कोकोनट कुकिज

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
7 May 2013 - 1:05 pm

साहित्य:

१५० ग्राम बटर (रुम टेंपरेचरला असलेले)
१५० ग्राम पिठीसाखर
१ अंडे
१ वाटी मैदा
१ वाटी डेसीकेटेड कोकोनट

.

पाकृ:

मिक्सींग बाऊलमध्ये बटर व पिठीसाखर एकत्र करून इल्केट्रीक बीटरने हलके होईपर्यंत फेटावे.
त्यात एक अंडे फोडून पुन्हा फेटून घ्यावे.
आतात त्यात मैदा व डेसीकेटेड कोकोनट हळू-हळू घालून मिश्रण स्लो स्पीडवर बीट करा.
मऊसर पिठाचा गोळा तयार झाला की त्याला क्लिंग फिल्ममध्ये कव्हर करुन फ्रिजमध्ये १/२ तास ठेवावे.
ओव्हन १५० डिग्रीवर प्री-हीट करुन घ्या.
बेकिंग ट्रेवर बेकिंग पेपर किंवा व्हॅक्स पेपर लावून घ्या.
सेट झालेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करुन घ्या व बेकिंग ट्रेवर अंतरावर लावा.
१५० डिग्रीवर १५-२० मिनिटे कुकिज हलक्या-सोनेरी रंगावर बेक करुन घ्या.
बेक झालेल्या कुकिज कुलिंग रॅकवर थोड्यावेळ थंड होण्यासाठी काढून ठेवाव्यात.
पूर्ण गार झाल्या की हवाबंद डब्यात भरुन ठेवा.

.

दूध,चहा,कॉफीबरोबर सर्व्ह करा.

.

.

प्रतिक्रिया

पियुशा's picture

7 May 2013 - 1:12 pm | पियुशा

व्हॉट अ क्लिक !!!

दिपक.कुवेत's picture

7 May 2013 - 1:20 pm | दिपक.कुवेत

फोटोसहित छान पाकॄ. पण तो शेवटचा फोटो कसा काय काढला? चहा कोरा आहे का?

धनुअमिता's picture

7 May 2013 - 1:26 pm | धनुअमिता

निशब्द........

अनिरुद्ध प's picture

7 May 2013 - 1:37 pm | अनिरुद्ध प

यात अन्ड न वापरता दुसरे काहि शाकाहारि पदार्थ वापरता येत नाहीत का? छायाचित्र उत्तम आले आहे.

सुहास झेले's picture

7 May 2013 - 1:45 pm | सुहास झेले

मस्तच... शेवटचा फोटो तर खास. अफलातून टायमिंग :) :)

मस्त फोटो... आणि पाकॄ सुद्धा.. :)

अक्षया's picture

7 May 2013 - 2:24 pm | अक्षया

+ १

गवि's picture

7 May 2013 - 1:56 pm | गवि

मस्त पदार्थ.

शेवटच्या फोटोत उसळता चहा नेमका कॅमेर्‍यात कसा पकडला असेल याचं नवल वाटतं आहे. सीरीजमधे फोटो काढतात आणि मधला योग्य तो घेतात असं आहे का?

बाकी ही खुसखुशीत कुकी कोर्‍या चहासोबत नाही जुळत. त्यासाठी मस्तपैकी दुधाचा बिनमसालेवाला साधा चहाच हवा. नुसतं दूधही चालेल..

सानिकास्वप्निल's picture

7 May 2013 - 3:02 pm | सानिकास्वप्निल

स्प्लॅश फोटोग्राफी आहे, ह्यात फोटो काढताना कॅमेर्‍यात हाय आयएसओ सेट करावे व बर्स्ट मोड (कंटिन्युअस शूटिंग) मध्ये ठेवून फोटो काढावा.

