सध्या बाजारात भरपूर बेरीज येत आहेत. का कुणास ठाऊक पण, ब्ल्यूबेरी माझ्या जरा जास्तच आवडीची. ह्या बेरी वापरुन फ्रेन्च टार्ट बनवला होता, लग्नाच्या वाढदिवसासाठी. त्याचीच ही कॄती-
साहित्य -
टार्ट बेस करिता--
आल्मड पावडर- ३/४ कप
मैदा- १ कप
सा़खर- ३ टे.स्पून
लोणी(गार)- ६ टे.स्पून
मीठ- १/८ टि.स्पून
अंड- १ पिवळा बलक( ओप्शनल)
हेवी क्रीम- २ टे.स्पून
पेस्ट्री क्रीम करिता--
दूध- १ कप
अंडी- ४ पिवळा बलक
हाफ अॅन्ड हाफ क्रीम- १ कप
कॉर्न स्टार्च- ३ टे. स्पून
साखर- १/२ कप
लोणी- १ टे. स्पून
व्हॅनिला अर्क- २ टि.स्पून
सजावटी करिता-
ब्ल्यू बेरी- १/४ कप
रासबेरी- १/४ कप
ब्लॅक बेरी- १/४ कप
कॄती-
मिक्सर मध्ये आल्मड पावडर, मैदा, साखर,मीठ ३-४ वेळा पल्स करुन घ्या.
आता त्यात अंडे व क्रीम घाला आणि ७-८ वेळा पल्स करा.
पीठ काढून हलक्या हाताने गोळा बनवून, प्लास्टीक मध्ये बांधून फ्रीज मध्ये गार होण्यासाठी कमीत कमी ३० मिनीटे ठेवा.
ओव्हन ४०० फॅ.डिग्री ला तापवा. गार पीठ लाटून टार्ट शेल्स मध्ये बसवा व त्यावर बटर पेपरचा लहान तुकडा कापून पाइ वेट्स ठेवून ५ मिनिटे बेक करा. पाइ वेट्स काढून काट्याने शेल्सला टोचून घ्या व पुन्हा ओव्हन मधे ३-५ मिनिटे बेक करा. हलका गोल्डन ब्राउन कलर आला पाहिजे.
गार झाले शेल्स की सोडवून घ्या.
आता पेस्ट्री क्रीम-
कॉर्न स्टार्च व अंडी एका बाउल मध्ये एकत्र करून हलकेच फेट, हळुहळु करत १/४ कप क्रीम मिक्स करा. गुठळी होता कामा नये.
आता सॉस पॅन मधे दूध, उरलेल क्रीम,साखर घालून गरम करून घ्या. गरम केलेले दूध हळूहळू अंड्याच्या मिश्रणा मध्ये घालत, सतत ढवळा.
आता हे मिश्रण सॉस पॅन मधे घाला व मंद गॅस वर शिजवा, साधारण १० मिनिटे लागतील. सतत ढवळायचे नाही तर स्क्रॅम्बल्ड एग्ज होतील. (सोई साठी सांगते- फेस क्रीम सारखी कन्सिस्टंसी असली पाहिजे)
गॅस वरुन काढून लगेच एका बाउल मधे गाळून घ्या आणि लोणी, व्हॅनिला मिक्स करा.
प्लास्टिक पेपर क्रीमला लावा म्हणजे साय/ थर जमणार नाही. निवले की फ्रीज मधे गार होण्यासाठी ठेवा.
गार झालेल्या टार्ट मध्ये गार क्रीम घालून, बेरी पेरुन सजवा.
आता फस्त करा...
हॅपी बेकिंग!!
प्रतिक्रिया
22 Jun 2013 - 10:20 am | सुहास झेले
भारीच.... :) :)
22 Jun 2013 - 12:27 pm | दिपक.कुवेत
भारीच दिसतोय हा प्रकार. पण ओव्हन नसल्यामुळे सगळ घोडं अडतं त्यामुळे नुसतं पाहुनच समाधान मानतो.
22 Jun 2013 - 1:02 pm | धनुअमिता
तों. पा. सु
22 Jun 2013 - 2:31 pm | Mrunalini
छान झालाय टार्ट.. बेस पण एकदम मस्त दिसतोय.
22 Jun 2013 - 3:08 pm | निवेदिता-ताई
मस्तच..................... :)
23 Jun 2013 - 1:36 am | इन्दुसुता
आवडली पाकृ.. करून पाहीन लवकरच. आमच्या कडे मिनि पाय शेल्स तयार मिळतात, मी त्यातच क्रीम घालते आणि वर फ्रूट टॉपिंग ... सोप्पं काम....:)
23 Jun 2013 - 1:48 am | रेवती
great!
26 Jun 2013 - 11:11 pm | चेरी
सर्वांचे आभार...
26 Jun 2013 - 11:14 pm | किसन शिंदे
लय भारी!!
27 Jun 2013 - 12:06 am | मोदक
भारीये..
27 Jun 2013 - 1:04 am | प्यारे१
नवीन रिक्रुटमेंट आहे ही छळछावणी तली. ;)
छानच.
27 Jun 2013 - 11:15 am | मी_देव
जबरदस्त :)
7 Jul 2013 - 10:30 pm | अत्रुप्त आत्मा
शेवटच्या फोटुतनं उचलून खावसं वाट्टय...!!! :)
28 Aug 2013 - 2:38 pm | जयवी
आई गं...... मस्त मस्त !!