नही, इंडियन ....!

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
6 Aug 2013 - 9:19 pm

…. रझाने मला लॉबीसमोर हॉटेल च्या मेन गेट जवळ सोडलं आणि गाडी पार्क करायला गेला. त्याची ही सवय आहे. गाडी पार्क करून पुन्हा परत येतो. आतमध्ये लिफ्ट पर्यंत येतो आणि तिथे गुड नाईट म्हणुन परत जातो. त्यामुळे गाडीतून उतरून त्याची वाट बघत थांबलो. आजूबाजूला आज प्रचंड संख्येने गाड्या लागल्या होत्या. त्यात पुष्कळ गाड्या पोलिसांच्या आणि त्याहून थोड्या कमी काळ्याशार चकचकीत मर्सिडीज ! मर्क्स वर सात आठ वेगवेगळ्या देशांचे छोटे झेंडे लावलेले. मला अंदाज आला, आज काहीतरी मोठा कार्यक्रम हॉटेल मध्ये असणार. …. आज सकाळीच जाताजाता रझाला मी म्हटलं होतं की पाचशे रूम्सचे एवढं टोलेजंग हे हॉटेल आहे. पण काल अगदी सुनसान होतं. फारसे लोक दिसले नाहीत. त्याआधी बऱ्यापैकी गर्दी होती, पण काल अचानक सगळी जनता गायब. रझा गाडी पार्क करून तेवढ्यात येताना दिसला. मी लॉबीकडे जायला निघालो.

मेनगेट मधून किंचित आत सरकताना रझाला ऐकू जाईल एवढ्या आवाजात किंचाळलोच ! … Reza, what the hell is this ? आत जाताना प्रचंड सिक्युरिटी !!! बाय द वे, रझा माझा इथला म्हंजे इराणमधला सगळा व्यवसाय सांभाळतो. इराणी जनता सॉलिड प्रेमळ. कष्टाळु. आजकाल जरा भेदरलेली. रझा एकदम गुणी बाळ आहे…… नशीब त्या सिक्युरिटीवाल्यांनी अंगावरचे कपडे तेव्हढे बाकी ठेवले. झाडून सगळे चेक करत होते. सामान सुमानासह बेल्ट, बूट, पाकीट आदी सगळं एक्स रे केलं ! आत रझाने चौकशी केली. आणि मला सांगितलं. उद्या रविवारी त्यांचे नवे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांचा शपथविधी कार्यक्रम आहे. त्यासाठी आलेल्यातले आठ देशांचे राष्ट्राध्यक्ष आज हॉटेल मध्ये उतरले होते. पाकिस्तानचे झरदारी ही त्यात होते. त्यांच्या बरोबर त्यांचा सगळा लवाजमा. म्हटलं बोंबला. जातायेता हे अंगावरनं हात फिरवत राहणार आणि हॉटेलमध्ये मोकळेपणाने फिरूही देणार नाहीत.

रूममध्ये निवांत झाल्यावर मेलामेली करावी म्हणुन आयपॅड उघडले, पण वायफाय ची मुदत संपली होती. इथे वायफायचे कुपन घ्यायला हॉटेलच्या आयटी विभागात प्रत्यक्ष जावे लागते. कुढत गेलो. शिक्कुरीटी मेली होतीच. इकडूनच जा. तिकडून नको. वगैरे. आयटी डीपा. मध्ये एकजण त्याच्या कॉम्प मध्ये गुगल सर्च उघडायचा प्रयत्न करत होता. त्याच्या बरोबर एका टेबल भोवती आणखी दोघे बसले होते. कुठल्यातरी अवघड पण हिंदी मध्ये ते संभाषण करत होते. मी माझे कुपन घेतले आणि आणि परतायला निघालो. जाताना मला त्यांची गुगल उघडण्याची केविलवाणी धडपड बघवली नाही. मी त्यांच्या जवळ गेलो आणि सरळ ऑफर दिली.

