंग भाजावं.
३. नंतर दुसऱ्या कढईमध्ये थोडं तूप घेऊन रवा भाजावा. तूपाचे प्रमाण असे घ्या कि रवा ओलसर झाला पाहिजे. मंद आचेवर ढवळत रवा भाजावा. रवा छान भाजला गेला कि त्यात नारळ घालावा. रवा नारळ एकत्र झाले आणि नारळ नीट भाजला गेला कि गॅसवरून उतरवावे.
४. आता खवा भाजून घ्यावा. खवा सुद्धा मंद गॅस वर ढवळत भाजावा.
५. साखरेचा एक तारी पाक करावा. त्यासाठी साखर पाणी मिश्रण गॅस वर ठेवावे. साधारण साखर पाण्यामध्ये विरघळली आणि जराशी उकळी आली कि पाक दोन बोटांमध्ये घेऊन बोटांची उघड मिट करावी. जर पाकची एक तार दिसली तर समजावे कि एक तारी पाक तयार झाला.
६. मगाशी भाजलेले सर्व जिन्नस एकत्र करावे. हे मिश्रण पाकामध्ये घालून ढवळावे. या Stage ला हे मिश्रण थोडेसे पातळ असेल. १० - १५ मिनिटांनंतर मिश्रण ढवळून पहावे. थोडे घट्ट वाटल्यास तूप लावलेल्या ताटामध्ये वाटीला मागील बाजूस तूप लावून थापावे. वरून काजू बदामाचे काप घालावे व परत थापावे.
७. अर्ध्या तासाने त्याच्या वड्या पाडाव्यात. शाही वड्या नैवेद्यासाठी तय्यार आहेत.

मला तेवढा धीर धरवला नाही त्यामुळे… :)

काही महत्वाचे:
१. रवा नारळ भाजताना काळजी घ्यावी. भांड्यात खाली करपण्याची जास्त शक्यता असते.
२. पाक करताना सतत लक्ष ठेवावे. एक तारी पाक झाला कि लगेच gas बंद करावा.

a
b
c
d
e
f

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

8 Sep 2013 - 12:42 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.easyfreesmileys.com/smileys/free-party-smileys-781.gif

मुक्त विहारि's picture

8 Sep 2013 - 12:52 pm | मुक्त विहारि

मस्त

झक्कास..

दिपक.कुवेत's picture

8 Sep 2013 - 12:59 pm | दिपक.कुवेत

शाहि बर्फि....करुन बघण्यात येतील....अर्थात साखरेचा पाक जमला तर!

अत्रन्गि पाउस's picture

8 Sep 2013 - 1:27 pm | अत्रन्गि पाउस

पाक : सविस्तर माहिती हवी....
१ /२ /३/ ४...असे तारी पाक असतात का? ते कसकसे बनतात..प्रोसेस उलट होते का? म्हणजे १ चा २ तरी झालं तर पुन्हा १ तरी होईल का?
आगाऊ धन्यवाद...
बाकी वरील पदार्थ नुसता वाचून मेंदूला आनंदाच्या झिणझिण्या आल्या आहेत...त्यात अंमळ केशर बरे लागेल का हो?
एकस्लांत ....

टक्कू's picture

9 Sep 2013 - 7:49 am | टक्कू

सर्वांना धन्यवाद!
@ अत्रन्गि पाउस: हो असे पाकाचे प्रकार असतात. चार तारी पाक म्हणजेच पक्का पाक. पाक करताना एक stage वर गेल्यानंतर परत खाली येता येत नाही :( त्यामुळे खूप काळजी घ्यावी. मुख्य म्हणजे पुढच्या सर्व गोष्टी तयार ठेवूनच पाक करण्यास घ्यावा. कारण पाक तयार झाला कि पटापट मिश्रण एकत्र करावे लागते. वेळ दवडून चालत नाही.
आणि बर्फी शाही आहे त्यामुळे केशर धावेल :)

कवितानागेश's picture

9 Sep 2013 - 4:55 pm | कवितानागेश

छानच आहेत वड्या.
राघवदासाचे लाडू पण साधारण असेच असतात का? रवा, खवा, बेसन, नारळ घालतात.

पैसा's picture

10 Sep 2013 - 10:08 am | पैसा

अगदी शाही दिसते आहे बर्फी!

Mrunalini's picture

10 Sep 2013 - 1:00 pm | Mrunalini

वा.. बर्फी आवडली. :)

सानिकास्वप्निल's picture

10 Sep 2013 - 1:19 pm | सानिकास्वप्निल

शाही बर्फी आवडली ....मस्त्त्त्त्तं :)

अनन्न्या's picture

11 Sep 2013 - 6:28 pm | अनन्न्या

पण करायला वेळच होत नाहीय. मस्त, खूप आवडली बर्फी मला!

अनिरुद्ध प's picture

11 Sep 2013 - 6:37 pm | अनिरुद्ध प

पाकक्रुती आवडली.(पाकाची माहिती साठवण्यात आली आहे)

एम्-जे's picture

11 Sep 2013 - 10:31 pm | एम्-जे

छान आहे बर्फी!
खव्याच्या ऐवजी मावापावडर वापरू शकतो का?

मॉस्तच ऑमॉमॉमॉ झॉलीये बॉर्फी!

अनिरुद्ध प's picture

12 Sep 2013 - 7:47 pm | अनिरुद्ध प

मग बोला कि राव उगाच खाता खाता बोलताना ठसका लागुन रन्गाचा बेरन्ग नको व्हायला.

@लीमाउजेट नक्कि माहित नाही पण बहुदा राघवदास लाडू असेच असताµ

@एम्-जे मावा पावडर म्हणजे मिल्क पावडर का? मिल्क पावडर पाण्यात मिसळून एक शिट्टी काढली तर झटपट मावा तयार होतो.

मावा पावडर म्हणजे मिल्क पावडर का - नाही बहुतेक, मावा पावडर दुधात मिसळली की खव्यासारखी चव लागते.
मावा पावडर वापरून करून बघायला हवी.

किसन शिंदे's picture

12 Sep 2013 - 11:17 pm | किसन शिंदे

बर्फी जामच आवडली. तुमची पाककृती सांगण्याची पध्दत खूप सोप्पी आहे.

स्पंदना's picture

17 Sep 2013 - 7:45 am | स्पंदना

रवा, बेसन,नारळ अन खवा या प्रत्येकाची वेगवेगळी चविष्ट वडी होउ शकते, ते सगळ एकत्र करुन म्हण़जे चौपट चविष्ट?