प्रॉन्स कॅलडिन.

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in पाककृती
16 May 2013 - 10:35 am

Prawns-Calledine

साहित्यः

मोठी कोलंबी : ५०० ग्रॅम्स.
आलं : १ इंचं.
लसूण : ८ पाकळ्या.
ह्ळद : १/२ लहान चमचा (टि स्पून).
तिखट : १ लहान चमचा (किंवा आवडीनुसार जास्त).
हिरव्या मिरच्या : ३ नग. आख्या, उभी चीर देऊन.
कांदा : १ मध्यम.
टोमॅटो : १ मध्यम.
कढीलिंब : १७ ते १८ पानं.
नारळाचे तेल : अर्धी वाटी.(नारळाचे तेल आवडत नसल्यास कुठलेही आवडीचे खाद्यतेल घ्यावे).
जीरं : १ मोठा चमचा (टेबल स्पून)
नारळ : १ नग
मीठ : चवीनुसार.

तयारी:

कोलंबी स्वच्छ करून त्यातील काळा धागा काढून टाका. कोलंबीला हळद-मीठ लावून ठेवा.
आलं+लसूण वाटून घ्या.
कांदा टोमॅटो वेगवेगळे बारीक चिरून घ्या.
कढीलिंब धुवून घ्या.
नारळ खवून त्याचे जाड आणि पातळ दूध काढा. (नारळ आणि दिड ग्लास कोमट पाणी घालून मिक्सर मध्ये भरपूर वाटून, हे मिश्रण पातळ कपड्याने गाळून घ्या. हे झाले जाड दूध . आता तोच नारळाचा चोथा मिक्सरमध्ये घालून अर्धा ग्लास कोमट पाणी घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून हे मिश्रण पातळ कपड्याने गाळून घ्या हे झाले पातळ दूध. जाड आणि पातळ दूध वेगवेगळे ठेवा.)

कृती:

कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवा.
तेल तापले की त्यात जीरे घाला. जीरे तडतडले की कढीलिंब आणि हिरव्या मिरच्या घाला.
कढीलिंबाचा वास आणि मिरच्यांचा तिखटपणा तेलात उतरला की बारीक चिरलेला कांदा टाकून परता.
कांदा गुलाबी रंगावर परतून झाला की टोमॅटो घालून परता.
टोमॅटो शिजून कांद्याशी एकजीव झाला की कोलंबी आणि आलं-लसूण पेस्ट घालून परता.
आंच मंद करून, कोलंबी बुडतील इतके (जरा कमीच) नारळाचे पातळ दूध घाला. सर्व मिसळून घ्या.
कोलंबी लवकर शिजते. ती शिजली की नारळाचे जाड दूध घाला.
जाड दूध घातल्यावर उकळू नका. रस्सा साधारण चांगला गरम झाला की गॅस बंद करा.

हे कालवण गरम भात किंवा अप्पम बरोबर, केल्यादिवशी, चांगले लागतेच पण दूसर्‍या दिवशी अधिक मुरते. फक्त दूसर्‍या दिवशी फ्रिझ मधून काढल्यावर गॅसवर किंवा मायक्रेवेव्ह मध्ये हलके गरम करावे. उकळू नये नाहीतर नारळाचे दूध फाटते.

शुभेच्छा....!

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

16 May 2013 - 10:44 am | सुहास झेले

मस्तच..... कोलंबी तर माझा जीव की प्राण :) :)

bharti chandanshive१'s picture

16 May 2013 - 10:44 am | bharti chandanshive१

मस्त आहे

सौंदाळा's picture

16 May 2013 - 10:45 am | सौंदाळा

बेष्ट,खल्लास
कोलंबीच्या सर्व पदार्थांचा चाहता.

काळंबी एकदम फेवरेट. कधी पण खायला तयार आहे.

दिपक.कुवेत's picture

16 May 2013 - 11:00 am | दिपक.कुवेत

हेच म्हणतो....कोळंबी म्हणजे जीव कि प्राण. घरात अनायसा आहेच.....ह्या वीकेंडला करतोच

मस्त! मलेशिया / सिंगापूर मधे "लाकसा" नावाची करी प्रसिद्ध आहे..त्याच प्रकार ची डिश वाटत आहे..बाकी कोलंबी आपला पण वीकपॉइण्ट आहे.. :)

दिपक.कुवेत's picture

16 May 2013 - 11:08 am | दिपक.कुवेत

आज काकांच्या दोन्हि रेसीपीज (निदान फोटो) एकाच वेळि एकाच स्क्रिनवर बघण्याचे भाग्य लाभले :). वरती "कोळंबी" आणि उजव्या कोपर्‍यात "मटण रोगनजोश"

गणामास्तर's picture

16 May 2013 - 11:11 am | गणामास्तर

काका हे काय बरोबर नाय हां..काल सकाळी मटण रोगनजोश अन आत्ता प्रॉन्स.
हापिसात बसून हे फटू पाहणे म्हणजे अत्त्याचार आहेत..बाकी पाकृ बद्दल काय लिहिणार. :)