" क्या मै आपकी कुछ मदद करू ? "
एक बोला " हा, यारा ये ग्गुगल नई, ओपण होरा "
लग्गेच दुसऱ्याने प्रश्न फेकला " क्या आप भी पाकीस्ताण से हो …?"
" क्या मै आपको पाकिस्तान का लगता हुं ?…. ( माझी ती ही थोडी किलकिली जागी झाली होती, अस्मिता !)
कुणीच काही बोललं नाही. ते तिघे किंचित अवघडल्या सारखे.
त्यांची कुचंबणा डुबवण्यासाठी मी थोडं हसत " आपका नेबर हु "
"इंडिया से हो आप" हा झरदारी साहेबांच्या विडीयोवर त्याच्या कॉम्पवर काहीतरी काम करत होता .
"आप हमीद अन्सारी साहब के साथ आये हो क्या …? भारतचे उपराष्ट्रपतीही आल्याचे समजले !
मी मुद्याला हात घातला " इराण में गुगल नही चलता. यहां गुगल पुरी तरहसे बंद है. जीमेल भी नही चलेगा "
तिघे ही एकदम ढूस झाले.
एकजण दुसऱ्याला " अब फिर …?"
मै बोला " आपको सर्च मारना है तो, याहू देखो ना. "
मी त्याना याहू उघडून दिलं. त्याना जे सर्च मारायचं होतं ते मिळालं.
तिघे जाम खूष. " दो घंटे से लगे हुए थे जनाब. मसला हल नई हो रहा था. आपणे हमे हल्का कर दिया " उपकृत झाल्याचा भाव तिघांच्या चेहऱ्यावर .
"आप हमीद अन्सारी साहब के साथ आये हो क्या …इंडियन डेलिगेशण के साथ ? पुन्हा तोच प्रश्न.
"नही. मै धंदे के लिए आया हु.कुछ दिनोके लिए हॉटेल मे रुका हु " त्यांना एकदा सांगून टाकले.
"हम जी पाकीस्ताण टीवी से आये है. पि टीवी. हमारे प्रेसिडेंट साहब के साथ आये है"
" आपका स्टाईल बडा चंगा है जी. मत्थे के बाल उडाये हो और बड्डी काली मुछछे … " हा आता उतराई होण्याचा थोडा प्रयत्न एकाने केला, जो आत्ता पर्यंत बोलला नव्हता. मी हसलो.
आणखी एक प्रयत्न …. "अच्छा आपको मंत्री साहब भी आये है, उनके साथ फोटो निकलवाणी है ?
इंटरेस्टिंग. मै बोला " कैसे ?"
अरे साहब, आपके दूरदर्शनवाले आये है, वो अपने जिगर है. वो खुशिसे मदद करंगे जी.
मै बोला " काघज और कलम है आपके पास ?"
( त्यांच्या स्टाईलने अगदी घशाच्या खाली जाऊन अन्ननलिकेतून कागज मधला "ग" काढताना बाहेर येई पर्यंत त्याचा "घ" झाला होता. पण ठीक आहे. पाकिस्तानच्या "ध" चा "मा" करण्याच्या वृत्ती पुढे हे काहीच नव्हते. )
" हांजी" खरच एक जण कागद पेन घेऊन सरसावला.
"हा लिखिए" मी सुरु झालो. " रूम नंबर 1402"
"इतने उपर रहते है आप ?" पी टीवी
मै बोला " हा, सबसे उप्पर "
हसला.
"अब मेरा नाम लिखिए सुधीर मुतालीक "
"हांजी, मिस्टर सुधीर …. "
"जी नही, मिस्टर नही …"
"क्या जी …? क्यो जी …… ?
"मिस्टर नही, श्री सुधीर मुतालीक, ऐसे लिखो "
तो बुचकळ्यात. मला समजले. त्याला मी "श्री" लिहून दिलं.
" ओक्केजी, आपको मेसेज भिजवा देंगे आपके रूम मे, कब निकलवा सकते है आप फोटो "
फिर मारा मैने धोबी पछाड. मै बोला,
"जी मुझे मेसेज मत दिजिए."
तो पुन्हा बुचकळ्यात
"मेसेज हमारे मिनिस्टर साहब को दिजिए. भारत का एक उद्योजक श्री सुधीर मुतालीक यहां आये है, इराण में. इराण में आके वो आपणा धंदा करते है. अगर मिनिस्टर साहब को श्री सुधीर मुतालीक के साथ फोटो निकलवानि है, तो वो अपने रूम में आज शाम के साडे सात बजेसे साडे आंठ बजे तक उपलब्ध होंगे …… "
"वल्ला, क्या आटूडुट है जी, सरकार " एकजण वेडा झाला होता.
मै बोला " अटीट्युड नही, इंडियन !"

