पक्ष विचारधारा - साम्य आणि भेद

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
6 Apr 2013 - 12:41 pm
गाभा: 

अन्या दातार यांनी एका धाग्यावर (http://www.misalpav.com/comment/reply/24386/475028)
"भाजप विचारसरणी व काँग्रेस विचारधारा यात नेमका काय फरक आहे?"
हा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला प्रतिसाद म्हणून हा धागा केला आहे. प्रतिसाद खूप मोठा असल्याने धागा करणे योग्य वाटले. हा धागा किंवा हा विषय योग्य न वाटल्यास प्रशासकांनी धागा नष्ट करावा.
_______________________________________________________________________________

हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. याचे उत्तर खूपच अवघड आहे. काँग्रेस व भाजपची स्वतःची पक्षाची घटना आहे. इतर पक्षांची देखील स्वतःची पक्षघटना असेल.

भाजपची पक्षघटना खालील संकेतस्थळावर आहे.

http://www.bjp.org/images/pdf_2012_h/constitution_eng_jan_10_2013.pdf

त्यात खालील वाक्ये आहेत.

Objective

The party is pledged to build up India as a strong and prosperoud nation, which is modern, progressive and enlightened in outlook and which proudly draws inspiration from India's ancient culture and values and this is able to emerge as a great world power playing an effective role in the comity of nations for the establishment of world peace and a just international order.

The party aims at establishing a democratic state which guarantees to all citizens irrespective of caste, creed or sex, political, social and economic justice, equality of opportunity and liberty of faith and expression.

The party shall bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established and to the principles of socialism, secularism and democracy and would uphold the sovereignty, unity and integrity of India.

Basic Philosophy

Integral Humanism shall be the basic philosophy of the party.

Commitments

The party shall be committed to nationalism and national integration, democracy, Gandhian approach to socio-economic issues leading to the establishment of an egalitarian society free from exploitation, positive secularism, that is, 'Sarva Dharma Samabhav' and Value-based politics. The party stands for decentralisation of economic and political power.

भाजपच्या संकेतस्थळावर खालील परिच्छेद देखील आहेत.

BJP Philosophy : Hindutva (Cultural Nationalism)

Hindutva or Cultural Nationalism presents the BJP's conception of Indian nationhood, as explained in the following set of articles. It must be noted that Hindutva is a nationalist, and not a religious or theocratic, concept.

कॉंग्रेसची पक्षघटना खालील संकेतस्थळावर आहे.

http://www.aicc.org.in/Constitution%20FINAL%2012.6.08.pdf

काँग्रेसच्या पक्षघटनेत खालील वाक्ये आहेत.

Objective

The objective of the Indian National Congress is the well-being and advancement of the people of India and the establishment in India, by peaceful and constitutional means, of a Socialist State based on Parliamentary Democracy in which there is equality of opportunity and of political, economic and social rights and which aims at world peace and fellowship.

Allegiance to Constitution of India

The Indian National Congress bears true faith and allegiance to the Constitution of India as by law established and to the principles of socialism, secularism and
democracy and would uphold the sovereignty, unity and integrity of India.

पक्षघटना व पक्षाची तत्वप्रणाली हीच पक्षाची विचारधारा असे समजायला हरकत नाही. परंतु पक्षघटनेतले व तत्वप्रणालीतले हे शब्द, वाक्ये व परिच्छेद कितीही भारावून टाकणारे वाटले तरी प्रत्यक्षात पक्ष, पक्षाचे कार्यकर्ते व नेते हे त्यानुसार वागतात का आणि पक्षाची राबविलेली धोरणे ही पक्षघटनेला व पक्षाच्या तत्वप्रणालीला अनुसरून आहेत का यावरूनच पक्षाची खरी विचारधारा दिसून येते.

भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा पक्ष १९८० साली स्थापन झाल्यावर १९८९ पर्यंत या पक्षाचे अस्तित्व नगण्य होते (भाजपचा पूर्वीचा अवतार जनसंघ याचे अस्तित्व देखील शेवटपर्यंत नगण्यच राहिले). १९८५ साली भाजपचे फक्त २ खासदार निवडून आले, तर महाराष्ट्रात २८८ पैकी १६ आमदार, हि.प्र. मध्ये ६८ पैकी ३० आमदार व म.प्र. मध्ये ३२० पैकी ६४ आमदार इतकेच भाजपचे अस्तित्व होते. पण नोव्हेंबर १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून भाजपचे अस्तित्व जाणवायला लागले. १९८९ लोकसभेत भाजपचे ९० खासदार निवडून आले, तर १९९०/९१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने हि.प्र., राजस्थान, उ.प्र., म.प्र. या राज्यात बहुमत मिळविले. भाजपचे महाराष्ट्रात ४२, बिहारमध्ये ३९ व गुजरातमध्ये ६७ आमदार निवडून आले होते. त्यामुळे पक्ष विचारधारेचा विचार करताना भाजपचा विचार १९८९/९० पासून केला पाहिजे.

कॉंग्रेस जरी कागदोपत्री १२७ वर्षांचा जुना पक्ष असला तरी काँग्रेसमध्ये अनेक स्थितंत्यरे झाली. सर्वात मोठे स्थित्यंतर १९९१ मध्ये नरसिंहराव सत्तेवर आल्यावर झाले. काँग्रेसच्या विचारधारेवर विचार करताना १८८५ मध्ये स्थापनेच्या वेळी कोणत्या उद्देशाने काँग्रेस स्थापन केली होती किंवा १९४७ मध्ये काँग्रेसची विचारधारा कशी होती याचा विचार करण्यापेक्षा गेल्या १५-२० वर्षात या पक्षाची वाटचाल कशी चालू आहे हे बघणे जास्त योग्य ठरेल. त्यामुळे काँग्रेसची विचारधारा ही पण १९९१ पासून विचारात घेतली पाहिजे.

त्यामुळे दोन्ही पक्षांच्या विचारधारांची तुलना करताना पक्षघटनेत काय लिहिले आहे त्यापेक्षा हे दोन्ही पक्ष १९९० ते २०१३ या कालखंडात कसे वागले/वागत आहेत याचा विचार केला पाहिजे.

(१) काँग्रेसच्या पक्षघटनेत लोकशाही, सर्वधर्मसमभाव, समाजवाद, सर्वांचे कल्याण, सर्वांना समान हक्क, भारतीय राज्यघटनेशी बांधिलकी अशा अनेक आदर्श शब्दांची पेरणी आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर आजतगायत काँग्रेसने क्वचितच या शब्दांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली आहे. लोकशाहीऐवजी एकाधिकारशाही व घराणेशाही, सर्वधर्मसमभावाऐवजी देशहिताची पर्वा न करता चालू असलेले एका विशिष्ट धर्माचे लांगूललाचन, समाजवाद व सर्वाचे कल्याण करण्याऐवजी फक्त पक्षनेत्यांचे कल्याण, सर्वांना समान हक्काऐवजी आमदार्/खासदार व काही विशिष्ट व्यक्तींना (उदा. रॉबर्ट वड्रा) दिलेले विशेष हक्क, राज्यघटनेशी बांधिलकी पाळण्याऐवजी जेव्हा जेव्हा राज्यघटनेमुळे पक्षस्वार्थाला बाधा आली तेव्हा तेव्हा घटना डावलून व नवीन कायदे करून केलेली घटनेची पायमल्ली, पक्षांतर करून किंवा खासदार विकत घेऊन सत्ता टिकविणे . . . अशा इतिहास व वर्तमानामुळे काँग्रेसची खरी विचारधारा ही भ्रष्टाचार, गुन्हेगारी, स्वार्थासाठी देशाच्या हिताशी तडजोड, अतिरेक्यांच्या बाबतीत मऊ धोरण, निवडणुकीच्या तोंडावर जनतेला राखीव जागा/कर्जमाफी/स्मारके/नामांतर इ. सवंग घोषणांची अफूची गोळी देणे, या व अशा अनेक कृष्णकृत्यांशी संबंधित आहे.

