नमस्कार मंडळी,
काहि गोष्टि जशा ठरवुन होत नाहि तसाच ह्या पाकॄ बाबतीत झालं. बच्चु करिता आणलेलं दुध नासलं. नासकोणी (नासलेल्या दुधात गुळ किंवा साखर घालुन करतात तो प्रकार) मला फारसं आवडत नाहि. म्हणुन जरा माझं डोकं (?) चालवुन खालील पाकॄ केली. अनायसे सर्व साहित्यहि घरात उपलब्ध होतं.
पाकॄ वाचल्यावर कदाचीत तुम्हि म्हणाल हे देवा.....याने फिरुन परत पनीर आणलच पण एक स्टफिंग विदाउट पनीर पण आहे. आशा आहे गोड मानुन घ्याल :D
साहित्यः
१. किसलेलं पनीर - १.५ वाटि (ताजं किंवा आपले नेहमीचे अमुलचे फ्रोजन क्युब्स)
२. पीठिसाखर - आवडिप्रमाणे कमी / जास्त
३. डेसीकेटेड कोकोनट - पाव वाटि
४. खजुर - १० ते १२ (बीया काढुन)
५. खायचा रंग - आवडिप्रमाणे कुठलाहि
६. भाजलेले तीळ - २ चमचे
प्रकार १ स्टफिंगसाठि:
१. पिस्ता / बदाम / काजु भरड पुड - २ चमचे प्रत्येकि
२. बाकि सुका मेवा असल्यास - उदा. ड्राय प्लम, अंजीर ई.
२. पीठिसाखर - आवडिप्रमाणे कमी / जास्त
३. दुध
प्रकार २ स्टफिंगसाठि:
१. क्रिम चीज - २ चमचे (मी फिलाडेल्फिया वापरलयं. आपण आपल्या आवडिच वापरु शकता)
२. मध - २ चमचे (आवडिप्रमाणे कमी/जास्त)
३. भरडसर वाटलेले अक्रोड- एक ४ ते ५
४. दालचीनी पुड - पाव चमचा
कॄती:
१. अमुलचे फ्रोजन क्युब्स वापरणार असाल तर ते थोडया वेळ गरम पाण्यात ठेवा म्हणजे मउ होतील. मउ झाले कि किसुन घ्या किंवा हातानी कुस्करुन घ्या.
२. आता एका भांडयात/बाउल मधे किसलेल पनीर घ्या आणि हळुवार हातानी रगडत रहा.....अगदि पार पनीरचा पॄष्ठभाग स्मुथ/गुळगुळित होईस्त.....एक साधारण १०-१२ मि.
३. आता त्यात आवडिप्रमाणे पिठिसाखर आणि आवडता रंग घालुन परत एकदा मळा. एक ५-७ मि. मिश्रणाचा गोळा होईल. पनीरमधे पीठीसाखर ह्या बेताने घाला कि अंतीम रोल्स अती गोड होणार नाहि कारण स्टफिंग मधेहि पीठिसाखर आहे.
४. खजुराच्या बीया काढुन घ्या
रोल्स प्रकार १:
१. स्टफिंगसाठिचं सर्व साहित्य एकत्र करा. त्यात आवश्यकतेनुसार दुध घालुन (१ ते १.५ चमचा) त्याचा गोळा करा. आता ह्या गोळ्याचे छोटे छोटे भाग करुन पोकळ खजुरात स्टफ करा. मिश्रण हलक्या हाताने दाबुन भरा म्हणजे बाहेर येणार नाहि.
