"केनी" च्या पानांची भजी

चौकटराजा's picture
चौकटराजा in पाककृती
3 Aug 2013 - 3:57 pm

मिपाकर मित्रहो ,
मिपाचे सदस्य झाल्यापासून पाककृती मधे आमचा हा पहिलाच धागा आहे. तो गोड मानून घ्यावा असे म्हणायची सोय नाही.
कारण तो पदार्थ तिखट आहे.

आपल्या महाराष्ट्र देशी जास्तीत जास्त साधे सोपे पदार्थ तयार करण्याची महान परंपरा आहे. त्यात भजी नावाचा पदार्थ तर
महा लोकप्रिय आहे. कांदा,( यात चकती, गोल, लांब काप असे प्रकार ) बटाटा, वांगे, मिरची, घोसाळे( की घोसावळे), केळे, पालक, चाकवत पाने, मायाळू पाने, ओवा पाने, कोबी ई ई वापरून भजी करतात. ती चवीचवीने खातात. बरोबर पावाची , पुदीन्याच्या चटणीची, लसणीच्या चटणीची साथ घेतात. ( ऐला तोंडाला पाणी सुटायला लागले राव !) .तर असे हे भजी महात्म्य !
चल गण संपला. आता गौळण !
तर मंडळी हा पदार्थ म्हणजे केनीच्या पानाची भजी. बर्‍याच जणांकडे चवकशी करून झाल्यावर लोकाना माहीत नाहीसे दिसले. खायला रुचकर लागतो. त्यापेक्षाही आपल्या महाराष्ट्रातील आपल्या आया मावशांचा निसर्गाचा अभ्यास कसा पक्का
होता याचे प्रत्यंतर देणारा हा पदार्थ.
.
वर चित्रात दिसणारे झुडूप आपण आखाड-श्रावणात आपल्या परसदारी वा रस्त्याच्या कडेला अनाहूतपणे आपला आवडता शेजारी आघाडा याच्या सोबतीने उगवलेले आपल्याला जागोजागी दिसेल.
पानांचा आकार साधारण पणे आपल्या जिभेसारखा. पान हाताळले तर बारीक लव पानावर आलेली आढलते.
.

वरील चित्रात वरून फोटो घेतला आहे . बाजूने हे झुडूप व पाने अशी दिसतात.

.
आता ही पाने खुडून घेऊन ती धुतलेली आहेत.

आता पाककृती.

एका बाजूला अशी पाने घेतल्यावर एका पसरट भांड्यात नेहमीप्रमाणे भजीसाठी हरबरा डाळीचे पीठ भिजवून घ्यावे. आपल्या आवडीनुसार त्यात लाल तिखट, ओवा, मीठ , अगदी थोडा खाण्याचा सोडा घालावा. मग एकेक पान उचलून
पीठात बुडवून तळायला टाकावे.
.

.
जरासा ब्राउन रंग आला की भजी झार्‍याने डिशमधे काढावीत.आपल्याला आवडणार्‍या चटणीबरोबर खावीत.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

3 Aug 2013 - 4:09 pm | प्रचेतस

वावा.
आखाड तळला वाट्टं.

केनीचे नाव पहिल्यांदाच ऐकतोय. पण झुडूप बरेच वेळा पाहिलंय. करून पाहायला हवी भजी.

बाकी पाकृ तुम्ही केली का काकूंनी?

अत्रुप्त आत्मा's picture

3 Aug 2013 - 6:02 pm | अत्रुप्त आत्मा

@आखाड तळला वाट्टं. >>>+++++११११११ आणी तो ही आंम्हाला न बोलिवता!!! :-/

http://i1074.photobucket.com/albums/w408/arunbarve/P1020298_zpsd9aa3936.jpg
http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif

@बाकी पाकृ तुम्ही केली का काकूंनी?>>> कुणी का करे ना...! :-/ आमाला नै बोलिवलं... :-/ आमी येतांन्ना अज्जून मुळ्याची /ओव्याची...झालच तर अजून कुठली कुठली (खायची) पान आणून "भजी मोहोत्सव" आमच्या हातांनी क्येला अस्ता!!! =))

अनन्न्या's picture

3 Aug 2013 - 4:13 pm | अनन्न्या

रत्नागिरीस मिळेल? पावसाळ्यात अनेक रानभाज्या येतात आमच्याकडे!