एक विनंती: अशा पाकृ संध्याकाळच्या वेळी टाका ना, म्हणजे आम्हाला जास्त वेळ जळजळ
सहन करावी लागणार नाही. ;)

ऋषिकेश's picture

16 May 2013 - 11:11 am | ऋषिकेश

कातील!
हे रेसिपी व्हेज करायची तर कडव्या वालांबरोबरही चांगली लागावा हा अंदाज.. करेन आणि सांगेनच म्हणा

सौंदाळा's picture

16 May 2013 - 11:50 am | सौंदाळा

नक्की सांगा.
वालाचा कडूपणा घालवण्यासाठी नॉर्मली चिंच-गुळ वापरतो तेच काम नारळाच्या दुधाने झाले तर मस्तच
कडव्या वालांचा (आमटी, उसळ, भात)भोक्ता..

हो.. यामधे वाल सूट होतील... ब्रिलियंट थिंकिंग.. लॉजिक एकदम बरोबर वाटतंय. वाल म्हणजे बिरड्या / डाळिंबी असं गृहीत धरुन..

खरंच करुन झाल्यावर फोटो आणि अनुभव शेअर कर..

प्रभाकर पेठकर's picture

16 May 2013 - 11:59 am | प्रभाकर पेठकर

जरूर करून पाहा आणि कळवा.

वाल पूर्ण शिजल्यावर नारळाचे जाड दुध घाला. जाड दूध घातल्यावर उकळायचे नाही हा नियम विसरू नका.

ऋषिकेश's picture

20 May 2013 - 2:43 pm | ऋषिकेश

विकांताला डाळिंब्यांबरोबर हा रस्सा करून बघितला. डाळिंब्यांना कोलंबीइतका वास येत नसल्याने लसुण कमी घातला होता. अजूनही कमी असता तरी चालला असता असे वाटून गेले. मात्र एक अनोखी चव आली हे नक्की...

बाकी डाळिंब्या आधी कुकराची शिटी काढून वाफवून घेतल्या होत्या, त्यामुळे फार शिजवावे लागले नाही.

प्रभाकर पेठकर's picture

20 May 2013 - 3:46 pm | प्रभाकर पेठकर

मात्र एक अनोखी चव आली हे नक्की...

प्रयोग करीत राहा आणि आपल्या आवडीनुसार पाककृती बनविण्याचा प्रयत्न करा.

एक नविन शाकाहारी पाककृती आहारात सामिल झाली आहे.

अभिनंदन.

सौंदाळा's picture

20 May 2013 - 3:53 pm | सौंदाळा

धन्यवाद, फोटो दिल्याबद्दल.
आणि अभिनन्दन पाकक्रुती यशस्वी झाल्याबद्दल. :)
आता तर करुन बघायलाच पाहीजे.

रंग एकदम मस्त दिसतो आहे. चटकदार असणार. फोटो पाहून स्वाद , वास नाकात आपोआप हजर झाले.

चवअत्यंतआवडतअसूनहीकाही वेळेला कोळंबी घशाला खवखवण्याचा प्रॉब्लेम येत आल्याने खाता मात्र येणार नाही.

नेमकी कोणती कोळंबी खवखवेल हे सांगता येत नसल्याने हल्ली ट्राय करणेच बंद केले आहे. :(

मासा / माश्याचे बोनलेस तुकडे वापरुन करता यावी.

प्रभाकर पेठकर's picture

16 May 2013 - 11:50 am | प्रभाकर पेठकर

मासा / माश्याचे बोनलेस तुकडे वापरुन करता यावी

होय गवि. पापलेट, रावस, मोदकं, ओले बोंबील वगैरे मासे झकास लागतील ह्या कालवणात.

इतकंच काय, अस्थिविरहीत कोंबडीही मजा आणेल जेवणाला.

मोदक's picture

16 May 2013 - 2:55 pm | मोदक

मोदक.. मासे प्रकारात पण आहेत.??

हे खरे असेल तर, इतके दिवस सोज्वळ आयडी घेतल्याने नॉनव्हेज पाककृतींवर प्रतिक्रिया देताना उगाचच कानकोंडे व्हायचे.. आजपासून ती टोचणी बंद! :D

(मत्स्यप्रेमी) मोदक.

यशोधरा's picture

16 May 2013 - 8:24 pm | यशोधरा

मोदक नव्हे, मोदकं.. क लांबवायचा.

