आपला एक संगणक ५०० मुलांच्या आयुष्यात प्रकाशाची मशाल पेटवू शकतो
माझे फेसबुक वरील स्नेही श्री.सुनील जोशी ह्यांनी ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी कार्य हाती घेतले आहे. याबद्दल अधिक माहिती सुनील जोशी यांच्या शब्दात..
महाराष्ट्राच्या अती दुर्गम भागात असलेल्या 'जीवन शिक्षण' या शाळेतील शिक्षकांशी चर्चा करताना त्यांच्याकडून असं समजलं की " आमच्या भागातील मुलं आता लिहा वाचायला शिकली, पण कॉम्पुटरचं ज्ञान नसल्यामुळे ती खूप मागे पडतात " मी मनात म्हंटल, अरे हो, खरचकी, हल्ली ज्याला कॉम्पुटरचे ज्ञान नाही तो एक प्रकारे अशीक्षीतच गणला जाणार ! 'जीवन शिक्षण मंडळाच्या' अंदाजे १२ शाळा आहेत, त्यातील ८ शाळांमध्ये वीजच नाहीये ! तर आता मी असं ठरवलाय, की या शाळांसाठी काही कॉम्पुटर्स घेऊन जायचे आणि तिकडे राहून तिकडच्या विद्यार्थ्यांना कॉम्पुटरचे बेसिक शिक्षण पण द्यायचं. ज्या शाळांमध्ये विद्युत पुरवठा आहे तिथे एक कॉम्पुटर सेंटर चालू करायच, म्हणजे ईतर सर्व शाळांमधील मुलं तिकडे येउन प्रशिक्षण घेतील. गेल्या वर्षी १५ ऑगस्टला लोक सहभागातून गांव कलमाडी, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार येथील एका प्राथमिक शाळेत संगणक कक्ष चालू झाला. आपणा सारख्या बर्याच जणांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालं. या मराठी शाळेतील मुलं आता बर्यापैकी संगणक चालवू शकतात. या वर्षी शहादा तालुक्यातील " जीवन शिक्षण " या संस्थेच्या काही शाळांमध्ये असे संगणक कक्ष चालू करण्याचा संकल्प आहे. तरी कृपया अपणाकडील जुने पण चालू स्थितितील किंवा नवीन संगणक, प्रिंटर्स, मॉनीटर्स, stabilizers द्यावेत अशी प्रार्थना. या पुढे, संगणकाबद्दल ज्ञान नसेल, तर ती व्यक्ती अशिक्षीतच गणली जाईल..!!
अधिक माहितीसाठी संपर्क :
- श्री. सुनील जोशी
- भ्रमणध्वनी - ९२२३३१९२१६
- ई-मेल पत्ता - sanjosi@yahoo.com
- संपर्क पत्ता - द्वारा ग्रेट आऊटडोअर्स, दुकान नं. ३, गौतम व्हिला सोसायटी, घंटाळी मंदिर मार्ग, नौपाडा, ठाणे ( प ), महाराष्ट्र. पिन -- 400602.
- वेळ - सोमवार वगळता सर्व दिवस सकाळी १० ते रात्री ८.
- फेसबुक - खाते दुवा
II मिपाकरांनी या कार्यात आपले शक्य तेवढे योगदान द्यावे हि नम्र विनंती II
वाचने
9752
वाचनखूण
प्रतिक्रिया
24



स्तुत्त्य उपक्रम...............
In reply to स्तुत्त्य उपक्रम............... by निवेदिता-ताई
+१११
अरे वा!
र र रिप्लायचा
पुण्यातून संगणक/ प्रिंटर कसा
In reply to पुण्यातून संगणक/ प्रिंटर कसा by यशोधरा
र र रिप्लायचा
In reply to र र रिप्लायचा by यशोधन वाळिंबे
अच्छा, असय होय. ओके. मला
उपक्रमास शुभेच्छा !
१
र र रिप्लायचा
माझ्याकडे संगणक टेबल व ३
In reply to माझ्याकडे संगणक टेबल व ३ by दशानन
र र रिप्लायचा
एका विद्यार्थ्याचे आपणा सर्वांसाठी पत्र --
In reply to एका विद्यार्थ्याचे आपणा सर्वांसाठी पत्र -- by यशोधन वाळिंबे
प्रशंसनिय उपक्रम ! अभिनंदन !!
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.
अतिषय सुंदर
अभिनंदन
मदत
धागा वर आणत आहे..
अतिशय स्तुत्य उपक्रम
उपक्रमास शुभेच्छा !
शुभेच्छा मित्रा!
एक चांगला धागा वर आणतोय. हा
वर दिलेल्या आय डि वर संपर्क