कोळ-पोहे

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
6 May 2013 - 11:21 am

kolpohe

साहित्यः
१. एका नारळाचं घट्ट दुध
२. चिंचेचा कोळ - पाव वाटि
३. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं पेस्ट - ३ चमचे
४. तुप, जीरं, हिंग - फोडणीसाठि
५. चवीनुसार गुळ, मीठ
६. पोहे - जाड किंवा पातळ
७. पोह्याचा पापड किंवा मिरगुंड

कॄती:

१. नारळाच्या घट्ट दुधात चिंचेचा कोळ, हिरवी मिरची/कोथिंबीर/आलं पेस्ट, चवीनुसार गूळ व मीठ घालुन एकजीव करा
२. तुप, हिंग - जिर्‍याची फोडणी तयार कोळाला द्या
३. पोहे किंचीत पाण्याचे हबके मारुन भिजवुन घ्या
४. सर्विंग डिश मधे पोहे घालुन त्यावर तयार कोळ घाला
५. वरुन भाजलेला किंवा तळलेला पोह्याच्या पापडाचा/मिरगुंडाचा चुरा करुन आंबट-गोड-तिखट असे कोळ-पोहे सर्व करा

प्रतिक्रिया

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 11:23 am | ढालगज भवानी

वारल्यात जमा झाले आहे!!!!!!

विसोबा खेचर's picture

6 May 2013 - 11:26 am | विसोबा खेचर

अगदी तुमच्याआमच्या घरातली एक सुरेख पाकृ..धन्यवाद दिपकराव..

या पाकृचा जन्म पेणमध्ये झाला (पोहे पेणचे आणि नारळाचं दूध अलिबागचं!) आणि तेथून पुढे ती रत्नांग्री, देवगडच्या प्रवासाला निघाली अशी पुराणात एक कथा आहे.. :)

तात्या.

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 11:32 am | ढालगज भवानी

वा! उत्तम माहीती. पेणविषयी ममत्व आहे.

रुस्तम's picture

11 May 2013 - 3:08 pm | रुस्तम

पेणविषयी ममत्व का आहे?

पिलीयन रायडर's picture

6 May 2013 - 11:28 am | पिलीयन रायडर

वा वा वा....
मनातलं असं मि.पा वर आलं की काय आनंद होतो...!!

केव्हा पासुन मला अन्न हे पुर्णब्रह्म.. मध्ये "पोहे" सिरिज सुरु करा असं सांगायचं होतं..मागे एका धाग्यावर लोकांनी वेगवेगळ्या पोह्यांची काय वर्णनं केली होती..!!

आता कराच बरं...

गवि's picture

6 May 2013 - 11:29 am | गवि

आजीची आठवण करुन देणारी आणखी एक पाककृती.

खूप खूप धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 May 2013 - 11:34 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्त, या बरोबर भरलेली मिरची तळुन चुरली तर अजुन मजा येते.
आज संध्याकाळी कोळाचे पोहे खाणारच.

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 11:37 am | ढालगज भवानी

मिरगुंड म्हणजेच कूटाची मिरची का?

अक्षया's picture

6 May 2013 - 11:54 am | अक्षया

मिरगुंड म्हणजे..पोह्याचा पापडच फक्त आकार वेगळा

गवि's picture

6 May 2013 - 12:05 pm | गवि

A

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 12:07 pm | ढालगज भवानी

अक्षया व गवि धन्यवाद.

शिवाय आपल्याच एका ठाणे कट्ट्याच्या वृत्तांतातला खाली दिलेला फोटो पहा. थाळीच्या शेजारी सोलकडीच्या बाजूला ताटलीत आहेत ती मिरगुंडे.

A

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 7:50 pm | ढालगज भवानी

वा!! पण तो हात कोणाचा आहे, फोटो काढायची वाटही न पाहता तुटून पडणारा ;)

पोह्याचा हा प्रकार वेगळा आहे. छान दिसतो आहे. :)

महेश नामजोशि's picture

6 May 2013 - 11:41 am | महेश नामजोशि

वा !! काय छान पाककृती दिली आहे. अगदी लहानपणची आठवण झाली. आजी आम्हाला दडपे पोहे करून द्यायची. एकतर झटकन व्हायचे व विशेष साहित्य लागायचे नाहि. त्या काळात स्टोवने सैपाक व्हायचा. त्यामुळे स्टोववर काही चालू असतांना भूक लागली तर चटकन होण्यासारखा हाच पदार्थ असे. त्या काळात पेण पनवेलहून पोहे यायचे, काय चव असायची त्या पोह्यांना. आताहि पोहे आमच्याकडे बर्याच वेळा होतात. पण दडपे पोहे नाही. शिवाय आताच्या पोह्याना ती चवही लागत नाहि. कारण काय माहित नाही. नवीन पाककृतीबद्दल धन्यवाद.