मोदक's picture

16 May 2013 - 11:24 pm | मोदक

कधी करताय..? :-D

यशोधरा's picture

18 May 2013 - 9:05 pm | यशोधरा

मिळाली की.. :P

कपिलमुनी's picture

16 May 2013 - 11:52 am | कपिलमुनी

मस्त मेजवानी सुरु आहे ..डिशचा रंग लै भारी दिसतोय..
कारवारकडे बांगड्याचा हुमण असाच असता , त्याची आठवण झाली !
काका , या मधे आमसुले किंवा तिरफळेचा कोळ / पाणी वापरत नाहित का ? बर्‍याच माशांच्या रेसिपी मधे असता म्हणून विचारतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 May 2013 - 12:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुप्पर लाईक. फोटो पाहून तोपासुआ. :)

-दिलीप बिरुटे

गणपा's picture

16 May 2013 - 1:14 pm | गणपा

गेल्या आठवड्यात एका पार्टीनिमित्त्ने एका चायनीज उपहारगृहात गेलो होतो तेव्हा अशीच नारळाच्या दुधात शिजवलेली कोलंबी हाणली होती.
रश्याचा रंग पांढरा शुभ्र आणि कोलंबी ईतकी सॉफ्ट होती बस्स. (दुरदैवानं त्या डिशचं नाव पहायला विसरलो.)
तेव्हा पासुन अशी रेसीपी शोधतोय.
हळद वगळुन करावी म्हणतो. :)

विसोबा खेचर's picture

16 May 2013 - 2:47 pm | विसोबा खेचर

......................!!!

सानिकास्वप्निल's picture

16 May 2013 - 2:51 pm | सानिकास्वप्निल

कोळंबी पाहूनचं जीव गेला
आता आज कसे खाऊ गुरुवारी??

कवितानागेश's picture

16 May 2013 - 4:23 pm | कवितानागेश

आता वाल भिजत घालणं आले! ;)

स्पंदना's picture

16 May 2013 - 4:38 pm | स्पंदना

देवा! वाचव, आज गुरुवार, शुक्रवार, शनिवार अन मग रवीवार की हो काका!
कस कस जगु मी म्हणते?
र्‍हाउदे मी गप मुटकुळ मारुन झोपाव म्हणते.

सस्नेह's picture

16 May 2013 - 9:02 pm | सस्नेह

कोळंबी अन तीही नारळाच्या दुधात शिजवलेली !
काका, शाकाहाराचा अंत पाहू नका हो.

रंग इतका यल्लो कशामुळे आलाय काका ??

कच्ची कैरी's picture

17 May 2013 - 8:34 am | कच्ची कैरी

कोलंबी माझी आवडती असल्याने नक्कीच करुन बघेल :)

पैसा's picture

17 May 2013 - 8:50 am | पैसा

फोटो अन पाकृ नेहमीप्रमाणेच!

मला तरी ही करी गस्सी / घस्सी च्या जवळ पास जाणारी वटते आहे.
अवांतर = रोगन जोश या धाग्यावर रोगन आणि जोश या शब्दांचा अर्थ कळला.(अन सामन्या ज्ञानात भर पडला) तर हे "कॅलडिन" काय प्रकरण आहे? जरा सांगाल का?

प्रभाकर पेठकर's picture

17 May 2013 - 1:57 pm | प्रभाकर पेठकर

'कॅलडिन' चा अर्थ मलाही माहित नाही. पण गोवन पाककृतींच्या क्रमात टिव्हीवर पाहिली होती. कदाचीत कांही पोर्तुगीझ अर्थ असेल तर माहित नाही. ब्रिटीशांमध्ये 'कॅलडिन' हे आडनाव आहे त्यामुळे एखाद्या 'कॅलडिन' आडनावाच्या ब्रिटीश बुवाने किंवा बाईने अशी पाककृती शोधून त्याला आपले आडनांव लावले असावे, असेही वाटते.

बाकी कोणाजवळ कांही वेगळी माहीती असेल तर ज्ञानात भर पडेल.

पैसा's picture

18 May 2013 - 9:31 am | पैसा

हे मुळात पोर्तुगीज लोकांचे सूप आहे. ते त्यात चुरिसां (गायीच्या आतड्यात भरलेले डुकराच्या मांसाचे तुकडे) घालतात.

http://ourlifeonthepond.blogspot.in/2011/09/portuguese-caldine-kale-soup...

त्यात नारळाचे दूध घालून भारतीय अवतार आला ती ही रेसिपी. हे सहसा ख्रिश्चन घरांत केले जाते. ते त्यात व्हिनेगारही घालतात.

यात कोलंबीऐवजी कोणताही मांसल मासा, उकडलेली अंडी किंवा भेंडी घालूनही करतात आंणि मुख्यतः भाताबरोबर खातात.

प्रभाकर पेठकर's picture

18 May 2013 - 9:39 am | प्रभाकर पेठकर

धन्यवाद, पैसा.

चिंतामणी's picture

18 May 2013 - 12:45 am | चिंतामणी

हे कालवण गरम भात किंवा अप्पम बरोबर,

आणी निर डोश्याबरोबर भन्नाट लागेल.

माश्याची कोणतीही रस्सावाली डिश आणी निर डोसा हे माझे अत्यंतीक आवडीचे खाद्य आहे.

(फिश अथव कोलंबी करी बरोबर तंदुर रोटी खाणा-यांची मी किव करतो)

फिश अथव कोलंबी करी बरोबर तंदुर रोटी खाणा-यांची मी किव करतो

+१११११