तुमचं मत काय?

नीलकांत's picture
नीलकांत in काथ्याकूट
9 Jul 2008 - 10:50 am
गाभा: 

नमस्कार मित्रांनो,

आपण सगळे रोज मिसळपाव वर येते असतो आणि आता मिसळपाव व त्यावरील मंडळींना आपल्या भावविश्वात एक वेगळे स्थान प्राप्त झालेले आहे असं मला वाटतं. रोज येथे यायंच, वाचायचं, मैत्री करायची.. कधी कधी कुणालातरी चावायचं... असं काही तरी करण्यासाठी आपण रोज मिसळपाव वर येत असतो.

खरं तर येथे म्हणजे मिसळपाव वर अनेक लोक असे आहेत की जे इतर कुठल्याही मराठी संकेतस्थळावर या आधी सदस्य नव्हते. तर काही लोक मात्र इतर संकेतस्थळावर खुप पुर्वीपासून वावरत आहेत. खूप वर्षांपासून ही जूणी मंडळी इतर कुठल्याही संकेतस्थळावर वावरत असली तर त्यांच्या भावविश्वात त्या संकेतस्थळाबद्दल आदर असने किंवा ममत्व असने साहजिकच आहे. यात कुणालाच काही अडचण असण्याचे कारण नाही.

मात्र मिसळपाववर वारंवार इतर कुठल्यातरी संकेतस्थळाचा कायम बरा किंवा वाईट उल्लेख करणे हे कितपत योग्य आहे? या जुण्या लोकांच्या प्रत्येक चर्चेत तोच एक कायम संदर्भ असेल तर 'हे जरा अतीच होतंय' असं नाही वाटत?

आम्ही नव्याने मिपाकर बनलेल्या लोकांना ह्या अर्धवट संदर्भांचा माग घेण्यासाठी इतरत्र जावे लागते, शोधा शोध करावे लागते आणि शेवटी हातात काय येतं तर " अरे हे दोघे या आधीही भांडलेली आहेत की !" असा काहीसा संदर्भ.

मराठीत खुप कमीच संकेतस्थळे आहेत. त्यामुळे त्यांचा संदर्भ येणे साहजिक आहे. मात्र आलेला संदर्भ किमान काही वेळा तरी निकोप असावा...! आणि आला तरी ह्याचर्चेत येथे मिसळपाववर काहीच संदर्भ नाही असा नसावा, असं वाटतं.

खरंच मिसळपाववर अश्या अन्य कुठल्याही संकेतस्थळाचा बरा किंवा वाईट संदर्भ जवळपास प्रत्येकच चर्चेत देणे योग्य आहे का?

ह्यामुळे नव्या सदस्यांना त्रास होत नाही का?

जुणी मंडळी थोर आहेत हे मान्य. म्हणून नव्यांनी कायम त्यांच्याचर्चा वाचत त्यांची वाटचाल शोधत रहावे अशी अपेक्षा आहे काय?

तुमचं मत काय?

नीलकांत

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

9 Jul 2008 - 10:53 am | बेसनलाडू

येथील दिग्गज जुण्या मंडळींच्या प्रतिक्रिया/मतमतांतरे वाचण्यासाठी उत्सुक!
(उत्सुक)बेसनलाडू

II राजे II's picture

9 Jul 2008 - 10:54 am | II राजे II (not verified)

हेच म्हणतो....

जुणी मंडळी थोर आहेत हे मान्य.

जास्त वय झाल्यावर म्हातारचळ लागते असे म्हणतात... !
;)

राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

आनंदयात्री's picture

9 Jul 2008 - 10:58 am | आनंदयात्री

>>जुणी मंडळी थोर आहेत हे मान्य. म्हणून नव्यांनी कायम त्यांच्याचर्चा वाचत त्यांची वाटचाल शोधत रहावे अशी अपेक्षा आहे काय?

=)) .. लै लै भारी .. अजुन एकदा =))

>>तुमचं मत काय?

काही चर्चांचे संदर्भ द्यावेत, म्हणजे मत प्रदर्शित करता येइल !

नीलकांत's picture

9 Jul 2008 - 11:08 am | नीलकांत

खरं तर मिसळपाव आता चांगल्याने स्थिरस्थावर झालंय. हे सांगायला मला मिसळपावचे सॅट्स पाहण्याची गरज नाही. रोज येणारी मंडळी आणि प्रकाशित होणार्‍या लेखांचा ओघ पाहून ते कुणीही सांगेल.

हा चर्चा प्रस्ताव टाकण्यासाठी तात्कालीक कारण असे आहे की अनेक नव्या सदस्यांनी या संदर्भाबद्दल मला विचारपूस केली आहे.

आमच्यासाठी मिसळपाव जसे असेल तसे प्यारे आहे. त्याची तुलना कायम इतर कुणा संकेतस्थळाशी करणे हे काही पटत नाही. कुणीतरी येऊन एखादी कविता काय करतं किंवा लेख काय टाकतो तर त्यावरचा वाद भलतीकडेच जातो. कुणीतरी दुसर्‍या संकेतस्थळावर लेख टाकतो तर त्याचा संदर्भ आजच प्रकाशित झालेल्या एका लेखात असतो.

खरंतर भटकत भटकत आपण सगळीकडे जातच असतो. मग जेवढा संदर्भ एका जुण्याप्रेमाच्या संकेतस्थळाचा असतो तेवढा मटाच्या बातम्यांचा किंवा रेडीफ अथवा इतर कुठल्याही संकेतस्थळाचा का नसतो ?

मिसळपाववर असलेली ही थोडी श्यामल किनार नाही आवडत बुवा आपल्याला.

नीलकांत

बेसनलाडू's picture

9 Jul 2008 - 11:15 am | बेसनलाडू

ही श्यामल किनार काही 'जुन्या','जाणत्या' सदस्यांनीच मिसळपावच्या सुरुवातीच्या दिवसांपासून लावलेली आहे,असे माझे निरीक्षण आहे.आणि अशा श्यामल किनारीमुळेच जर मिपाची झळाळी डोळे दिपवत असेल,तर अशा सदस्यांचे आपण अभिनंदनच करायला हवे.
(अभिनंदक)बेसनलाडू

प्रियाली's picture

9 Jul 2008 - 5:47 pm | प्रियाली

मग जेवढा संदर्भ एका जुण्याप्रेमाच्या संकेतस्थळाचा असतो तेवढा मटाच्या बातम्यांचा किंवा रेडीफ अथवा इतर कुठल्याही संकेतस्थळाचा का नसतो ?

रेडीफ आणि मटावर 'राम राम मंडळी, अहो काय सांगू तुम्हाला...साक्षात यमाला डब्बलशीट देऊन मिसळ खायला घातली हो' छाप लेख येऊ लागले की रेडीफ आणि मटाचे संदर्भही मिपावर येऊ लागतील.

मिसळपाववर असलेली ही थोडी श्यामल किनार नाही आवडत बुवा आपल्याला.