महेश नामजोशी

प्रभाकर पेठकर's picture

6 May 2013 - 1:47 pm | प्रभाकर पेठकर

'कोळाचे पोहे' वेगळे आणि 'दडपे पोहे' वेगळे.

सुहास झेले's picture

6 May 2013 - 11:58 am | सुहास झेले

मस्त... गवि म्हणतात तसेच म्हणतो आजीची आठवण आली :) :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2013 - 12:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

लहाणपणच्या आजोळच्या अनुभवांची आठवण ताजी केलीत.... बहूSSSSSSSSत मझा आ गया !

मुक्त विहारि's picture

6 May 2013 - 12:21 pm | मुक्त विहारि

झक्कास...

सानिकास्वप्निल's picture

6 May 2013 - 12:25 pm | सानिकास्वप्निल

कोळाचे पोहे अतिशय आवडता प्रकार
मस्तचं :)

तर्री's picture

6 May 2013 - 12:30 pm | तर्री

मधली वेळ नावाची एक खाण्याची वेळ आणि पदार्थ एके काळी असे. त्या पुरातन काळातली तशी ही साधीच डिश - पण येथे अगदी सन्मान पावली गेली हे पाहून बरे वाटले.
झटपट आणि चवदार पदार्थ.

गौरीबाई गोवेकर's picture

6 May 2013 - 12:53 pm | गौरीबाई गोवेकर

फक्त मी हे पोहे तुम्ही लिहिल्याप्रमाणे ऐत्यावेळी न करता कोळातच भिजवून थोडा वेळ ठेवते. मुरल्यावर छान लागतात. आणि त्यात बारीक चिरलेला कांदाही घालते.

स्पंदना's picture

6 May 2013 - 1:04 pm | स्पंदना

हे कधीच नाही खाल्ले. आणि नारळाचे दुध वापरुन त्यंना कोळाचे का म्हणतात? फार आंबट् असतात का?
एकुण करुन पहायला हरकत नाही पण हल्ली तयार दुध मिळताना ते कोवळ्या नारळाच मिळालं एक दोनदा. बघु.

अरे वा... एकदम वेगळी पाकृ... कधीच खाल्ली नाहिये. एकदा करुन बघायला पाहिजे.

nishant's picture

6 May 2013 - 1:46 pm | nishant

मस्त राव!!

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2013 - 1:54 pm | अत्रुप्त आत्मा

पोहे प्रांतातला अजुन १ पारंपारिक प्रकार...येकदम झ्याक लागतात. :)

@पोहे किंचीत पाण्याचे हबके मारुन भिजवुन घ्या>>> पण हे मात्र नाही, आमच्याकडे पोहे थोडेसे भाजुन कुर्कुरीत करतात आणी तसेच घेतात.

मॄदुला देसाई's picture

6 May 2013 - 4:10 pm | मॄदुला देसाई

हा प्रकार एकदा केला होता पण येवढा खास वाटला नव्हता. फोटो बघुन तुमच्या पद्धतीने परत एकदा करुन बघेन. @ महेश बर्याच ठिकाणी पेणचे पोहे मिळतात. फार छान चव असते...खास करुन जिथे कोकणातले घरगुती पदार्थ मिळतात तिथे विचारुन बघा. कोथरुड मधे राहाणार्यांना कोकण एक्सपेसच्या गल्लीतल्या कोकण मेवात हे पोहे मिळतील.

वर्णन आणि फोटो पाहून संपलो...

भारी. जुने पदार्थ म्हणजे खजिना असतो बुवा!

jaypal's picture

6 May 2013 - 7:39 pm | jaypal

सुपर्ब, जबराट

पैसा's picture

6 May 2013 - 7:45 pm | पैसा

आवडती पाककृती! मिरगुंडे घालण्याएवढा पेशन्स नसतो. पण चांगली लागत असणार!

दिपक.कुवेत's picture

7 May 2013 - 11:34 am | दिपक.कुवेत

हि पाकॄ करताना मला सुद्धा माझ्या आजीची प्रकर्षाने आठवण झाली. असो....सुट्टिला गेल्यावर आजीला करायलाच सांगतो

तात्या: पोह्यांचा हा प्रवास माहित नव्हता. धन्यवाद...अधीक माहिती मीळाली.
शुची: सडसडित/निमुळत्या बोटांचा आकार पाहता तो हात 'स्पावड्याचा' असावा असा अंदाज आहे. अंदाज चुअकल्यास गवि मार्गदर्शन करतीलच.
गौरीबाई: कोळपोह्यात कांदा घालतात हे प्रथमच एकले. असतील...शेवटि पसंद अपनी अपनी :)
अपर्णा: नारळाच्या दुधात चिंचेचा कोळ वापरतात म्हणुन कदाचीत कोळाचे पोहे म्हणत असतील. फार आंबट नाहि होत....जर चिंच प्रमाणात घातली तर

गवि's picture

7 May 2013 - 12:10 pm | गवि

शुची: सडसडित/निमुळत्या बोटांचा आकार पाहता तो हात 'स्पावड्याचा' असावा असा अंदाज आहे. अंदाज चुअकल्यास गवि मार्गदर्शन करतीलच.

