फिश फ्राय

त्रिवेणी's picture
त्रिवेणी in पाककृती
15 Jul 2013 - 8:00 pm

नमस्कार मंड्ळी,
माझ धनी ३ वर्षानंतर परत आता वशट खाऊ लागल्यात.(ही लाईन अपर्ना ताईंच्या मागच्या एका लेखातील लिखाणाची कापी) ही मागील कोकण सफरीची क्रुपा. तर म्ह्ट्ल चला आज फिश फ्राय करुया.

साहित्य:-
पापलेट - २
तंदुर मसाला- २ चमचे
लाल तिखट- २ चमचे
कांदा लसुन मसाला- २ चमचे
ह्ळद- १ चमचा
लिंबु- १
लसुण- ८ ते १० पाकळ्या
मिठ- गरजेनुसार
तेल- प्रत्येकाच्या डायट्नुसार
रवा- २ चमचे
बटर(चहा सोबत खातो ते)- ३Album 1
(मी स्वःतसाठी दिड पाव सुरमई सुध्दा घेतली होती. फोटोत दिसेलच तुम्हाला.)

क्रुती-
१)पापलेट साफ करुन त्याला लिंबु+मिठ+हळद लावुन १५-२० मिनीट ठेवावे.
२)त्यादरम्यान तिखट्,तंदुर मसाला, कांदा लसुन मसाला,ठेचलेल्या लसुन पाकळ्या एकत्र करुन मॅरिनेट केलेल्या फिशला लावुन कमीत कमी १ तास ठेवावे.
३)रवा+बटरचा चुरा एकत्र करुन त्यात चवीपुरते मिठ व तिखट टाकावे.
४)मॅरिनेट फिश वरील रव्याचे मिश्रण लावुन शॅलो फ्राय करावे.

fish fry
fish fry
fish fry
fish fry

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2013 - 9:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त दिसतायेत फीश फ्राय. आवडले.
अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

दिपक.कुवेत's picture

15 Jul 2013 - 10:10 pm | दिपक.कुवेत

फिश फ्राय आपला वीक पॉईट आहे. पण रवा असुनहि बटरचा चुरा लावण्याचे प्रयोजन समजले नाहि?

प्रभाकर पेठकर's picture

16 Jul 2013 - 2:33 am | प्रभाकर पेठकर

'प्रयोजन समजले नाही' हा प्रश्न आहे की विधान? असो.

बटरच्या चुर्‍यामुळे मसाल्यातील पाण्याचा अतिरिक्त अंश शोषला जाऊन माशाला रवा चांगला चिकटावा हा उद्देश असू शकतो. त्यासाठी रव्यात किंचित तांदूळाचे किंवा गव्हाचे पीठ मिसळले तर अधिक चांगला परिणाम दिसून येतो. त्यातल्या त्यात मी तांदूळाचे पीठ वापरतो. त्याने कुरकुरीतपणा वाढतो.

त्यातल्या त्यात मी तांदूळाचे पीठ वापरतो. त्याने कुरकुरीतपणा वाढतो.

सहमत.
आमच्या घरी मासे तळताना रव्या ऐवजी तांदळाचं पीठच वापरलं जातं. कधी पीठ संपलं असेल तरच मग रव्याचा नंबर लागतो.

पेठकर काकांनी बरोबर सांगितले. माझी एक मेत्रिण बटर आणि बर्याचदा मारी बिस्कीटही रव्यात मिक्स करते म्ह्णून मी सुध्दा हा प्रयोग करुन बघितला.

पैसा's picture

15 Jul 2013 - 11:32 pm | पैसा

त्रिवेणीचे प्रयोग सुरू झालेले दिसतात! तुमच्या अहोंना नक्की आवडले असणार!

त्रिवेणी's picture

16 Jul 2013 - 10:06 am | त्रिवेणी

हो ताई आवड्ले अहोंना.
पण तुम्ही सांगितलेल्या आमंत्रण मधील फिश फ्राय आणि करी अजुन आठ्वते. तशी करी करुन बघण्याचे खुप मनात आहे.
अवांतर - गणपतीपुळे येथील होटेल समीर मध्येही मस्त फिश मिळाले होते.

