मास्टरशेफ संजीव कपुर ह्यांची हि रेसीपी पाहिल्यावर चोको जामुन करुन तर बघीतलेच पण माझा त्यात खारीचा वाटा म्हणजे मी ते व्हॅनीला आईसक्रिम बरोबर सर्व केले. वेल तसहि हलके गरम गुलाबजाम आणि थंड आईसक्रिम हे कॉम्बीनेशन भन्नाट लागतं; एकदा नक्कि ट्राय करा. कधी काळी अचानक पाहुणे टपकलेच तर हे कॉम्बीनेशन पेश करा आणि आवडेल ह्याची खात्री बाळगा. आईसक्रिम तर आपण रेडिमेड आणतोच पण हल्ली गुलाबजाम पण सहज उपलब्ध असतात.
साहित्यः
१. मिल्क पावडर - ५ मोठे चमचे (मुळ पाकॄ मधे खवा वापरलाय)
२. मैदा - १.५ चमचा (बाईंन्डिंग साठि)
३. बेकिंग पावडर - १/४ चमचा
४. कोको पावडर - १ चमचा
५. ड्रिकिंग चॉकलेट पावडर - २ चमचे (हि कॅडबरिची रेडिमेड मिळते)
६. साखर, पाणि - पाक बनवण्यासाठि
७. दुध - गरजेप्रमाणे
८. व्हॅनीला आईसक्रिम किंवा आपल्या फ्लेवर्डच आवडतं (चॉकलेट सोडुन)
कॄती:
१. रेडिमेड गुलाबजाम मिक्स पावडर वापरणार असाल तर मिल्क पावडर वगळा. आता एक मोठं गाळणं घेउन त्यातुन अनुक्रमे मिल्क पावडर, मैदा, बेकिंग पावडर, कोको आणि ड्रिकिंग चॉकलेट पावडर घालुन गाळुन घ्या म्हणजे पीठ मळताना गुठळ्या राहणार नाहित
२. एकिकडे साखरेचा पाक तयार करत ठेवा आणि गुलाबजाम तळण्यासाठि तेल तापत ठेवा
३. आता बाउल मधे गरजेप्रमाणे दुध घालुन गोळा मळा
४. तयार पीठाचे लींबाएवढे गोळे करुन तळुन घ्या. आच मंदच असु द्या म्हणजे गुलाबजाम आतपर्यत तळले जातील
५. झार्याने कढईतील तेल हलक्या हाताने गोलाकार फिरवा म्हणजे गुलाबजाम सर्व बाजुनी सारखे तळले जातील
६. तयार गुलाबजाम साखरेच्या पाकात सोडुन मुरु द्या
७. सर्व करतेवेळि मायक्रोव्हेव मधे हलके गरम करुन नुसतेच किंवा व्हॅनीला आईसक्रिम बरोबर सर्व करा
टिपः
१. आवडत असल्यास ह्यात सुका मेवा (काजु, बदाम, पिस्ते ह्यांचे बारिक तु़कडे), गुलकंद किंवा चॉकलेटचे तुकडे स्टफ करुन शकता
प्रतिक्रिया
11 Jul 2013 - 8:08 pm | jaypal
दिपक शेफ्/ठ मान गये उस्ताद
11 Jul 2013 - 8:13 pm | अनन्न्या
कसे प्रमाण घ्यायचे? व्हॅनिलाची आयडिया भन्नाट!
15 Jul 2013 - 11:04 am | दिपक.कुवेत
सुद्धा ५ चमचे घे....फक्त बाकि सर्व घालण्याआधी नीट मळुन घे म्हणजे सुरकुत्या राहणार नाहित.
11 Jul 2013 - 8:22 pm | रेवती
धन्य आहात तुम्ही! फोटू भलताच गोड आलाय.
11 Jul 2013 - 8:30 pm | मुक्त विहारि
झक्कास..
11 Jul 2013 - 9:16 pm | पैसा
करून बघायला हवे!
11 Jul 2013 - 11:57 pm | कवितानागेश
साधे गुलाबजाम आणि आईसक्रीम खाल्लय पूर्वी. आता हे एकदा करुन बघायला हवं.
फोटो टेम्प्टिन्ग आहे. :)
12 Jul 2013 - 12:22 am | अत्रुप्त आत्मा
इतका खत्री फोटू टाकल्याबद्दल....णिषेध...!णिषेध...!णिषेध...! ;)
अता रात्री सपनात येनार तो फोटू...सारखा...सारखा!!! :(
12 Jul 2013 - 10:37 am | अक्षया
आणि व्हॅनीला आईसक्रीम बरोबर तर अजुनच छान लागत असतील.
नक्की करुन बघणार. :)
12 Jul 2013 - 12:03 pm | त्रिवेणी
आता गुलाबजाम आणायला संध्याकाळी बाहेर जाणे आले.
ग्लासात खाली आईस्क्रीम आहे का?
12 Jul 2013 - 12:43 pm | Mrunalini
चांगली आयडिया आहे. मला आधी वाटले कि काला जामुन आहे. करुन बघायला पाहिजे.
12 Jul 2013 - 2:03 pm | सानिकास्वप्निल
दिपक तूम्ही आता डेझर्ट एक्सपर्ट आहात :)
पाकृ छान आहे :)
15 Jul 2013 - 9:19 am | रुस्तम
१. कढाईतून गुलाब जाम काढल्यावर ते गरम गरम पाकात टाकावेत का गार झाल्यावर?
२. आणि पाक सुद्धा गरम असावा कि गार?
कधी घरी केले नाहीत आणि करताना गोन्धळ नको म्हणुन शंका.
15 Jul 2013 - 11:02 am | दिपक.कुवेत
हा अगदि थंड किंवा खुप गरम नको....हलका गरम असला पाहिजे म्हणजे पाक आतपर्यत मुरतो. त्यासाठि पाक तयार होत आला कि गुलाबजाम तळायला घ्यावे.
15 Jul 2013 - 11:24 pm | रुस्तम
आणि गुलाब जाम कढाईतून काढल्या काढल्या पाकात टाकायचे का??
15 Jul 2013 - 9:28 am | मदनबाण
हल्लीच मलई कुल्फी विथ रबडी ट्राय मारली आहे ! ही भन्नाट जोडी एकदा चाखाच तुम्ही. :)
("मलई" प्रेमी बोका ) ;)
15 Jul 2013 - 11:44 am | सूड
तो किती वापरायचा? का घ्यायचाच नाही. साहित्यात तर नाहीच, कृतीतही खवा किती वापरायचा त्याचा उल्लेख नाहीये.
15 Jul 2013 - 12:02 pm | दिपक.कुवेत
आलेले प्रतिसाद / त्यांना दिलेली उत्तर बघ.....तुझा प्रश्नाचं उत्तर मिळेल.
15 Jul 2013 - 11:41 pm | सूड
स्वारी बर्का.
18 Jul 2013 - 11:58 am | चावटमेला
अगदि, अगदि. माझं फेवरिट आहे खूप्प..
18 Jul 2013 - 12:02 pm | जागु
असेही माझ्या मोठ्या लेकीला गुलाब जाम आवडतात. परवाच केले. चॉकलेट फ्लेव्हर म्हटल्यावर रोजच करायला लावेल. नक्की करुन बघेन. तसे चितळेच्या गुलाबजाम मिक्सचे गुलाबजाम छान मऊ होतात.
18 Jul 2013 - 1:45 pm | दिपक.कुवेत
चितळे गुलाबजाम मिक्स पाकिट मिळतं? तस असेल तर आल्यावर करायला हरकत नाहि