त्या धाग्यातील इतर छायाचित्रे वर्णन वाचून फोरेन्सिक संशोधनाने या हाताचा मालक शोधणे हे मनोरंजक ठरेल आणि तसे बर्‍यापैकी शक्यही आहे. शोधा पाहू.. :)

ये आदमी व्हेज थाली खा रहा है.. और उंगली में अंगूठी.. दया पता करो..!!!

http://misalpav.com/node/17613

यशोधरा's picture

7 May 2013 - 12:13 pm | यशोधरा

मस्त!

तुमचा अभिषेक's picture

7 May 2013 - 3:01 pm | तुमचा अभिषेक

सहिये.. हे ना कधी ऐकले होते ना पहिले होते.. खाना तो दूर की बात.. आवडेल पण नक्की.. शेवटी पोहे आहेत भाई.. :)

पोह्याचा पापड म्हणजे काय? मराठवाड्यात वेगळं काही नाव असेल क हे माहीत नाही.
पोहे मस्तच लागतील.

घरचे पोहे आणि ओलं खोबरं हे दोन घटक आणि त्यासोबत कधी लसूण चटणी, कधी फोडणीची मिरची, कधी कच्चा कांदा-कोथिंबिर, कधी तेलावर परतून साधे तिखट आणि मीठ, असे कितीतरी दड्प्या पोह्यांचे प्रकार संध्याकाळी शाळेतून आल्यावर केले जायचे. यात गूळ नारळ(ओलं खोबरं) पोहेही आवडीचे! दूध-गूळ पोहे, दही पोहे, कांदे पोहे, बटाटे पोहे आणि तुम्ही सांगितलेले कोळाचे पोहे! किती प्रकार असायचे पोह्यांचे कोकणात!
तुमच्या या रेसिपीमुळे हे सारं आठवलं!

कवितानागेश's picture

11 May 2013 - 10:04 pm | कवितानागेश

फोटो बघूनच भूक लागली. छान पदार्थ. पटकन होणारा आणि चविष्ट. :)

चिंतामणी's picture

12 May 2013 - 1:50 am | चिंतामणी

एक मामुली शंका.

कुठले पोहे वापरायचे? पातळ की जाड?

सौंदाळा's picture

12 May 2013 - 11:27 am | सौंदाळा

आम्ही पातळ पोहे वापरतो आणि दडपे पोहे म्हणतो या पाकक्रुतीला.
बाकी
पोहे किंचीत पाण्याचे हबके मारुन भिजवुन घ्या
ऐवजी
पोहे किंचीत नारळ पाण्याचे हबके मारुन भिजवुन घ्या :) अजुन टेस्टी लगतात

सानिकास्वप्निल's picture

12 May 2013 - 3:27 pm | सानिकास्वप्निल

कोळाचे पोहे आणी दडपे पोहे ह्यात फरक आहे
दडपे पोह्यांसाठी पातळ पोहे घेऊन त्यात चिरलेला कांदा, मीठ, साखर, नारळाचे पाणी हबका मारण्यापुरतं किंवा नारळाचा चव, चिरलेली कोथींबीर, लिंबाचा रस एकत्र कालवून घेतात. त्यावर मोहरी, हींग, हळद, बारीक चिरलेली मिरचीची फोडणी, तळलेले शेंगदाणे घालून काहीवेळ दडपून ठेवतात.

वर दिपकने दिले आहेत ते कोळाचे पोहे आहेत.

प्रभाकर पेठकर's picture

12 May 2013 - 4:30 pm | प्रभाकर पेठकर

होय, अगदी बरोबर.

कांही जणं त्यात चोचलेली काकडीही घालतात. काकडीचे पाणी आणि बारीक चिरलेल्या कांद्याच्या वाफेने पातळ पोहे मऊ पडतात, खाण्यायोग्य होतात. नारळाचे पाणी हाही पर्याय मस्त आहे.

वेल्लाभट's picture

12 May 2013 - 1:27 pm | वेल्लाभट

खायला(च्च) हवेत !

दिपक.कुवेत's picture

12 May 2013 - 2:03 pm | दिपक.कुवेत

@ चिंतामणी: पोहे जाड किंवा पातळ कोणतेहि वापरा. पाकॄ मधे तसं म्हटलं आहे
@सौंदाळा: नारळ पाण्याची आयडिया मस्त. नेक्स्ट टाईम करेके चखेगा!