आपला एक संगणक ५०० मुलांच्या आयुष्यात प्रकाशाची मशाल पेटवू शकतो

यशोधन वाळिंबे's picture
यशोधन वाळिंबे in काथ्याकूट
23 Jun 2013 - 7:09 pm
गाभा: 

Your Computer Can Enlighten The Life Of At Least 500 Kids

          माझे फेसबुक वरील स्नेही श्री.सुनील जोशी ह्यांनी ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी कार्य हाती घेतले आहे. याबद्दल अधिक माहिती सुनील जोशी यांच्या शब्दात..

    

Your Computer Can Enlighten The Life Of At Least 500 Kids

Your Computer Can Enlighten The Life Of At Least 500 Kids

          महाराष्ट्राच्या अती दुर्गम भागात असलेल्या 'जीवन शिक्षण' या शाळेतील शिक्षकांशी चर्चा करताना त्यांच्याकडून असं समजलं की " आमच्या भागातील मुलं आता लिहा वाचायला शिकली, पण कॉम्पुटरचं ज्ञान नसल्यामुळे ती खूप मागे पडतात " मी मनात म्हंटल, अरे हो, खरचकी, हल्ली ज्याला कॉम्पुटरचे ज्ञान नाही तो एक प्रकारे अशीक्षीतच गणला जाणार ! 'जीवन शिक्षण मंडळाच्या' अंदाजे १२ शाळा आहेत, त्यातील ८ शाळांमध्ये वीजच नाहीये ! तर आता मी असं ठरवलाय, की या शाळांसाठी काही कॉम्पुटर्स घेऊन जायचे आणि तिकडे राहून तिकडच्या विद्यार्थ्यांना कॉम्पुटरचे बेसिक शिक्षण पण द्यायचं. ज्या शाळांमध्ये विद्युत पुरवठा आहे तिथे एक कॉम्पुटर सेंटर चालू करायच, म्हणजे ईतर सर्व शाळांमधील मुलं तिकडे येउन प्रशिक्षण घेतील. गेल्या वर्षी १५ ऑगस्टला लोक सहभागातून गांव कलमाडी, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार येथील एका प्राथमिक शाळेत संगणक कक्ष चालू झाला. आपणा सारख्या बर्याच जणांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालं. या मराठी शाळेतील मुलं आता बर्यापैकी संगणक चालवू शकतात. या वर्षी शहादा तालुक्यातील " जीवन शिक्षण " या संस्थेच्या काही शाळांमध्ये असे संगणक कक्ष चालू करण्याचा संकल्प आहे. तरी कृपया अपणाकडील जुने पण चालू स्थितितील किंवा नवीन संगणक, प्रिंटर्स, मॉनीटर्स, stabilizers द्यावेत अशी प्रार्थना. या पुढे, संगणकाबद्दल ज्ञान नसेल, तर ती व्यक्ती अशिक्षीतच गणली जाईल..!!

अधिक माहितीसाठी संपर्क :

  • श्री. सुनील जोशी
  • भ्रमणध्वनी -   ९२२३३१९२१६
  • संपर्क पत्ता - द्वारा ग्रेट आऊटडोअर्स, दुकान नं. ३, गौतम व्हिला सोसायटी, घंटाळी मंदिर मार्ग, नौपाडा, ठाणे ( प ), महाराष्ट्र. पिन -- 400602.
  • वेळ - सोमवार वगळता सर्व दिवस सकाळी १० ते रात्री ८.

II मिपाकरांनी या कार्यात आपले शक्य तेवढे योगदान द्यावे हि नम्र विनंती II

प्रतिक्रिया

निवेदिता-ताई's picture

23 Jun 2013 - 7:20 pm | निवेदिता-ताई

हार्दिक शुभेच्छा............... :)

भावना कल्लोळ's picture

24 Jun 2013 - 6:24 pm | भावना कल्लोळ

सहमत

पैसा's picture

23 Jun 2013 - 8:25 pm | पैसा

चांगला उपक्रम आहे तुमच्या मित्राचा. त्याना शुभेच्छा! हार घातलेले कॉम्प्युटर बघून मजा वाटली. पण त्या मुलांना पाहताना बरंही वाटलं. जिथे कॉम्प्युटर्स विजेच्या अभावामुळे चालत नसतील तिथे छोटे टेब मात्र नक्कीच चालतील कारण मोबाईल नेटवर्क बहुतेक सगळीकडे मिळतं. त्यांचा उपयोग करून घेता येतो का पहा.