मलाही आवडत नाही परंतु मिपाचा जन्म श्यामल किनारीतूनच झाला हे नाकारता येणे शक्य नाही भ्रातृभजना!! (हा लेख इथलाच) जाणीवपूर्वक हा बदल घडवून आणणे म्हणजे अधिक बंडखोर निर्माण करणे. त्यापेक्षा अपनी मौतसे मरो| आणि शहाण्यांनी आपल्याला जे आवडत नाही किंवा आपल्याशी संबंधीत नाही त्याकडे लक्ष देवू नये.

विसोबा खेचर's picture

9 Jul 2008 - 6:08 pm | विसोबा खेचर

रेडीफ आणि मटावर 'राम राम मंडळी, अहो काय सांगू तुम्हाला...साक्षात यमाला डब्बलशीट देऊन मिसळ खायला घातली हो' छाप लेख येऊ लागले की रेडीफ आणि मटाचे संदर्भही मिपावर येऊ लागतील.

प्रियाली, जियो....! :)

आपला,
(प्रियालीचा फ्यॅन आणि मित्र!) तात्या.

प्रमोद देव's picture

9 Jul 2008 - 11:40 am | प्रमोद देव

नीलकांत मला ह्याविषयी जे प्रामाणिकपणाने वाटते ते लिहितो.
ह्या सर्वात खुद्द तात्या आघाडीवर असतो.(आता तात्या मला धारेवर धरणार! :T )उठसुठ, पूर्वी ज्यावर वावरलो त्या संकेतस्थळाच्या प्रशासकांबद्दल काहीतरी बोललेचे पाहिजे असा त्याचा खाक्या दिसतो. आता खुद्द मालकच असे बोलताहेत म्हटल्यावर इतर लोकांबद्दल काय बोलणार? तेही वाहत्या गंगेत हात धूऊन घेतात. नाहीतरी त्या सगळ्या लोकांना मिपा स्थापन झाल्यामुळे कायमची पोटदुखी जडलेली आहे. इनोचा खप उगीच नाही वाढला.
मिपाची भरभराट होऊ नये अथवा होत असलेली भरभराट पाहवत नाही... असे महाभाग आहेतच आणि त्यांनी उगीचच इथे वातावरण नासवण्याचा प्रयत्न करणे समजू शकते. कारण त्याशिवाय त्यांना प्रसिद्धी कशी मिळेल?
पण निदान तात्याने तरी आपली पूर्वीची भूमिका बदलून फक्त मिपाचे हित पाहणे ह्यातच लक्ष घातले तर परिस्थिती नक्कीच सुधारेल.
बघू तात्या काय म्हणताहेत ते. इतरांबद्दल काही न बोललेलंच बरं! कारण 'ते' आपले द्राक्षासवाच्या अंमलाखाली असतात.... सदैव!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

गणा मास्तर's picture

9 Jul 2008 - 11:58 am | गणा मास्तर

नीलकांत चे म्हणने योग्य आहे.
आणि प्रमोद काकांनि खरे तेच संगितले.

नीलकांत's picture

9 Jul 2008 - 12:30 pm | नीलकांत

केवळ तात्यांनाच सांगायचे असते तर एक फोन करून मला ते सांगता आले असते की !

येथे बेला ने एक लक्षात घ्यावे की त्यांना जर मिसळपाव सुरूवातीपासून माहिती आहे तर तात्याचा लेखनातील सुरूवातीचा उल्लेख आणि आताचा उल्लेख यात फरक आहे. आता तर ते खूप कमीच झालं आहे. माझ्या लेखाचा रोख केवळ तात्या नसून त्यासोबतचे जूणे लोक सुध्दा आहेतच की.

आज सकाळीच आल्या आल्या एक लेख वाचला त्याच्या संदर्भाचा उल्लेख मी वर केला आहेच. असे अनेक संदर्भ आपल्याला सापडतात.

(अवांतरः काही लेख वाचल्यावर काही सदस्यांच्या प्रतिक्रियांबद्दल आता सहज अंदाज बांधता येतात. येथे सुध्दा अद्याप अनपेक्षीत काही घडतेय असं नाही. )

II राजे II's picture

9 Jul 2008 - 12:33 pm | II राजे II (not verified)

अरे सरळ,
सर्कीटरावांचे नाव घे ना ! व त्या लेखाचे व त्या लेखाला आलेल्या प्रतिसादांचे !

उखाणे काय घेत बसलायस :)

राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

नीलकांत's picture

9 Jul 2008 - 12:37 pm | नीलकांत

मला सर्कीटरावांना व्य. नि. पाठवता आला असता ना !
मग काथ्याकुट कश्याला करायला लागली असती? अहो हे तर उदाहरण आहे.असे अजूनही आहेतच की. कुणाएकाचे नाव घेतले की मग चर्चा व्यक्तीगत पातळीवर उतरते. मला ते नकोय. व्यक्तीगत वादविवाद करायला व्य.नि. आणि खरडवही आहे की.

त्यामुळे हे व्यक्तीगत न घेता सर्वांनी मनावर घ्याकी. राजे तुम्ही तर जूनेच आहात की, तुम्हाला का ह्या गोष्टी ठाऊक नाहीत?

नीलकांत

II राजे II's picture

9 Jul 2008 - 6:36 pm | II राजे II (not verified)

त्यामुळे हे व्यक्तीगत न घेता सर्वांनी मनावर घ्याकी. राजे तुम्ही तर जूनेच आहात की, तुम्हाला का ह्या गोष्टी ठाऊक नाहीत?

ह्म्म्म ! सगळे माहीत आहे पण आमचा त्यात सहभाग कधीच नव्हता व कधी ही राहणार नाही... तात्यांच्या पाठोपाठच मी देखील ते स्थळ सोडले तेव्हा पासून आजपर्यंत परत गेलो नाही... बाकी सर्कीट रावां विषयी मला नेहमीच आदर वाटत राहीला आहे हे तुला देखील माहीत आहे.. ते एक विद्वान व्यक्ती आहेत हे नक्कीच.

येथे देखील सुरवातीची काही पोष्ट सोडली तर मी अश्या कुठल्याही भांडणात सहभाग घेतला नाही व घेणार नाही..

माझ्याकडे हा विषय कधीच नव्हता... तेव्हा विषय संपला म्हणण्यात काही अर्थ नाही,

आम्ही आपल्या खफवर बहोत खुष आहोत... आमचे जग वेगळे व उच्चविद्याविभुषीत पंडीतांचे जग वेगळे.... !

राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

बेसनलाडू's picture

9 Jul 2008 - 12:44 pm | बेसनलाडू

वरील प्रतिसादातील अवांतर कन्टेन्टसह सगळ्याशी सहमत आहे नीलकांत!
(सहमत)बेसनलाडू
आणि याला कारण हे सुद्धा आहे. तुमच्या आजच्या चर्चेत तुम्ही मांडलेले मुद्दे सुरुवातीलाच लक्षात आणून दिले होते तेव्हा समस्त मिपाकर झोपले होते की झोपेचे सोंग घेतले होते त्यांचे त्यांनाच माहीत!
(जागरुक)बेसनलाडू
त्या दयनीय प्रकारानंतर वेळीच शहाणपण आल्याचे चांगले परिणाम व्यक्तिशः अनुभवल्याने माझी काही *ट तक्रार नाही.जे जे होईल ते ते पहावे ..... पण म्हणून कोणी अरे केले तर त्याला का रे करू नये,हा गांधीवाद मला माहीत नाही .गांधीगिरीचा मक्ता सर्कीटरावांकडे आहे ;)
(स्मरणशील)बेसनलाडू

सर्किट's picture

9 Jul 2008 - 1:17 pm | सर्किट (not verified)

नीलकांत , बेसनलाडू, आणि प्रमोदकाका,

संकेतस्थळांवर गजाली करणे हा आमचा फार पूर्वीचा छंद आहे. येथील जुन्याच नाही तर नवीनही बर्‍याच लोकांना हे माहिती आहे.