(२) याच मुद्द्यांवर जर भाजपचा इतिहास पाहिला तर यातले काही दुर्गुण भाजपकडे देखील आहेत. जरी यातले काही दुर्गुण कमी प्रमाणात असले तरी भाजप त्यापासून पूर्णपणे मुक्त नाही. विशेषतः पक्षांतर्/आमदार विकत घेणे हे १९९७ मध्ये उ.प्र. मध्ये प्रकर्षाने दिसून आले होते. भ्रष्टाचारापासून देखील भाजप सर्वार्थाने मुक्त नाही. येडीयुरप्पा, रेड्डी बंधू किंवा नितीन गडकरी ही भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराची अलिकडील उदाहरणे आहेत. पण तुलनाच करायची तर भाजपच्या नेत्यांचा भ्रष्टाचार हा काँग्रेस नेत्यांच्या तुलनेत किस झाडकी पत्ती. हत्ती आणि मुंगी यांच्यात जितका फरक आहे तितकाच काँग्रेस व भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचारात फरक आहे.

या दोन्ही पक्षांची आर्थिक धोरणे व परराष्ट्र धोरण यात फारसा फरक नाही. दोन्ही पक्षांनी मुक्त आर्थिक धोरणाचा पुरस्कार करून त्या दिशेने कमीअधिक वेगाने पावले टाकली होती. दोन्ही देशांच्या परराष्ट्र धोरणातही अमेरिकेला मह्त्त्वपूर्ण स्थान आहे.

दोन्ही पक्षातला मुख्य फरक भारतांतर्गत राजकारणात आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यापूर्वीपासूनच मुस्लिम तुष्टीकरणाचे धोरण स्वीकारले व ते आजतगायत सुरू आहे. मुस्लिम मतांसाठी काँग्रेसने अनेक अन्यायकारक कायदे करून मुस्लिम स्त्रियांवर कायम अन्याय केला व समाजात दुही कायम राहील याचा यशस्वी प्रयोग केला. 'फोडा आणि झोडा' या ब्रिटिश नीतिचा काँग्रेसने यशस्वी प्रयोग केला. पण भाजपने मुस्लिम तुष्टीकरणाला स्थापनेपासूनच विरोध केला आहे. दुर्दैवाने समान नागरी कायदा आणणे किंवा मुस्लिम तुष्टीकरण कायद्याने थांबविणे हे भाजपला बहुमताअभावी करता आले नाही.

अतिरेक्यांविरूद्ध लढण्यासाठी भाजपने पोटासारखा कठोर कायदा करून अतिरेक्यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला होता, पण काँग्रेसने आपल्या लांगूलचालनाच्या धोरणाला अनुसरून हा कायदा रद्द केला.

घराणेशाही काँग्रेसमध्ये तळागाळापासून हायकमांडपर्यंत फोफावली आहे. पण भाजपमध्ये घराणेशाही अगदी तुरळक प्रमाणात आढळते.

इन्फ्रास्ट्रक्चर विकास, रस्तेबांधणी, इ. गोष्टींकडे काँग्रेसने सातत्याने दुर्लक्ष केले कारण हे न करता सुद्धा काँग्रेस प्रचंड बहुमताने सत्तेवर येत होती. पण भाजपने आपल्या ६ वर्षांच्या अगदी छोट्या सत्ताकाळात या रस्तेबांधणी, नदीजोड प्रकल्प, कृष्णा खोरे पाणी अडविणे प्रकल्प असे काही महत्त्वाचे प्रकल्प सुरू करून आपले वेगळेपण दाखवून दिले होते.

त्यामुळे दोन्ही पक्षांच्या विचारधारेतील साम्य व भेद याविषयी थोडक्यात लिहायचे तर, दोन्ही पक्षांची आर्थिक व परराष्ट्र धोरणे समान आहेत, पण देशांतर्गत राजकारणात दोन्ही पक्षात जमीनअस्मानाचा फरक आहे.

