होळी स्पेशल रबडी

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
26 Mar 2013 - 5:44 am

सर्व मिपाकरांना होळीच्या अनेक शुभेच्छा :)

.

व्हिडियो पाककृती:

साहित्य:

१ लिटर दूध
४-५ टेस्पून साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
१ टेस्पून दूध मसाला ( ह्यात जायफळपूड, वेलचीपूड,थोडे केशर व सुक्या-मेव्याची पूड असते.तुम्ही हवे असल्यास सगळे वेग-वेगळे घालू शकता)
सजावटीसाठी पिस्त्याचे काप
चिमूट्भर केशर
चांदीचा वर्ख (ऐच्छिक)

.

पाकृ:

एका नॉन-स्टीक भांड्यात दूध मंद आचेवर गरम करायला ठेवावे.
दूधाला उकळी येऊन वर साय जमा व्ह्यायला लागली की , चमच्याने सायीला भांड्याच्या कडेला लावत जावे.
जेव्हा-जेव्हा साय दूधावर यायला लागेल तसे-तसे ती कडेला लावावी.
आच मंदचं असावी नाहीतर साय करपेल.
दूध बर्‍यापैकी आटले असे वाटले की कडेची साय हळू-हळू चमच्याने काढून दुधात मिसळावी.
त्यात दूध-मसाला घालून अजुन थोडे आटवून घ्यावे.
दूधाला दाटपणा आला की त्यात थोडी-थोडी करुन साखर मिक्स करुन घ्यावी.
गॅस बंद करून रबडी पूर्ण गार होऊ द्यावी, गार झाल्यावर रबडी जरा घट्ट वाटेल.
सर्व्हिंग बाऊलमध्ये रबडी घ्यावी व त्यावर पिस्त्याचे काप घालावे.
चिमूटभर केशर व चांदीचा वर्ख लावून घ्यावे.

.

ही रबडी तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा जिलेबी, मालपुव्याबरोबर सर्व्ह करु शकता.

.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 Mar 2013 - 8:34 am | प्रचेतस

जबरी..........
सकाळी सकाळी अत्याचार आहेत हे.

अक्षया's picture

26 Mar 2013 - 4:25 pm | अक्षया

आवडता पदार्थ.
बाकी प्रतिक्रीया नेहमीप्रमाणेच :)

दिपक.कुवेत's picture

26 Mar 2013 - 4:31 pm | दिपक.कुवेत

पाकॄ पण सोपी आहे. नक्कि करुन बघेन. पण रबडी आणि बासुंदि मधे काय फरक असतो?

सर्व मिपाकरांना होळिच्या हर्दिक शुभेच्छा!

ओ दिपकराव अहो अजुन रबडी चाखली नाहीत ! स्वर्ग सुखाला अजुन वंचित कसे राहिलात? म्हणतो मी.

दिपक.कुवेत's picture

26 Mar 2013 - 4:41 pm | दिपक.कुवेत

अरे काय करु? उत्तम रबडी तर दुरच पण खरच चव अजुन अशी चाखलीच नाहि :)

(फोटो पाहिल्यापासुन रबडीचा चाहता) दिपक

मदनबाण's picture

26 Mar 2013 - 4:33 pm | मदनबाण

घरी जाउन पहावे लागणार ! हापिसात हा इमोशल अत्याचार आता सहन होइनासा झाला आहे. ;)
अवांतरः-स्वप्निलराव फोटो एडिट करताना ब्लर टुलचा सुयोग्य वापर करतात असे वाटते.

(रबडी प्रेमी) :)

सानिकास्वप्निल's picture

26 Mar 2013 - 4:54 pm | सानिकास्वप्निल

पाकृंचे फोटो मीच काढते ओ आणी ह्यात ब्लर टुलचा वापर केला नाहीये फक्त झूम घेतलाय
स्वप्निल फक्त व्हिडियो चे काम करतो व पदार्थ खातो ;)

पाकृंचे फोटो मीच काढते ओ आणी ह्यात ब्लर टुलचा वापर केला नाहीये फक्त झूम घेतलाय
व्होक्के. :) शेवटचा फोटु पाहुन मला उगाच तसे वाटले.पाकॄ करण्या बरोबरच फोटो सुद्धा अगदी भारी काढता.:)

पिंगू's picture

26 Mar 2013 - 4:43 pm | पिंगू

सोपी आहे बनवायला. उद्या प्रयत्न करुन बघतो.

धनुअमिता's picture

26 Mar 2013 - 4:48 pm | धनुअमिता

तोंपासु. खुप छान दिसत आहे.

प्यारे१'s picture

26 Mar 2013 - 4:52 pm | प्यारे१

मस्तच...!

पैसा's picture

26 Mar 2013 - 4:53 pm | पैसा

नेहमीप्रमाणे जबरदस्त पाकृ!

स्मिता.'s picture

26 Mar 2013 - 5:08 pm | स्मिता.

काय जीवघेणा प्रकार आहे हा! काश हे फोटो दिसलेच नसते तर.... ;)

गणपा's picture

26 Mar 2013 - 5:27 pm | गणपा

होळीची लाकडं पेटलेली आहेतच.
ठेवा मला त्यावर.

वा वा वा... एकदम मस्त पाकृ आणि फोटो सुद्धा... सकाळीच आजच्या होळिची पुरणपोळीची फर्माईश झाली आहे ;) .... पण आता तेवढा वेळ नाही त्यामुळे हे करुन देते. :D

सुरेख पाकृ! आमच्या डोळ्यांवर अत्याचार करणार्‍या सानिकेस होळीपोर्णीमेच्या शुभेच्छा!