आता ते बदलणे आम्हालातरी अशक्य आहे. आम्ही कुठेही गेलो, तरी हा प्रमाद आमच्या हातून घडणारच.

कोपरखळ्या, चिमटे ह्याच्या व्यतिरीक्त पुढे जाणे, हे मात्र हल्ली वार्धक्यामुळे आम्हाला फारसे जमत नाही.

आणि तुम्ही तर आम्हाला फक्त "जुना" न ठेवता "जाणता"ही करून टाकले आहे.

त्यामुळे आमच्यावरची जबाबदारी अधिकच वाढली आहे, ही जाणीव आम्हाला आहेच.

असो, आम्ही प्रयत्न करू. पण आमची गारंटी नाही, हे नव्या-जुन्या सर्वच लोकांना माहिती आहे.

- सर्किट

बेसनलाडू's picture

9 Jul 2008 - 1:31 pm | बेसनलाडू

व्यक्तिशः सगळे बरेवाईट अनुभवल्याने माझी काही *ट तक्रार नाही.जे जे होईल ते ते पहावे ..... पण म्हणून कोणी अरे केले तर त्याला का रे करू नये,हा गांधीवाद मला माहीत नाही .गांधीगिरीचा मक्ता सर्कीटरावांकडे आहे
(विनातक्रार)बेसनलाडू

सर्किट's picture

9 Jul 2008 - 1:39 pm | सर्किट (not verified)

गांधीगिरीचा मक्ता सर्कीटरावांकडे आहे

अगदी बरोबर. आणि हे व्रत आम्ही अंधतेने घेतलेले नाही.

जेव्हा गांधीजींवर सशस्त्र क्रांतिकारकांच्या खुनाचे आरोप करण्यात अले होते, तेव्हादेखील मानसिक संतुलन न ढळू देता आम्ही शांतपणे पुरावे मागत बसलो होतो, तेही आपल्याला आठवत असेलच. ती आमची खरी कसोटी होती.

बाकी काय छोट्या-मोठ्या गोष्टी आम्ही मनाला लावून घेतल्याच नाहीत कधी.

सार्वजनिक स्थळावर वावरणार्‍याला गेंड्याची कातडी बाळगावी लागते, असे कुणीतरी म्ह्टले आहेच.
(कुणीतरी कशाला, आम्हीच म्हटले आहे ;-)

- सर्किट

दरोगाजी बाबू, तुमची कळकळ कळते. [अर्थात काही तक्रारी आल्या की दखल ही घ्यावीच लागते नाही का माननीय उपनिरिक्षकसाहेब कृ.ह.घ्या.] नवसदस्य ह्याकडे कानाडोळा करु शकतात म्हणजे करत आहेतच बहुतेक. चांगले लक्ष आहे त्यांचे. पण खरं सांग त्यानिमीत्ताने त्यांचा मराठी संकतेस्थळांचा इतिहास पक्का होत जातो की नाही? नाहीतरी इतिहास म्हणजे युद्ध, तह, सनावली व प्रमुख घटना असेच तर शिकलो ना?

वैचारिक व व्यावहारीकदृष्ट्या बोलायचे झाले तर गॉसीप, उखळ्यापाखळ्या वाचनात जास्त आनंद मिळतो व अश्या चविष्ट बातम्या असल्या की खप वाढतो हे सरळसरळ गणित आहे. जगभर हे चालते मराठी पाउल मागे पडून कसे चालेल रे मैत्र!

खरेतर तुझ्या बोलण्यातुन कळते आहे की अजुन एक संकेतस्थळ बनवले पाहीजे ज्यात केवळ हा आंतरजालीय पेशवाईचा इतिहास नोंदवला असेल. सर्व संदर्भ एकाच जागी मिळेल अशी व्यवस्था असली पाहीजे. ;-)

शेवटी हे म्हणजे पुण्यातल्या ट्रॅफीक सारखे आहे कोणि कितीही म्हणले, सगळ्यांना समजत असले तरी शेवटी जो तो आपल्याला पाहीजे तेच करत असतो.

बर तुझ्या प्रश्राचे एक सोपे उत्तर हे की, नवसदस्यांनी जुन्या खलनायकांच्या गाथा विसरुन नवी दुष्मनी करावी, महाराष्ट्र धर्म वाढवावा!! ;-)

असो. बघ ह्या निमीत्ताने का होईना तु लिहता झालासच ना. फार कमी लिहीतोस रे तू.

-------------------------------------------------
वैधानीक इशारा - नाही जुना नाही जाणता मी आपला मिणमीणता!!!

प्रमोद देव's picture

9 Jul 2008 - 1:58 pm | प्रमोद देव

नाही जुना नाही जाणता मी आपला मिणमीणता!!!

:)

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विसोबा खेचर's picture

9 Jul 2008 - 4:33 pm | विसोबा खेचर

हम्म! छान आहे चर्चा...! :)

जोपर्यंत विठोबाची कृपा आहे तोपर्यंत मिपा सुरू राहील असंच मी म्हणेन. आजपर्यंत मी माझ्याकडून जास्तीत जास्त उतम तर्‍हेने मिपा चालवण्याचा प्रयत्न केला. यापुढेही करीन. मायबाप मिपाकरांची साथ अर्थातच अनमोल आहे. त्यांनी आजपर्यंत चांगलीच साथ केली अन् या पुढेही देतील अशी खात्री आहे . बाकी मिपाच्या हितशत्रूंना बिनधास्त फाट्यावर मारून पुढे जायला हा तात्या समर्थ आहे!

आणि त्यातूनही उद्या हितशत्रूंच्या कारवायाना यश मिळून मिपा बंद पडलं तरी बेहत्तर! कोई फिकीर नाय तिच्यायला!

असो.. बाकी चर्चा चालू द्या...!

आपला,
(मुंबईतल्या विशिष्ठ सेवा पुरवणार्‍या बायकांच्या पाठीला साबण चोळलेला) तात्या.

चतुरंग's picture

9 Jul 2008 - 4:36 pm | चतुरंग

एका ठसठसणार्‍या गळवाला तू हात लावला आहेस कारण दुखणार, पू निघणार, मलमपट्टी करावी लागणार, पण शेवटी जखम कालांतराने का होईना बरी होऊन तब्बेत खर्‍या अर्थाने सुधारणार हे ज्याला माहीत आहे, खरी तळमळ आहे तीच व्यक्ती हे करु शकते. हे करायला धाडस लागतं आणि त्याकरता प्रथम तुझं अभिनंदन! (अवांतर - तू पोलीस का झालास ह्याचं इंगित ह्या तुझ्या स्वभावात आहे असं मला वाटतं!)