गोवा सरकारने यावर्षी पाचवीतल्या सगळ्या मुलांना टॅब द्यायचं ठरवलं आहे.

यशोधन वाळिंबे's picture

23 Jun 2013 - 10:06 pm | यशोधन वाळिंबे

@ निवेदिता-ताई ,
धन्यवाद..

@पैसा ,
आपली कल्पना छान आहे. काकांपर्यंत जरूर पोहोचवीन.

पुण्यातून संगणक/ प्रिंटर कसा घेऊन जाणार ते कळवता का?

यशोधन वाळिंबे's picture

24 Jun 2013 - 8:51 pm | यशोधन वाळिंबे

@यशोधरा,

मी फक्त या समाजकार्याच्या प्रसाराचे काम करीत आहे. आपली या कार्यात सहभाग घेण्याची इच्छा असल्यास कृपया सुनील जोशी यांच्याशी संपर्क साधा...

यशोधरा's picture

24 Jun 2013 - 9:19 pm | यशोधरा

अच्छा, असय होय. ओके. मला वाटले की तुमचे स्नेही असल्याने तुम्ही लगेच विचारुन माहिती देऊ शकाल.

मदनबाण's picture

24 Jun 2013 - 9:10 pm | मदनबाण

उपक्रमास शुभेच्छा ! :)
बाकी हा उपक्रम पाहुन काही काळापूर्वी पाहिला हा व्हिडीयो आठवला.

विनायक प्रभू's picture

24 Jun 2013 - 9:17 pm | विनायक प्रभू

१ ं माझ्याकडे आहे. ़क सा ने णा र?

यशोधन वाळिंबे's picture

24 Jun 2013 - 9:36 pm | यशोधन वाळिंबे

ज्यांना या कार्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी थेट सुनील जोशी यांच्याशी भ्रमणध्वनीवर/आंतरजालावर संपर्क साधावा जेणेकरून तुमच्या शंकांचे निरसन होईल.

@मदनबाण ,
अशाच प्रकारचा एक व्हिडियो फेसबुकवर गाजल्याचे आठवतय.

माझ्याकडे संगणक टेबल व ३ पुर्ण कार्यरत संगणक आहेत व भरपुर इतर साहित्य व एक नवीन प्रिन्टर देखील देण्यास इच्छुक आहे.. पुण्यातून घेण्याची काही व्यवस्था असेल तर प्लीज सांगा, नाहीतर मी पाहतो कसे पोचवायचे ते.

जर वाचनालय असेल तर काही पुस्तके देण्यास देखील मी इछुक आहे.

यशोधन वाळिंबे's picture

24 Jun 2013 - 10:19 pm | यशोधन वाळिंबे

उत्तम.. सुनीलजीना देखील इथे या कार्यासाठी इच्छुक मिपाकरांना संपर्क साधायला सांगतो.
आणी पुण्यात जर जास्त प्रमाणावर इच्छुक मंडळी असतील तर सर्व संगणक व साहित्य एका ठिकाणी गोळा करून ते एकत्रच पाठवण्याची कल्पना सुचली आहे. ज्यामुळे ते अधिक सोयीस्कर पडेल..!!

आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे मला नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागांमधील शाळांमध्ये संगणक घेउन जाणं शक्य झालं. कलमाडी गावातील जि . प . शाळा, कलमाडी गावातील गावित शाळा आणि जावदा वाडी येथील जीवन शिक्षण शाळा, अश्या तीन शाळामध्ये आपण दिलेले संगणक, ups, monitors यांची यशस्वीरित्या जोडणी करून मी परत आलो. साधारण दहाएक दिवस माझा मुक्काम त्या शाळांमध्ये होता. मराठी माध्यमातील शाळांमधील मुलं संगणकासमोर प्रथम थोडी बुजत होती पण मुक्त हस्त दिल्यावर ICONS ओळखून पटापट सराव करू लागली.

येथील शिक्षकंना संगणकाचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली गेली आहे, तसंच संगणक बिघडला तर त्याचे maintenence कंत्राट पण मार्गी लागले आहे.

या तीनही शाळांमध्ये मिळून अंदाजे १००० विद्यार्थी आहेत. आपणा सर्वांच्या भरीव प्रयत्नांमुळे या सर्व विद्यार्थ्यांना संगणकाची तोंड ओळख होईल आणि भावी आयुष्यात या शिक्षणाचा नक्की लाभ होईल.