देशांतरप्रकटन

प्रतिक्रिया

बाबा पाटील's picture

6 Aug 2013 - 11:42 pm | बाबा पाटील

मुतालिक साहब,आपने तो दिल खुश कर दिया.....वा माझ्या मरहठ्या,या महाराष्ट्राच्या मातीचा हाच तर गुण आहे.......

धमाल मुलगा's picture

7 Aug 2013 - 12:13 am | धमाल मुलगा

लय भारी! आमचा मुजरा रुजू करुन घ्येवा सरकार :)

कवितानागेश's picture

7 Aug 2013 - 12:18 am | कवितानागेश

भारी! :)

पुढे काय झाले.निघाला का फोटो?

स्पंदना's picture

7 Aug 2013 - 3:56 am | स्पंदना

हां! हां! हां!
हे मंत्री संत्री हज्जार येतील भाया अन जातीलही, पण सुधीर मुतालिक एक ही रहेगा। हम्मेशाह।

सस्नेह's picture

7 Aug 2013 - 4:30 am | सस्नेह

मिणिष्टर असुन्दे नायत्तर प्राइम मिणिष्टर ! आपण त्यांचे राजे !

अत्रुप्त आत्मा's picture

7 Aug 2013 - 8:34 am | अत्रुप्त आत्मा

@अगर मिनिस्टर साहब को श्री सुधीर मुतालीक के साथ फोटो निकलवानि है, तो वो अपने रूम में आज शाम के साडे सात बजेसे साडे आंठ बजे तक उपलब्ध होंगे …… "
"वल्ला, क्या आटूडुट है जी, सरकार " एकजण वेडा झाला होता.
मै बोला " अटीट्युड नही, इंडियन !">>> खत्तरनाक !!! :-D मूहतोड जवाब! प्रचंड टाळ्या! :-D

पैसा's picture

7 Aug 2013 - 8:48 am | पैसा

मस्त! भारीपैकी खास मराठी बाणा!

पण गुगल चालत नसेल तर याहू किंवा एमेस एन उघडावं हे पाकड्यांच्या २ तास टाळक्यात शिरलं नाही याची गंमत वाटली. पाकिस्तानी शोभतात खरे!

धमाल मुलगा's picture

8 Aug 2013 - 5:29 pm | धमाल मुलगा

त्यामुळं आपण भले अन आपलं काम भलं असे मानेवर खडा ठेऊन काम करणारे असतील. नाहीतर, हल्ली हॅकिंगच्या क्षेत्रात रशियन अन चायनिज हॅकर्सच्या पुढे गेलेयत म्हणे पाकिस्तानी हॅकर्स.

पैसा's picture

9 Aug 2013 - 3:25 pm | पैसा

आणि हॅकिंगच्या बाबत म्हणशील तर साधे सरळ काही करण्यापेक्षा उपद्व्याप करायला पाकिस्तानी नेहमीच पुढे!

इन्दुसुता's picture

7 Aug 2013 - 8:55 am | इन्दुसुता

मान गये!!!
किस्सा / लेख आवडला.

किसन शिंदे's picture

7 Aug 2013 - 9:04 am | किसन शिंदे

_/\_

किस्सा भारीच.

मुक्त विहारि's picture

7 Aug 2013 - 9:15 am | मुक्त विहारि

हाण तिच्यायला..

यशोधरा's picture

7 Aug 2013 - 10:02 am | यशोधरा

>>माझी ती ही थोडी किलकिली जागी झाली होती, अस्मिता >> :)

मदनबाण's picture

7 Aug 2013 - 10:03 am | मदनबाण

लयं भारी !

काळा पहाड's picture

9 Aug 2013 - 10:06 pm | काळा पहाड

आमचा ठोंब्या तर बाईने पत्र लिहल्यावरच बोलतो

म्हणजे तोच तो "सिक्खों के नाम पे धब्बा" ना?