प्रतिक्रिया

नाना चेंगट's picture

6 Apr 2013 - 12:48 pm | नाना चेंगट

भाजप हा पुराणमतवादी असल्याचे आणि कॉग्रेस उदारमतवादी असल्याचे हल्लीच कुणीतरी सांगत होते.

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2013 - 1:01 pm | श्रीगुरुजी

>>> भाजप हा पुराणमतवादी असल्याचे आणि कॉग्रेस उदारमतवादी असल्याचे हल्लीच कुणीतरी सांगत होते.

समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, लोकजनशक्ती इ. पक्ष हे पुरोगामी पक्ष आहेत व मुलायमसिंग, लालू, पास्वान इ. नेते पुरोगामी आहेत हे देखील वृत्तपत्रातून छापून येते.

श्री गावसेना प्रमुख's picture

6 Apr 2013 - 1:32 pm | श्री गावसेना प्रमुख

पुरोगामीत्व म्हणजे काय रे भाउ

अर्धवटराव's picture

6 Apr 2013 - 1:46 pm | अर्धवटराव

त्यापेक्षा एकवेळ भाजप काँग्रेसपेक्षा कसा चांगला आहे असं शिर्शक हवं. काँग्रेसने कम्युनिस्टांचा प्रभाव रोखला, अणु तंत्रज्ञान भारतात आणलं, राष्ट्रीयत्वाची भावना दक्षीण भारतात रुजवली... आणि बरच काहि... हे सर्व. पक्षाचं धोरण म्हणुनच.

दलीत, आदीवासी, वगैरे मागास वर्गीयांना कुणीच न्याय देउ शकलं नाहि. तरुणाइला ईग्नोर केलं. सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतंत्र भारताच्या प्रगतीला अत्यावश्यक असे उत्तुंग आदर्श कुणीच देउ. शकलं नाहि.

अर्धवटराव

नाना चेंगट's picture

7 Apr 2013 - 11:03 pm | नाना चेंगट

>>काँग्रेसने कम्युनिस्टांचा प्रभाव रोखला

त्याने काही फारसा फायदा झाला नसावा. मार्क्सवादा (जो एक वेळ परवडला असता) ऐवजी माओवाद फोफावला. आणि मिळालेल्या यशाने कॉग्रेस (आणि तिची पिल्लावळ) फॅसिस्ट झाली.

कम्युनीस्टांची न्युसेन्स व्हॅल्यु फारशी वाढण्यापुर्वीच ति आटोक्यात आलि म्हणुन आपल्याला असं वाटतय. गरीबीच्या उदात्तीकरणाचा समाजवादी मुखवटा फाडणे सोपे गेले कारण तो नैतीकतेच्या वगैरे धाग्यांनी बनला होता. कम्युनीस्ट फिस्लॉसॉफी मात्र सामाजीक कार्यकारण भाव देऊन पटवता येते व ते भूत जर फार चढलं असतं तर पानटपरी काढण्या पलिकडे भारताची व्यापारीक मानसीकता कधिच नसती.

माओवाद मार्क्स्वादा"ऐवजी" फोफावला नाहि. किंबहुना भारताला माओवाद ठाऊकच नाहि... माओवादाच्या नावाने आज जे काहि उगवलय ते ऐच्छीक नसलं तरी अपेक्षीत होतं. प्रचंड वैविध्याच्या अपरिपक्व लोकशाहीत नाकर्त्या शासनाविरुद्ध हिंसक रक्तपात होणारच होता. ड्रॅगन, पाकाडे वगैरे हितचंतक आहेच मदतीला.

अर्धवटराव

नाना चेंगट's picture

8 Apr 2013 - 8:52 am | नाना चेंगट

हं. काही मुद्द्यांबद्दल सहमती तर काहींबद्दल असहमती.

