सह-कर्मचार्यांना फेस-बुकात स्थान द्यावे कि नाही ?

माझीही शॅम्पेन's picture
माझीही शॅम्पेन in काथ्याकूट
24 Apr 2013 - 10:52 am
गाभा: 

खर तर मिपा वर लिहिण्याचा सध्या ब्रेक घेतलाय , पण सह-कर्मचार्यांना फेस-बुकात स्थान द्यावे कि नाही ह्या प्रश्नाने सध्या फेस आल्याने मिपा-कर मित्र मंडळीचे मार्ग दर्शन घेण्यासाठी हा का-कु काढतोय

नुकत्याच केलेल्या अमेरिका वारीत माझ्या टीम मधील काही जुनियर मंडळींनी बरीच मदत केली , स्वत:कडे कार नसल्याची जाणीव हि होवू दिली नाही , त्याच्या मदतीने आणि बाकी अन्य कारणाने वारी यशस्वी झाली. पण आता परत आल्या नंतर सर्व जु. मंडळी फेस बुकात (माझा प्रामाणेच पडीक) मित्र-विनंत्या (फ्रेंड रेक्वेष्ट) पाठवल्याला सुरुवात केली तेंव्हा डोक चालेनास झाल.

इतके दिवस मी सह-कर्मचार्यांना मी माझ्या फेस बुकात कधीच स्थान दिले नव्हते , पण खर तर सह-कर्मचारी मित्र वैगरे होवू शकतात असे मिपा वर धागे वाचल्या वर शेवटी न राहवून विनंती अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली , त्यांनी आणखीन पंचाईत झाली मी फेस बुकात आहे आणि काही जणांचा मित्र आहे हे कळल्या वर सर्वानीच मित्र-विनंत्या पाठवल्यात

पुढील काही गोष्टींना मी आता मुकणार कि काय अस मला वाटू लागल्या , माझ जालिय व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलाय अस वाटू लागल आहे , खालील बाबी प्रकार्शाने जाणवल्या

  • एखादा दिवस ऑफिसात खुपच वाईट गेला तर पहिले बिनधास्त तस लिहायची सोय संपली
  • एखाद्या जवळच्या मैत्रिणीच्या फोटो वर काही नाजूक कमेंट्स लिहायची चोरी झाली , कारण दुसर्या दिवशी मग ऑफिसात मग मुली नजरेतून एक मेकांना हा मेला असाच दिसतोय अश्या टाइप प्रतिक्रिया येतात , काही जणी तर बिनधास्त सांगतात तुझ फेस बुक वर काय चाललाय ह्यावर आमच बारीक लक्ष्य आहे. असे बरेच साईड इफेक्ट सध्या अनुभवतोय

असो अजून बराच काही लिहिता येईल , पण तुमचा अनुभव काय आहे मुळातूनच सह-कर्मचार्यांना फेस-बुकात स्थान द्यावे कि नाही हे कळेना झालाय......

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

24 Apr 2013 - 12:24 pm | नितिन थत्ते

>>मग ऑफिसात मग मुली नजरेतून एक मेकांना हा मेला असाच दिसतोय अश्या टाइप प्रतिक्रिया येतात

त्याने तुम्हाला काही फरक पडतो का?

कर नाही त्याला डर कशाला?

बॅटमॅन's picture

24 Apr 2013 - 12:40 pm | बॅटमॅन

थत्तेचाचांशी सहमत. त्या मुलींच्या प्रतिक्रियांचे एवढे दडपण घेण्याचे काय कारण आहे?

शिल्पा ब's picture

24 Apr 2013 - 12:29 pm | शिल्पा ब

वेगवेगळे कप्पे (ग्रुप ) करता येतात की. जे सहकार्‍यांबरोबर शेअर नसेल करायचं तिथे तो ग्रुप शेअरींगमधुन गाळुन टाका. हाकानाका.

श्री गावसेना प्रमुख's picture

24 Apr 2013 - 1:33 pm | श्री गावसेना प्रमुख

मैत्रिणीच्या फोटो वर काही नाजूक कमेंट्स करु नये, बायकोच बारीक लक्ष असते तुमच्या प्रोफाईल वर
घरात आदळाआपट व्हायची

माझ्या एका मित्राने मला सांगितलेलं वाक्य; 'ऑफिसात कोणी मित्र नसतात, सगळे कलिग्ज असतात'. सगळ्याच ठिकाणी नसला तरी बर्‍याच ठिकाणी या वाक्याचा प्रत्यय आला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Apr 2013 - 1:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपलं लिहिण्या-बोलण्याचं स्वातंत्र्य धोक्यात येत वगैरे असे वाटत असेल तर आपल्या फेसबूकाच्या खात्याला डिलीट मारावं या मताचा मी आहे.