दादा कोंडके's picture

7 Aug 2013 - 10:10 am | दादा कोंडके

पण च्यामारी एव्हडं सेल्फ एस्टीम असण्यासाठी मला मास्लो पिरॅमिडच्या पुष्कळ पायर्‍या चढाव्या लागतील. ;)

सार्थबोध's picture

7 Aug 2013 - 10:33 am | सार्थबोध

… कुणी काहीही म्हणा… मराठी बाणा… ताठ कणा

काळा पहाड's picture

9 Aug 2013 - 6:13 pm | काळा पहाड

… कुणी काहीही म्हणा… मराठी बाणा… ताठ कणा

इतकं चुकीचं वाक्य मी आत्तापर्यंत ऐकलेलं नाही. ताठ कणा हा बाणा मराठ्यांचा नव्हे. तो राजपूतांचा. शिवाजी महाराजांनी शिकवल्या प्रमाणे मराठ्यांचा बाणा गनिमी कावा हा आहे. याचं थोडक्यात वर्णन म्हणजे कोणत्याही परिस्थीतीत जिवंत रहाणे, प्रसंगी परिस्थीतीशी थोडी तडजोड करणे, पण वेळ मिळताच दुश्मनाचा खात्मा करणे. लपून छपून लढणे, जितकी हाणामारी करता येईल ती करून पळून जाणे पण परत परत हल्ला करून शत्रूला जेरीस आणणे. इतिहासाचा अभ्यास न करता उगीच काहीही शब्द वापरू नये.

कित्ती गं बाई ऑर्थोचं भारी ज्ञान ते! कुणी मिरे आणा हो!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Aug 2013 - 10:50 am | डॉ सुहास म्हात्रे

आवडले !!!

बॅटमॅन's picture

7 Aug 2013 - 12:26 pm | बॅटमॅन

वा!! जबरीच एकदम.

Mrunalini's picture

7 Aug 2013 - 12:33 pm | Mrunalini

मस्तच..

Mrunalini's picture

7 Aug 2013 - 12:35 pm | Mrunalini

मस्तच..

स्वाती दिनेश's picture

7 Aug 2013 - 12:39 pm | स्वाती दिनेश

भारी किस्सा!
स्वाती

तिमा's picture

7 Aug 2013 - 12:44 pm | तिमा

त्या पाकिस्तानींना असा बाणा बघायची संवयच नसेल. वा उस्ताद, मान गये.

श्रीगुरुजी's picture

7 Aug 2013 - 12:51 pm | श्रीगुरुजी

मस्तच!

आनंद's picture

7 Aug 2013 - 12:57 pm | आनंद

क्या बात है.
तुमच्या कंपनीचे प्रॉडक्ट्स बघीतले बरका , लै भारी आहेत.

विटेकर's picture

7 Aug 2013 - 4:21 pm | विटेकर

च्यायला नाहीतरी हे मंत्री संत्री आम्ही आहोत म्हणून आहेत ना !

अनिरुद्ध प's picture

7 Aug 2013 - 4:32 pm | अनिरुद्ध प

येक्दम ब्येश बघा.

सुधीर's picture

7 Aug 2013 - 5:08 pm | सुधीर

लेख आवडला.
बाय द वे, रझा माझा इथला म्हंजे इराणमधला सगळा व्यवसाय सांभाळतो. इराणी जनता सॉलिड प्रेमळ. कष्टाळु. आजकाल जरा भेदरलेली. रझा एकदम गुणी बाळ आहे...

Don't Tell My Mother नावाची मालिका आठवली. इराण कसा देश आहे हे माध्यमांपेक्षा तुमच्यासारखे अनुभवी लोक जास्त चांगलं सांगू शकतील. तरीपण इराणमध्ये जाऊन व्यवसाय करण्याचं कौतुक वाटलं.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Aug 2013 - 3:02 pm | निनाद मुक्काम प...

