मिपाकर मित्रहो ,
मिपाचे सदस्य झाल्यापासून पाककृती मधे आमचा हा पहिलाच धागा आहे. तो गोड मानून घ्यावा असे म्हणायची सोय नाही.
कारण तो पदार्थ तिखट आहे.
आपल्या महाराष्ट्र देशी जास्तीत जास्त साधे सोपे पदार्थ तयार करण्याची महान परंपरा आहे. त्यात भजी नावाचा पदार्थ तर
महा लोकप्रिय आहे. कांदा,( यात चकती, गोल, लांब काप असे प्रकार ) बटाटा, वांगे, मिरची, घोसाळे( की घोसावळे), केळे, पालक, चाकवत पाने, मायाळू पाने, ओवा पाने, कोबी ई ई वापरून भजी करतात. ती चवीचवीने खातात. बरोबर पावाची , पुदीन्याच्या चटणीची, लसणीच्या चटणीची साथ घेतात. ( ऐला तोंडाला पाणी सुटायला लागले राव !) .तर असे हे भजी महात्म्य !
चल गण संपला. आता गौळण !
तर मंडळी हा पदार्थ म्हणजे केनीच्या पानाची भजी. बर्याच जणांकडे चवकशी करून झाल्यावर लोकाना माहीत नाहीसे दिसले. खायला रुचकर लागतो. त्यापेक्षाही आपल्या महाराष्ट्रातील आपल्या आया मावशांचा निसर्गाचा अभ्यास कसा पक्का
होता याचे प्रत्यंतर देणारा हा पदार्थ.
वर चित्रात दिसणारे झुडूप आपण आखाड-श्रावणात आपल्या परसदारी वा रस्त्याच्या कडेला अनाहूतपणे आपला आवडता शेजारी आघाडा याच्या सोबतीने उगवलेले आपल्याला जागोजागी दिसेल.
पानांचा आकार साधारण पणे आपल्या जिभेसारखा. पान हाताळले तर बारीक लव पानावर आलेली आढलते.
वरील चित्रात वरून फोटो घेतला आहे . बाजूने हे झुडूप व पाने अशी दिसतात.
आता ही पाने खुडून घेऊन ती धुतलेली आहेत.
आता पाककृती.
एका बाजूला अशी पाने घेतल्यावर एका पसरट भांड्यात नेहमीप्रमाणे भजीसाठी हरबरा डाळीचे पीठ भिजवून घ्यावे. आपल्या आवडीनुसार त्यात लाल तिखट, ओवा, मीठ , अगदी थोडा खाण्याचा सोडा घालावा. मग एकेक पान उचलून
पीठात बुडवून तळायला टाकावे.
जरासा ब्राउन रंग आला की भजी झार्याने डिशमधे काढावीत.आपल्याला आवडणार्या चटणीबरोबर खावीत.

वाचने
16617
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
वावा.
@आखाड तळला वाट्टं. >>>++++
In reply to वावा. by प्रचेतस
हे झाड पाहिले नाही कधी!
दिसायला तर छानच दिसतायेत ..
निराशा
च्यायला, आता ही पानं शोधनं आलं.
वा: मस्त!
बिरुटे सर इंडिया स्टोअर्स मधे
मस्त!
एग्झाक्त्ली
In reply to मस्त! by स्वाती दिनेश
ही भजी .....
त्यासाठी थोडी वाट पाहावी
In reply to ही भजी ..... by चौकटराजा
तोपर्यंत,
In reply to त्यासाठी थोडी वाट पाहावी by प्रचेतस
अगदी अगदी.
In reply to तोपर्यंत, by सस्नेह
तसं काय नाय ....
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
@ पहिल्यांदा सौ वल्लरी ला
In reply to तसं काय नाय .... by चौकटराजा
अगोबी...!!!
=)) ==================================== चौरा काकांकडून अगोबा यांचे सुप्पर डुप्पर मार्केटयार्ड उठवल्या गेले आहे... =))कधी भजी खाली नाही.
<<<कधी भजी खाली नाही.
In reply to कधी भजी खाली नाही. by त्रिवेणी
नाही नाही टाईप करताना चुकून
In reply to <<<कधी भजी खाली नाही. by शिल्पा ब
मग हरकत नै ! सत्कारासाठी
In reply to नाही नाही टाईप करताना चुकून by त्रिवेणी
सोपी पाकृ .
पुइच्या पानांची भजी.
भजे अत्यंत आवडता पदार्थ.
केनीची भाजी
छान फोटो व नव्या प्रकारची भजी
छान पदार्थ
जरूर.
आवडती !!!
अहाहा...
हे एक शेती मधील तण आहे
वा
माझी आवडती भजी
विड्याच्या पानाची
तण
मस्त...
फोटो मस्तच, आणि उपद्व्याप