>>पानटपरी काढण्या पलिकडे भारताची व्यापारीक मानसीकता कधिच नसती.

तसेही परंपरागत इकडचा माल तिकडे आणि तिकडचा इकडे म्हणजेच व्यापार, उद्योग, उद्योजकता अशीच आपली मानसिकता आहे. पूर्वी गाढव, घोडे, हत्ती यावरुन इकडे तिकडे नेऊन विकायचो, आता एका ठिकाणी बसून. मग त्याला पान टपरी म्हणा किंवा मॉल.

अर्धवटराव's picture

8 Apr 2013 - 6:59 pm | अर्धवटराव

खायची किंवा आंजा :)

अर्धवटराव

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2013 - 8:00 pm | श्रीगुरुजी

"त्यापेक्षा एकवेळ भाजप काँग्रेसपेक्षा कसा चांगला आहे असं शिर्शक हवं."

कोणत्याही निकषावर भाजप काँग्रेसच्या तुलनेत कधीही चांगला पक्ष आहे.

"काँग्रेसने कम्युनिस्टांचा प्रभाव रोखला, अणु तंत्रज्ञान भारतात आणलं, राष्ट्रीयत्वाची भावना दक्षीण भारतात रुजवली... आणि बरच काहि... हे सर्व. पक्षाचं धोरण म्हणुनच."

कम्युनिस्टांचा प्रभाव होता कधी? कम्युनिस्ट पक्ष कधीही प. बंगाल, केरळ व त्रिपुरा या तीन राज्यांच्या बाहेर गेला नाही. कम्युनिस्टांची सर्वात प्रभावी कामगिरी २००४ ते २००६ या काळात होती (२००४ च्या लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचे विक्रमी ६२ खासदार निवडून आले होते. २००६ मध्ये केरळमध्ये पुन्हा सत्ता मिळविताना त्रिपुरा व प. बंगालमधील आपली सरकारे टिकविली होती.). ही २-३ वर्षे वगळता भारतात कम्युनिस्टांचा फारसा प्रभाव कधीही दिसला नाही.

अणुतंत्रज्ञान हे काँग्रेसचे पक्षधोरण नव्हते. कोणतेही तंत्रज्ञान देशात यायला पक्षाची किंवा पक्षधोरणाच्या संमतीची आवश्यकता नसते. तसे असते तर आंतरजाल व चलभाष आणण्याचे श्रेय देवेगौडाकडे जाते कारण देवेगौडाच्या काळातच आंतरजाल व चलभाष सेवा भारतात सुरू झाली.

राष्ट्रियत्वाची भावना अजूनही दक्षिण भारतात तसेच जम्मू-काश्मिर सारख्या सीमावर्ती राज्यात रुजलेली नाही. याचे अगदी अलिकडील उदाहरण म्हणजे केवळ २ आठवड्यांपूर्वीच तामिळनाडू विधानसभेने एकमताने मंजूर केलेला 'तामिळ इलम'चा ठराव. सर्व राज्यांना राष्ट्रियत्वाच्या एका धाग्यात गुंतविण्याचे काँग्रेसचे कधीही धोरण नव्हते. याउलट विशिष्ट राज्यांनी स्वत:ची स्वायत्तता जपण्याचे कायदे करून काँग्रेसने त्या राज्यांना कायम उर्वरीत भारतापासून वेगळे ठेवले.

दलीत, आदीवासी, वगैरे मागास वर्गीयांना कुणीच न्याय देउ शकलं नाहि. तरुणाइला ईग्नोर केलं. सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतंत्र भारताच्या प्रगतीला अत्यावश्यक असे उत्तुंग आदर्श कुणीच देउ. शकलं नाहि.

"

अर्धवटराव's picture

6 Apr 2013 - 8:34 pm | अर्धवटराव

>>कोणत्याही निकषावर भाजप काँग्रेसच्या तुलनेत कधीही चांगला पक्ष आहे.
-- आय डाऊट, बट नो कमेण्ट्स.