प्रभाकर पेठकर's picture

16 Jul 2013 - 2:35 am | प्रभाकर पेठकर

मसाल्याची पद्धत वेगळी आहे. वापरून पाहीली पाहिजे.

स्पंदना's picture

16 Jul 2013 - 4:40 am | स्पंदना

आहा! आहा! लागलं, लागलं! लग्न मुरायला लागल.
हरकत नाही, चला. आनंद आहे.
बा द वे मासा मस्त दिसतो आहे. अगदी खंगरी पाककृती.
मी मात्र प्रॉम्फ्रेट सोडुन सुरमाईच्या मागे धावेन.

वाह! तोंडाला पाणी सुटले..!

मुक्त विहारि's picture

16 Jul 2013 - 9:04 am | मुक्त विहारि

फिश फ्राय....

रविवार सार्थकी लागणार आमचा..

प्रतिसादा बद्द्ल सग्ळ्यांना खुप खुप धन्यवाद.

bharti chandanshive१'s picture

16 Jul 2013 - 10:27 am | bharti chandanshive१

मसाल्याची पद्धत वेगळी आहे. खुप छान आहे

मी_देव's picture

16 Jul 2013 - 12:25 pm | मी_देव

Ekdum bhari

गणपा's picture

16 Jul 2013 - 1:18 pm | गणपा

इथे हे घरचे मासे मिळत नसल्याने असले हे धागे पहाणे म्हणजे मानसीक छळ आहे.

मालोजीराव's picture

16 Jul 2013 - 2:11 pm | मालोजीराव

असले हे धागे पहाणे म्हणजे मानसीक छळ आहे.

हापिसात बसून पेरी-पेरी चिकन बघताना आमचाबी मानशिक छळ होतो…गनपाशेट ;)

शेम हिअर!!! हपिसात बसून अस्ले षड्रसविकार चाळवणारे धागे पाहिले की कामातलं लक्ष उडून जातं :)

मी_आहे_ना's picture

16 Jul 2013 - 2:18 pm | मी_आहे_ना

अगदी बरोबर (जेवण झालं असलं तरीही)

बाकी डीश छानच असणार, सगळे म्हणतायत म्हणजे!

अनन्न्या ताई रत्नागिरी ट्रिप तर तुमच्या भेटीमुळे सार्थकी लागली. आणि हे सर्व पैसा ताईंमुळेच शक्य झाले.

दिपस्तंभ's picture

16 Jul 2013 - 11:06 pm | दिपस्तंभ

मस्तच् दिसत आहेत मासे... तोंडाला पाणी सुटले..! जेवनानंतर हि..

प्रतिसादा बद्द्ल सग्ळ्यांना खुप खुप धन्यवाद.

वेल्लाभट's picture

17 Jul 2013 - 10:17 am | वेल्लाभट

तोंडाला पाणी आणि हळहळ !...........

सुहास झेले's picture

17 Jul 2013 - 11:12 am | सुहास झेले

अंमळ छळवाद आहे हा ;-)

नक्शत्त्रा's picture

17 Jul 2013 - 11:16 am | नक्शत्त्रा

हळहळ...मासा साथि....
बाकी डीश छानच असणार, सगळे म्हणतायत म्हणजे!

सांजसंध्या's picture

23 Oct 2013 - 10:33 pm | सांजसंध्या

बघूनच तोंडाला पाणी सुटलं. आता करायलाच पाहीजे..

विशाखा राऊत's picture

23 Oct 2013 - 11:03 pm | विशाखा राऊत

सही...

वात्रट मेले's picture

12 Jan 2014 - 5:17 pm | वात्रट मेले

आज हिला करायलाच सांगतो....:)

आयुर्हित's picture

13 Jan 2014 - 12:27 am | आयुर्हित

चमचमीत मासे. छान फोटो.सोपी पाककृती. पेठकर काकांच्या टिप्स.
व्वा! माझी मेजवानी सुरु आहे, फक्त मिपावर!!!!
नक्कीच करून पाहीन.

येऊ द्या अजून नवीन काहीतरी.

आपला मिपा स्नेही: आयुर्हीत