मी सुद्धा हा कार्यक्रम पाहतो . पण खात्रीने सांगतो ,इराण एवढा वाईट देश अजिबात नाही आहे , निदान सौदी पेक्षा तेथील महिलांना बरेच स्वातंत्र्य आहे. माझे येथे जर्मनीत अनेक इराणी कुटुंबीयांशी घनिष्ट संबंध आहेत , त्यापैकी कितीतरी भारतात जाऊन आले आहेत व त्यांना भारताविषयी आत्मीयता आहे.
लेख आवडला , व त्याचा शेवट खासच

उपास's picture

7 Aug 2013 - 5:23 pm | उपास

ये हुई ना बात! अभिनंदन सुधीर मुतालिक तुमचं!
अवांतर : देशाबाहेर राहून आपल्याच देशाची चारचौघा अभारतिय माणसांत निंदा करणार्‍यांचा संताप येतो. चांगलं बोलता येत नसेल तर निदान वाईट उगाळू नका तिर्‍हाईता समोर इतकी सुद्धा अक्कल ह्या सुविद्यांना नसते!

आदूबाळ's picture

7 Aug 2013 - 9:58 pm | आदूबाळ

देशाबाहेर राहून आपल्याच देशाची चारचौघा अभारतिय माणसांत निंदा करणार्‍यांचा संताप येतो. चांगलं बोलता येत नसेल तर निदान वाईट उगाळू नका तिर्‍हाईता समोर इतकी सुद्धा अक्कल ह्या सुविद्यांना नसते!

अगदी अगदी. मी अशावेळी शक्यतोवर विषयाला वेगळं वळण लावतो किंवा "अगदीच असं नसतं बर्का" छाप काही बोलतो. वय, मान, पद-पदवी यापरत्वे हेही शक्य नसेल तर "झग्यातून पडला होतास का रे रताळ्या" असं मकरंद अनासपुरे ष्टाईलमध्ये मनातल्या मनात बोलतो. :)

जॅक डनियल्स's picture

12 Aug 2013 - 1:16 am | जॅक डनियल्स

त्यांना चांगल्या गोष्टीची माहिती नसते मग हे अज्ञान लपवायला देशाला शिव्या घालणे चालू होते. खर म्हणजे त्यांना आयुष्य कसे जगायचे हेच माहित नसते, म्हणून चांगले जगायला मिळावे म्हणून देश सोडतात, आणि देशाला शिव्या घालत बसतात. ज्यांना छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद घ्यायची सवय आहे ती लोकं निर्जन बेटावर पण सुखी राहू शकतात. $ आला की अक्कल आली अशी समज करून घेतात. अश्या लोकांना त्यांची जागा दाखवून देऊन त्यांची इज्जत काढणे माझा छंद आहे.

स्वाती२'s picture

7 Aug 2013 - 5:34 pm | स्वाती२

लै भारी!

गणपा's picture

7 Aug 2013 - 6:51 pm | गणपा

तुमचा 'अ‍ॅटिट्युड' भावला. :)

भावना कल्लोळ's picture

8 Aug 2013 - 5:33 pm | भावना कल्लोळ

तुसी ग्रेट हो ….

इराणी कल्चर, सामाजिक जीवन इत्यादि विषयी वाचायला आवडेल.

सुधीर मुतालीक's picture

9 Aug 2013 - 6:07 pm | सुधीर मुतालीक

हो, नक्की लिहीन या विषयांवर इराणची सांस्कृतिक बाजू मोहकच आहे. सवडीने लिहेन. धन्स.

सर्वसाक्षी's picture

9 Aug 2013 - 4:41 pm | सर्वसाक्षी

मानलं! याला म्हणतात 'जागा दाखवुन देणं'

आतिवास's picture

9 Aug 2013 - 7:16 pm | आतिवास

किस्सा आवडला.
पण भारतीय मंत्र्याला भेटायला पाकिस्तानी नागरिकांचा(ही)वशिला चालू शकतो हे मनोरंजक वाटलं :-)

सुधीर मुतालीक's picture

11 Aug 2013 - 2:35 pm | सुधीर मुतालीक

एक्दम फरडु प्रतिसाद मिळाले आहेत. समस्त प्रतिसादी मंडळींचे प्रचंड आभार.

जॅक डनियल्स's picture

12 Aug 2013 - 1:18 am | जॅक डनियल्स

फारच मस्त अनुभव आहे,असे अनेक अनुभव वाचायला आवडेल.
आपण चुकीचे नसलो तर, बापाला पण भ्यायचे नाही ही वृत्ती फार कमी पाहायला मिळते.