२. आता पनीरचा थोडा मोठा गोळा हातावर घेउन पसरा. त्यात अलगद स्टफ केलेला खजुर ठेवा. बाजुच्या सर्व कडा एकत्र करुन लंबगोलाकार वळा. डेसीकेटेड कोकोनटड मधे हा गोळा घोळवुन बाजुला ठेवा
रोल्स प्रकार २ (पनीर वगळुन):
१. एका बाउल मधे क्रिम चीज, मध, दालचीनी पावडर, भरडसर वाटलेले अक्रोड एकत्र करुन फेटुन घ्या
२. आता हे फेटलेल मिश्रण पोकळ खजुरात अलगद स्टफ करा
३. वरुन मधल्या भागात भाजलेले तीळा भुरभुरा
५. दोन्हि प्रकारचे खजुर रोल्स फ्रिज मधे एक १५-२० मि. सेट झाले कि सर्व करा :)
६. दुस~या दिवशी खाणार असाल तर सर्व करण्याआधी एक १०-१५ सेकंद मायक्रोव्हेव मधे गरम करा.
प्रतिक्रिया
21 Mar 2013 - 12:08 pm | प्रचेतस
अहाहाहाहाहा..........
लाजवाब प्रेझेंटेशन.
21 Mar 2013 - 12:10 pm | अक्षया
नेहमी प्रमाणेच वेगळी आहे.
मस्तच.
21 Mar 2013 - 12:41 pm | वैशाली हसमनीस
मस्त चव लागत असेल .छान पा.क्रू.
21 Mar 2013 - 12:45 pm | हारुन शेख
पनीरमध्ये असणारे व्हे प्रोटीन, खजुरातले आणि अंजिरातले लोह आणि डाएटरी फायबर्स, तीळ,बदाम आणि अक्रोडमधले ओमेगा ३ फॅटी अॅसिडस, हे एकदम आरोग्यदायी डेझर्ट दिसतेय. आणि काय पण छान दिसतंय !! लाजवाब.
21 Mar 2013 - 12:47 pm | कच्ची कैरी
धागा उघडण्याआधीच यात पनीर असेल याची खात्री होती :) बाकी पाककृती छान !
21 Mar 2013 - 1:47 pm | धनुअमिता
नेहमीप्रमाणे छान आहे पाकृ आणि फोटो
21 Mar 2013 - 2:15 pm | अनन्न्या
बाकी यासाठी एक म्हण आहे, म्हणजे एक वस्तू फुकट जाते ती वापरात आणायला लागणारा मसालाच महाग!! रागावू नका.
तुमच्या कलप्नाशक्तीला सलाम!!
21 Mar 2013 - 3:34 pm | दिपक.कुवेत
अनन्न्या....हे म्हणजेच चार आण्याची कोंबडि आणि बारा आण्याचा मसाला.
21 Mar 2013 - 3:05 pm | Mrunalini
मस्तच... मला पण माहितच होते.. ह्यात पनीर असणार म्हणुन. ;) :D
21 Mar 2013 - 3:24 pm | ज्योति प्रकाश
फोटू व पा़कृ मस्तच नक्की करून बघेन.
21 Mar 2013 - 3:36 pm | nishant
काय दिसतायत ते रोल्स..पटकन उचलुन तोंडात टाकावासा वाटतोय.. :)
तुम्हि मि.पा चे पनीर स्पेशलिस्ट आहात हे नक्कि !! ;)
21 Mar 2013 - 3:37 pm | अत्रुप्त आत्मा
आं.............!!! इतना अच्छा अच्छा रेशिपी काय कू बनाते तुम???

हमकू अत्ताच्या अत्ता खानेकू पायजे...
21 Mar 2013 - 4:09 pm | सानिकास्वप्निल
छान पाकृ व फोटो :)
21 Mar 2013 - 4:13 pm | प्यारे१
पनीरवाले बाबा... दीपक बाबा! ;)
छान आहेत रोल्स!
21 Mar 2013 - 5:23 pm | पिंगू
दिपकशेठ, किती गोड खिलवाल... ह. घ्या.
बाकी पाककृती लाजवाब..
21 Mar 2013 - 6:26 pm | दिपक.कुवेत
आता पुढली रेसीपी हि नक्कि विदाउट पनीर....आपण शबुत देतो :D
@ पिंगू: अहो गोड मिपाकरांसाठि गोड पाकॄ :)