श्री.सुनिल जोशी

एका विद्यार्थ्याचे आपणा सर्वांसाठी पत्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Sep 2013 - 1:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रशंसनिय उपक्रम ! अभिनंदन !!

क्रेझी's picture

20 Sep 2013 - 2:16 pm | क्रेझी

अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.

प्रसाद गोडबोले's picture

20 Sep 2013 - 11:01 pm | प्रसाद गोडबोले

अतिषय सुंदर उपक्रम !!

एस's picture

21 Sep 2013 - 1:00 am | एस

आणि खूप खूप शुभेच्छा!

यशोधन वाळिंबे's picture

14 Oct 2013 - 12:18 am | यशोधन वाळिंबे

शहापूर येथील गतिमंद विद्यार्थ्यांनी बनविलेले दिवाळी साहित्य

हा धागा

स्वगृह » नवे लेखन » नवे लेखन » सर्व नवीन लेखन मध्ये का दिसत नाही ??

यशोधन वाळिंबे's picture

23 Sep 2014 - 6:21 pm | यशोधन वाळिंबे

हा उपक्रम "संगणेशा" या नावाने पुन्हा (कायमस्वरूपी) सुरु होत आहे. याबद्दल अधिक माहिती संगणेशाच्या ह्या फेसबुक पानावर मिळेल.

अधिक माहितीसाठी कृपया श्री.सुनील जोशी यांच्याशी संपर्क साधावा.

vikramaditya's picture

24 Sep 2014 - 8:18 am | vikramaditya

अश्या उपक्रमांनीच तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचेल.

मी स्वतः आठवड्यातील ३-४ तास २ शाळां मध्ये शिकवतो, जिथे बहुसंख्य मुले अतिशय खालच्या आर्थिक स्तरातुन आहेत. मुले हुशार असतात, त्यांना प्रोत्साहनाची गरज असते. त्यांचा आत्मविश्वास टिकवला पाहीजे. तसेच ती घेत असलेले शिक्षण आणि आर्थिक उन्नती ह्याचे डायरे़क्ट कोरिलेशन त्यांना जाणवले पाहिजे.

माहितगार's picture

24 Sep 2014 - 10:20 am | माहितगार

स्तुत्य उपक्रम आणि स्तुत्य सहभाग. जे संगणक देताहेत त्यांनी संगणक देतानाच शक्य असल्यास त्यावर मराठी किमान वाचता येतय हे पहावे. आणि किमान देताना तो चालू स्थितीत असणे अधिक चांगले. केवळ घरात जूना संगणक बम्द पडून आहे तो कुणीतरी घेऊन जातोय ना असे टाळलेले बरे कारण बंद संगणक चालू करणे मेंटेन करणे ग्रामीण भागात अवघड जाऊ शकते हेही लक्षात घेतले पाहीजे असे वाटते.

मराठीतील मुक्त शैक्षणिक मजकुर निर्मिती अपेक्षेपेक्षा/गरजेपेक्षा कमी वेगाने वाढते आहे पण मराठीतन जो काही मजकुर निर्मित होतोय तो किमानपक्षी वाचता आला तरीही पुरे.

आम्ही आमच विकिवरून योगदान चालू ठेवतोच, तेव्हा उपक्रमास शुभेच्छा !

नाव आडनाव's picture

24 Sep 2014 - 11:12 am | नाव आडनाव

शुभेच्छा मित्रा!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Feb 2016 - 12:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एक चांगला धागा वर आणतोय. हा उपक्रम अजुनही चालु असेल अशी अपेक्षा आणि त्याची जी लाभार्थी मुलं आहेत त्यांना संगणकाची तोंडओळखही झाली असे छान.

नाव आडनाव धाग्याची लिंक दिल्याबद्दल शतशः आभारी आहे.

मम्बाजी सर्वज्ञ's picture

15 Feb 2016 - 4:33 pm | मम्बाजी सर्वज्ञ

वर दिलेल्या आय डि वर संपर्क साधतो आहेच, पण हे पहा -
https://www.raspberrypi.org/

लहान मुलांना आणि शिकाऊ प्रोग्रामर्स ना टार्गेट करून बनवलेला कमप्यूटर.
प्रत्येकाने घरात ठेवावा (आणि वापरावा) असा आणि स्वस्त - २५ डॉलर्स (मोनितर वेगळा घ्यावा लागतो).
आता ८ डॉलर्स मध्ये तयार होणारी मशिन्स पण आली आहेत.