पूर्वसूरींचे राग आळवणे हे तसे कोणत्याच क्षेत्रात नवीन नाही ह्याचा आपण सर्वजणच कधी ना कधी, कुठे ना कुठे अनुभव घेत असतो. मिपा सारख्या संकेतस्थळाबद्दल बोलायचे झाले तर वेगळे असायचे काही कारण नाही. पण बर्‍याचदा दुसर्‍या संकेतस्थळांचे, तिथल्या चालकांचे, इतर सभासदांचे, त्यांच्या लेखाचे संदर्भ कारण नसताना उगीचच्या उगीच देऊन खोडसाळपणा करणे म्हणजे आपलीच प्रतिमा डागाळण्यासारखे आहे.
काहीकाही खोडसाळ व्यक्ती मुद्दाम ह्याचे जुने संदर्भ उकरुन काड्या कशा करता येतील ह्याकडेच जास्त लक्ष देऊन असतात. थोड्या वाचनाने आपल्या सर्वांच्याच लक्षात असे लोक येतात. इतर संकेतस्थळावरही मिपावर घडलेल्या लेखनाचे संदर्भ देऊन आगी लावायचे प्रयत्न होत असतात. बर्‍याचवेळेला त्यांच्या खोड्यांना अनुल्लेखाने मारणे श्रेयस्कर असते. तात्कालिक भावनांच्या आहारी जाऊन प्रत्युत्तरे देणे टाळले तर पुढचे वाद टळतात. आपण सर्वांनीच ह्याचे कसोशीने पालन करायला हवे असे मला वाटते. (कधीकधी आपलाही तोल सुटतो पण त्यावेळी इतर जाणत्या लोकांनी व्य. नी.तून थोडे टोकून त्या व्यक्तीला जागेवर आणावे) कोणीही इतरांवर उघड टीका करण्यापेक्षा आपण ह्या चांगल्या गोष्टीला कसा हातभार लावू शकतो ह्याचा विचार व्हावा.
एखाद्या सभासदाचे मत, लिखाण, उत्तर वैयक्तिक जाते आहे, वर उल्लेखलेल्या सीमारेषा ओलांडते आहे असे वाटल्यास व्य. नि. खरड ह्याचा वापर करुन मत जाणवून देऊ/घेऊ शकता.

आपण सर्वांनी मिळून 'मिपा'एक परिपक्व संकेतस्थळ करण्याकडे वाटचाल करण्याचे दिवस आलेले आहेत हे नक्की. ह्या साठी शुभेच्छा!

चतुरंग

प्रियाली's picture

9 Jul 2008 - 4:56 pm | प्रियाली

मिसळपाववर वारंवार इतर कुठल्यातरी संकेतस्थळाचा कायम बरा किंवा वाईट उल्लेख करणे हे कितपत योग्य आहे? या जुण्या लोकांच्या प्रत्येक चर्चेत तोच एक कायम संदर्भ असेल तर 'हे जरा अतीच होतंय' असं नाही वाटत?

व्यक्तिशः असा सतत उल्लेख करणे अति आहे असे मला वाटते परंतु ते गैर नाही. याचे कारण मिपाचे सर्व जुने जाणते सदस्य हे एक्स-मनोगती किंवा मनोगती आहेत. मी स्वतः मनोगतावर असते. तात्यांनी काहीही म्हटले किंवा मनोगतावरील काही बाबी मला पसंत नसल्या तरी माझे मनोगताशी बरे आहे. तशा तर मिपावरीलही काही बाबी मला पसंत नाहीत पण मी काही या संस्थळांची चालक नाही. सदस्य म्हणून मला जे पसंत आहे त्यातच मी लक्ष घालते. यानुसार, इतर सदस्यांनी मनोगताचा (ताकाला जाऊन भांडं का लपवा?) ससंदर्भ - ताज्या घडामोडींवर उल्लेख करणे अयोग्य नाही परंतु मिपाला खाली दाखवण्यासाठी हा उल्लेख करणे, सतत भूतकाळात रमणे इ. अयोग्य आहे, असं मला वाटतं.

खरंच मिसळपाववर अश्या अन्य कुठल्याही संकेतस्थळाचा बरा किंवा वाईट संदर्भ जवळपास प्रत्येकच चर्चेत देणे योग्य आहे का?

साहित्य, कविता, विडंबने, प्रतिसाद यांचा संदर्भ देण्यासाठी केलेला उल्लेख माझ्यामते योग्य आहे. मिपाला मनोगताची सर नाही असा पोटदुखीचा स्वर कोणी काढत असेल किंवा केवळ हिणवण्यासाठी केलेला वापर अयोग्य आहे. इनो, बिनो, पोटदुखीबद्दल प्रमोदकाकांनी सविस्तर सांगितले आहेच. ;)

ह्यामुळे नव्या सदस्यांना त्रास होत नाही का? जुणी मंडळी थोर आहेत हे मान्य. म्हणून नव्यांनी कायम त्यांच्याचर्चा वाचत त्यांची वाटचाल शोधत रहावे अशी अपेक्षा आहे काय?

हरकत काय? नव्या सदस्यांना रस नसेल तर वाचू नये किंवा सोडून द्यावे. रस असेल तर संदर्भ लावण्याचे आपापल्या परिने मार्ग शोधावेत. प्रत्येकाने प्रत्येक चर्चा-लेखात हिरिरीने भाग घ्यावा असे तर नाही. मला अनेक नवे सदस्य माहित नाहीत किंवा त्यांच्यात इंटरेश्ट नाही. तिथे मी प्रतिसाद देत नाही किंवा वाचते आणि सोडून देते. त्रास करून घ्यायचा का नाही हे आपल्या हातात असते. जुनी मंडळी नव्या मंडळींना त्रास देण्यासाठी असे करतात असे तर म्हणायचे नाही ना?

काही मंडळी पुण्यात भेटतात. त्याबद्दल मिपावर चर्चा करतात, इतरांना त्याचे सोयरसुतक नसणे शक्य आहे. काही मंडळी बे-एरियात भेटतील ;) त्याबद्दलही मिपावर चर्चा करतील. इतरांना त्याचेही सोयरसुतक नसणे शक्य आहे. तेव्हा संकेतस्थळावरील लहान मोठ्या कंपूंनी आपापल्या चर्चा इथे करू नयेत असे तर काही नाही. त्याचप्रमाणे जुन्या मंडळींनी त्यांच्या आवडीच्या विषयांवर चर्चा करू नये असे काही नाही.

आपली
बिल्ला क्र. (३-१३)
प्रियाली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jul 2008 - 8:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडला प्रतिसाद !!!

१)साहित्य, कविता, विडंबने, प्रतिसाद यांचा संदर्भ देण्यासाठी केलेला उल्लेख माझ्यामते योग्य आहे.

