फॅन्टसी

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
27 May 2013 - 11:13 am

Fantacy

साहित्यः
१. स्ट्रॉबेरीचे तुकडे - १ कप
२. रेडिमेड व्हॅनीला आईसक्रिम - २ मोठे चमचे
३. किवीचे तुकडे - १/२ कप
४. साखर - १ ते २ चमचे
४. ऑरेंज जेली
५. बर्फाचे खडे - ३ ते ४
६. सजावटिसाठि पुदिना पान, किवी/स्ट्रॉबेरी काप/फोडि यापैकि काहिहि

कॄती:
१. जेली पाकिटावर दिलेल्या सुचनेनुसार ऑरेंज जेली सेट/तयार करुन ठेवा
२. किवीचे तुकडे, साखर आणि ३-४ बर्फाचे खडे मिक्सर मधे घेउन त्याची प्युरे/पल्प तयार करुन घ्या (पाणि न घालता)
३. आता एका बाउल मधे स्ट्रॉबेरीच्या फोडि आणि व्हॅनीला आईसक्रिम घेउन हॅन्ड मिक्सरने किंवा मिक्सर मधे मिक्स करुन घ्या. किवी प्युरेचच भांड वापरणार असाल तर स्वच्छ धुवुन घ्या म्हणजे फळांचे रंग एकमेकात मिसळणार नाहित
४. आता सर्विंग ग्लास मधे प्रथम स्ट्रॉबेरी-व्हॅनीलाचं मिश्रण घाला
५. ग्लास हलकासा टॅप (सपाट पृष्ठभागावर किचन टॉवेल ठेवा व ग्लास हलकासा आदळा) करुन घ्या म्हणजे मिश्रण सेट होईल
६. आता ग्लासला हळुवारपणे गोलाकार फिरवत एका दुसर्‍या चमच्याने किवीचा पल्प ग्लासच्या कडेकडेने गोलाकार घाला (Same like Magic Layers steps). मी कलर कॉस्ट्रास्ट साठि किवी पल्पवर परत स्ट्रॉबेरी-व्हॅनीलाचं मिश्रण घातलं
७. तयार ऑरेंज जेलीचे तुकडे लेयरवर हळुवारपणे सेट करा. माझे जेलीचे तुकडे मिक्स झाले :D
८. मनाप्रमाणे सजावट करुन फॅन्टसी ग्लास पेश करा :)
९. वरील फॅन्टसी ग्लास तयार झाल्यावर मी शील्लक राहिलेल्या पल्प पासुन हा दुसरा ग्लास तयार केला. ग्लास मधे आधी तळाला जेली घातली. मग किवी/स्ट्रॉबेरीचं मिश्रण घातलं आणि शेवटि व्हॅनीला आईसक्रिमचे स्कुप घालुन किवीची चकती आणि स्ट्रॉबेरीच्या फुलानी सजवलं (हे उरलेल्या मिश्रणापासुन बववलय त्यामुळे ग्लास अर्धाच का? हा प्रश्न कृपया टाळावा)

Fantacy 2

टिपा:
१. स्ट्रॉबेरी किंवा किवीएवजी आपल्याला आवडतील/ जी सीजनल फळं उपलब्ध असतील ती घ्या पण आईसक्रिम व्हॅनीलाच घ्या म्हणजे त्या फळाची मुळ चव बदलणार नाहि.
२. जेलीची स्टेप आवडत नसेल तर वगळा किंवा आवडत असेल त्या फ्लेवरची जेली घ्या (कलर कॉम्बीनेशनच्या दॄष्टिने)

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

27 May 2013 - 11:27 am | प्रचेतस

अशक्य सुंदर.

अत्रुप्त आत्मा's picture

27 May 2013 - 4:19 pm | अत्रुप्त आत्मा

भीषण शुंदोर!!!

हम्रे लिये येकदम फँन्टॅन्सीच!!! :)

मस्तच आहे हा फॅन्टसी प्रकार. कलरफुल.
सजावटही छानच. :)

गणेशा, ५० फक्त आदि सदस्यांनी एकदा पुणे गेट नावाचे हॉटेल ठरवून तिथे कट्टा घडवून आणला होता.. त्यात फ्रूट पंच नावाचा प्रकार अगदी अशाच प्रकारचा होता. अजूनही त्याची चव जिभेवर आहे.

मस्त पाकृ.. लगे रहो.

प्यारे१'s picture

27 May 2013 - 1:27 pm | प्यारे१

तिथे मिसळपावचे एक उत्तुंग व्यक्तीमत्व (माजी) भेटले होते. ;)
दिपकशेठ कुवेतवाले ह्यांना उत्तमोत्तम पाकृ सादरीकरणाबद्दल हार्दिक शुभेच्छा.

नि३सोलपुरकर's picture

27 May 2013 - 11:56 am | नि३सोलपुरकर

दारुण शुंदर....दिपक राव ,आपने तो मार ही डाला.

धनुअमिता's picture

27 May 2013 - 1:06 pm | धनुअमिता

सुंदर !!!!!!

मोदक's picture

27 May 2013 - 2:17 pm | मोदक

भारी!!!

पैसा's picture

27 May 2013 - 2:29 pm | पैसा

मगाचपासून हा धागा उघडायचं टाळत होते. दिपक दुष्ट आहे.

प्रभाकर पेठकर's picture

27 May 2013 - 2:40 pm | प्रभाकर पेठकर

अहाहा! बाहेर उन तापवतय आणि मिपा उघडल्यावर ही थंडक मनाला लई भावली.

आज पिनाकोलाडा बनवायची अतूट इच्छा मनांत आहे. त्यामुळे आज नाही पण ह्या आठवड्यात नक्कीच प्रयत्न करण्यात येईल.

सुहास झेले's picture

27 May 2013 - 2:45 pm | सुहास झेले

प्रचंड भारी.... !!!

सूड's picture

27 May 2013 - 2:55 pm | सूड

जीवघेणे आईस्क्रीमचे प्रकार हल्ली फोटोतच बरे वाटतात !! ;)

मदनबाण's picture

27 May 2013 - 3:03 pm | मदनबाण

आहाहा... :)

सविता००१'s picture

27 May 2013 - 3:34 pm | सविता००१

अप्रतिम.........

nishant's picture

27 May 2013 - 6:09 pm | nishant

एक ग्लास मला पण :)

मुक्त विहारि's picture

27 May 2013 - 8:45 pm | मुक्त विहारि

झक्कास..

ब़जरबट्टू's picture

29 May 2013 - 9:47 am | ब़जरबट्टू

अप्रतिम वाटतेय. नक्की करुन पाहू !

झकासराव's picture

29 May 2013 - 9:54 am | झकासराव

अप्रतिम :)

दिपक.कुवेत's picture

29 May 2013 - 11:06 am | दिपक.कुवेत

लोक्स.

संजय क्षीरसागर's picture

29 May 2013 - 11:35 am | संजय क्षीरसागर

हे इतकं करत बसायला वेळ कुठे आहे? (पुण्यात) कुठे मिळते ते सांगा लगेच निघतो.