साहित्यः तांदुळ, काश्मिरी लाल मिरच्या, तिखट लाल मिरच्या (दोन्ही मिरच्या मिळून १०० ग्राम) , मिठ., बारीक चिरलेला कांदा.
तीन वाट्या तांदुळ स्वच्छ धुवुन दोन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. पाणि बदलण्याची गरज नाही. तिसर्या दिवशी तांदुळातील पाणी ओतून टाकून तांदूळ बारिक वाटून घ्या. दोन्ही प्रकारच्या मिरच्या पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्या.
आता वाटलेल्या तांदुळात तेवढेच पाणी, चिरलेला कांदा, मिरच्यांची पेस्ट, मिठ (जरा जास्तच) घालून गॅसवर ठेवा. उकड काढतो तसे. मधुन मधुन हलवत रहा पिठाची गुठळी होऊ नये. दोन तीन वाफा आल्यावर खाली उतरवणे जरा थंड झाले की बोराच्या आकाराचे गोळे करून सांडगे घालतो तसे उन्हात सुकवावे. चांगले वाळले की डब्यात भरून ठेवावे.
पिठ
पाहिजे तेंव्हा डिप फ्राय करून सर्व करावे. क्रिस्पी लागतात. खाताना तिखटाचा ठसका उठतो. लहान मुलांना देऊ नयेत. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करावे.
आमच्याकडे मुलांत नातवंडातही हा प्रकार हिट आहे कारण ड्रिंक्स बरोबर कुरकुरीत चविष्ठ तोंडिलावणे म्हणून. बाकी आम्ही जेवणात तळून खातोच.
प्रतिक्रिया
24 May 2013 - 8:58 pm | तुमचा अभिषेक
ईंग्लिश नाव देशी प्रकार... पण एकंदरीत पाकृ आणि प्रचि पाहता कुरकुरीत अन चविष्ट असणार एवढे नक्की. :)
25 May 2013 - 11:32 am | दिपक.कुवेत
हा देशी मस्का चस्का आवडला! ह्या सांडग्यांची भाजी पण छान लागेल ना? सोया चक्सं असतात त्या प्रमाणे
25 May 2013 - 4:54 pm | त्रिवेणी
मस्त.
25 May 2013 - 4:56 pm | पैसा
सांडगे फेण्या यासारखं चटक मटक खाणं.
25 May 2013 - 4:56 pm | त्रिवेणी
वाटीत च्स्क्यावर मोहरी दिसते आहे, ती भाजी आहे का
27 May 2013 - 2:26 pm | गौरीबाई गोवेकर
त्रिवेणि ओल्या चसक्यांना वरून फोडणी देऊन पण मस्त लागतात. एक दिवस वाळवलेले चसके फोडणी देऊन तेलावर परतले तरी मस्त लागतात.
25 May 2013 - 6:09 pm | परिकथेतील राजकुमार
ह्यात थोडे मटकीचे पिठ घातले तर अजूनच लाजवाब.
बाकी,
ओळख करून द्या की आमची.
26 May 2013 - 2:15 pm | स्पंदना
आई ग! मी तांदळाच्या सांडग्यात कांदा फ्लेवर असलेला खाल्ला आहे. हे एकदम नविन अन जीभ चवताळणार दिसतं आहे.
माहिती बद्दल धन्यवाद गो गो ताई.