गाकर (हारोळ्या)

सचिन कुलकर्णी's picture
सचिन कुलकर्णी in पाककृती
30 Jun 2013 - 8:13 pm

गाकर हा माझा अत्यंत आवडता पदार्थ. आम्ही देशावरील मंडळी याला हारोळ्या म्हणतो.
जाडसर कणिक थोडे मोहन, थोडे जास्त मीठ आणि ओवा घालून भिजवायची. दहा मिनिटे कणिक मुरवायची आणि लाटून साधारण पुरीपेक्षा थोड्या मोठ्या पण चार मिलीमीटर जाडीचा गाकर लाटायचा. एकाबाजूने तव्यावर शेकायचा आणि दुसर्या बाजूने अर्धवट तव्यावरच शेकायचा. नंतर अग्निमध्ये (ग्यासच्या चुलीवर. खर्या चुली तर आता गावात पण नसतील..)मस्त खरपूस हि हारोळी भाजून घ्यायची. वरून भरपूर साजूक तूप टाकायचे आणि तोंड शेकत शेकत खायची. Alternatively तुम्ही हि बटर किंवा घरातल्या ताज्या लोण्याबरोबर पण खाऊ शकता. मला तर जरा ही जळालेलीच आवडते म्हणून फोटोतील पण जरा काळी दिसतेय. :)
धन्यवाद !!

a

प्रतिक्रिया

रमेश आठवले's picture

30 Jun 2013 - 8:40 pm | रमेश आठवले

आईकडून शिकलेले या पदार्थाचे नाव आरोळ्या असे आहे.

सचिन कुलकर्णी's picture

30 Jun 2013 - 8:43 pm | सचिन कुलकर्णी

आम्ही हारोळ्या म्हणतो याला. भाषेची गंमत, दुसरे काय ?

आम्ही देशावरचे असूनही ह्याला गाकर असेच म्हणतो.
बाकी फोटू भारीच आलाय.

सचिन कुलकर्णी's picture

30 Jun 2013 - 9:49 pm | सचिन कुलकर्णी

बाकी फोटू भारीच आलाय.

ही वक्रोक्ती तर नव्हे वल्ली साहेब? :)

प्रचेतस's picture

30 Jun 2013 - 9:53 pm | प्रचेतस

नाय हो.
मस्त लोणी लावलेली, खरपूस भाजलेला गाकर असताना वक्रोक्ती कशाला करेन ब्वा.
आता उद्या गाकर खाणे आले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jun 2013 - 9:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो भारी आलाय.

-दिलीप बिरुटे

सचिन कुलकर्णी's picture

30 Jun 2013 - 10:06 pm | सचिन कुलकर्णी

धन्यवाद वल्ली,बिरुटे साहेब.

पैसा's picture

30 Jun 2013 - 10:05 pm | पैसा

रोटीचा महाराष्ट्रीय अवतार दिसतोय!

सचिन कुलकर्णी's picture

30 Jun 2013 - 10:08 pm | सचिन कुलकर्णी

पैसाताई, हा प्रकार जर राजस्थानी बट्टीच्या जवळपास जाणारा आहे.

मस्त पाकृ आहे. करून पहायला हवी . मी या प्रकाराबद्दल फक्त ऐकले आहे.

सचिन कुलकर्णी's picture

1 Jul 2013 - 10:32 am | सचिन कुलकर्णी

धन्यवाद रेवतीताई. नक्की करून बघा. अत्यंत सोपी आहे हि पा. कृ. फक्त गव्हाचे पीठ जरा जाडसर/रवाळ घ्या म्हणजे नंबरी काम होते एकदम.

प्रभाकर पेठकर's picture

2 Jul 2013 - 1:34 am | प्रभाकर पेठकर

अगदी रवाळ नाही पण कोंडायुक्त गव्हाचे पीठ आहेच घरात. कोळशाचे निखारेही जमवता येतील. मग गाकर करायला वेळ कशा करीता? लगेच करून पाहीन. नक्कीच मस्त लागतील.

मी ही देशावरचा पण आयुष्य मुंबईत गेले. मीही गाकर असेच नांव ऐकले आहे. आज पाककृती पाहिली. आता कृती.

सचिन कुलकर्णी's picture

2 Jul 2013 - 8:48 pm | सचिन कुलकर्णी

वा काका, तुम्ही बनविणार म्हणजे एकदम जबर्या काम होणार .. सोबत पिठले/झुणका try करा.