२)नव्या सदस्यांना रस नसेल तर वाचू नये किंवा सोडून द्यावे. रस असेल तर संदर्भ लावण्याचे आपापल्या परिने मार्ग शोधावेत. प्रत्येकाने प्रत्येक चर्चा-लेखात हिरिरीने भाग घ्यावा असे तर नाही. मला अनेक नवे सदस्य माहित नाहीत किंवा त्यांच्यात इंटरेश्ट नाही. तिथे मी प्रतिसाद देत नाही किंवा वाचते आणि सोडून देते. त्रास करून घ्यायचा का नाही हे आपल्या हातात असते. जुनी मंडळी नव्या मंडळींना त्रास देण्यासाठी असे करतात असे तर म्हणायचे नाही ना?
३)संकेतस्थळावरील लहान मोठ्या कंपूंनी आपापल्या चर्चा इथे करू नयेत असे तर काही नाही. त्याचप्रमाणे जुन्या मंडळींनी त्यांच्या आवडीच्या विषयांवर चर्चा करू नये असे काही नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भडकमकर मास्तर's picture

9 Jul 2008 - 5:10 pm | भडकमकर मास्तर

पूर्वी मी भांडण का झाले? कोणाचे? कसे? असल्या प्रश्नांची उत्तरे शोधत असे...
त्यात काही अर्थ नाही हे आता कळायला लागले आहे...काहींना तेवढ्यातच मजा येते हेही कळायला लागले आहे... त्यांची मज्जा त्यांनी करत राहावी...

सततच्या तुलनात्मक लिखाणाला अजिबात प्रतिसाद न देणे आणि
कोणत्याही तुलनात्मक लिखाणाचं मूळ शोधायचा प्रयत्न न करणे ..
असे काही मार्ग आहेत आणि मी ते आताशा अवलंबतो....

ज्या दिवशी भांडाभांड जोरात चालते त्या दिवशी मी नवीन लेख लिहायचा प्रयत्न करतोच... तेच बरे...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

9 Jul 2008 - 5:14 pm | विसोबा खेचर

ज्या दिवशी भांडाभांड जोरात चालते त्या दिवशी मी नवीन लेख लिहायचा प्रयत्न करतोच... तेच बरे...

हा हा हा! अगदी सहमत आहे. मीदेखील आत्ता बसंतच्या लग्नाचा पुढचा भाग लिहितो आहे. थांबा, टाकतोच आज-उद्याकडे! :)

तात्या.

वरदा's picture

9 Jul 2008 - 6:26 pm | वरदा

आयडीया मास्तर्...मी लिहायचा प्रयत्न नाही पण जुन्या रेसिपीज वाचत बसते आणि विकांताचा मेनू ठरवते....कुणी दिसलं की गप्पा टप्पा करते , पण त्या लेखांवर प्रतिक्रीया ही देत नाही आणि जुने संदर्भ तर अजिबात शोधण्याचा प्रयत्न करत नाही...
नीलकांत तुम्ही म्हणता ते पटलं की ते उगाळून काय उपयोग पण काही जण सुधारत नाहीत तर आपण नको ना त्रास करुन घ्यायला....अगदी काही नवीन सुद्धा असतात की पकाऊ.... सोडून देऊयात झालं....
चतुरंगशी १००% सहमत...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

संदीप चित्रे's picture

9 Jul 2008 - 7:40 pm | संदीप चित्रे

नीलकांत ..
योग्य मुद्यावर धागा सुरू केलात :)

>> सदस्य म्हणून मला जे पसंत आहे त्यातच मी लक्ष घालते.
प्रियालीशी सहमत !
मिपावर नवीन होतो तेव्हा संदर्भ शोधायचा प्रयत्न केला पण नंतर ठरवलं जाऊ दे ना च्यायला, आपण आपलं लेख / कविता लिहिणं आणि चांगलं काही वाचणं हे बरं हेच खरं !
--------------------------
www.atakmatak.blogspot.com

माझा या दुनियेशी परिचय झाला तो मूळ वादांनंतर (हे मिसळपावाच्या जन्मापूर्वी उद्भवले). पण शह-काटशह दिले जात होते, (मिसळपावाचे पहिलेवहिले महिने) तेव्हा मी येथे सदस्य होतो. तेव्हाही तो भावनांचा उद्रेक माझ्यासाठी असंदर्भ म्हणूनच त्रासदायक वाटे. त्यामुळे आताच्या नवीन सदस्यांना हे पुराणे संदर्भ कोड्यात टाकत असतील, तर मला स्वानुभवाने समजते.

त्या कटुतेचा उल्लेख होत राहील असे समजू शकतो, कारण चिखलफेक फारच चवताळून केलेली होती. पण त्या संदर्भांचा अभिनिवेश काळानुसार कमीकमी होत जाईल अशीही अपेक्षा मी करतो. पूर्वीइतके तसे उल्लेख येत नाहीत हे मी मानातोसुद्धा. याहूनही कमी झालेत, तर मला आनंदच होईल. पण ते पूर्णच विसरले जातील, अशीही अपेक्षा करणे फार होईल.

तरीसुद्धा पूर्वेतिहास माहीत असलेल्या सदस्यांनी हात राखूनच उगाळलेल्या कोळशाचा गंध लावला, तर केवळ तीटच लागेल, गालबोट लागणार नाही.

मिसळपाव स्थळ आता शैशवापलीकडे गेले आहे. कालांतराने तो तीट लावण्याचीही गरज भासू नये.

मुक्तसुनीत's picture

9 Jul 2008 - 8:07 pm | मुक्तसुनीत

धनंजय यांचा प्रतिसाद अतिशय आवडला. त्यांच्याबद्दलच्या आदरात भर टाकणारा. ज्याना मिसळपावबद्दल प्रेम आहे आणि त्यातून काहीतरी बरेवाईट घडवावेसे वाटते त्यांच्याकरता मार्गदर्शक ठरेल असे काही त्यानी वर लिहीले आहे. मतामतांच्या गदारोळात मिसळपाव हळूहळू कूस बदलते आहे , मूळचा मोकळेपणा तसाच ठेवून काहीतरी नवे , चांगले येथे घडते आहे हेच महत्त्वाचे. बाकीच्या गोष्टी मनोरंजनात्मक आहेत.

प्रकाश घाटपांडे's picture

10 Jul 2008 - 10:50 am | प्रकाश घाटपांडे


मिसळपाव स्थळ आता शैशवापलीकडे गेले आहे. कालांतराने तो तीट लावण्याचीही गरज भासू नये.


खर आहे. तीट हा बालकाला आधार नसतो पण पालकाला असतो. शैशवातुन यौवनात गेल्यावर उन्माद हा असतोच. त्यात आपल्या कडून नकळत कुणाच्या संवेदनशीलतेला धक्का पोचला असु शकतो हे आपल्या गावीही नसतं. त्याच कधीतरी भान आल पाहिजे. काही कटुता या केवळ अपरिहार्य रहात नाहीत त्या अपरिवर्तनीय ही बनतात. दुधाच 'विरजण 'लावून दही होते पण दह्याचं 'निरजण' लावुन दुध होत नाही. म्हणुनच शब्दांच भय वाटतं . मग लिहायला नको वाटतं.