>>> पण तुमचा अनुभव काय आहे

माझ्या ष्टाफमेंबरच्या फ्रेंड रिकवेष्ट्या मी मान्य करत नाही. स्टाफमधेच एकमेकांशी बोलायचा कंटाळा येतो तेव्हा फेसबूकावर काय उजेड पाडायचा. आणि अशा नावडत्या आणि आवडत्या माणसांनी कीतीही भारी ष्टेटस फेसबूकावर टाकलं तरी त्याचं कौतुक करुन आपल्याला थोडा आनंद होणार आहे, नाही का ? (वरवर आपल्याला आनंद झाल्याचा आपण दाखवतो, आतून थोडा आनंद होतो)

-दिलीप बिरुटे

हत्तेच्या त्यात कठिण ते काय?,
दुसरं अकाउंट उघडा की राव. एक अकाउंट ऑफिसवाल्या मित्रांवर ओवाळुन टाका.
हाय काय अन नाय काय?

तुमचा अभिषेक's picture

24 Apr 2013 - 3:19 pm | तुमचा अभिषेक

•एखाद्या जवळच्या मैत्रिणीच्या फोटो वर काही नाजूक कमेंट्स लिहायची चोरी झाली
>>>>>>>>>>>>>

अश्याच काही कारणांसाठी मी ७ फेसबूक प्रोफाईल बनवलेत.
तसेच ते प्रोफाईल एकमेकांच्या लिस्टमध्ये नाहीत.

ट्राय मारा, या पोरीचे त्या पोरीला समजणार नाही.

"आमचं तुझ्या फेसबुकवर बारीक लक्ष असतं" वगैरे बालीश बाष्कळ करणार्‍यांना काढून टाका. नुइसन्स आहेत.

आनन्दा's picture

24 Apr 2013 - 6:23 pm | आनन्दा

करू नये असे मला वाटते.. चे पु च नव्हे, तर कोणत्याही सोशल वेब्साईटला घेऊ नये.. केवळ व्यक्तिगत नव्हे तर व्यावसायिक स्वातंत्र्य देखील धोक्यात येते.

शिल्पा ब यांनी सांगितलेला उपाय करावा असे सुचवते. वेगळाले कप्पे करावेत.
प्राडॉचे म्हणणेही पटले. त्यांना सांगा की हापिसात रोज भेटत असतोच (किंवा हामेरिकेच्या हापिसात असले तरी कामाच्या निमित्ताने मेलामेली होतेच) तर कशाला फेस्बुकावर जोडणी?, किंवा गंपा म्हणतोय तसं सरळ वेगळे खाते चालू करा.
स्वगत- गणपाने मला खाते चालू करायला सांगितले तर काय उत्तर द्यावे?

मदनबाण's picture

24 Apr 2013 - 10:59 pm | मदनबाण

ह्म्म... रोचक प्रश्न ! :)

आता एक इस्टोरी सांगतो...
"क्ष" मुलगा एका "अ" कंपनीत कामास असतो... त्याला ऑनसाईटला वारी करायची जाम इच्छा असते,नव्हे तर ती तळमळ तो हापिसात त्याच्या "ग" बॉसला अधुन मधुन सांगत असतो. "अ" कंपनीचा ऑनसाईटला एक प्रोजेक्ट चालु असतो त्यात काही आठवड्यांसाठी एका विशिष्ठ काम करणार्‍या व्यक्तीची गरज असते,हेच काम करण्यात "क्ष" व्यक्ती हुशार असते."ग" ला ही रिकवारमेंट कळते आणि तो दोन्ही गोष्टींचा विचार करतो.मग "ग" "क्ष" ला सांगतो की सध्या ज्या "ड" प्रोजेक्टवर काम करतो आहेस तिथे तू काही काळासाठी उपलब्ध नसणार आहे असे कळवतो त्याचे कारण मीच सांगिन तू ऑनसाईटची तयारी कर... "क्ष" ला आनंदाच्या उकळ्या फुटतात ! तो "ह" देशात रवाना होतो,मग तिथे पोहच्याल्या नंतर फेसबुकवर काही काळातच तो माझे "ह"देशातली पहिली पिक्चरस म्हणुन काही फोटो फेसबुकात चढवतो...पण इथेच सगळी गडबड होते,कारण्..."ड" प्रोजेक्ट मधला एक जण त्याच्या मित्र यादीत असतो.तो "ड" कंपनीला कळवतो की "क्ष" तर "ह" मधे पोहचला आहे आणि आपल्याला सांगितलेले कारण फार वेगळेच आहे.मग काय "ड" प्रोजेक्टची कंपनी "ग"ची चांगली पाचर मारते इतकी की त्याची कळ व "ग"च्या च्यार पदे वर बसलेल्या "ढ" व्यक्तीं पर्यंत पोहचते... थोड़यात "क्ष","ग" आणि "ढ" यांची चांगलीच लेवल होते...