दिसायला तर छानच दिसतायेत ...चवीला पण छानच असतील...या पानांना स्वहाताची अशी काही चव असते का ?? आणि अळूच्या पानांसारखी खाज वैगेरे तर येत नाही ????

अनिरुद्ध प's picture

3 Aug 2013 - 4:21 pm | अनिरुद्ध प

मुम्बैत यातिल काहिच मिळत नसल्याने निराशाच आहे.बाकी आपण लिहिल्याने चव चान्ग्लीच असेल यात शन्का नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Aug 2013 - 4:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वा.. राजे वा....! :)

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

3 Aug 2013 - 5:03 pm | पैसा

सोपी पाकृ आणि अप्रतिम फोटो. ओव्याच्या पानांच्या भजांसासारखी लागत असावीत असे वाटते. केनीकुर्डू अशी नावे जोडीने घेतली जातात. त्यामुळे कुर्डूप्रमाणे सगळीकडे उगवत असावे.

बिरुटे सर इंडिया स्टोअर्स मधे जाणे आणि शोधणे आले तुम्हाला.

स्वाती दिनेश's picture

3 Aug 2013 - 6:00 pm | स्वाती दिनेश

भजी मस्तच..
केनीच्या पानांची भजी असे नाव वाचून चातुर्मासातल्या कहाण्यांमधील केनीकुर्डूची भाजी आठवली.
स्वाती

अत्रन्गि पाउस's picture

4 Aug 2013 - 10:25 pm | अत्रन्गि पाउस

कहाण्यांमधील रेफरन्स आठवला...

चौकटराजा's picture

3 Aug 2013 - 6:24 pm | चौकटराजा

आपल्यापैकी कोणी चाकवताच्या पानाची भजी खाल्ल्ली असतील तर त्यासारखी लागतात. पदार्थ फार नाजुक ! गरमागरम खाल्ली तरच मजा ! एरवी अर्ध्या तासातच मउ पडतात.
@ वल्ली व अआ
काकूने केलेला पदार्थ आहे.पण मी तिला शिकविला आहे ! ( त्यात शिकवायचं काय डोस्क ?)
सौ वल्ली व सौ अ आ याना डायरेक्ट हा पदार्थ शिकवीन असे काकू चे म्हणणे आहे .( त्यात काय शिकवायचं कप्पाळ !)

प्रचेतस's picture

3 Aug 2013 - 6:37 pm | प्रचेतस

=)) =))
त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल काकूंना म्हणावं.

सस्नेह's picture

3 Aug 2013 - 9:41 pm | सस्नेह

काकूंच्या हातच्या भज्यांवरच समाधान माना हो !

प्रचेतस's picture

3 Aug 2013 - 10:13 pm | प्रचेतस

अगदी अगदी. :)

चौकटराजा's picture

4 Aug 2013 - 8:41 am | चौकटराजा

घरी विचारले वल्लीला जेवायला बोलवायचे का ? म्हणाली... पहिल्यांदा सौ वल्लरी ला श्रावणी शुक्रवारला सव्वाष्ण म्हणून बोलवू ...... मग मेहूणाचा विचार .... काय ??