प्रकाश घाटपांडे

बेसनलाडू's picture

10 Jul 2008 - 10:54 am | बेसनलाडू

निव्वळ अप्रतिम! हेच सगळ्यांना कळून चुकलं तर काय बहार येईल!
(वासंतिक)बेसनलाडू

सर्किट's picture

10 Jul 2008 - 12:07 pm | सर्किट (not verified)

म्हणूनच म्हणतो, कटुता नको. वाद हवे संवाद हवे. कटुता टाळावी ;-)

आणि हेही खरेच की दह्याचे पुन्हा दूध बनवण्याचा अट्टाहासही नको. चुकून विरजण पडून दुधाचे दही झाले, म्हणून किती दिवस आता हळहळणार ? त्या दह्याचे ताक करून प्याना त्यापेक्षा.

- सर्किट

प्रकाश घाटपांडे's picture

10 Jul 2008 - 2:15 pm | प्रकाश घाटपांडे


त्या दह्याचे ताक करून प्याना त्यापेक्षा

पटलं बुवा! सम्जा लईच आंबाट लाग्ल त मंग तडका मारुन त्येची कढी बनवा!
प्रकाश घाटपांडे

चित्रा's picture

10 Jul 2008 - 11:52 pm | चित्रा

स्तुत्य विचार!

खूपच करमणूक झाली :-)

चित्तरंजन भट's picture

11 Jul 2008 - 3:37 pm | चित्तरंजन भट

लेखातल्या आणि धनंजय यांच्या प्रतिसादातल्या सर्वच मतांशी सहमत आहे, हे आधी नमूद करतो.

तुम्हा दोघांचे हे संतुलित लेखन वाचून सदस्य वैयक्तिक रोख असलेले, असंदर्भ आणि अस्थानी टाळतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही ;)

कुठल्याही संकेतस्थळावरील कंफर्टझोन मध्ये राहून आपल्या स्तुतिपाठकांकडून स्तुतिसुमनांची उधळण करून घेणेच ज्यांचे जीवनध्येय आहे, अशा स्वतःची प्रतिमा बघून स्वतःशीच रत होऊ पाहणार्‍या नार्सिससच्या वशंजांना (चांगला शब्द "औलादींना" आहे बहुतेक) मात्र हे लागू होणार नाही.

शेक्सपिअरने एका ठिकाणी म्हटलेच आहे :
With eager feeding food doth choke the feeder.
Light vanity, insatiate cormorant,
Consuming means, soon preys upon itself.
ह्याचा अनुवाद करीत बसणार नाही. डिक्शनरी बघावी. गुगलून काढावे.

टीका झाली की "हा मिसळपाववर हल्ला आहे. पहा, पहा, पहा, त्यांचे बूड जळते, त्यांचे पोट दुखते" ही रणनीती (स्ट्रॅटजी) फार काळ चालेल, असे वाटत नाही. (कोणाचे बूड किती जळते, खरेच जळते का, कधी जळते, का जळते ह्या गोष्टींचे संशोधन व्हायला हवे. काही बाबतींत तथ्य असेलही, नसेलही ;) )

असो. किमान अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही.

चित्तरंजन

विसोबा खेचर's picture

11 Jul 2008 - 3:55 pm | विसोबा खेचर

प्रतिसाद आवडला हे आधीच नमूद करतो...! :)

कुठल्याही संकेतस्थळावरील कंफर्टझोन मध्ये राहून आपल्या स्तुतिपाठकांकडून स्तुतिसुमनांची उधळण करून घेणेच ज्यांचे जीवनध्येय आहे, अशा स्वतःची प्रतिमा बघून स्वतःशीच रत होऊ पाहणार्‍या नार्सिससच्या वशंजांना (चांगला शब्द "औलादींना" आहे बहुतेक) मात्र हे लागू होणार नाही.

काय म्हणता चित्तोबा? कसं चाललंय बाकी? मनोगत डॉट कॉम काय म्हणतंय आमचं? मजेत ना? :)

(कोणाचे बूड किती जळते, खरेच जळते का, कधी जळते, का जळते ह्या गोष्टींचे संशोधन व्हायला हवे. काही बाबतींत तथ्य असेलही, नसेलही )

खरंच संशोधन व्हायला हवे! बाकी आपण इथे नेमका हा प्रतिसाद द्यायला अगदी हटकून उपस्थित झालात यातच कोणाचे बूड किती जळते या बाबत बरेचसे संशोधन झाले आहे असे वाटते! :)

असो...!

येत रहा अधनंमधनं! मिसळपाव किंवा इतर कोणत्याच संकेतस्थळांच्या उल्लेखाव्यतिरिक्तही इथे वाचायला बरंच असतं! बाय द वे, मिपावर नुकताच प्रकाशित झालेला शिंपिंणीचं घरटं हा लेख वाचलात का? नसल्यास वाचून पाहा, फार सुरेख आहे. कदाचित आवडेल तुम्हाला!

तात्या.

चित्तरंजन भट's picture

11 Jul 2008 - 4:07 pm | चित्तरंजन भट

वेळ मिळेल, वाटेल तेव्हा येत राहीन. वेळ मिळाल्यावर शिंपिंणीचं घरटंही वाचीन. "येत रहा अधनंमधनं! " हे सांगणारे तुम्ही कोण? ;)

विसोबा खेचर's picture

11 Jul 2008 - 4:16 pm | विसोबा खेचर

"येत रहा अधनंमधनं! " हे सांगणारे तुम्ही कोण?

येथे नियमीतपणे येणारा, लिहिणारा एक सामान्य मिपाकर! अन्य कुणी नाही! :)

आपणही येथे नियमितपणे यावं, वाचावं, लिहावं असं वाटलं म्हणून सहजच तसं म्हटलं झालं! ;)

तात्या.

चित्तरंजन भट's picture

11 Jul 2008 - 4:34 pm | चित्तरंजन भट

असे होय ;)

टारझन's picture

9 Jul 2008 - 8:03 pm | टारझन

मला का कुणास ठाऊक कसल्याही चर्चेचा काहीही त्रास होत नाही .. बाकींना होत असावा... वाचावं .. जे आवडलं कळालं ते घ्यावं... नाही कळालं / समजंल सोडून द्यावं.. उगाच डोकं खाजवत नाही बसत ... लोक वाद-प्रतिवाद करतात .. ते मी करमणूक म्हणून वाचतो...
पण सर्वांचा विचार करता निलकांतने योग्य मूद्दा मांडला आहे. ठिक ठिक

सगळ्या बाजूंनी पाठींबा देणारा )
कु. ख.


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

नीलकांत's picture

9 Jul 2008 - 8:09 pm | नीलकांत

अतिशय जास्त शक्यता होती की ही चर्चा व्यक्तीगत पातळीवर उतरेन. आणि दूपारी काही वेळ तर... आता उतरली... आता भरकटली.... असं वाटत होतं.

मात्र असं काही घडलं नाही. चतुरंग, प्रियाली, सहज आणि मास्तर तुमच्या सुचनांचे स्वागतच आहे.

चला मिसळपाव पुढे जातंय त्याला अधीक गती देऊया.

