भरली वांगी.....जरा वेगळया पध्दतीने!

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
11 Aug 2013 - 5:46 pm

आपल्या लाडक्या 'अन्न हे पूर्णब्रम्ह' ह्या दालनास एक वर्ष पूर्ण झाल्याबद्द्ल सर्वांचे हार्दिक अभिनंदन!
चला तर मग आज लुफ्त घेवुया भरल्या वांग्यांचा!

पोकळ वांगी:

Pokal wangi

सारण/स्टफिंगः

Stuffing

आणि फायनली भरली वांगी:

Bharli wangi

साहित्यः
१. मध्यम आकाराची छोटि वांगी - ४ ते ५
२. कांदे - २ मध्यम
३. आलं/लसुण पेस्ट - १ चमचा
४. टोमॅटो - २ मध्यम
५. तेल
६. चवीनुसार मीठ
७. काश्मीरी तिखट - १.५ चमचा

स्टफिंगसाठि:
१. बारिक चिरलेले मशरुम्स - ४
२. पाव तुकडा प्रत्येकि लाल/केशरी सीमला मिरची बारिक चिरुन (नसल्यास हिरवी वापरु शकता)
३. ब्रोकोलीचे छोटे तुरे - २ चमचे
४. मनुका - १ चमचा
५. २ बारिक चीरलेल्या हिरव्या मिरच्या
६. चेडार चीज - २ चमचे
७. तेल १ चमचा
८. चवीनुसार मीठ

सजावटिसाठि: बारिक चीरलेली कोथिंबीर, पारमेझान चीज

कॄती:
१. वांग्यांना देठाकडुन काप देउन स्कुपर किंवा पिलरच्या सहाय्याने आतुन पोकळ करुन घ्या. पोकळ झालेली वांगी जरा वेळ मिठाच्या पाण्यात घालुन ठेवा म्हणजे आतुन काळि पडणार नाहित. वांगी पोकळ करण्याआधी फोर्कने त्याना हलकेच टोचे मारा जेणेकरुन ग्रेव्हि आतपर्यत मुरेल. माझे टोचे मारायचे राहिले :D

२. एका छोटया पॅन मधे १ चमचा तेल तापलं कि मशरुम्स, सिमला मिरच्या, ब्रोकोलीचे तुरे घालुन एक ३-४ मि. परता. मिश्रण कोरडं झालं कि एका बाउल मधे काढा. गार झाल्यावर त्यात मनुके, हिरव्या मिरच्या, चीज आणि चवीनुसार मीठ घालुन सारखं करा.

३. पाण्याला उकळि आली कि टोमॅटोना वरुन अधिकचं चिन्ह देउन एक २-४ मि. उकळत्या पाण्यात ठेवा व लगेच गार पाण्यात घाला; थोडया वेळाने टोमॅटोची सालं अलगद निघतील. आता त्याच उकळत्या पाण्यात सोललेले कांदे घाला. कांदा मउ झाला कि पाणी गाळुन बाजुला ठेवा. पाणी फेकुन देउ नका...हेच पाणी ग्रेव्हि सारखं करायला वापरता येईल. दोन्हि गार झालं कि मिक्सर मधे त्यांची बारिक प्युरी करुन घ्या (वेगवेगळ्या).

४. वांगी स्टफ करण्याआधी पेपर टॉवेल, टिश्यु किंवा कोरडया फडक्याने हलकेच आतुन टिपा म्हणजे आतलं अतिरिक्त पाणी शोषलं जाईल आणि सारण नीट भरलं जाईल. आता त्यात तयार केलेलं स्टफिंग भरा.

५. मंद आचेवर एका नॉनस्टिक कढईल २ पळ्या तेल तापलं कि आलं/लसुण पेस्ट घाला. पेस्टचा कचा वास गेला कि उकडलेल्या कांद्याची पेस्ट घालुन परतत रहा.

६. कांद्याचा रंग बदलला कि टोमॅटो प्युरे घाला. बाजुच्या कडेने तेल सुटु लागलं कि काश्मीरी तिखट, चवीनुसार मीठ घालुन स्टफ केलेली वांगी हलकेच सोडा.

७. मधे मधे ग्रेव्हि ढवळत रहा जेणेकरुन खाली लागणार नाहि. ग्रेव्हि जर कोरडि वाटत असेल तर वरचच उकळलेलं पाणी घालुन सारखी करा. एक ४-५ मि. जर स्टफिंग/सारण उरलं असेल तर ग्रेव्हित घाला जेणेकरुन ग्रेव्हि आपसुक घट्ट होईल.

८. वांग्यांमधे हलकेच सुरी खुपसुन बघा. जर मउ लागली तर गॅस बंद करा नाहितर वाफेवर अजुन शीजवा (अंतीम पायरीला वांग्यांच पार मेण होता कामा नये).