अत्रुप्त आत्मा's picture

4 Aug 2013 - 9:20 am | अत्रुप्त आत्मा

@ पहिल्यांदा सौ वल्लरी http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gifला श्रावणी शुक्रवारला सव्वाष्ण म्हणून बोलवू ...... >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

@मग मेहूणाचा विचार .... काय ?? >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-hard-smiley-emoticon.gif

काका.... आखाड फक्त भज्यां'नीच साजरा केलात ना??? =)) वल्लरी हे नाव भावी-मि.पा. बाय.डी नेम म्हणून गृहीत धरणेत येत आहे...! =)) आणी चिडवायचं नाव अगोबी...!!! =))
====================================
चौरा काकांकडून अगोबा यांचे सुप्पर डुप्पर मार्केटयार्ड उठवल्या गेले आहे... =))

त्रिवेणी's picture

3 Aug 2013 - 8:45 pm | त्रिवेणी

कधी भजी खाली नाही.
पण एक गोष्ट खरी खरी सांगते,भजी टपरीवर आणि पोहे दुसर्‍यांच्या घरीच खायला मला खुप आवडते.

शिल्पा ब's picture

3 Aug 2013 - 10:49 pm | शिल्पा ब

<<<कधी भजी खाली नाही.
म्हणजे ? कोणतीच भजी खाल्ली नाहीत? का फक्त या पानांची ? कोणतीच भजी (नगरकडे भजे म्हणतात) खाल्ली नसतील तर जंगी सत्कार करावा तुमचा अशी सदस्यांना एक सुचना आहे.

त्रिवेणी's picture

4 Aug 2013 - 11:11 am | त्रिवेणी

नाही नाही टाईप करताना चुकून चूक झाली. मला ही (या पानाची) भजी असे म्हणायचे होते.

शिल्पा ब's picture

4 Aug 2013 - 11:15 am | शिल्पा ब

मग हरकत नै ! सत्कारासाठी दुसरं कारण शोधु आपण.

सस्नेह's picture

3 Aug 2013 - 9:44 pm | सस्नेह

भज्यांपेक्षा पानांचेच फोटो आवडले.

रमेश आठवले's picture

3 Aug 2013 - 9:58 pm | रमेश आठवले

माझ्या लहानपणी माझी आजी घराच्या समोर असलेल्या देवळाच्या आवारात उगवणार्या गवता मध्ये असणार्या पुईची पाने खुडून आण्यासाठी मला पाठवायची आणि या पानांची भजी करावयाची. माझ्या आठवणी प्रमाणे ही पाने केनीच्या पानापेक्षा वेगळी दिसतात.
याच ठिकाणाहून घरात गणपति बसवला कि दुर्वा आणण्याचे कामही माझ्याच कडे असायचे.

शिल्पा ब's picture

3 Aug 2013 - 10:51 pm | शिल्पा ब

भजे अत्यंत आवडता पदार्थ. आताशा कमी खाल्ले जातात वयोमानानुसार !
ही पानं माहीती नाहीत अन इथे मिळण्याची शक्यता नाही. असो.
छान दिसताहेत.

राही's picture

3 Aug 2013 - 11:10 pm | राही

केनीची भाजी माहीत आहे पण याच पानांची भजी देखील करतात हे ठाऊक नव्हते. श्रावणाच्या कहाण्यांतल्या एका भाजीत केनी-कुर्डूची भाजी असते. कुर्डूची भाजी खाण्यापेक्षा जून झाल्यावर झाडाला येणारे गुलबट तुरेच पहात बसावेसे वाटतात. सध्या मुंबईत या रानभाज्यांची रेलचेल आहे पण यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने या भाज्याही लवकर जून झाल्यात. टाकळा पिवळा पडायला सुरुवात झालीय. फोडशीसुद्धा चरट झालीय. शेवळे येऊन गेली. आता बांबूचे कोंब आणि करटुली खूप दिसतात मुंबईत दादरला पणशीकर समोर आणि समोरच्या गल्लीत, माटुंगा रोड्ला काशीविश्वेश्वर देवळानजिक, गिरगावला बनामा गल्लीत, पारले, गोरेगाव, अंधेरी येथे या भाज्या हमखास असतात. बोरिवली-ठाणे तर या भाज्यांची कोठारेच.
या भाज्यांच्या तुरट अनवट चवी जिभेवर जागवल्याबद्दल धन्यवाद.