नीलकांत

चतुरंग's picture

9 Jul 2008 - 8:18 pm | चतुरंग

विमान उंचावर गेलं ना की कधीकधी त्याला एअर करंट्स चे धक्के बसतात (टरब्यूलन्स) एवढेच जाणवून देण्यापुरते की ते खूप उंचावरुन उडते आहे!:)

चतुरंग

नीलकांत's picture

9 Jul 2008 - 8:11 pm | नीलकांत

>>मिसळपाव स्थळ आता शैशवापलीकडे गेले आहे. कालांतराने तो तीट लावण्याचीही गरज भासू नये.

हे वाचून खरंच आनंद झाला. :)

नीलकांत

छोटा डॉन's picture

9 Jul 2008 - 9:04 pm | छोटा डॉन

अंदाजे १२०० च्या सभासद असणार्‍या मिसळपाव वर अनेक प्रवॄती आहेत. काही मिपाचे हीत पाहतात तर काहींनी " अवघा हलकल्लोळ करावा" हे ब्रीद पाळतात. वर कुणीतरी म्हणाल्याप्रमाणे "आंतरजालावर" जे काही "प्रतिसादाचे राजकारण आणि इगो" ह्यांचे जे प्रस्थ आहे त्यातुन मिपावर "काही आक्षेपार्ह्य लेख अथवा कविता" पडते. कुणी कितीही नाकारले तरी कंपुबाजी अस्तित्वात आहेच. हे "सो कॉल्ड " कंपु मग त्या लेखाच्या " बाजुने अथवा विरुद्ध " तुटुन पडतात, त्यातुन कुणाचा अहंकार गोंजारला जातो व कुणाचा दुखावला जातो. काही वेळा परिस्थीती एवढी हाताबाहेर जाते की "सर्वसामान्य सदस्य व नविन सदस्य" गांगारुन वा घाबरुन येथुन काढता पाय घेतात. या सर्व गोष्टींचा वीट येऊन "स्वतःचे लेख " टाकायला "नको म्हणणारी" जनता सुद्धा आहेच की.
काही वेळा एखादा "नवा सदस्य" चुकुन या वादात उतरतो व कशल्या तरी "प्रेरणेने" त्या "शह - काटशह" च्या भानगडीत पडुन स्वतःला पोळुन घेतो. त्यात त्याला अधिकच मानसीक त्रास झाल्याने मग त्याची "काही लिहायची व वाचायची इच्छा" मरुन जाते व तो एक "निष्क्रीय सभासद" बनुन राहतो. त्यावर चतुरंगशेठ म्हणतात तसे "तात्कालिक भावनांच्या आहारी जाऊन प्रत्युत्तरे देणे टाळले तर पुढचे वाद टळतात". मी स्वतः यापुढे अशा गोष्टी टाळणार आहे.
थोडक्यात काय तर "या गोष्टींना" पर्याय नाही. जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवॄत्ती असे असताना आपण अगदी काटेकोरपणे " हे नकोच" असा आग्रह घरु शकत नाही व धरुन काही फायदाही नाही. त्याच्यावर काही ठिकाणी " अनुल्लेखाने मारणे वा सोईस्कर दुर्लक्ष करणे" हा रामबाण इलाज ठरु शकतो.

आणखी काही आवडले व सहमत असलेले सल्ले वा मुद्दे :

  1. सहजराव म्हणतात "शेवटी हे म्हणजे पुण्यातल्या ट्रॅफीक सारखे आहे कोणि कितीही म्हणले, सगळ्यांना समजत असले तरी शेवटी जो तो आपल्याला पाहीजे तेच करत असतो"" हेच खरे. शेवटी ते वागणार्‍याच्या "सर्वसारासार विचारबुद्धी" वर अवलंबुन आहे.
  2. एखाद्या सभासदाचे मत, लिखाण, उत्तर वैयक्तिक जाते आहे, सीमारेषा ओलांडते आहे असे वाटल्यास व्य. नि. खरड ह्याचा वापर करुन मत जाणवून देऊ/घेऊ शकता. जास्त करुन "जेष्ठ व जाणत्या सभासदांनी" ही जबाबदारी घेतल्यास बरेच वाद एका मर्यादेच्या आत समाप्त होतील व बाकीची जनता सुखी राहिल.
  3. नव्या सदस्यांना रस नसेल तर वाचू नये किंवा सोडून द्यावे. रस असेल तर संदर्भ लावण्याचे आपापल्या परिने मार्ग शोधावेत. प्रत्येकाने प्रत्येक चर्चा-लेखात हिरिरीने भाग घ्यावा असे तर नाही. त्रास करून घ्यायचा का नाही हे आपल्या हातात असते. जुनी मंडळी नव्या मंडळींना त्रास देण्यासाठी असे करतात असेही नाही. संकेतस्थळावरील लहान मोठ्या कंपूंनी आपापल्या चर्चा इथे करू नयेत असे तर काही नाही. त्याचप्रमाणे जुन्या मंडळींनी त्यांच्या आवडीच्या विषयांवर चर्चा करू नये असे काही नाही.

ह्या सर्वांवर मला मास्तरांचा उपाय पटला किंवा डायरेक्ट इथुन कल्टी मारुन त्या "खरडफलका वर पडुन" राहणे परवडले.

मिसळपाव स्थळ आता शैशवापलीकडे गेले आहे. कालांतराने तो तीट लावण्याचीही गरज भासू नये.

सहमत आणि बरे वाटले की असे मानणारे पण काही " जाणते व जुने सदस्य" आहेत हे पाहुन.

मायबाप मिपाकरांची साथ अर्थातच अनमोल आहे. त्यांनी आजपर्यंत चांगलीच साथ केली अन् या पुढेही देतील अशी खात्री आहे .

तात्या , या बाबतीत शंका नको. आमची मिपा बद्दल आत्मियता अशीच राहील....

[ न जुणा न जाणता सर्वासामान्य सदस्य ] छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भाग्यश्री's picture

9 Jul 2008 - 10:34 pm | भाग्यश्री

धनंजय यांच्या प्रतिसादाशी तसेच सवच प्रतिसांदाशी सहमत..

मी आंतरजालावर खूपच पूर्वीपासून आहे.. ज्यावरून वाद झाले त्या मनोगताचा जन्म देखील मी पाहीला असेल.. सो बर्‍याच घडामोडी का, आणि कशामुळे झाल्या याची कल्पना आहे.. कधीच ऍक्टीव्ह नव्हते,रोमातच असायचे, पण हो.. सुरवातीला खूप उत्सुकता वाटायची काय चाललंय, कोण भांडतंय .. गॉसिपींगचे ते.. आवडायचं त्यामुळे.. पण हळूहळू ते आवडणं कमी झालं..

मिपा जन्मल्यापासून, या सर्वांकडे खरंतर लक्ष सुद्धा देऊ नये असं वाटते.. कारण इतके उत्तमोत्तम लिखाण येतं इथे, की भांडणं, वाद ई. गोष्टींकडे ढुंकुन सुद्धा पाहवसं वाटत नाही.. इतर संस्थळांवर अशी गोष्ट नव्हती. वाद जास्त करमणूक करायचे,संस्थळाच्या कंटेंटपेक्षा! :) ह.घ्या.