९. सर्व करण्याआधी वरुन बारीक चीरलेली कोथिंबीर आणि पारमेझान चीज भुरभुरा.

१०. गरमागरम वेगळ्या पध्दतीच्या भरल्या वांग्यांचा पोळि, फुलका किंवा नान (गर्लिक उत्तम) बरोबर आस्वाद घ्या!

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

11 Aug 2013 - 5:54 pm | मुक्त विहारि

झक्कास..

सुहास झेले's picture

11 Aug 2013 - 6:03 pm | सुहास झेले

प्रचंड भारी..... शेवटचा फोटो तर पार जीवघेणा आलाय :) :)

मी_आहे_ना's picture

12 Aug 2013 - 12:04 pm | मी_आहे_ना

अगदी. झकास पाकृ आणि लाजवाब फोटो. त्यात आता जेवायच्या वेळी बघून तर, हाल हाल!

पैसा's picture

11 Aug 2013 - 6:15 pm | पैसा

मस्त कल्पक पाकृ आणि जीवघेणे फोटो!

त्रिवेणी's picture

11 Aug 2013 - 6:15 pm | त्रिवेणी

तुम्ही इतके छान छान पदार्थ करू नका हो,भारतात येताना तुम्हाला खूप मोठा टिफीन आणावा लागेल.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Aug 2013 - 6:56 pm | अत्रुप्त आत्मा

फोटोत शिरता यायला हवं होतं...!

आदूबाळ's picture

11 Aug 2013 - 8:33 pm | आदूबाळ

+१ अगदी अगदी

सारणाने जसं वांग्यात शिरावं तस्संच

हेय दीप्स फुल्ल कलरफुल्ल पाकृ टाकलास की रे.
बेस्ट एकदम. टेस्टफुल्ल तर असणारच.

प्रभाकर पेठकर's picture

11 Aug 2013 - 8:48 pm | प्रभाकर पेठकर

मस्तं पाककृती आणि सादरीकरण.

करून पाहीली पाहिजे ही पाकृ.

सानिकास्वप्निल's picture

11 Aug 2013 - 10:15 pm | सानिकास्वप्निल

वेगळी, आकर्षक, भन्नाट पाकृ दिपक :)
+१

स्पंदना's picture

12 Aug 2013 - 4:41 am | स्पंदना

वांग्याचा भाव वाढला की हो दिपक भाऊ? चिज काय मश्रुम काय? काय विचारु नका?

शेवटपर्यंत आता पनीर दिसेल, मग दिसेल असं वाटत होतं. ;)
हटके पाकृ आहे पण.

कवितानागेश's picture

12 Aug 2013 - 7:42 am | कवितानागेश

ही पाकृ पनीर घालूनही करता येइल की. ;)
मस्त दिसतेय डीश.

दिपक.कुवेत's picture

12 Aug 2013 - 6:13 pm | दिपक.कुवेत

पनीर नक्किच घालायचा विचार होता पण मुद्दाम टाळला. पण माउ म्हणते त्याप्रमाणे सारणात पनीर घालु शकतोस.

किसन शिंदे's picture

12 Aug 2013 - 11:10 am | किसन शिंदे

ठाकूरकी पाककृती एकदम ब्येष्ट! ;)

सौंदाळा's picture

12 Aug 2013 - 12:10 pm | सौंदाळा

मस्तच, हटके पाकक्रुती

अक्षया's picture

12 Aug 2013 - 3:25 pm | अक्षया

मस्त पाककॄती आणि फोटॉ. :)

भावना कल्लोळ's picture

12 Aug 2013 - 6:47 pm | भावना कल्लोळ

मस्त....

अनन्न्या's picture

12 Aug 2013 - 6:36 pm | अनन्न्या

पण वांगी आवडत नाहीत. त्यामुळे फक्त पाहिली, छान लागत असणार!

या वांग्यात अंड्याची भुर्जी करून तीचे सारण वापरता येईल. अशा तर्‍हेने ही पा कृ अंडी घालून देखील करता येईल

विजुभाऊ तुम्ही पाहिजे तेव्हढी अंडी घाला. आम्ही काहीही म्हणणार नाही. :)

दिपक.कुवेत's picture

14 Aug 2013 - 10:39 am | दिपक.कुवेत

मात्र तुम्हि घातलेली अंडि पाहुन आम्हि नि:शब्द जरुर होउ :D

निवेदिता-ताई's picture

13 Aug 2013 - 9:27 pm | निवेदिता-ताई

सुरेख :)

अमोल केळकर's picture

14 Aug 2013 - 9:58 am | अमोल केळकर

मस्तच ! :)

अमोल