>>या तीन राज्यांच्या बाहेर गेला नाही.
-- ते काँग्रेसमुळे. प्रसंगी लोकल मदत घेऊन (शिवसेना वगैरे).

>>अणुतंत्रज्ञान हे काँग्रेसचे पक्षधोरण नव्हते. कोणतेही तंत्रज्ञान देशात यायला पक्षाची किंवा पक्षधोरणाच्या संमतीची आवश्यकता नसते. तसे असते तर आंतरजाल व चलभाष आणण्याचे श्रेय देवेगौडाकडे जाते कारण देवेगौडाच्या काळातच आंतरजाल व चलभाष सेवा भारतात सुरू झाली.
-- कॉग्रेससारख्या पक्षात सरकार व पक्ष एकाच नौकेत बसतात. देवेगौडा त्यांच्या पक्षाच्या ताकतीवर प्र.म. बनले नाहि. आणि सरकार व पक्षधोरण वेगळे असतात म्हटलं तर काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप लावता येणार नाहि.

>>राष्ट्रियत्वाची भावना अजूनही दक्षिण भारतात तसेच जम्मू-काश्मिर सारख्या सीमावर्ती राज्यात रुजलेली नाही.
याचे अगदी अलिकडील उदाहरण म्हणजे केवळ २ आठवड्यांपूर्वीच तामिळनाडू विधानसभेने एकमताने मंजूर केलेला 'तामिळ इलम'चा ठराव.
-- द.भा.ची समस्या ज.का. पेक्षा वेगळ्या धाटाची आहे. दक्षीणेत राष्ट्रीय प्॑क्ष म्हणुन काँग्रेसने अस्तीत्व दाखवलं. आज घटकेला तामिळ्नाड्त ज्या समस्या आहेत त्या राष्ट्रीय पक्षाच्या अभावामुळे.

>> सर्व राज्यांना राष्ट्रियत्वाच्या एका धाग्यात गुंतविण्याचे काँग्रेसचे कधीही धोरण नव्हते. याउलट विशिष्ट राज्यांनी स्वत:ची स्वायत्तता जपण्याचे कायदे करून काँग्रेसने त्या राज्यांना कायम उर्वरीत भारतापासून वेगळे ठेवले.
-- राज्यांना जास्तीत जास्तीत स्वायत्तता देण्याबद्दल जो एकंदर घोळ देशात माजला त्याचा हा परिणाम. त्याला सर्वस्वी काँग्रेस जवाबदार नाहि.

अर्धवटराव

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2013 - 8:01 pm | श्रीगुरुजी

"दलीत, आदीवासी, वगैरे मागास वर्गीयांना कुणीच न्याय देउ शकलं नाहि. तरुणाइला ईग्नोर केलं. सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतंत्र भारताच्या प्रगतीला अत्यावश्यक असे उत्तुंग आदर्श कुणीच देउ. शकलं नाहि."

या वाक्यांशी सहमत आहे.

अन्या दातार's picture

6 Apr 2013 - 9:31 pm | अन्या दातार

कोणताही पक्ष एखादी "सिस्टीम/संघटना" म्हणून काय विचार करतो व धोरण म्हणून जे काही राबवू शकतो यात फरक असावा. कारण अनेकदा धोरणे नोकरशाही सत्ताधार्‍यांच्या गळी उतरवते/उतरवू शकते, जी पक्षविचारांशी सुसंगत असतीलच असे नाही.

ऋषिकेश's picture

8 Apr 2013 - 11:58 am | ऋषिकेश

तुलना म्हणून रोचक आहे.
निष्कर्ष फारसे पटले नाहित.. असो.