इति साठा उत्तराची काहाणी "सफळ" संपूर्ण ! ;)

या कथेतुन काही बोध मिळाल्यास तो घ्यावा...

जाता जाता :---- मी फेसबुक वापरत नाही.

माझ्या बाबतीत घड्लेय हो असे.

श्रीरंग_जोशी's picture

24 Apr 2013 - 11:59 pm | श्रीरंग_जोशी

लेखनातला मुद्दा वाचून जरा गंमतच वाटली पण इतर लोक काय समजतील वगैरे हे कुणासाठी संवेदनशील नक्कीच असू शकतात याची कल्पना आहे.

फेसबुकच्या वापराबाबत माझे विचार प्रश्नोत्तराद्वारे मांडतो.

  • मी फेसबुकावर आहे का? - हो
  • कारण काय? - आजकाल बरेच लोक असतात, जुने मित्र, स्नेही ज्यांच्याशी संपर्क तुटलाय तेही भेटतात, बरीच मंडळी जे काही प्रकाशित करत असतात त्यातून काही वेळा मोलाची माहिती भेटते, चांगली पर्यटनस्थळे आपोआप ठाऊक होतात, जालावरील चांगले दुवेही मिळतात, मनोरंजनही होते.
  • फेसबुकावर मी काय करतो? - मला आवडलेले जालावरील साहित्य, बातम्या, लेख, तंत्रज्ञान विषयक माहिती या गोष्टींचे दुवे टाकतो. स्वतः काढलेले फोटो अधून मधून टाकतो. एखादा चित्रपट आवडला तर तसे लिहितो इ.
  • फेसबुकवर काय टाकणे टाळतो? - अति खाजगी माहिती, कौटुंबिक घडामोडी इत्यादी.
  • फेसबुकच्या टाइमलाइनमुळे काही त्रास झाला? - अजिबात नाही, मुळात जालावर अशा गोष्टी लिहाव्याच कशाला की जे वाचल्याने लोकांचे उगाच नको ते समज होतील.
  • मी चतुरभ्रमणध्वनिसंचावर फेसबुकचा वापर करतोस का? - हो करतो, त्यामुळे गाढ झोपेचे तास सोडल्यास सतत कनेक्टेड रहायला मदत होते.
  • फेसबुकचे दुष्परिणाम लिही - उगाचच बिनकामाची माहितीही दिसत राहते. मनोरंजनाच्या नावाखाली टुकार कार्टून दिसत राहतात. फेसबुकावर वेळ कसा जातो तेच कळत नाही. फोन उगाच बीप करतो वेळी अवेळी, ही यादी न संपणारी आहे.
  • या दुष्परिणामांची तीव्रता कमी कशी करतोस - जे लोक मित्रयादीत आहेत अन फेसबुकवर सतत काही तरी अपडेट करत राहतात त्यांच्या प्रोफाईलवर जाऊन "Show in news feed" चा पर्याय बंद करून टाकतो. लोकांच्या फोटो अन पोस्टसवर केवळ लाईक करतो. कारण मी प्रतिक्रिया टाकली की त्या पोस्टवरील इतर प्रत्येक प्रतिक्रियेच्या वेळी फोन बीप करतो. एखाद्या वेळी प्रतिक्रिया व्यक्त कराविशी वाटलीच तर संदेशद्वारे त्या व्यक्तिस पाठवतो.
  • सह-कर्मचार्‍यांना फेसबुक मित्र बनवतोस का? - काहींना मी मित्र विनंती पाठवतो, काही मला पाठवतात. पण प्रत्यक्षातला संवाद असल्याखेरीज मात्र असे करत नाही.
  • याचे काही फायदे - कामाच्या ठिकाणी संवाद सुरू करताना विषय मिळतात, जसे - अरे तुझ्या सहलीचे फोटो पाहिले, धमाल केलेली दिसतेस, तुझा नवा टॅब काय म्हणतोय?
  • कुणी मित्र विनंती नाकारली तर... - नाकारली तर नाकारली, ज्याचा त्याचा प्रश्न आहे कुणाला फेसबुक मित्र म्हणून स्विकारावे.
  • फेसबुकचे ऑर्कुटसारखे झाले तर... - झाले तर झाले, जोवर सुरू आहे तोवर आहे, उद्या दुसरे काही असेल. शेवटी फेसबुक आपल्यासाठी आहे आपण फेसबुकसाठी नाही.
उपास's picture