छान फोटो व नव्या प्रकारची भजी पाहून श्रावणातल्या कहाण्यांची आठवण झाली. त्यात केनीकुर्डूची भाजी असा प्रकार असायचा.

सानिकास्वप्निल's picture

3 Aug 2013 - 11:36 pm | सानिकास्वप्निल

केनीच्या पानांची भजी नवा प्रकार समजला
भजी खावीशी वाटत आहे :)

प्रभाकर पेठकर's picture

4 Aug 2013 - 2:31 am | प्रभाकर पेठकर

वा..वा.. मस्तच दिसताहेत 'केनीच्या पानांची भजी'. लवकरच मुंबई-पुण्यात जाण्याचा योग आला तर नक्कीच करून खाण्याचा आणि (सम व्यसनी भेटले तर..) पिण्याचा कार्यक्रम करणेत येईल.

इन्दुसुता's picture

4 Aug 2013 - 8:45 am | इन्दुसुता

माझ्या वडिलांच्या अतिशय आवडीची ही भजी.... त्यामुळे दर पावसाळ्यात आई अगदी आवर्जून करत असे... खूप वर्षे झाली खाऊन ... छान आठवण करून दिलीत.

चित्रगुप्त's picture

4 Aug 2013 - 8:49 am | चित्रगुप्त

राजे, पाकृचा पहिलाच धागा मस्त भज्यांचा. अहाहा...

आमच्या विदर्भात हे सगळ्या शेतामध्ये तन म्हणून उगवते आणि याला कोणी हात पण लावत नाही पण पोथीची / चमकोरा ची पाने भाज्या मध्ये विशेषता पोळ्या च्या दिवशी भज्या मध्ये टाकली जातात आणि ज हि पाने पाणथळ जागी जास्त उगवतात .

दिपक.कुवेत's picture

4 Aug 2013 - 12:16 pm | दिपक.कुवेत

ह्या निमित्ताने सगळ्या भजी प्रकारची चव जिभेवर तरळुन गेली. वरील भजी एकदम टॉप.

गौरीबाई गोवेकर's picture

4 Sep 2013 - 12:21 pm | गौरीबाई गोवेकर

मस्त लागतात. आताच केनी छान उगवलाय. वाळायच्या आत करायची भजी.

कपिलमुनी's picture

4 Sep 2013 - 2:24 pm | कपिलमुनी

विड्याच्या पानाची पण भजी करता येते ..
मस्त लागते

राही's picture

4 Sep 2013 - 6:36 pm | राही

खरोखर बहुतेक सगळ्या रानभाज्या ही तणेच असतात. टाकळा, कुर्डू, पांढरा माठ, ही तर अव्वल दर्जाची तणे. टाकळा आणि केनी अशा ठिकाणी उगवलेली असतात की कधी खावीशीही वाटू नयेत. तेरे म्हणून अळवाची एक दुय्यम दर्जाची पांढर्‍या देठाची आणि फिकट पानांची जात असते तीही अशीच कुठेही चिखलात उगवते.

मुक्त विहारि's picture

4 Sep 2013 - 6:55 pm | मुक्त विहारि

आणि अनवट पा.क्रु. बद्दल धन्यवाद,,

भ ट क्या खे ड वा ला's picture

5 Sep 2013 - 12:37 am | भ ट क्या खे ड वा ला

फोटो मस्तच, आणि उपद्व्याप करायला हि सोपा दिसतो आहे.
कुर्डू या वर्षी दोन वेळा खाऊन झाला .
पण केनी कधी खल्ली नाही अजून,छान पदार्थ सुचवलात ,धन्यवाद ,