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2013 - 12:41 pm | श्रीगुरुजी

>>> कम्युनीस्टांची न्युसेन्स व्हॅल्यु फारशी वाढण्यापुर्वीच ति आटोक्यात आलि म्हणुन आपल्याला असं वाटतय. गरीबीच्या उदात्तीकरणाचा समाजवादी मुखवटा फाडणे सोपे गेले कारण तो नैतीकतेच्या वगैरे धाग्यांनी बनला होता. कम्युनीस्ट फिस्लॉसॉफी मात्र सामाजीक कार्यकारण भाव देऊन पटवता येते व ते भूत जर फार चढलं असतं तर पानटपरी काढण्या पलिकडे भारताची व्यापारीक मानसीकता कधिच नसती.

माओवाद मार्क्स्वादा"ऐवजी" फोफावला नाहि. किंबहुना भारताला माओवाद ठाऊकच नाहि... माओवादाच्या नावाने आज जे काहि उगवलय ते ऐच्छीक नसलं तरी अपेक्षीत होतं. प्रचंड वैविध्याच्या अपरिपक्व लोकशाहीत नाकर्त्या शासनाविरुद्ध हिंसक रक्तपात होणारच होता. ड्रॅगन, पाकाडे वगैरे हितचंतक आहेच मदतीला.

काँग्रेस व भाजपच्या विचारधारेबद्दल लिहिल्यानंतर डाव्या पक्षांच्या विचारधारेबद्दल लिहायलाच हवे.

खालील संकेतस्थळावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची घटना आहे.

http://eci.nic.in/eci_main/mis-Political_Parties/Constitution_of_Politic...

येथे खालील परिच्छेद आहेत. यातील काही वाक्ये खूपच इंटरेस्टिंग आहेत.

AIM

The Communist Party of India (Marxist) is the revolutionary vanguard of the
working class of India. Its aim is socialism and communism through the
establishment of the state of dictatorship of the proletariat
. In all its activities the Party is guided by the philosophy and principles of Marxism-Leninism which shows to the toiling masses the correct way to the ending of exploitation of man by man, their complete emancipation. The Party keeps high the banner of proletarian internationalism.

Party Pledge

Every person joining the Party shall sign the Party Pledge. This Pledge shall be:
“I accept the aims and objectives of the Party and agree to abide by its
Constitution and loyally to carry out decisions of the Party.

“I shall strive to live up to the ideals of communism and shall selflessly serve the working class and the toiling masses and the country, always placing the
interests of the Party and the people above personal interests.”

डाव्या पक्षांमध्ये इतर पक्षांप्रमाणे अध्यक्ष नसतो. त्याऐवजी पॉलिट ब्यूरो नावाचा एक गट (सामूहिक नेतृत्व) पक्षाचे नियंत्रण करतो.

Principles of Democratic Centralism
1.

The structure of the Party is based on, and its internal life is guided by, the
principles of democratic centralism. Democratic centralism means centralised
leadership based on inner-Party democracy under the guidance of the
centralised leadership. In the sphere of the Party structure, the guiding principles of democratic centralism are:
(a) All Party organs from top to bottom shall be elected;
(b) The minority shall carry out the decisions of the majority; the lower Party
organisations shall carry out the decision and directives of the higher
Party organs, the individual shall subordinate himself to the will of the
collective. All Party organisations shall carry out the decisions and
directives of the Party Congress and of the Central Committee.