स्प्लॅश इफेक्ट साठी कपमध्ये ओरियो कुकि किंवा तत्सम जड खाद्य पदार्थ थोड्या उंचावरुन टाकावे म्हणजे चहा/ कॉफी उसळून बाहेर येईल... हे करताना शटर बटन प्रेस करत रहावे.
माझा ही पहिलाच प्रयत्न होता.
फोटो आवडल्याबद्द्ल धन्यवाद.

अवांतर : कप मध्ये चहा नसून ब्लॅक कॉफी आहे :) चहा मला ही दुधाचाच आवडतो.

जेनी...'s picture

7 May 2013 - 6:15 pm | जेनी...

भारीयेस बाबा तु तं !!!

काश .... :-/

मी_आहे_ना's picture

7 May 2013 - 2:07 pm | मी_आहे_ना

झकास पाकृ आणि नेहमीप्रमाणेच उत्तम सादरीकरण (बरं झालं आधीच जेवण करून मग धागा वाचला)

दिपक.कुवेत's picture

7 May 2013 - 2:07 pm | दिपक.कुवेत

पण त्या करता कप आदळावाच लागला असेल ना?

कप आदळायला लागू नये..
शुगर क्यूब उंचावरुन डुबुक करुन आत टाकल्याने असा इफेक्ट आणता यावा...असा अंदाज..

सानिकाची पाकृ आहे म्हणल्यावर नो चॅलेंज.
सगळ्या पाकृत सानिकाचा शेवटचा फोटो म्हणजे मास्टरपीस असतो. अगदी परफेक्ट काम्पोझीशनसाठी बघतो खास पण... यावेळी थोडीसी बॅक्ग्राऊंड पटली नाही. वूडनच्या एवजी प्लेन किंवा डीफ्यूजड असती तर चा ऊडायचा ईफेक्ट एकदम जबरा दिसला असता..
तरी पण बेस्ट क्लीक अन ऑफकोर्स बेस्ट कुकीज. पहिल्या फोटोतले बोल मस्त आहेत.

सानिकास्वप्निल's picture

7 May 2013 - 3:10 pm | सानिकास्वप्निल

१००% मान्य
खरं तर मला वेगळे बॅक्ग्राऊंड घ्यायचे होते खिडकीजवळ नुसत्या कॉफी टेबलवर कप ठेवून क्लिक करायचे होते पण फोटो काही केल्या चांगला येत नव्हता शिवाय फोटो जरा डार्क येत होता.

शेवटी वुडन बॅक्ग्राऊंडलाच नीट आला...थोडा रस्टीक वाटतोय बट आय अ‍ॅम ह्याप्पी :)

दिपक.कुवेत's picture

7 May 2013 - 2:12 pm | दिपक.कुवेत

बाकि "डुबुक" हा शब्द मला फार आवडतो. बरेच दिवसांनी एकला.

दिपूकाका फक्त तुमच्यासाठी :)
" डुबुक डुबुक डुबुक डुबुक डुबुक डुबुक " :D

अत्रुप्त आत्मा's picture

28 May 2013 - 10:35 am | अत्रुप्त आत्मा

@" डुबुक डुबुक डुबुक डुबुक डुबुक डुबुक " >>> :D :D :D
http://www.sherv.net/cm/emoticons/drink/hot-chocolate-cocoa-smiley-emoticon.gif

सगळ्या पाकृत शेवटचा फोटोच जाम भाव खाऊन गेला आहे.

प्यारे१'s picture

7 May 2013 - 2:27 pm | प्यारे१

नेहमीचा प्रतिसाद.
तो 'डुबुक' फोटो 'प्लेन लाईट' बॅकग्राऊंडवर आणखी खुलून दिसला असता. असा आपला अंदाज

मोदक's picture

7 May 2013 - 2:37 pm | मोदक

भारी!!!

मुक्त विहारि's picture

7 May 2013 - 2:44 pm | मुक्त विहारि

झक्कास...

