स्ट्फ्ड ब्रॉकोली पराठे

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
15 May 2013 - 10:34 pm

साहित्यः

नेहमीप्रमाणे पोळ्यांचे/ चपात्यांचे कणिक जसे तेल, मीठ घालून भिजवून घेतो तसे भिजवून घेणे.
छोटा गड्डा ब्रॉकोली - फक्त तुरे किसून घेणे
१ टेस्पून किसलेले आले
१ टेस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची (मिरचीऐवजी लाल तिखट आवडीप्रमाणे कमी-जास्तं घालू शकता)
१ टेस्पून भाजलेली जीरेपूड
१ टेस्पून धणेपूड
१ टेस्पून अनारदाना पावडर (तूम्ही आमचूर पावडर ही वापरु शकता)
मीठ चवीप्रमाणे
बारीक चिरलेली कोथींबीर
पराठ्यांना वरुन लावायाला तूप / बटर

.

पाकृ:

भांड्यात तेल गरम करून त्यात आले व हिरवी मिरची परतून घ्या.
त्यात ब्रॉकोलीचा कीस घालून एकत्र करुन घ्या.
जीरेपूड, धणेपूड व अनारदाना पावडर घालून एकत्र करून, झाकून एक-दोन वाफा काढून घ्या.
त्यात बारीक चिरलेली कोथींबीर व मीठ घालून पुन्हा २-३ मिनिटे शिजवा.
मिश्रण जरा गार होऊ द्या.

.

कणकेचा लिंबापेक्षा जरा मोठा गोळा घेऊन, छोटी पोळी लाटून घ्या.
त्यात ब्रॉकोलीचे सारण भरुन सर्वं बाजूंनी बंद करून, कोरडे पीठ लावून हलक्या हाताने गोल पराठा लाटावा.
पराठा जरा जाडसरच लाटावा.
नॉन-स्टीक तव्यावर पराठा तूप किंवा बटर लावून दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावा.
लाकडी उलथण्याने हलके दाबून सगळीकडून नीट शेकावे.

.

गरम- गरम ब्रॉकोली पराठा रायता, आंब्याच्या लोणच्याबरोबर सर्व्ह करा आणी हो बटर मारके बरं का :).

.

.

तूम्ही अशा पध्दतीने फ्लॉवर्, मुळ्याचे पराठे ही करु शकता.

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

15 May 2013 - 10:38 pm | सौंदाळा

खल्लास
डाळ मखणी बरोबर पण मस्तच लागतात.

आवडीचा प्रकार..

धन्यवाद!

पैसा's picture

15 May 2013 - 11:47 pm | पैसा

मस्त ग सानिके, पण त्या देठांचे काय करायचे?

सानिकास्वप्निल's picture

16 May 2013 - 1:16 am | सानिकास्वप्निल

अगं देठांचा उपयोग व्हेज स्टॉक किंवा सूप बनवण्यासाठी करु शकतो.
पराठ्यामध्ये मुद्दाम वापरले नाही कारण मग उग्रपणा जास्तं जाणावतो...फ्लॉवरचे पराठे करताना जसे किसून घेतो तसेच.
तरी पण जर कोवळे असतील तर चालतील.
धन्यवाद :)

चेरी's picture

15 May 2013 - 11:48 pm | चेरी

नक्की करुन पाहणार!!

सुहास झेले's picture

15 May 2013 - 11:53 pm | सुहास झेले

भारीच !!!

प्यारे१'s picture

15 May 2013 - 11:59 pm | प्यारे१

छानच आहे पाकृ.

गोबी पराठ्यासारखा लागतो का?

अभ्या..'s picture

16 May 2013 - 1:22 am | अभ्या..

मस्त. :)

जेनी...'s picture

16 May 2013 - 1:22 am | जेनी...

मस्त लागतात .... माझी दिदी छान बनवते ... मी आयते खाल्लेत :)

दिपक.कुवेत's picture

16 May 2013 - 10:50 am | दिपक.कुवेत

आग कधीतरी तु काहितरी बनवुन ईतरांना पण आयतं खायला घाल कि.....सारखं काय आपलं हे माझी दिदि छान करते, हे माझी आई छान करते....

:(
दीपूकाका मला पोळी भाजी शिवाय दुसरं कैच नै जमत :-/

पैसा's picture

16 May 2013 - 6:50 pm | पैसा

लग्न करताना नवर्‍याला स्वयंपाक येतो याची खात्री केलीस ना बये?

अय्या असं पण करायचं असतं ??? :(

मी तं फक्त सासुबैंना स्वयपाक येतो ना ..घ्फक्त याचीच खात्री करुन घेतली :(

आधी नै का सांगायचं :-/

:D

प्रभाकर पेठकर's picture

16 May 2013 - 2:13 am | प्रभाकर पेठकर

मस्तं.

गरमागरम परोठे आणि त्यावर बटर म्हणजे सोनेपे सुहागा.