पक्षघटनेत जे काय लिहिले आहे त्याचा व डाव्या पक्षांच्या आजवरच्या वर्तनाचा फारसा संबंध नाही. डावे पक्ष हे कायम गोंधळलेल्या अवस्थेतच राहिले. त्यांनी अनेक ऐतिहासिक घोडचूका केल्या व चुका केल्यानंतर अनेक दशकांनंतर 'त्यावेळी आपण चूक केली होती' ही त्यांना उपरती झाली. नेताजी सुभाषचंद्र बोसांना विरोध करणे, १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केल्यावर चीनच्या आक्रमणाचे स्वागत करणे व नंतर ते 'आक्रमण' होते का 'अतिक्रमण' होते याविषयी माथेफोड करणे, अमेरिकेला आंधळा विरोध करणे या व अशा अनेक घोडचुका कम्युनिस्टांनी केल्या. त्यांच्या घोडचुकांचे गंभीर परिणाम भारताला व विशेषतः प. बंगालला भोगावे लागले आहेत. लक्षावधी बांगलादेशी घुसखोरांना उत्तेजन देऊन त्यांना बेकायदा शिधापत्रिका देऊन त्यांची घुसखोरी कायदेशीर करण्याचे महापाप कम्युनिस्टांचेच आहे. प. बंगालमध्ये औद्योगिक विकास ठप्प करण्याचे श्रेय देखील त्यांचेच. मुस्लिमांचे लांगूलचालन, हिंदूत्वाला विरोध, अमेरिकेला आंधळा विरोध, भारताचा शत्रू असलेल्या चीनशी चुंबाचुंबी या व अशा अनेक घटनांमुळे डावे पक्ष भारताच्या बहुसंख्य राज्यात कधीच रूजू शकले नाहीत व इथल्या जनतेशी त्यांची नाळ कधीही जोडली गेली नाही. पोथीनिष्ठ डावे पक्ष बहुसंख्य भारतीय जनतेला कायमच परके वाटत आले व त्यामुळे त्यांची वाढ एका मर्यादेपलिकडे कधीही झाली नाही. राज्यांत काँग्रेसला कट्टर विरोध व केंद्रात काँग्रेसला पाठिंबा अशी परस्परविरोधी भूमिका घेताना डाव्यांना कधीही खंत वाटली नाही. एक मात्र मान्य करावेच लागेल की इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेत डाव्या पक्षांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

त्यामुळे डाव्या पक्षांची विचारधारा म्हणजे पक्षघटनेत काय लिहिले आहे ते नसून, अमेरिकेला आंधळा विरोध, गुंडगिरी व हुकूमशाही, औद्योगिकरणाला विरोध, भारताच्या शत्रूंशी हातमिळवणी व काळानुसार न बदलणे अशीच डाव्या पक्षांची खरी विचारसरणी आहे.

चौकटराजा's picture

9 Apr 2013 - 9:16 am | चौकटराजा

१९५२ ते २०१३ पर्यंत बघितलं तर १९९१ नंतर प्रगतीचा वेग वाढला आहे हे नक्की पण त्याच वेगाने सामान्य माणसाचे काही प्रश्न जटील होत चालले आहेत.उदा वैद्यकीय खर्च , शिक्षण,घर ,वीज, पाणी ई. काही तुरळक अपवाद वगळता एकाही पंतप्रधानाने भारतात गव्हर्नन्स आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे योजनांचा हवा तसा फायदा सर्वाना न मिळता राजकीय पुढारी व त्यानी सांभाळलेले वा त्याना सांभाळणारे उद्योजकच श्रीमंत झाले आहेत. आपल्या प्रधानमंत्र्याने काही क्रांतिकारी करायचे ठरवले तर तो टिकेल का त्या खुर्चीवर अशी प्रत्येक प्रधानमंत्र्यास भिती वाटत असल्याने कदाचित आजचा दिवस ढकलला अशी प्रवृती त्या खुर्चीवरही दिसून आलेली आहे.
कांग्रेस ही एक राजकीय जात आहे. त्यात पक्षांतरर्गत निवडणुका गुप्त मतदानाने होत नाहीत. विशीष्ट घराण्याच्या नावलौकिकावर अवलंबित्व आहे.त्याला अल्पसंख्याकांचे लांगूलचालन डोळ्यावर यावे इतकी करण्याचे संवय आहे. साखर कारखाने , दूध सोसायट्या, खरेदी विक्री संघ , जिल्हा सह बॅका , ई त्याची राजकारणात जम बसविण्याची ठिकाणे आहेत.
वरील जातीची काही वैशिष्टे भाजपाने स्वीकारलेली आहेत. त्या प्रमाणात त्याना यश येत चालले आहे.
कांग्रेस हा भाजपचा राजकीय गुरु आहे. निदान जनसंघाच्या वेळी असे नव्हते.