मेळ घाट

राजा सोव्नी's picture
राजा सोव्नी in जे न देखे रवी...
20 Apr 2013 - 11:01 pm

अजुनी आठविते भय रात्र मज ती,कोणी न्हवते अवती भवती,
त्यातून बिबट्याची डरकाळी ,मेळ घाटातली ती रात्र काळी,
रान गव्यांचे हुंकार भिवविती ;वानरांचे चित्कार घुमती,
हरीणांचे बिथरून पळणे ,रस्त्यांची ती अद्भुत वळणे,
पहाट होता किलबिल होते,मनावरचे दडपण जाते,
पहाट किती रम्य वाटते,झाड -फुलांना शोभा येते,
भयाची जागा हुशारी घेते,निसर्ग त्याला साथ देते.

भूछत्रीकविता