ब्रोकोली तिच्या औषधी गुणांमुळे आवडते. ब्रोकोली सुप, सॅलड मधली अर्धवट शिजवलेली ब्रोकोली आणि आता हे परोठे. वेगवेगळ्या रूपात चाखलेल्या ब्रोकोलीवर फार जीव आहे.

दिपक.कुवेत's picture

16 May 2013 - 10:48 am | दिपक.कुवेत

ब्रोकोलीचे तुरे नुसत्या १ चमचा तेलात किंवा बटर मधे शॅलो फ्राय करा. वरुन चिमुटबर मीठ आणि मिरपुड टाकुन खाउन पहा....एक उत्तम हेल्दि तोंडिलावणे तय्यार...

येस्स्स... आणि मला त्याच्यावर थोडेसे पार्मेसान चीज घालुन पण मस्त लागते.

प्रभाकर पेठकर's picture

16 May 2013 - 12:18 pm | प्रभाकर पेठकर

व्वा... बकार्डी आणि ब्रोकोली... एक चविष्ट आणि सुरेल संध्याकाळ.

दिपक.कुवेत's picture

16 May 2013 - 12:30 pm | दिपक.कुवेत

बकार्डी मस्कत मधे मिळते का? मज्जा आहे बुवा!

प्रभाकर पेठकर's picture

16 May 2013 - 7:11 pm | प्रभाकर पेठकर

...

सानिकास्वप्निल's picture

16 May 2013 - 2:56 pm | सानिकास्वप्निल

ब्रॉकोलीचे तुरे ऑलिव्ह ऑईल मध्ये थोड्या ठेचलेल्या लसणाबरोबर परतून, वर मीठ +मिरपूड भुरभुरून सॅलॅड म्हणून ही छान लागतं.

दिपक.कुवेत's picture

16 May 2013 - 3:06 pm | दिपक.कुवेत

मी वर सांगीतल्याप्रमाणे करतो. लसुण कधी ट्राय केलं नाहि आता वापरुन बघेन.

येस्स ... भरपूर खिसलेला लसुन , भरपूर मोहोरी , मिरेपूड , मीठ, हलकं लाल तिखट वाईसच आणि कडीपत्ता चुरगळा मुरगळा करुन तेलात
फोडणी ... त्यावर ब्रोकोलीची चान चान फुले .... झाकन टाकुन ... बस्स दो मिनिट ;)
चकना तय्यार :D

:P

कच्ची कैरी's picture

16 May 2013 - 7:40 am | कच्ची कैरी

मस्तच !! आवडले पराठे :)

रेवती's picture

16 May 2013 - 7:56 am | रेवती

सुरेख! प्रश्नच नाही.

सुनील's picture

16 May 2013 - 8:28 am | सुनील

छान.

हा पदार्थ मावेओमध्ये कसा करता येईल?

अच्छा देठ घेतले नाहीत तर उग्र वास येत नाही. बर.
चलो ये भी हो जाय्य!

अक्षया's picture

16 May 2013 - 9:32 am | अक्षया

नेहमीप्रमाणेच मस्त पाकॄ आणि मस्त फोटो...:)

मस्त पाकॄ... कसा लागतो गं पराठा??? मला ब्रोकोलीचे सुप आवडते, त्यामुळे चव तर माहितीये. पण पराठा कसा लागेल, ते बघायला एकदा केलाच पाहिजे.

bharti chandanshive१'s picture

16 May 2013 - 10:47 am | bharti chandanshive१

नक्की करुन पाहणार

दिपक.कुवेत's picture

16 May 2013 - 10:53 am | दिपक.कुवेत

पराठा (मग तो कशाचाहि असो) म्हणजे जीव कि प्राण....नक्कि बनवुन खाणार. पाकॄ आणि जीवघेणे फोटो नेहमीप्रमाणेच

ब्रोकोलीचा हा उप्येग माहित नव्हता
आमी फक्त सलाड, पास्ता किंवा पिझ्झा करताना वापरायचो

चला हे ही कधीतरी करून पाहू

धनुअमिता's picture

16 May 2013 - 12:12 pm | धनुअमिता

मस्त !!

गणपा's picture

16 May 2013 - 12:54 pm | गणपा

फक्कड दिसतायत परांठे. :)
आजवर ब्रोकोली तिच्या उग्र वासामुळे कधी ट्राय केली नाही. अश्या पद्धतीने करुन पहायला हरकत नाही.

पराठा आवडला. मी तर भाज्यांची देठेपण बारीक कापून पराठ्यात वापरतो.

सूड's picture

16 May 2013 - 3:26 pm | सूड

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सारण जरासंदेखील बाहेर आलेलं दिसत नाहीये. हॅट्स ऑफ !!

अनन्न्या's picture

16 May 2013 - 4:33 pm | अनन्न्या

तोंपासु.........