साहित्यः
१. कलिंगडाच्या फोडि - २ कप
२. अननसाच्या फोडि - १/२ कप (फ्रेश किंवा टिन मधल्या)
३. नारळाचं घट्ट दुध - १/२ कप किंवा क्रिम कोकोनट - पाव कप
४. बर्फाचे तुकडे
५. साखर किंवा मध - कलिंगड/अननसाच्या गोडानुसार कमी/जास्त
६. सजावटिसाठि पुदिना पान किंवा कलिंगड/अननसाची फोड
कॄती:
१. सर्विंग ग्लास (रिकामे :D) फ्रिजर मधे गार करण्यास ठेवा. असं केल्याने कोलाडा थंड राहण्याचा काळ वाढतो.
२. दिलेल सर्व साहित्य मिक्सर मधे एकत्र करुन स्मुथ होईस्त ब्लेंड करा
३. चिल्ड झालेल्या सर्विंग ग्लास मधे तयार कोलाडा हळुवारपणे ओतुन पुदिना किंवा कलिंगड/अननसाच्या फोडनी सजवा....
कोलाडा तयार झाल्यावर मला रहावलं नाहि म्हणुन मी काहि पानं/बिनं लावत बसलो नाहि :D. जेमतेम फोटो काढण्यापुरतं धीर धरला आणि ग्लास गट्ट्म केला :D.
प्रतिक्रिया
2 May 2013 - 12:00 pm | किसन शिंदे
मस्त!!
कलिंगड आणि अननसाचं कॉम्बिनेशन मस्तच लागत असेल.
2 May 2013 - 12:02 pm | अक्षया
उन्हाळ्याचा दिवसात एकदम मस्त रेसीपी दिलीत. नक्की करुन बघणार. :)
2 May 2013 - 12:12 pm | धनुअमिता
मस्त
2 May 2013 - 12:20 pm | अत्रुप्त आत्मा
2 May 2013 - 12:35 pm | सुहास झेले
जबरी... मला प्रचंड आवडतं हे कॉम्बिनेशन :) :)
2 May 2013 - 12:41 pm | विसोबा खेचर
........!!!!!!!!!!!!!!!!!!
2 May 2013 - 1:00 pm | मुक्त विहारि
थोडी व्होडका आणि जिन टाकली, की काय मस्त बहार येईल..
2 May 2013 - 1:55 pm | ऋषिकेश
मी नारळाच्या दुधाऐवजी केवळ माईल्ड फ्लेवर येण्यासाठी शहाळ्याचं पाणी वापरतो. आता एकदा नारळाचा चव काढून त्याचं दूध वापरून बघतो.
2 May 2013 - 5:10 pm | सानिकास्वप्निल
पिनाकोलाडा बघून तरतरी आली, एकदम रिफ्रेशींग ड्रिंक :)
2 May 2013 - 5:11 pm | सविता००१
भन्नाट आवड्तं कॉम्बिनेशन. :)
2 May 2013 - 5:18 pm | गवि
नारळाचं दूध घातलेलं कोणतंच कॉकटेल व्यक्तिगत टेस्टमधे बसत नसल्याने नारळपाणी वापरुन करुन पाहण्यात येईल.
कॉकटेल मस्त आहे, पण प्रेझेंटेशनबाबत असं वाटतं की बाकी सजावट जाऊ दे, किमान फोटोत ग्लासाच्या रिमला जो चिकटलेला रस / धागे इ दिसताहेत ते नसते तर जास्त छान दिसलं असतं. आत्ता उष्टावून ठेवलेला किंवा घाईघाईत भरताना ओव्हरफ्लो झालेला ग्लास वाटतोय.
पुन्हा एकदा, हे मत पदार्थाविषयी नसून मांडणीविषयीच आहे.