आणि एक विश्वास आहे.. की जसे पूर्वीइतके उल्लेख येणं बंद झालंय तसंच अजुनही होईल.. नविन सभासदंनी काय वाचवे या बद्द्ल प्रियालीशी सहमत.. जे आवडेल ते वाचावं.. भांडणं, वाद यात इंटरेस्ट असेल तर बसा शोधत संदर्भ.. पण स्वताहून इथे राळ उडावायचा प्रयत्न करू नये.. तसेच जुने काही सदस्य..ज्यांना पूर्वीच्या आठवणी आल्याशिवाय चैन पडत नाही,त्यांना जे करायचे ते करतील.. वाचक, निदान मी तरी येथील लिखाणावर जास्त भर देते..मला इथल्या लोकांचे विचार आवडतात्,त्यांचे लेखन आवडते,इथल्या सुविधा, मोकळेपणा आवडतो, एक कुटुंब वाटते म्हणून इथे मी येते.. कुटुंबात जर काही वाद होत असतील, तर त्या आगीत तेल टाकून मजा नक्कीच बघणार नाही.. ती कमी कशी होईल हे पाहीन.. आणि कदाचित अनुल्लेखाने कमी होईल असे वाटते..

इनोबा म्हणे's picture

9 Jul 2008 - 11:48 pm | इनोबा म्हणे

मात्र मिसळपाववर वारंवार इतर कुठल्यातरी संकेतस्थळाचा कायम बरा किंवा वाईट उल्लेख करणे हे कितपत योग्य आहे? या जुण्या लोकांच्या प्रत्येक चर्चेत तोच एक कायम संदर्भ असेल तर 'हे जरा अतीच होतंय' असं नाही वाटत?
सहमत.

यापुढे माझ्या लेखनात/प्रतिसादात इतर कुठल्याही संस्थळाचा (निलकांत यांनी म्हटल्याप्रमाणे) विनाकारण उल्लेख येणार नाही, याची मी काळजी घेईन.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

लिखाळ's picture

10 Jul 2008 - 3:55 pm | लिखाळ

प्रियाली, धनंजय, प्रकाशराव आणि अजून काहींच्या मतांशी सहमत आहे.
मी मनोगतावर रुजू झालो तेव्हा तेथे अधूनमधून नव्या-जून्या सभासदांना हेच प्रश्न पडायचे की संकेतस्थळावरचे लेखन हे कुणाही नव्याला लगेच कळावे असे पूर्वसंदर्भांपासून मुक्त असावे की नसावे. (त्यातून उत्तर न निघता नवी संकेतस्थळे निघाली :)) पण हे पूर्वसंदर्भ येणारच. हे सर्वांनी मान्य करावे.

तसेच हे लोकशाहीपद्धतीचे ठिकाण असेल असे तात्या कुठेतरी म्हणालेले स्मरते. मग सदस्यांनी दुर्लक्ष करणे, निषेधकरणे इत्यादी केले तर सदस्यांना अपेक्षित असे लेखन होत राहिल. सदस्यांना काय आवडते, काय चालते ते हळुहळु सिद्ध होईल. तसेच व्हावे.

सुरुवातीच्या काळातले भरमसाठ पूर्वसंदर्भ आता कमी झाले आहेत हे नक्कीच.
त्यानंतरच्या काळात सदस्यांना असलेल्या स्वातंत्र्यामुळे येणारे भरमसाठ मोठे / बाश्कळ / काहिबाही असे प्रतिसाद कमी होत आता नेमके, चांगले असे लेखन होण्याचे प्रमाण वाढत आहे असे मला वाटते. असे लेखन आवडणारे आणि करणारे लोक इथे जास्त रमु लागले आहेत असेही दिसते आहे. आता मिपा स्थिर होण्याकडे वाटचाल करत आहे हे नक्की.

लोकांना गॉसिप आवडते, त्यात करमणूक होते. नव्यांना प्रथम गॉसिप कळत नाही म्हणून ते कंटाळतात. दूर्लक्ष करतात. मग हळूहळू नवे जूने होतात आणि गॉसिप करु लागतात किंवा किमान ते त्यांना समजू लागते. हे चक्र नेहमीप्रमाणे चालू असते. :)

--लिखाळ.

विसोबा खेचर's picture

10 Jul 2008 - 4:22 pm | विसोबा खेचर

मग हळूहळू नवे जूने होतात आणि गॉसिप करु लागतात किंवा किमान ते त्यांना समजू लागते. हे चक्र नेहमीप्रमाणे चालू असते.

हे बाकी खरं हो! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jul 2008 - 8:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोकांना गॉसिप आवडते, त्यात करमणूक होते. नव्यांना प्रथम गॉसिप कळत नाही म्हणून ते कंटाळतात. दूर्लक्ष करतात. मग हळूहळू नवे जूने होतात आणि गॉसिप करु लागतात किंवा किमान ते त्यांना समजू लागते. हे चक्र नेहमीप्रमाणे चालू असते.

वा लिखाळ साहेब, तुम्ही तर हवाच काढून घेतली या चर्चेतील !!!

जे आपल्याला कळत नाही, एकतर ते समजून घ्यावे किंवा सोडून द्यावे, लगेचच चर्चा प्रस्ताव टाकू नये.

सुचेल तसं's picture

10 Jul 2008 - 8:55 pm | सुचेल तसं

तुम्हां सगळ्यांच्या प्रतिक्रिया छान आहेत.

मी बर्‍याच आधी मनोगत आणि मायबोली वर फक्त वाचक ह्या भुमिकेत बरेच दिवस रमलो. मराठी लेख, कविता, विडंबनं वाचून मजा यायची. बर्‍याचदा वाटायचं की आपणही काहीतरी लिहावं. पण काही सुचतच नव्हतं. एका मित्राने मिपावर सभासद हो असे सुचवले. तो म्हणाला की हे संकेतस्थळ इतर संकेतस्थळांपेक्षा active आहे. मी जेव्हा मिपाला भेट दिली तेव्हा मला खरोखरच ते आवडलं. मी सभासद होऊन मिपावर माझं पहिलं लिखाण प्रकाशित केलं आणि त्याला सर्व सभासदांचे छान प्रतिसाद मिळाले. नंतर मनोगत व मायबोलीवर देखील ते प्रकाशित केलं. मनोगतवरचा अनुभवदेखील सुखद होता. मायबोलीवर मात्र मला थोडसं वेगळं चित्र दिसलं. तिथल्या काही सभासदांनी लेखावर अभिप्राय देण्याऐवजी हा लेख कथा कसा काय होऊ शकतो? स्वतःचा अनुभव कथा म्हणून छापलेला दिसतोय, वगैरे वगैरे... अशा प्रतिक्रिया दिल्या. अर्थात तिथेही काही चांगले प्रतिसाद मिळाले... नाही असं नाही. पण काही सभासदांचा हेतू मात्र जाणूनबुजून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न वाटला.

असो. मिपावर मला निश्चितच समाधान लाभते.

http://sucheltas.blogspot.com

अनिल हटेला's picture

11 Jul 2008 - 12:44 pm | अनिल हटेला

३ दिवसा नन्तर आज मिपा ला लॉग इन झालो....

इथला आक्खा काथ्याकूट वाचुन झाला ....

एक शब्द डोक्यात शिरला नाही....

माफ करा नेमका लोच्या काय हाये?

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~