पनीर मिक्सव्हेज रोल

नेहरिन's picture
नेहरिन in पाककृती
22 Jun 2013 - 3:38 pm

साहित्य
:- २०० ग्रॅम पनीर ,१वाटि बारिक चिरलेला फ्लॉवर, १ वाटी बारीक चिरलेला
श्रावण घेवडा , १ मध्यम आकाराचे गाजर बारीक चिरून, ८-१० पुदिन्याची पाने , १
वाटि बारिक चिरलेली कोथिंबीर , १वाटि स्वीट कॉर्नचे दाणे , २ टेबलस्पून
Cornflower , ८-१० पालकाची पाने , ११/२ टीस्पून बारीक
वाटलेले आले ,२ टीस्पून जिरे पावडर, ११/२ टीस्पून मिरे पावडर , ३/४ हिरव्या
मिरच्या वाटून , १ लिंबाचा रस .११/२ वाटि ब्रेड crumb , मीठ ,तळण्यासाठी तेल .

कृति
:- प्रथम गाजर , श्रावण घेवडा , फ्लॉवर, कोर्न थोडेसे वाफवून घ्यावे (
पूर्ण शिजवायचे नाही ). नंतर ते सर्व एका मोठ्या बाउल मध्ये घेऊन त्यात मीठ
, वाटलेली मिरची कोथिंबीर, पनीर ,बारीक चिरलेला पुदिना, वाटलेले आल ,
जिरे पावडर, मिरे पावडर ,कॉर्न फ्लोअर, पालकाची पाने बारीक चिरून घालावी.आणि लिंबाचा रस
घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे .

https://lh3.googleusercontent.com/-j1DX1i-AXc4/UcU_pokj9dI/AAAAAAAABLQ/IrKSzBUmwgo/s640/21062013%2528006%2529.jpg

तयार मिश्रणाचे गोळे करून त्याला थोडासा रोल सारखा आकार देऊन breadcrumbs मध्ये घोळवून घ्यावे

https://lh3.googleusercontent.com/-Khb0qcnT-bw/UcU_p7ZCa4I/AAAAAAAABLU/vidqGcbzxY0/s640/21062013%2528009%2529.jpg

नंतर गरम तेलात मंद आचेवर तळून घ्यावे आणि TomaTo केचप बरोबर गरम गरम सर्व्ह करावेत

https://lh6.googleusercontent.com/-sI5PsAZJoBI/UcU_sJtMDwI/AAAAAAAABLc/JE702_yXrSw/s640/21062013%2528012%2529.jpg

प्रतिक्रिया

नेहरिन's picture

22 Jun 2013 - 3:41 pm | नेहरिन

नंतर ते सर्व एका मोठ्या बाउल मध्ये घेऊन त्यात मीठ
, वाटलेली मिरची कोथिंबीर, पनीर ,बारीक चिरलेला पुदिना, वाटलेले आल ,
जिरे पावडर, मिरे पावडर, कॉर्न फ्लोअर, पालकाची पाने बारीक चिरून घालावी.आणि लिंबाचा रस
घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे .

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jun 2013 - 9:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही स्वत: मिपावर लॉगइन करून हा धागा उघडलात की धाग्याच्या सुरुवातीला "द्रश्य" आणि "संपादन" अशी दोन बटणे दिसतील. "संपादन" बटणावर टिचकी मारून तुम्हाला तुमचा मूळ लेख संपादित (एडिट) करता येईल.

दिपक.कुवेत's picture

22 Jun 2013 - 7:44 pm | दिपक.कुवेत

छान दिसतय कि. उकडलेला बटाटा न घालता नुसतं कॉर्न फ्लोअर घालुन बाईंन्ड होतं म्हणजे कमाल आहे. एकदा ट्राय करुन बघीन.

मदनबाण's picture

22 Jun 2013 - 8:58 pm | मदनबाण

वा... :)

(पनीर प्रेमी) :)

पैसा's picture

23 Jun 2013 - 2:10 pm | पैसा

चहाबरोबर गरमागरम खायला मजा येत असणार! मस्त चटपटीत पदार्थ दिसतोय!

दिपक.कुवेत's picture

23 Jun 2013 - 3:14 pm | दिपक.कुवेत

ह्या रोल्सना अजुन चटपटित बनवण्यासाठि तळुन काढल्यावर त्यावर चाट मसाला भुरभुरावा....

सस्नेह's picture

23 Jun 2013 - 4:05 pm | सस्नेह

इतक्या भाज्या घातल्याहेत म्हणजे नक्कीच टेस्टी असणार. करायला सोपीही आहे पाकृ.
उद्याच करते.

निवेदिता-ताई's picture

23 Jun 2013 - 8:23 pm | निवेदिता-ताई

सुरेख

स्पंदना's picture

25 Jun 2013 - 2:46 pm | स्पंदना

मस्त!
भूक लागली.

रुमानी's picture

25 Jun 2013 - 3:24 pm | रुमानी

छान....!

सानिकास्वप्निल's picture

25 Jun 2013 - 11:48 pm | सानिकास्वप्निल

पाकृ आवडली :)

सगळ्यांचे मनःपुर्वक आभार.

श्रीरंग_जोशी's picture

26 Jun 2013 - 10:07 pm | श्रीरंग_जोशी

एकदम तोंपासू चित्रे पाहून.

फोटू आणि पाकृ आवडले. अश्या रोल्समध्ये बटाटा वापरलेला बरेचदा बघितला आहे पण या पाकृमध्ये नाहीये तरी व्यवस्थित बांधले गेलेत.

प्रभाकर पेठकर's picture

27 Jun 2013 - 2:29 am | प्रभाकर पेठकर

व्वा..वा..वा... मिश्र भाज्यांचे मुटकुळे.

गरमागरम असतानाच दह्या बरोबर खास लागतील.

पाकृ आणि छायाचित्र दोन्ही लाजवाब आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jul 2013 - 10:56 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-sandwich.gif