रबडी बघूनही लगेच प्रतिक्रिया दिली गेली नाही. रबडी झकास!! सानिका होळीच्या शुभेच्छा!!

तिमा's picture

26 Mar 2013 - 6:22 pm | तिमा

रबडी हा माझा आवडता पदार्थ आहे. तो मी कशाबरोबरही लावून खात नाही. कारण तो नुसताच चमच्याने तोंडात घोळवत घोळवत खाण्याचा पदार्थ आहे अशी माझी समजूत आहे. डायबिटिस नसल्यामुळे मी तो यथेच्छ हादडू शकतो.
रबडी म्हणजे घट्ट बासुंदी!
पा.कृ.पेक्षा प्रेझेंटेशनला साष्टांग दंडवत.

अर्धवटराव's picture

26 Mar 2013 - 9:23 pm | अर्धवटराव

रबडी, रबडी-जिलेबी... अलम दुनियेत जन्नत म्हणुन कहि असेल तर ते केवळ बल्लवाचार्यांच्या स्वयंपाकघरात.
खल्लास.

अर्धवटराव

रेवती's picture

27 Mar 2013 - 2:05 am | रेवती

सहमत.
देवाऽऽ, मला पुढच्या जन्मी स्वप्निल कर, सानिका मात्र तशीच राहू दे! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

26 Mar 2013 - 10:15 pm | अत्रुप्त आत्मा

होली है भाइ होलि है
रबडी मिठी गोली है!

ए ढिशक्यांव ढिशक्यांव ढिशक्यांव... ;-)
आज आत्मा तृप्त जाहला :-)

अभ्या..'s picture

27 Mar 2013 - 2:44 am | अभ्या..

माऊली _______/\_________दंडवत घे बै
होळी गोग्गोड केलीस अगदी.

स्पंदना's picture

27 Mar 2013 - 5:45 am | स्पंदना

रबडी रबडी!!

धमाल मुलगा's picture

27 Mar 2013 - 7:22 am | धमाल मुलगा

जागच्या जागी खपलो आहे. प्रभ्या, असुर्‍या अन मेव्या ह्यांना निरोप कळवा, समाधीच्या कामाला लागा म्हणून. :)

एकदम आमच्या दिल्लीच्या दिवसांची याद दिलवून दिली यार तुम्हीतर! एका खोपच्यातला तो कन्नु हलवाई शोधला होता...रोज सकाळी देवदर्शनाला जावं तसं त्याच्या दुकानापुढं जाऊन उभं रहायचो आम्ही चारही मित्र आणि मग, एका द्रोणात रबडी, दुसर्‍या द्रोणात गरमागरम जिलेबी...हाण्ण तिच्यायला! दिवसाची सुरुवातच अशी दणकेबाज गोड होऊन जायची. :) साला...तेव्हापासून ह्या रबडीनं काळजात घर केलंय राव. कोणा अनोळखी माणसानं जरी विचारलं, "रबडी देऊ का?" तर मी भिकार्‍यासारखा लगालगा मुंडी डोलावत त्याच्या मागोमाग जाईन अशी गत आहे. :)

काल अगदी अश्शीच रबडी झाली आमच्याकडे :)
फक्त त्यात तुपात खरपूस भाजलेल्या शेवया सुद्धा घातल्या होत्या..... ;)

स्वाती दिनेश's picture

27 Mar 2013 - 2:20 pm | स्वाती दिनेश

सुंदर!फोटो आणि पाकृ दोन्ही..
स्वाती

पियुशा's picture

28 Mar 2013 - 9:40 am | पियुशा

मार डाला ! ! मस्त ग सानिके ,अपुन तेरे पाक्रु आउर प्रेझेन्टॅशन दोनो पर फिदा हय ;)

कच्ची कैरी's picture

28 Mar 2013 - 12:45 pm | कच्ची कैरी

छान पाककृती आणि झक्कास सजावट !!!
अवांतर - बाजुला रांगोळीचे रंग वापरले आहेत वाटतं :)

नि३सोलपुरकर's picture

28 Mar 2013 - 5:15 pm | नि३सोलपुरकर

जबरदस्त पाकृ आणी सादरीकरण.
क्लास.

पण दिपकरावांचा प्रश्न अनुत्तरितच राहिला.

सानिकास्वप्निल's picture

28 Mar 2013 - 6:02 pm | सानिकास्वप्निल

बासुंदी व रबडी बनविण्याची पध्दत साधारण सारखीच.
बासुंदीला दूध मंद आचेवर आटत ठेवावे लागते व उलथण्याने सारखे ढवळावे लागते जेणेकरुन वर साय धरणार नाही.
रबडीसाठीही दूध मंद आचेवर आटत ठेवावे लागते आणी वर धरणारी साय जमा करुन त्यात मिक्स करावी लागते.
बासुंदी बदामी/गुलाबीसर दिसते व दाट असते.(हल्ली कंडेन्सड मिल्क वापरुन इंस्टंट बासुंदी ही बनवतात)
रबडी घट्ट, सायीसकट, थलथलीत टेकस्चर असणारी असते.

सर्वांचे आभार :)

सूड's picture

28 Mar 2013 - 7:40 pm | सूड

मस्त पाकृ.