2 May 2013 - 6:08 pm | दिपक.कुवेत
सुचना एकदम पटली...पण फोटो काढतानाच नाकि नउ आले. मुलाला ते कधी एकदा पितोय असं झालेलं...सारखा ग्लासला येउन हात लावत होता...त्यामुळे त्याच्या ईच्छेपुढे सबकुछ नजरअंदाज किया :D
2 May 2013 - 6:12 pm | दिपक.कुवेत
ग्लास उष्टावलेला वगैरे नक्किच नाहिये :)
2 May 2013 - 6:52 pm | जेनी...
हिहिहि दीपूकाका नेक्ष्टैम ग्लासाचा रिम चाटुन पूसुन घ्या .... केवढं सोप्पय ते
:D
2 May 2013 - 7:41 pm | दिपक.कुवेत
पुजा आज्जे स्वःताचा अनुभव सांगतेस व्हय :D
2 May 2013 - 7:57 pm | जेनी...
हिहिहि :D.... दीपूकाका मी रिमच कै .. पण अश्या पेयांचा तळ पण चाटुनपूसुन घेते ..:P... लाजत नै बै मी अजिबात! :-/
2 May 2013 - 5:24 pm | बॅटमॅन
पाकृ भारीच, पण हे पिनाकोलाडा म्हंजे नक्की काय प्रकार आहे?
3 May 2013 - 9:12 pm | सोत्रि
पिना आणि कोलाडा हे स्पॅनिश शब्द आहेत.
पिना - Piña म्हणजे अननस आणि कोलाडा म्हणजे धुणे, गाळणे, पिळणे.
त्यामुळे अननस पिळून काढलेला रस असं काहीसं असावे
-(साकिया) सोकजी
4 May 2013 - 2:25 am | बॅटमॅन
थन्क्स फोर च्लरिफिचतिओन ;)
(आभारी) बॅटमॅन. :)
2 May 2013 - 5:27 pm | पैसा
मस्त लागत असणार!
2 May 2013 - 7:01 pm | प्यारे१
आहा आहा आहा!
2 May 2013 - 7:12 pm | अनन्न्या
या थंड्गार पाककॄतीने!
2 May 2013 - 8:05 pm | nishant
रीफ्रेशींग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग..............
3 May 2013 - 7:07 am | साऊ
छान दिसतोय रंग ड्रिंकचा.
3 May 2013 - 3:53 pm | मी_देव
वा.. मस्तच दिसतय.. :)
3 May 2013 - 8:16 pm | यशोधरा
मस्त! करुन पाहणार. शहाळ्याचे पाणी वापरेन.
3 May 2013 - 9:15 pm | मी_आहे_ना
झकास...फक्त आधी "व्हर्जिन" लिहा,नाहीतर साहित्यात मदिरा अॅडवा :)
4 May 2013 - 4:49 am | धमाल मुलगा
आमच्या मनातल्या ढीगभर विचारांना एका वाक्यात मोक्ष दिलात देवा!
दिपकराव,
आता तुमची अन आमच्या सोक्याची जुगलबंदीच होऊन जाऊंद्या च्यामारी! तुमची मॉकटेल्स अन सोक्याची कॉकटेल्स! हैऽ...नुसती धुमडी उडवून देऊया! :)
4 May 2013 - 5:02 pm | दिपक.कुवेत
अरे ये तो सुरज को (सोक्याजी) रौशनी दिखाने वाली बात हो गयी. हम तो उनके नाखुन के बराबर भी नहि है|
4 May 2013 - 12:51 pm | श्रिया
मस्त! लाजवाब!!
6 May 2013 - 5:38 pm | जयवी
अहाहा....... आजच करुन बघणार ;)
7 May 2013 - 9:46 pm | जयवी
दीपक...........जमेश रे....!! एकदम मस्त झालं आणि सगळ्यांना आवडेश :)
8 May 2013 - 11:21 pm | कवितानागेश
मस्त दिसतय. नक्की करुन बघेन. आणि मग फोटो टाकेन. :)
27 May 2013 - 6:58 pm | समंजस
व्वा! मस्त!
करून बघू...