25 Apr 2013 - 12:01 am | उपास

सहकर्मचार्‍यांना फेसबुकात टाकण्यापेक्षा लिन्क्ड इन वर ढकलावे :)

"आमची आंतरजालावर कुठेही शाखा नाही" असं म्हणायाचा दिवस लांब वाटत नाहीये! :)

कपिलमुनी's picture

25 Apr 2013 - 12:55 am | कपिलमुनी

मिपाकरांना फेसबुकात स्थान द्यावे का?

१ कोणालाही वर्गात येऊ नको कशाला म्हणायचे ?सर्वांना कळले तरी चालेल एवढेच लिहायचे बाकीचा मेसेज करायचा . फेसबुकमुळे मैत्री वाढत वगैरे नाही पातळ होते .

निखिल देशपांडे's picture

25 Apr 2013 - 11:26 am | निखिल देशपांडे

सहकर्मचार्‍यांना फेसबुकावर स्थान द्यावे का याचे उत्तर माहित नाही असे आहे. पण माझ्या टिम मधल्या प्रत्येकाला मी फेसबुकावर अ‍ॅड करुन घेतले आहे. याही उपर त्यांना "फेसबुकावर रिक्वेस्ट टाकली आहे, अ‍ॅक्सेप्ट कर नाही तर अ‍ॅप्राय्झल मधे बघुन घेईन" असा प्रेमाने सज्जड दम पण भरला आहे. याचा मला एकच फायदा झाला, ऑफिसच्या वेळात लोकांचा फेस्बुक वापर कमी झाला.
याच वरुन घडलेला किस्सा, माझ्या टिम मधली एक क्ष व्यक्ती रीतसर सुट्टी घेउन दहा दिवसांसाठी आपल्या परिवारासोबत फिरण्यास गेलेली. तिकडुन तिने Enjoying Kashmir असे काहिसे स्टॅटस टाकलेले. त्यावर मी जाउन फक्त It seems you have internet connectivity over there :-) असा रिप्लॉय टाकला. त्या व्यत्कीने तेव्हढ्या दहा दिवसात परत कधीच लॉगीन केले नाही.
याचाच अर्थ काय, आपल्या टिम लिड ला तर चुकुनही फेसबुकावर अ‍ॅड करु नये.

बॅटमॅन's picture

25 Apr 2013 - 12:50 pm | बॅटमॅन

याचाच अर्थ काय, आपल्या टिम लिड ला तर चुकुनही फेसबुकावर अ‍ॅड करु नये.

टीम लीडने अप्रेजलचा दम दिल्यावरसुद्धा? ;) बिच्चारे सबॉर्डिनेट्स ;)

छोटा डॉन's picture

25 Apr 2013 - 2:07 pm | छोटा डॉन

>>तिकडुन तिने Enjoying Kashmir असे काहिसे स्टॅटस टाकलेले. त्यावर मी जाउन फक्त It seems you have internet connectivity over there असा रिप्लॉय टाकला.

हा हा हा, मजेशीर.
आम्ही निख्या देशपांडेला मानतो ते उगाच नाही.

जोक्स अपार्ट, मात्र फेसबुकावर अथवा अन्य कुठेही हापिसातला लोकांना अ‍ॅड करायला मला काही संकोच अथवा अडचण वाटत नाही कारण तसे काही होईल असे मी फेसबुकावर अथवा अन्य कोठे काही लिहीत नाही.
सोशल नेटवर्कवर खासगी काही लिहायचे नाही हा नियम पाळला की झाले.

- छोटा डॉन

फेसबुक हे एक करमणूकीचे साधन आहे हे मान्य नसेल तर खुशाल ऑफिसातल्या नगांना जोडावे .