नरेश_'s picture

7 May 2013 - 3:03 pm | नरेश_

:)

ज्योत्स्ना's picture

7 May 2013 - 4:40 pm | ज्योत्स्ना

नेहमीप्रमाणेच.

बाई गं! काय त्या कुकिज आणि काय ती फोटूची आयडीया! सगळच भारी.
सतत वेगळाले प्रयोग करत असतेस.

हॅ हॅ.. हे असं रेडिओवरच्या श्रुतिकेतल्या आवाजात का म्हणताय बुआ? ;)

हैला! खरच की! माझ्या लक्षात आलं नव्हतं, पण या सनिकेचं कौतुक करायला रोज शब्द तरी कुठून आणायचे? ;)

jaypal's picture

7 May 2013 - 6:30 pm | jaypal

फोटो जास्त आवडला. ४ थ्या फोटोत पार्श्वभुमी आणि कपातुन बाहेर आलेली कॉफी साधारण एकाच रंगाची असल्याने मर्ज झाली. वोरोधी रंगाची पार्श्वभुमी असती तर हा फोटो अजुन छान वाटला असता. कुकी बद्दल काय बोलणार? केवळ टाळ्या.
अवांतार = या कुकी मधे थोडेसे ड्राय फ्रुट्स टाकले तर?

डेसिकेटेड कोकोनट हे ड्राय फ्रूट समजायला हरकत नसावी जयपालमहाराज!
तरी बरं, नारळाच्या झाडावरून पडणार्‍या नारळाचे चित्र टाकले नाही तुम्ही. ;)

काजु, बदाम, पिस्ता ई. म्हणायच होत मला

आश's picture

8 May 2013 - 3:22 am | आश

अगदी मस्त. बिना अंड्याच्या करुन पाहीन

झन्नाट्ट!! भन्नाट्ट! धन्नाट्ट!
सानिके शब्द संपले पोत्यातले. नवे पाठव.

पैसा's picture

8 May 2013 - 9:39 am | पैसा

रोज उठून वेगळं काय लिहिणार ग? मस्त मस्त मस्त!!!

प्रभाकर पेठकर's picture

8 May 2013 - 9:54 am | प्रभाकर पेठकर

व्वा.. मस्त पाककृती. शेवटचे आणि शेवटून दूसरे छायाचित्र खासच. अगदी चित्ताकर्षक.

nishant's picture

8 May 2013 - 1:20 pm | nishant

Cookie? Smiley Sign

ढालगज भवानी's picture

9 May 2013 - 4:25 am | ढालगज भवानी

वा फोटोनेच अर्धा जीव गेला.

अनन्न्या's picture

9 May 2013 - 12:25 pm | अनन्न्या

गवताळांसाठी लगेच दुसरा पर्याय द्यायचा बरं का! तुझ्या पाकृ नुसत्या पाहून सोडून देता येत नाहीत ना!!!

श्रिया's picture

10 May 2013 - 1:07 pm | श्रिया

मस्त पाककृती आणि फोटो!

bharti chandanshive१'s picture

14 May 2013 - 3:56 pm | bharti chandanshive१

अगदी मस्त

खादाड's picture

14 May 2013 - 4:37 pm | खादाड

:)

यशोधरा's picture

16 May 2013 - 5:54 pm | यशोधरा

भीषॉण भॉलो!

बाकी कुकी सेव्ह करणं अलाउड नसलं तरी हया सेव्ह करुन घेतल्या आहेत, डुबुक सहित.

इनिगोय's picture

18 May 2013 - 1:45 am | इनिगोय

_/\_

समंजस's picture

27 May 2013 - 6:57 pm | समंजस

व्वा! मस्त!!

मदनबाण's picture

27 May 2013 - 7:38 pm | मदनबाण

कुकी मस्तच !
शेवटच्या फोटो बद्धल वरील मतांशी सहमत !

जाता जाता :---
फोटो ग्राफितले वेगळे प्रयोग सुद्धा करत आहात हे पाहुन विशेष आनंद झाला. :)